"निस दिन बरसत नैन हमारे" या गाण्याचा अर्थ आणि इतर माहिती

Submitted by mansmi18 on 10 May, 2013 - 04:39

नमस्कार,

http://www.youtube.com/watch?v=8RKX2Pq75s4

"निस दिन बरसत नैन हमारे" या गाण्याचा अर्थ कोणी सांगु शकाल का?

प्रत्येक वेळी हे गाणे ऐकताना आकाशात ढग दाटुन आले आहेत..एक उदासी सगळ्या वातावरणावर पसरली आहे असे काहीसे वाटु लागते.
सामान्य अर्थ कळला आहे तरी नीट कोणाला माहित असल्यास्/तसेच गाण्याबद्दल अधिक माहितीही असल्यास (राग इ) कृपया लिहा. हे गाणे पं. हृदयनाथ मंगेशकरानी वयाच्या १६-१७ व्या वर्षी स्वरबद्ध केलेय एवढेच माहित आहे.

निसिदिन बरसत नैन हमारे।
सदा रहत पावस ऋतु हम पर, जबते स्याम सिधारे।।
अंजन थिर न रहत अँखियन में, कर कपोल भये कारे।
कंचुकि-पट सूखत नहिं कबहुँ, उर बिच बहत पनारे॥
आँसू सलिल भये पग थाके, बहे जात सित तारे।
'सूरदास' अब डूबत है ब्रज, काहे न लेत उबारे॥

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे गाणं खूप वेळा ऐकलंय पण त्यातली आर्तताच एवढी भारी आहे की कधी अर्थाकडे लक्षच गेलं नाही. आता आधी नीट शब्दार्थ आणि मग भावार्थ लागतोय का बघते Happy

मला खूप आवडते हे गाणे. सूरदासांचे भजन की विरहिणी म्हणावे? कृष्ण गोकूळ सोडून गेल्यानंतर त्याच्या विरहाने दु:खी झालेल्या गोपींची अवस्था वर्णन केलेय. राग वगैरे नाही माहीत.

ही बेगम अख्तरांची ठुमरी आहे ना?
राग काफी. (तीच असेल तर.) इथुन ऐकुन सांगु शकत नाही. नंतर घरून ऐकेन.

अर्थ तोच स्वाती२ ने सांगीतलेला.

भरत, मला एकच 'जब ते श्याम सिधारे' आठवतय आणि ते बेगम अख्तरांचे आहे. काहीतरी समजुतीचा घोळ असणार.
नंतर ऐकुते नीट. थॅंक्स.

मला समजलेला तेवढा लिहिलाय.

सदा रहत पावस ऋतु हम पर जबसे श्याम सिधार
- श्याम गेल्या पासून नैन निस दिन बरसत आहेत जसे काही कायमचा पावसाळाच आलेला आहे
अंजन थिर न रहत अँखियन में, कर कपोल भये कारे।
डोळ्यांमधलं काजळ जागेवर रहात नाही ( कर कपोल चा अर्थ नेमका मला माहित नाही , पण गाल असावा असं मी समजत होते) काजळ ओघळून चेहरा काळा पडलाय.

कंचुकि-पट सूखत नहिं कबहुँ, उर बिच बहत पनारे॥
सतत डोळे पुसावे लागल्याने पदराचा शेव कोरडा नसतो कधीच, - वक्षामधून ओढा असावा तसे अश्रु वहात आहेत

आँसू सलिल भये पग थाके, बहे जात सित तारे।

'सूरदास' अब डूबत है ब्रज, काहे न लेत उबारे

मेधा +१
कर (डोळे पुसून) आणि कपोल (गाल - किती पुसले तरीही अश्रू वाहतच आहेत म्हणून) वाहिलेल्या काजळाने काळे झाले आहेत.
सित म्हणजे शुभ्र हे नवीन कळलं.

'आँसू सलील भये पग थाके, बहे जात सित तारे' तरीही नीट नाही कळलं मला.
दिवसरात्र वाहतायत असं म्हटलं असतं तर गोष्ट वेगळी. फक्त सित तारेच का?
का चांदण्या रात्री (कृष्ण असताना) रास रंगत असे त्याच्या आठवणींनी अश्रू वाहतायत असं लांबचं वळण आहे? (बाकी सरळसोट आहे त्यामानाने!)
पग थाके म्हणजे (वणवण करून) पाय थकले असं असावं.

