आंबापुराण

Submitted by रंगासेठ on 6 May, 2013 - 13:17

कडक उन्हाळ्याने समस्त मनुष्यप्राणी हैराण आहे, उकाड्याने त्रस्त, घामाने बेजार, तहानेने कासावीस झालेल्या या मानवास सुटकेचा मार्ग तरी कोणता?? हा उन्हाळा सहनीय कसा करायचा असा प्रश्न पडायचा, सुट्ट्यांचा मौसम पण सुरु झालेला, पाहुण्यांच्या टोळधाडीची धास्तीने घराघरात बेचैनी. घराघरातून टाहो फुटत होता की ''वाचव आम्हाला, हे भगवंता"!! तेव्हा दरवर्षी अशा समस्त त्रस्त भक्तांना त्रासातून सुटका अथवा अल्पकालीन आराम देण्याकरता भगवंत फळांच्या राजाच्या रुपात, अर्थातच आंब्याच्या रुपात पृथ्वीतलावर अवतारीत होतात.

अशा या माझ्या अत्यंत आवडत्या फळाला माझ्यातर्फे हा नमस्कार.

१) उनाची काहीली वाढत जाते तशातच वसंत ॠतूचे आगमन होते, कोकीळच्या कूजनाबरोबरच आपल्याला राजाचे पहिले दर्शन घडते.

Mohor

२) प्रत्यक्षात मूर्त स्वरुपात अवतरताना हा राजा येणार्‍या सुखद दिवसांची हमी देतो.

_MG_9436

३) सगुण सुंदर असे रुपडे सर्वत्र दिसू लागते

_MG_9466_MG_9468

४) एकदा का नैवेद्य दाखवला की आपल्या प्रकट दर्शनाने, चवीने, रंग रुपाने बेभान करतो.

_MG_9597_MG_9499

५) जेवताना जोडीने गोडी बरोबरच कैरीच्या चटणीच्या रुपात तिखट-आंबट चवीने तृप्त करतो

_MG_9891

६) उन्हाळ्यातील सण असोत, घरगुती फक्कड जेवण असो, लग्नातील पंगती असोत, आमरसा शिवाय उन्हाळा सार्थकी लागत नाही.

Aamras

७) थकून आलेल्यांना उर्जा देताना राजा, पन्हं रुपात येऊन ऊनाचा दाह कमी करतो.

_MG_9587

८) बाहेर जेवायला गेलो की फर्माइश होते ती आइस्क्रीम /मिल्कशेकची. तिथेही साहेब आहेतच.
आणि या अवतारात हल्ली बाराही महिने असतात.

आंबा-खोबरं वडी

_MG_9531

मिल्कशेक / मस्तानी आणि वर आंब्याच्या रसाळ फोडी...

Mango Milkshake

आइस्क्रीम तर आहेच

_MG_9894

९) बरं दरवेळी ताज्या रसरशीत स्वरुपातच यायला हवं असं नाही.

बच्चे कंपनीची आवड

Candies

बाराही महिने आंब्याचा सीझन Wink

_MG_9483

१०) बरं मंगल कार्यात, सणवारीत यांची उपस्थिती आहेच, डहाळ्यांच्या रुपात.

Dahali

त.टी. -: मला आंबा अतिशय आवडतो. बरेच दिवस एखादी थीम घेऊन फोटोग्राफी करण्याची इच्छा होती. तेव्हा हा आंब्याचा योग जुळून आला. लिखाणात काही उणिवा वाटल्यास गोड मानून घ्या, आंब्यासारखं Happy , ही विनंती.

यात आम्रखंड / आंबावडी / सुजाता मस्तानी / रसना / गोडांबा / क्रीम बिस्कीट्स/ मँगो केक या मान्यवरांचा समावेश करता आला नाही Sad झब्बू भरभरुन टाकावेत Lol

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद Happy लोणचं विसरलो आणि हो ती कैरीची डाळ आहे.
झब्बू मध्ये बाकीचे अवतार दिसतीलच.

अशी थीम घेऊन पहिल्यांदाच फोटो काढलेत आणि प्रेरणास्थान अर्थातच जिप्सी/मार्को पोलो सारख्या मंडळींना आहे. आणि Dev_ यांच्या 'कोकणवारी..' मधील कैरीच्या सुंदर फोटोवरुन या थीमची कल्पना सुचली त्याबद्दल त्यांना धन्यवाद Happy

वॉव.. भारी थीम... सुवास सुवास दर्वळतोय.. नुस्ते फोटू पाहूनच तोंडात चव येतीये... आहाहाआ!!!!
सुप्पर्ब थीम सुप्पर्ब फोटोज

मस्तच !!!

स्लर्प स्लर्प....

मँगो बर्फी ....मँगो लाडू....मँगो चीज केक.... काहीतरि केलेच पाहिजे आता Proud

मस्त धागा आहे रंगासेठ. फोटोदेखील छानच.
याबरोबरीनेच ’आंबा कसा खावा’ याबद्दलही गांभीर्याने (;) :P) विचार व्हायला हवा असे वाटते.

प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने आंब्याचा रसास्वाद घेत असतो.
आंब्यासंदर्भात आपापले अनुभव, आवडी-निवडी इ. शेअर केल्यास या धाग्याची रंगत वाढेल असे वाटते.

रंगासेठ, तुमचं काय मत आहे यावर ??

वा वा वा...रंगासेठ... जियो...!!! आज पर्यंत जेव्हढं समाधान आंबे खाऊन मिळवलं तेव्हढच तुमच्या या थिम फोटोग्राफिच्या मांडणीतून वाचुन फोटो पाहिल्यामुळे मिळवलं ... Happy

सुप्पर डुप्पर लाइक... http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-195.gif

गुळांबा, साखरांबा, मेथांबा, हे तर महत्वाचे पदार्थ,
उन्हाळ्यात करुन ठेवून नंतर शाळेत पोरांच्या ड्ब्यात द्यायला अन् खायला काय मज्जा येते !
बाकी फळांच्या राजाचं किती वर्णन करावे तेव्हडे थोडेच आहे.....!

मला खूप आठवण आली......आंब्यांची. ....यम्म्मी ....:-)

Pages