शक्करकंद की चाट

Submitted by दिनेश. on 26 May, 2013 - 15:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष्क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
माहितीचा स्रोत: 
दिल्लीला जी चाट मिळते त्याचा मी केलेला कल्पनाविस्तार.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतीशय उत्तम पाकृ

एखादा दर्जेदार परीपूर्ण शेर असतो तशी

उपासालाही चालेल का (चाट मसाला आहे म्हणून विचारले )

एक निरीक्षण : रताळी शिजल्यावर खूप मधुर लागतात त्यात मीठ नेमके किती घालायचे हे प्रमाण जर अधिक झाले तर उलटी होण्याचा संभव आहेच (मलातरी) पण एकंदर रेसिपी अगदीच विचित्र लागते अशाने की घशाखाली एकही घास उतरू नये मग आपण एवढ्या आवडीने केलेलं फेकून द्यायला जिवावर येतं अगदी

मी रताळ्याचा कीस करतो मीठ घालून पण रताळ्याचे (कच्च्या) पातळ काप वनस्पती तुपात सोनेरी तळून पिठीसाखर भुरभुरली की अप्रतीम लागतात रताळी

रताळ्याचा इतका टेम्प्टींग पदार्थ पहिल्यांदाच बघितला. (तशी तुमची द्राक्ष-बटाटा भाजी प्रचंड आवडते. पण त्यात इतर मालमसाला बराच असतो, रताळी त्यात ओळखू येत नाहीत.)

ह्या पदार्थात रताळ्याची गोड चव जाते का?

आता तुम्ही आठवण करून दिलीच आहे तर कालाखट्टा सरबताची कृती पण द्या. पूर्वी रसनाचे यायचे पण मग त्यांनी ते बंद केले. आता चांगले कालाखट्टा प्यायला थेट बोरीबंदरला जावे लागते - कॅननच्या बाजूला. Happy

वाचते..... पण आधी फोटो बघूनच तोंपासू!

शीर्षक वाचून आधी मला वाटलं की हे दोन चॉईस देताय तुम्ही. पण नंतर लक्षात आलं की शीर्षकातला की हीच त्या गैरसमजाची की आहे कारण तो की हिंदीतला आहे. Wink

शीर्षक वाचून आधी मला वाटलं की हे दोन चॉईस देताय तुम्ही. पण नंतर लक्षात आलं की शीर्षकातला की हीच त्या गैरसमजाची की आहे कारण तो की हिंदीतला आहे.

Happy

मस्त आहे पाकृ..

निम्मा कंद उकडून आणि निम्मा परतून असं का केलं आहे? सगळंच उकडून अथवा परतून घेतलं तर? सिरियसली विचारते आहे.

वैभव काही रताळी जास्त गोड असतात. त्यामूळे मिठाचे प्रमाण चव बघून ठरवावे लागेल. पण साधारणपणे पाव किलो रताळी उकडताना १ टिस्पून मीठ पुरेसे होते. शिवाय चाट मसाल्यात मीठ असतेच. चाट मसाला आणि तीळ
दोन्ही उपवासाला चालण्यासारखे नाहीत. आमच्याकडे कोथिंबीरही चालत नाही.

पौर्णिमा,
उकडलेले तूकडे मऊसर आणि परतलेले तूकडे कुरकुरीत लागतात. चवीतही फरक पडतो. दोन्हीला लावलेला मसालाही वेगवेगळा. एकत्र करून ते चांगले लागतात.

साधना,
मला गेल्या भेटीत काला खट्टा मिळाले होते. भारताबाहेर विमटो नावाचे एक पेय मिळते. त्यात काळे मीठ घातले कि थेट काला खट्टाचीच चव मिळते. रसना चे नसले तरी, बाटलीत कॉन्सेट्रेट मिळत असणार. ( चेंबूरला स्टेशनसमोर मिळेल. )

लाजो Happy

तूम्ही सगळ्यांनी वाचलीत म्हणजे माझे पोट भरले Happy

साधना,
रताळ्याची गोडूस चव थोडी कमी होते, ( अगदीच जात नाही ) पण इतर मसाल्यांमूळे चटकदार मिश्रण तयार होते.

गराडू म्हणजेच कोनफळ? कोनफळ पुण्यात मिळेल?
गराडूचं नाव पाहून इंदोरच्या चमचमीत आठवणी जाग्या झाल्या. तिथे गराडूच्या चिप्स काय सही मिळतात, आठवणीनेच तोंडाला पाणी सुटले.

सहेली, मुंबईत साधारण थंडी सुरु झाली कि मिळायला लागतात. वर्षभर तुरळक असतातच.
पुण्यातही मिळायला हवे. गेल्या भेटीत इंदोरला बघितल्या होत्या.
तसे कोनफळ घराच्या बागेतही छान वाढते. लाल देठाची पाने असलेला वेल असतो.

कणंग, लाच काटे कणंग, कणगर अशी नावे आहेत. लांबट आकाराचे, तपकिरी रंगाचे केसाळ कंद असते. भाजून खातात. सोबत तूप आणि मिरपूड घेऊन छान लागते.
खेडेगावात पावसाची बेगमी म्हणून ठेवलेले असते. गोव्यात आणि मुंबईतही मिळते.