गंध दरवळला मनी

Submitted by गंधा on 26 May, 2013 - 05:56

आज दुपारी घरची आठवण आली आणि माझे डोळे पाणावले. आणि काय योगायोग तेवढ्यात मोबायिल वाजला म्हणून पाहू लागले तर गंधालीचा मिस-कौल आला होता. हे पाहून मला खूप बर वाटले होते. गांधली माझी जीवा-भावाचीच म्हणा ना तशी मैत्रिण.फार वर्षाची नव्हे तर सहा महिन्यांच्या कालावधीत अतूट मैत्री ठेऊन जपणारी अशी.

पूर्वी मला खरं तर जीवाभावाच्या म्हणजेच “बेस्ट फ्रेंड” च नातं खूळ वाटायचे. कारण मला दहावी पर्यंत अशी एकही मैत्रीण आठवत नाही. याचे कारणही बहुतेक असे असावे कि आम्ही पाच-सहा भावंडे मिळून शाळेत जात येत असल्यामुळे घरी जाताना शाळेतील गमती जमाती सांगायला जणू मैत्रिणीची अशी गरजच वाटली नासावी. असो.

माझे पुढील शिक्षण दुसऱ्या शहरात असल्यामुळे मला एस्. टी. ने प्रवास करत तिथपर्यंत जावं लागत असे. पदवीपर्यंतचे शिक्षण घराजवळील कोलेजातच झालं. त्यामुळे हा प्रवास मला अनोखा होता. तिथे माझ्यासारखी अनेक मुलं दुसऱ्या शहरातून येणारी होती, पण काही लोकांची वेव्हलेंथ आपल्यापाशी का जुळावी आणि काही लोकांचे जन्मापासूनचे ऋणानुबंध सुद्धा अपूर्णच का राहावेत हे मला खरच कळत नाही.
ह्या अशाच प्रकारच्या गंधाचे माझ्या जन्मापासून मला ओळखत असल्याचे दाखले ती अनेकवेळा देत असे. प्रथम काही दिवस ती वर्गमैत्रीण आणि प्रवासातील सोबत होती. मग प्रवासात अनेकवेळा नोट्स, लेक्चर आणि इतर गप्पा होत असत. काही दिवसांनी ह्याबद्दल सखोल चौकशी आणि देवघेव सुरु झाली. आता तर ती माझी वाट पाहत बस stop वर तासनतास थांबत असे. कॉलेजात उशीर झाला तरी आम्ही दोघीही एकत्रच जात असो.

एकदा काय झाले, नेहमी प्रमाणे तिने मला फोन करून कॉलेजला निघण्याची वर्दी दिली. पण नेमकं त्या दिवशी आमची चुकामूक झाली. झाले असं मी तिच्या-आधी कॉलेजला पोचले. मी तिला फोन केला तेव्हा ती फार काही बोलली नाही. ती मला कॉलेजला भेटण्याची वाट पाहू लागली. तिचा पारा थोडा चढलेला होता. आणि मग तापलेल्या कढईत लाह्या जश्या भुरभुर उडाव्यात त्याप्रमाणे तिच्या मुखातून माझ्यावर शब्दांचा भडीमार सुरु झाला. मला तिचे बोलणे ऐकून घेण्य व्यतिरिक्त काही पर्याय नव्हता. कारण चूक माझीही नव्हती आणि तिचीही. मग काही मिनिटातच ती मला “सॉरी” म्हणाली आणि गप्पच बसली.