पाण्यासारखे अश्रू वाहात आहेत, पाय थकलेत, बहे जात सित तारे - अश्रूंचा प्रवाह इतका आहे की तारे ही वाहून जात आहेत, गोकूळ बुडत आहे.

>>आँसू सलिल भये पग थाके, बहे जात सित तारे।
'सित पक्ष' = शुक्लपक्ष.
'सित तारे' शुक्लातले (कृष्णपक्षातल्याइतके ठळकपणे न दिसणारे) तारे?
थाके = थकणे.
अश्रू (निव्वळ) पाणी झालेत. (किती रडणार?), पाय थकलेत. शुक्लपक्षात तारेही दिसेनासे झाले. ( उलटत जाणार्‍या काळाचं प्रतीक?. 'युगांमागुनी चालली रे युगे ही' किंवा 'ऋतू येत होते, ऋतू जात होते' चालीवर..?)

सदा रहत पावस ऋतु हम पर जबसे श्याम सिधार
- श्याम गेल्या पासून नैन निस दिन बरसत आहेत जसे काही कायमचा पावसाळाच आलेला आहे
अंजन थिर न रहत अँखियन में, कर कपोल भये कारे।
डोळ्यांमधलं काजळ जागेवर रहात नाही ( कर कपोल चा अर्थ नेमका मला माहित नाही , पण गाल असावा असं मी समजत होते) काजळ ओघळून चेहरा काळा पडलाय.

कंचुकि-पट सूखत नहिं कबहुँ, उर बिच बहत पनारे॥
सतत डोळे पुसावे लागल्याने पदराचा शेव कोरडा नसतो कधीच, - वक्षामधून ओढा असावा तसे अश्रु वहात आहेत

आँसू सलिल भये पग थाके, बहे जात सित तारे।

'सूरदास' अब डूबत है ब्रज, काहे न लेत उबारे>>>>>>>>>>> मेधा +१

अंजन थिर न रहत अँखियन में, कर कपोल भये कारे - डोळ्यामधले काजळ वाहुन, हात आणी गाल काळे झाले आहेत.
आँसू सलिल भये पग थाके, बहे जात सित तारे। -- अश्रुंची नदी झाली, पाय थकले , पांढरे-तार्यांसारखे अश्रु वहात राहिले आहेत.
'सूरदास' अब डूबत है ब्रज, काहे न लेत उबारे - सुरदासा, गोकुळ (अश्रुंमध्ये) बुडत आहे, (कान्हा) येउन आमचे का रक्षण करत नाहि ?

माझ्या हिंदीच्या अनुभवावर,

निसिदिन बरसत नैन हमारे।
रोजच(निसिदिन) डोळे भरून वहातात!

सदा रहत पावस ऋतु हम पर, जबते स्याम सिधारे।।
जसा काही पावसाचा मौसम असल्यासारखे (डोळे सतत वहातात, त्याला पावसाची उपमा) , जेव्हा पासून श्याम गेलाय(सिधारे...)

अंजन थिर न रहत अँखियन में, कर कपोल भये कारे।
काजळ टिकत नाही(रोज रडल्याने) डोळ्यात, ..................

कंचुकि-पट सूखत नहिं कबहुँ, उर बिच बहत पनारे॥
पदराची कडा ओली रहाते(डोळे पुसल्याने), उर (दु:खावियोगाने) भरून वहातो!

आँसू सलिल भये पग थाके, बहे जात सित तारे।
'सूरदास' अब डूबत है ब्रज, काहे न लेत उबारे॥
ह्या ओळी साठी माणूसला काही वाक्यासाठीच + १
>>आँसू सलिल भये पग थाके, बहे जात सित तारे। -- अश्रुंची नदी झाली, पाय थकले , अश्रु वहात राहिले आहेत, अंधार पसरलेला म्हणून तारे दिसत नाहीत असा आहे(तारे हरवले म्हणजे).
'सूरदास' अब डूबत है ब्रज, काहे न लेत उबारे - सुरदासा, गोकुळ (दु:खात बुडलेय असा अर्थ आहे) बुडत आहे, (कान्हा) येउन आमचे का रक्षण करत नाहि>><<

एकंदरीत सर्व मेकअपच खराब झालाय श्याम गेल्याने., भारीतला आय मस्कारा, नेलपॉलीश, अनारकलीचा दुपट्टा वगैरे... Proud

मी एकलेला व वाचलेला "कपोल" म्हणजे मन हिंदीत.

