मुंबई मध्ये लॉज ची सोय

Submitted by हिरकणी on 28 May, 2013 - 18:58

नमस्कार मायबोलीकर्स,

मला मुंबई मध्ये चांगल्यापैकि लॉज ची सोय सुचवा please.

या वेळी अमेरिकेतुन मुंबई मधे गेल्यावर , नेहेमीप्रमाणे विमान्तळावरुन लगेचच पुण्याला न जाता, आम्हाला काही कामासाठी एक दिवस मुंबई मधे रहावे लागणार आहे.
मुलेही बरोबर आहेत. तर विमान्तळापासुन बर्यापैकी जवळ असा लॉज सुचवा.

१) स्वच्छ असावे. २ मुले आणि आम्ही नवरा बायको यांना पुरेसे मोठे rooms/beds असावेत.
२) सुरक्शित असावे.
३) तिथे विमान्तळा वरुन रात्री १ च्या सुमारास जाणे सुरक्शित आणि सोयिस्कर असावे. कसे जायचे आणि किती लांब आहे ते ही सांगा.आम्हाला मुंबई ची फार महिती नाही.
४) दर काहिच्या काहि महाग नसावेत. असे लॉज सध्या काय रेट पडेल ?

मुंबई मधे सध्या कुणी नातेवाइक नाहीत आणि आतापर्यंत कधी ही माहिती लागली नाही.गुगल वर मिळतात ते लॉज सुरक्शित आहेत का हे माहित नाही आणि रेट योग्य आहेत की नाही काहिच कळत नाही.

सर्वांना धन्यवाद.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

पार्ले स्टेशनसमोर रामकॄष्ण नावाचे हॉटेल आहे. त्याच्या मागे त्यांचेच हॉटेल आहे. त्यांची एअरपोर्ट ड्रॉप सर्व्हीस आहे. ( मला त्यांचा चांगला अनुभव आहे. ) दोन्ही एअरपोर्ट्स पासून फारसे लांब नाही. एका दिवसाचे ५/६ हजार रुपये असतील.

एअरपोर्ट जवळची स्टार रेटींग नसलेली हॉटेल्स, कुटुंबासाठी सुरक्षित नाहीत. तिथे अवैध धंदे चालतात. यायच्या
आधी बुकिंग केले तर छान.
सहार एअरपोर्टच्या प्रीपेड टॅक्सी बुकिंग काऊंटर जवळच हॉटेल बुकिंग काऊंटर आहे.
रात्री १ ला उतरलात तरी बाहेर पडायला २/३ वाजतील. अशावेळी एअरपोर्टच्या बाहेरच थांबा. तिथे खायची / बसायची सोय आहे, टॉयलेटस पण आहेत. साधारण उजाडले कि बाहेर पडा.

हॉटेल शुभा अगदी नवीन आहे. कोहिनूर कॉनटीनेणटल जुने आहे. डोमेस्टिक एयरपोर्ट च्या आसपास चिक्कार हॉटेल्स आहेत. जस्ट डायल वर टाकून बघा . खूप सापडतील Happy

रात्री १ ला उतरलात तरी बाहेर पडायला २/३ वाजतील.
------ असा विलम्ब आधी नियमीत व्हायचा.... मागच्या वेळेला मी ३ तास कस्टम्स सोपस्कारासाठी राखुन ठेवले होते आणि बाहेर केवळ ३० मी आलो.

कस्टमस चे सोपस्कार आणि एकन्दर कारभारात खुप सुसुत्रता आलेली आहे (असे वाटते) त्यामुळे कामाची efficiency वाढली असेल.

हिरकणी यान्च्या सारखाच मला पण प्रश्न आहे पण मला मुम्बई (CST) जवळ काही तास रहाण्यासाठी लॉज हवा आहे. २६ तासापेक्षा जास्त प्रवास करुन काही तासातच गाडी पकडायची आहे पण ४ तास पाठ टेकवायला आणि पुढील रेल्वे प्रवासा करता ताजे होण्यासाठी स्वच्छ, सुरक्षीत असे स्थान सुचवाल का?

CST ला रेल्वे रिटायरिन्ग रुम हा माझा शेवटचा पर्याय आहे.

हिरकणीजी,
तुम्ही नेहमीप्रमाणे वगैरे लिहले आहे त्यावरुन अंदाज बांधतो की पुण्यात तुमची रहायची सोय आहे.... मग असे असताना सगळा कुटुंबकबीला घेउन कुठेतरी लॉजवर रहाण्यापेक्षा तडक पुण्यात येउन दुसर्‍या दिवशी कामपुरते मुंबईला जाउन येणे जास्त सोयीचे नाही का?

दिनेशदा,शुभा धन्यवाद.
दिनेशदा, अम्ही रात्रि ११:३० ला मुंबई ला पोचणार, १२:३० / १ वाजतिल बाहेर पडायला असा विचार करुन १ लिहिले होते.

>> बाहेर केवळ ३० मी आलो
उदय, असे असेल तर उत्तम.

bumrang, तो पण एक पर्याय आहेच. पण पुण्यात पहाटे पोचणार , काही तासातच निघावे लागेल.
मुंबई मधेच चांगले लॉज मिळाले तर बघु असा विचार होता.

मी पण मदत इथेच मागते. Happy

मालाड वेस्ट (Ryan Intr School) जवळ एखादे service apartment आहे का?