अशा प्रकारच्या रुसव्या-फुगाव्यात आणि आमच्या प्रवासाच्या गप्पात हे वर्ष अनेक गोड आठवणी मागे ठेऊन कसे संपलं हे कळलं देखील नाही. आम्हा दोघींची मैत्री होण्याचे आणखी एक कारण म्हणजे आमचे विचार फार पटकन जुळतात. दोघीही एकमेकीना एखादा मुद्दा खूप चांगल्या प्रकारे पटवून द्यायचो. एकदा क्लास मध्ये पुढीलं शिक्षण आणि करियर याबद्दल चर्चा सुरु होती. अनेकांचे विचार होते होस्टेलमध्ये राहून धमाल मस्ती करत पुढचे शिक्षण करायचे. पण माझं आणि गंधालीच मत होतं कि पुढील शिक्षण जमेल तितके कष्ट घेऊन स्वतः करण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी लागणारी मेहनत करण्यास तत्पर राहायचे. फार मोठी नाही पण आपल्या कुवतीनुसार आणि शिक्षणानुसार नोकरी करायला काहीच हरकत नाही. शिक्षणाबरोबर अनुभव ही फार महत्वाचा असतो. मग दोघींनीही नोकऱ्या शोधल्या. मी एका शाळेमध्ये कॉम्पुटर टीचर म्हणून जाऊ लागले. आणि गंधाली एका कॉलेजात असिस्टंट लायब्ररीयन म्हणून काम पाहू लागली. पगार आणि हुद्दा फार महत्वाचा नव्हता. तल्लीनता आणि कष्ट करायची तयारी वाढवायची होती. ह्या मिळणाऱ्या पैशातून कॉलेजची फी जाण्याच प्रश्नच नव्हता पण स्वतःला व्यस्त ठेवण्याचा हा प्रयत्न होता. अशा प्रकारे, आमचा पुढील आयुष्याचा प्रवास सुरु झाला. आता आम्हाला रोज भेटणं शक्यच नव्हतं. पण विज्ञानाचं वरदान असणारे एक साधन म्हणजे फोन हा अत्यंत सोयीचा मार्ग असल्यामुळे आम्ही अनेकवेळा फोनवर खूप गप्पा मारत असो.गंधाचा तर मला दिवसातून दोन-तीन वेळा फोन यात असे. त्यावर आम्ही क्षणाक्षणाचे किस्से एकमेकींना सांगायचो. आम्ही एकमेकींच्या घरी अनेक कार्यक्रमाना मदत मस्ती आणि धमाल करण्यासाठी बरेच वेळा भेटणं हे चालूच असे. त्यामुळे गंधा माझे अनेक नातेवाईक पटकन ओळखत असे.

एकदा एक गम्मत झाली होती. गंधा माझ्या ताईच्या लग्नासाठी आली होती. आम्ही हॉलवर गेल्यावर थोडी मजा म्हणून रात्री सगळ्या उश्या लपवण्याचा बेत आखला. यात गंधा आघाडीवर होती. सगळ्या मुलांनी मिळून उश्या लपवल्याही पण थोड्या वेळाने माझ्या बाबांनी जोरात हाक मारली. त्याबरोबर सगळेचजण उश्या घेऊन पळत पळत बाहेर आले. त्यादिवशी नंतरही आम्ही खूप धमाल केली. गंधाला असे आमच्या घरात मिसळलेलं पाहून खूप बरे वाटलं. दिवस कसे गेले कळलंही नाही.

वर्षभरातच आमच्या घरी माझ्याही लग्नाचे वारे वाहू लागले. मग काय विचारता, काही दिवसातच मला लग्नासाठी स्थळ येऊ लागली. गंधालीला हे कळताच तिला माझी खूप काळजी वाटू लागली. आणि ती स्वतः खूप अनुभवी असल्याच्या अविर्भावात माझी जणू थोरली बहीणच ह्याप्रमाणे मला अनेक सल्ले आणि जबाबदाऱ्या समजून देऊ लागली. म्हणत असे, सासरी खूप चांगली वाग बरं. जेवण जरा प्रेमाने कर. आणि अनेक सल्ले ती मला देत असे. मग मात्र मी तिची थट्टा केल्यावर ती माझ्याकडे लटक्या रागाने पाहत असे. माझ्या लग्नात चांगले चार दिवस बाई मदतीलाही आल्या होत्या. तिने माझ्या नवीन घरासाठी म्हणून एक “लाफिंग बुद्धा” दिला होता. तेव्हा मात्र तिच्या डोळ्यांच्या कडा अश्रूंनी ओतप्रोत भरल्या होत्या. हे माझ्या नजरेतून सुटले नाही. हे अश्रू मी तिच्यापासून दूर निघाल्याने तिला वाटनाऱ्या काळजीचे होते. मग मात्र तिला न रहावून तिने मला जवळ ओढलं आणि तिने अश्रुंना वाट मोकळी करून दिली. खरं सांगायचे तर गंधा माझी जीवाभावाची मैत्रीण केव्हा झाली हे उमगलंच नाही. माझ्या मनातील एक अतूट नात निर्माण करून ते जपणारी गंधाली मला पुन्हा एकदा हळवी करून गेली .