कपोल कल्पित कहानींया वगैरे. तोच बरोबर आहे असा हट्ट नाहीये.
नाहीतर इथे सत्याचे पंडीत आहेत ते सांगतीलच. Wink

<अंजन थिर न रहत अँखियन में, कर कपोल भये कारे।
काजळ टिकत नाही(रोज रडल्याने) डोळ्यात, मन घाबरून हात थरथरताहेत(दु:खावियेगाने) किंवा भितीने मन,हात्(शरीर) थरथरत>

भये - घाबरणे?

भोर भये पनघटपर मोहे नटखट शाम सताए

लावा अ(न)र्थ

>>लावा अ(न)र>><<
ती ओळ नीट वाचलीत का?

अहो मग तुम्हाला माहीतीय ना मग लावा ना अर्थ.. कि तुम्ही फक्त दुसर्‍यांच्या चुका शोधायला नेमलेले आहात?

अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणार्‍या सगळ्याना धन्यवाद. अर्थाबरोबरच गाण्यातले कोणी जाणकार हा कुठला राग आहे आणि यातील सौंदर्यस्थळे सांगतील का?

भरत,

मी लिहिणार नव्हतो पण तुम्ही भाग पाडताय. वरची तुमची उत्तरे "अर्थ सरळ आहे" "लावा अ(न)र्थ" इ. मला condescending वाटतात. जर नीट अर्थ माहित असता तर या बाफची जरुर नव्हती. इतर लोक आपल्याला कळल्याप्रमाणे अर्थ तरी सांगत आहेत. समजा कोणाचा अर्थ चुकीचा वाटला तर तो wiseass comment न करता, न दुखवताही दाखवता येउ शकतो जर हेही जमत नसेल तर आपल्या Negative comments ने या बाफवरची चाललेली चर्चा बिघडवुन त्यात वाद आणु नये ही आपल्याला नम्र विनंती.

धन्यवाद.

बSSSSरं.
manasmi, तुम्ही वापरलेल्या चारपैकी दोन इंग्रजी शब्दांचा अर्थ मला माहीत नाही.
त्यामुळे तुम्हाला नक्की काय वाटले ते मला कळले नाही.
पण माझ्या कमेंटमुळे निदान तुम्हाला तुमच्याच धाग्यावर परत लिहावेसे वाटले हे वाचून बरे वाटले.

एकूण रचनेच्या संदर्भात भये म्हणजे घाबरणे हा अर्थ ओढून ताणून वाटतो.
'कारे भये' हा 'काळे झाले' याच अर्थाने झालेला प्रयोग आहे. अतिशय आर्त,विरहव्याकूळ विरहिणी-विराणी सूरदासांची,सर्वांनी छान लिहिलेय समजून घेत.

सदा रहत पावस ऋतु हमपर..

सूरदास अब डूबत है ब्रज..
अशा ओळींतून येणारी भावना प्राणांतीच्या विरह-आकांताची आहे, लतादीदीच तिला न्याय देणे जाणतात अन हृदयनाथ संगीत.

हा धागा वाचताना गाणं मनात वाजत राहिलं म्हणून गुणगुणत होते, त्यावर नवर्‍याने नोंदवलेलं एक मत मार्मिक वाटलं म्हणून आत्ता अ‍ॅड करतेय-
'निसीदिन बरसत नैन हमारे''
सहजपणे असे लिहिणारे संतकवी सूरदास अंध होते हा तपशील ! त्या डोळ्यांचा त्यांना एकच उपयोग करायचाय, कृष्णदर्शनाची आस, तो नसेल तर अंधार अन त्यात बरसणारं अश्रूजल..

