||ब्रम्ह चैतन्य महाराज दर्शन द्या,महाराज दर्शन घडवा||

Submitted by विनायक. दि.पत्की. on 3 June, 2013 - 08:02

||श्री||
||जय श्रीराम||
maharaj.PNG||ब्रम्ह चैतन्य महाराज दर्शन द्या,महाराज दर्शन घडवा||
महाराज मी तुम्हाला, शरण आलो.
अन्यन्य तेने आता, तुमचाच झालो.
हा देह हि केला, तुम्हास अर्पण.
तुम्ही पूर्ण करून घ्यावे, माझे समर्पण.||१||
तुम्ही आम्हाला, देता ज्ञान.
तेव्हाच कळले आम्हाला, आमुचे अज्ञान.
तळाशी आमच्या ज्ञानाच्या, आहे देह बुद्धी.
त्या अनुशांघाने झाली, विकाराची वृद्धी.||२||
अमुल्य वेळ आणिक, अनेक संपत्ती.
व्यर्थ दडवून ओढवली, आता आपत्ती.
अध्यात्माचा आमुचा, पाया आहे कच्चा,
दोष निवारून गुरुराया, करावा पक्का.||३||
हे ओझे बिनकामी, घेऊन फिरतो आम्ही
उतरावयास प्रभो, सत्वर धावा तुम्ही.
प्रभो तुम्ही आम्हाला, ज्ञानी करा.
मागणे हेच आता, त्वरा करा.||४||
तव चरणाचे सानिध्य,लाभले खास,
तव ह्र्दयस्थ जानकीचा,आहे मी दास.
ब्रम्हांडाचे नारायण, प्रभू श्रीराम.
वसले तव ह्रदयी ऐकून गोड नाम.||५||
समस्त देवतांची जननी, आदिशक्ती,
वसते तव हृदयी, धन्य तुमची भक्ती.
प्रभो झाली मनोमन, एक इच्छा.
तुम्ही प्रगट व्हावे, हि आहे सदिच्छा.||६||
आता तुम्ही करवून घ्यावी, उत्कृष्ट साधना.
नामस्मरण,सत्संगती ची, वाढावी भावना.
अन्नदान हि घडावे,मी पण सोडावे.
अनुसंधानाने उत्कृष्ट ते जोडावे.||७||
बंधन सत्वर तोडा, देहबुद्धीच्या पाशांचे.
प्रगटोनी घडवा, दर्शन समस्त देवतांचे.
जीवनहे आता जाऊ नये व्यर्थ
प्रभो जीवन हे तुम्ही करावे सार्थ.||८||
[[ श्री राम जय राम जय जय राम ]]

Group content visibility: 
Public - accessible to all site users