आज तिचा मिसकॅल पाहून तिला फोन केला. ती माझ्याजवळ बोलताना अनेक महिने न भेटल्याने घडलेल्या साऱ्या दिवसाचा इतिवृत्तात सांगत होती तिच्या आणि माझ्या गप्पांना आता खूप वेळ झाला होता. अचानक तिच्या आवाजात मला बदल वाटू लागला मी थोड घाबरूनच तिला काय झालं? असं विचारल. ती दबक्या आवाजात मला तिच्या लग्नाविषयी सांगू लागली तिच्या लहानपणीचा एक मित्र आणि ती खूप जवळ होती पण त्याच हे नात मैत्रिच्या नात्यातून जन्मभर साथ निभावणाऱ्या पती –पत्नीच्या नात्यात रुपांतरीत होऊ पाहत होत. ती आणखी भावूक होऊन बोलू लागली तू इकडे असतीस तर बर झालं असत.माझे बाबा या नात्याला पूर्ण रूप देवू इच्छित नाहीत. तिच बोलण सुरु असतानाच माझ्या मनात अचानक विचारांच काहूर माजल. प्रत्येक मुलाचे आई- वडील हे त्यांच्या भविष्याचा विचार करून आयुष्याला कलाटणी मिळणाऱ्या अशा क्षणाचे चांगलेच चटके मिळून कणखर झालेले असतात. म्हणूनच त्याची या अशा नाजूक पण महत्वाच्या विषयातील मत परखड आणि तितकीच दूरदृष्टीची असतात. त्याप्रमाणे तिच्या आई –वडिलांनी तिच्या बद्दल ही अशी स्वप्न नक्कीच पहिली असतीलच की?

त्याच दिवशी अनायासे माझ गंधाच्या आईजवळ बोलण झालं यावेळी मी जरा धाडसानेच त्यांच्याजवळ संवाद साधला. त्यांना विचारल काकू गंधाच्या लग्नाचं काही पाहताय का ? तेव्हा काकूंच्या माहितीप्रमाणे त्यांनी मला हा विषय माहित असल्याने त्याचं बोलण सुरु केल. काय सांगू ? ती आम्हाच ऐकतच नाही .तिच्या बाबांना हे स्थळ मंजूर नाही. आम्हीही तिच्यासाठी दुसरे मुलगे पाहत आहोत पण तिने डोक्यात खूळ घेतलय तिला तीच प्रेम महत्वाच वाटतंय पण आम्हाला ही तीच आयुष्य सुखी व्हाव असं नाही का वाटत? काही गोष्टींमुळे आम्ही तिला दूर ठेवतो आहे. तिला हे पटतच नाही. मुलांचा सुखी संसार पाहण्याचं सुख हव असत ग आई–वडिलांना! तूच सांग आम्ही तरी दुसर काय पाहतोय? तीच सुखाच ना? आणि अचानक काकूंचा आवाज थांबला. आता मी काकूंच्या पुढे काही बोलणं म्हणजे स्वच्छ आणि नितळ सूर्यप्रकाशात काजव्याचा उजेड वाटणारे माझे बोल अपोआप थांबले. काकूंच्या भावनेतील आणि शब्दातील सत्याचा लख्ख प्रकाश माझ्या डोक्यात पडला. माझ जणू भानच हरपल. तेवढयात त्यांनीच मला “ हॉलो ” असं म्हणून बोलत करण्याचा प्रयत्न केला. मला आता गंधाच्या आणि प्रेम करणाऱ्या प्रत्येक मुलाच्या पालकांची काळजी वाटू लागली आहे. कारण प्रेम आंधळ असत असं म्हणतात पण त्यामुळे पालकांनीही वेळोवेळी अनेक ठेचा लागून दु:ख होण्याची व्यथा मात्र मुलं समजून घेत नाहीत.