निसीदिन बरसत नैन हमारे''
सहजपणे असे लिहिणारे संतकवी सूरदास अंध होते हा तपशील ! त्या डोळ्यांचा त्यांना एकच उपयोग करायचाय, कृष्णदर्शनाची आस, तो नसेल तर अंधार अन त्यात बरसणारं अश्रूजल..>>>>>>>>>> क्या बात है भारतीजी!

भारती, सूरदासांसारख्या भौतिक दृष्टया दृष्टीहीनाने रचलेलं हे नयन आणि विरहाश्रूंशीच सगळ्या सहा ओळीत बांधलं गेलं आहे. म्हणूनच मला नुसत्या शब्दांपेक्षाही शब्दांच्या पलिकडलं काहीतरी आपल्याकडून मिस होतंय असं वाटत राहिलंय हा बाफ उघडला गेल्यापासून. त्रयस्थाच्या दृष्टीने शब्दार्थ लागू शकेल पण तो शब्दांच्या पलिकडला भावार्थ जाणायला मनात सूरदासांच्या इतका शक्यच नसला तरी किंचितसातरी विरहाग्नी जाणवायला हवा असं सारखं वाटतंय.

तूच बघ ना ट्राय करुन, तुझ्याकडे ती प्रतिभा आहे. माझ्या मनात तो भाव उमटला तरी मी ते शब्दांत उतरवू शकेन की नाही याबद्दल शंकाच आहे.

या कवनाचा अर्थ [सामुदायिकरित्या] छानच उलगडला. तसा सरळ-सोपा अर्थ आहे. संतांच्या रचना क्वचितच अवघड / बिकट असतात.
याचं संगीत हृदयनाथ मंगेशकरांचं आहे आणि लताबाईंनी गायलेलं आहे. सुमारे पंचेचाळीस ते पन्नास वर्षांपूर्वीची ही रचना असावी.
त्याच्या जोडीचं दुसरं गाणं - बरसे बूंदियां सावनकी. तेही सदाबहार.
तेंव्हा EP प्रकारच्या रेकॉर्डवर ही गाणी HMV ने काढली होती. आजकाल ती फारशी कुणी म्हणताना ऐकू येत नाहीत. पण माझ्या अत्यंत आवडत्या गाण्यात All Time Favourites त्या दोन्हींचा समावेश आहे.
'निसदिन' मधली आर्तता खासच पण 'बरसे बूंदियां' ने होणारा प्रसन्न-रसाचा शिडकावा असा मस्त आहे की ते गाणं ऐकता ऐकता आपण श्रावणधारात भिजत असल्याचा अनुभव येतो.
या गाण्याचं सांगितिक निरुपण करायला 'दाद' ना खास पाचारण करायला हवं! ते काम येरा गबाळ्याचं नाहीच.
- प्रभाकर [बापू] करंदीकर.

या गाण्याचं सांगितिक निरुपण करायला 'दाद' ना खास पाचारण करायला हवं! ते काम येरा गबाळ्याचं नाहीच.
- प्रभाकर [बापू] करंदीकर.
+ १

छान माहिती मिळाली. लहानपणी अनेक वेळा ऐकलेले आहे हे गाणे.

बापू- 'बरसे बूंदियाँ सावन की' च्या आठवणीबद्दल धन्यवाद. त्या गाण्याला तोड नाही. पूर्वी शाळेच्या रूटीन मधे सकाळी ऐकायचो त्या दिवसांत गेलो एकदम मी Happy

ही घ्या लिन्क
http://www.youtube.com/watch?v=OTXzhGxvsoM

निसदिन बरसत हे मधुकौन्स आणी मधुवन्ती अशा मिश्र रागावरवर आधारित म्हणावे लागेल. त्यातील रिशभ आणी धैवत हे स्वर आहेत जे मधुवन्ती रागाशी (मुखद्याची ओळ) जुळतात पण तिथे पन्चम वापरला नाहिये !
शुध्ध मध्यम असा येतो कि तो मालकौन्स ची आठवण करतो. कमाल अजब मिश्रण आहे हे.
कुणी जाणकार आहेत का हा अनवट राग महित असलेले ?