लेकीला माशे (जु) मधे भाग घ्यायचा आहे त्याच्या ऑडीशन्ससाठी जायचे आहे. जाताना एखादा पदार्थ बनवून न्यायचा आहे. म्हणून हॉटेल नको तर service apartment हवे आहे.

उदय,
एकाचवेळी फ्लाईट्स आली तर इमिग्रेशनला मोठी लाईन लागते आणि मग बेल्ट वर सामान यायला वेळ लागतो.
सी एस टी ला, भट्ट यांचे साबर रेस्टॉरंट आहे तिथेच वर लॉज आहे असे बघितले होते. पण तरीही सी.एस.टी. परीसरातली लॉजेस, असली तरी त्या भागात रात्री अवैध धंदे चालतात. त्यापेक्षा दादरला राहणे जास्त सोयीचे होईल. प्रीतम वगैरे स्टेशनजवळच आहेत.

माझ्या परिचयातील एक बाई दादरच्या माधवाश्रमात मुक्कामासाठी कायम उतरतात. त्यांच्या मते ते सुरक्षित व राहण्याच्या दृष्टीने बरे, सोयीचे आहे. तुम्ही माधवाश्रम बद्दल चौकशी करून बघा. इथेही कोणाला कदाचित त्याबद्दल अधिक माहिती असू शकेल. सोयीचे असेल व योग्य वाटले तर रात्रीच्या वेळी कॅबने तिथवर नक्कीच जाऊ शकाल.

विनायक परांजपे कशाला एडीट केली पोस्ट? तुम्ही यादी दिली होती ती चांगली होती. नंतर दुसर्‍या कुणाला पण कामी येऊ शकेल.

विनायक परांजपे कशाला एडीट केली पोस्ट? तुम्ही यादी दिली होती ती चांगली होती. नंतर दुसर्‍या कुणाला पण कामी येऊ शकेल.
>>>> +१

अकु, इद्रधनुश्य , धन्यवाद. प्रीपेड taxi , airport वरुन बाहेर अल्यावर मिळेल ना?

तुम्हाला मुंबईत ज्या विभागात काम आहे तिथली आसपासची हॉटेल्स शोधलीत तरी हरकत नाही. प्रीपेड टेक्सी ची सोय विमानतळावरून बाहेर पडल्यावर लगेच मिळेल . ही सोय अतिशय सुटसुटीत पडते. टेक्सीवाला तुम्हाला इतछीत ठिकाणी सोडल्यावर रिसीट वर तुमची सही घेतो ( जी रिसीट आपल्याकडे असते ) तेह्वा त्याला उरलेले पैसे विमानतळावरून मिळतात. रिसीट वर विमानतळाच्या टेक्सी स्टण्ड चा फोन नंबर असतो.आम्ही बायका बायकाच एकदा दुबई वरून आलो . रात्री एक वाजता एयरपोर्ट वर अशीच टेक्सी केली आणि अगदी आरामात पोचलो. एकेकट्या बायका वसई /पनवेल ला सुद्धा प्रीपेड टेक्सीनेच गेल्या Happy

हिरकणी, पुण्यात घर असेल तर केकेज, सॅण्डीज किंवा प्रायव्हेट गाडी असे काहीतरी बुक करून सरळ पुण्याला जा.
लांबचा विमान प्रवास करून येणार, हॉटेलमधे चेक इन करणार आणि जरा पाठ टेकते न टेकते तो परत पुढचा प्रवास यापेक्षा सगळा प्रवास एकाच रेट्यात करून मग आपल्या घरात हवी तेवढी पाठ टेकावी. Happy

पार्ले स्टेशनसमोर रामकॄष्ण नावाचे हॉटेल आहे. त्याच्या मागे त्यांचेच हॉटेल आहे. त्यांची एअरपोर्ट ड्रॉप सर्व्हीस आहे. ( मला त्यांचा चांगला अनुभव आहे. ) दोन्ही एअरपोर्ट्स पासून फारसे लांब नाही. एका दिवसाचे ५/६ हजार रुपये असतील.>>>>>>>>>>>>

रामकृष्ण ला मी आत्ताच मागच्या आठवड्यात राहुन आलो ५ दिवस. मला तरी आवडले. एका दिवसाचे एका रुमचे रेट त्या मानाने बरे आहेत (३००० ते ५०००). रुम्स आणि लॉबी अगदी स्वच्छ . रेल्वे स्टेशन अगदीच जवळ आहे. डोमेस्टिक एअर पोर्ट वरुन रिक्षाने १० मिनिटे फक्त. पण रुम सर्विस चे जेवण आणि पेये कहिच्या काहि महाग आहेत. तिथेच खाली एक व्हेज हॉटेल आहे, बहुतेक त्यांचेच आहे ते त्या मानाने स्वस्त आहे.

पण हिरकणी एक नक्की करा कि हॉटेल आधी बुक करा एकच दिवस रहाणार असाल तर, कारण मुंबई मधे प्रत्ये़क ठिकाणी हॉटेल्स जरी भरपुर असली तरी आयत्या वेळेस गेल्यावर फार फिरावे लागते, कधी कधी रुम्स उपलब्ध असतात कधी नसतात. आणि तुम्ही रात्री १२.३० ते १ वाजता सहकुटुंब असे शोधायला निघालात ईतक्या प्रवासानंतर तर अजुन वैताग आणि चिडचीड होईल.