आता हा तिढा कसा सोडवायचा हा यक्षप्रश्न माझ्या पुढे होता. कुठेतरी अंतर्मनात असं वाटत होत की गंधालीने तिच्या आई – बाबांच्या मताचा आदर करून स्व:ताच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. त्यानंतर मध्यंतरी काही महिन्याच काळ लोटला आणि मी गंधालीच्या वाढदिवसादिवशी तिला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. नेहेमीप्रमाणे खूप गप्पा झाल्या. मी तिला
काय बाई काही विशेष घडामोडी !!

सांगायची एक गोष्ट म्हणजे गंधा ही “हॉपी गो लकी वूमन” होती. त्यामुळे काका काकुना फलरूप येण्यासाठी थोडा उशीरच लागला.

तीचा मूड बहुतेक मला सरप्राईज देण्याचा आणि हो थोड घाबरवण्याचा होता. मी ...अग बोला ना .... ती गंभीरपणे म्हणाली काही नाही बाबा पाहतायत ..अग त्या मुलाच काय झालं. काही नाही त्याला करियर महत्त्वाच वाटतंय म्हणून तो चार – पाच वर्ष लग्नाला तयार नाही...हे बाबांना मान्य नाही ..मग मी काय करणार म्हणून मी हा निर्णय घेतलाय. हे एकून माझ्या कानांवर माझा विश्वासच बसला नाही मी आ ...आ असं म्हणून थंडच झाले....ती थोडस हसली माझ्या या रियाक्क्षन्वर आणि म्हणाली अग सिर्यस काय होतेस show must go on… life is race… Time has changed बेबी! असं म्हणून अग ऐक की
पुढे म्हणाली
Hey, there is one news also…
काय ग?
अग माझ लग्न ठरलंय!
काय सांगतेस....वाव Congrats कधी, कुठे, कोण ? असे अनेक प्रश्न मी विचारले.
After marriage I’m fling to USA….या हुउऊ ....

ती खूप खुश दिसली आणि हसू लागली ... मुलगा स्व:तचा बिसनेस करतो. शिवाय तो अमेरिकेचा ग्रीन कार्ड होल्डर देखील आहे, वगैरे वगैरे..

मला सांगताना तीच भान हरपल होत. तिचा अत्यानंद एकून मी ही खूप खुश झाले. म्हटलं हॉलो अग गंधा जमिनीवर ये ग बाई.... म्हणाली लग्नाचं आमंत्रण तुला आता पासूनच भरपूर दिवस आधी यायचं आहे बर का! तीच मी अभिनंदन केलं...
गंधाचा हा उत्साह पाहून आणि ही बातमी एकून माझ्यावर जणू फुलांचा सडा पडत आहे असं वाटल. मी लगेचच तिच्याकडे भेटल्यानंतर पार्टी साठी हट्ट धरला मग बाई म्हणाल्या नक्की जंगी पार्टी देऊ की ... मी गंधाच्या आई बाबांना मनोमन धन्यवाद दिले ..

लालनात पंच वर्षांनी | दश वर्षांनी ताडयेत ||
प्राप्तेतु शोडषे वर्षे | पुत्रमित्र समाचरेत ||

या उक्ती प्रमाणे गंधाच्या आई – बाबांनी तिच्याजवळ मैत्रीपूर्ण संवाद साधला. या प्रेमाच्या वादाचा शेवट आई – वडिलांच्या आणि गंधाच्या समंजस विचारांमुळे आणि संवादामुळे गोड झाल्याचा आनंद मला मिळाला. आजही त्या दिवसाची आठवण मला तितकाच आनंद देते.

पण आता ही गोष्ट ऐकल्यावर काहीजणांना वाटेल ही आऊट डेटेड कथा आहे. पण ही सांगण्याचे एकमेव कारण म्हणजे आज एकविसाव्या शतकात विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे. इंटरनेटमुळे जग जवळ आलंय असं म्हणतात पण कुटुंबातील सदस्यांचा संवाद कुठेतरी कमी झालाय असं वाटत का?

आज इंटरनेट मुळे सातासमुद्रापलीकडील मित्रमैत्रिणींशी chat करता येते पण फ्रेंड रिक्वेस्ट न पाठवता मिळालेल्या आई-वडील आणि सभोवताली असलेल्या समाजात संवाद साधण्यासाठी अनेकांकडे वेळ नसतो.

आज अनेक सुज्ञ लोकांनी आत्मपरीक्षण करून हा संवाद साधण खूप गरजेच आहे. गंधाच्या बाबतीत हा तिच्या लग्नाचा प्रश्न होता. पण आज समाजात अनेक कुटुंबात हा सुख संवाद कुठेतरी विरळ होत चालला आहे. आणि ह्याचा परिणाम कुटुंबातील प्रत्येक नात्यांवर होतानाही बरेच वेळा जाणवतो.

ह्याचे एक कारण म्हणजे आज कुटुंबातील आई आणि वडील हे दोघेही नोकरी करतात. त्यामुळे त्यांना आलेला दिवसभराचा शीण आणि डोळ्यासमोर घरातील इतर कामे ह्या सगळ्या गडबडीत मुलांबरोबर बोलायला वेळच मिळत नाही.

दुसरे महत्वाचे कारण म्हणजे, आजच्या समाजात मुलांना जास्त प्रमाणात स्वातंत्र्य मिळत. अशा स्वतंत्र विचारांबरोबर मुलांमध्ये आत्मविश्वासही रुजवला जातो. पण ह्या आत्मविश्वासामुळे जर अहंकार बळावला तर संवादाला जागाच राहात नाही.

झाले तर त्यामुळे पालक आणि पाल्य ह्यांच्यातील संवादच खुंटला गेला. खरच हा संवाद महत्वाचा नाही का?

तसंच आज शिक्षण क्षेत्रात ज्ञानाची अनेक दालाने उपलब्ध आहेत. त्यामुळे क्षेत्र निवडतांना ही अनेक अडचणी येतात. कोणत्या क्षेत्रात प्रवेश घेतल्यास मुलाला आनंद मिळेल यासाठी पालकांनी पाल्याचा कल ओळखून शिक्षकांप्रमाणेच मुलांशी जास्तीत-जास्त संवाद साधून वेळोवेळी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करायाला हवं.

तसंच परदेशी आलेल्या पती-पत्नीच्या नात्यात संवाद हा खूप महत्वाचा दुवा ठरतो कारण सगळ्याच जबाबदाऱ्या दोघांनी मिळूनच सांभाळायच्या असतात ना.

|| जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुरते चे ||

ह्या वक्तव्याप्रमाणे आपण आपल्या शेजाऱ्याशीही चांगला संवाद साधला पाहिजे की नाही. इथे रक्ताच नात नसतानाही मित्र मैत्रिणी शेजारी हे चांगले सहकारी होण्याचे एकमात्र कारण असतं ते म्हणजे परस्परातील मैत्रीपूर्ण संवाद.वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीची माहिती करून घेण्यासाठी लागतो तोही म्हणजे संवादच नाही का?.

अशा मैत्रीपूर्ण संवादाचा गंध मनात रुजवून आजच्या गोष्टीची सांगता करुया.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users