सहकार्य सामजिक कार्याशी....

Submitted by मी दुर्गवीर on 6 May, 2013 - 12:19

जय शिवराय
सहकार्य सामजिक कार्याशी

५/५/२०१३ रोजि दादर येथे ''सेवा सहयोग'' द्वारा आयोजित ''school kit assembly' या कार्यक्रमात दुर्गवीर प्रतिष्टान च्या मावळ्यांनी या कार्याला हातभार लावून पुन्हा एकदा सिध्द केले कि दुर्गवीर हि संस्था हि फक्त गडसंवर्धन या कार्य सोबतच सामाजिक कार्यही तितक्याच तळमळीने करत आहे …

समाजकार्य म्हणजे रंजलेले-गांजलेले दु:खी-कष्टी दुबळे लोक अथवा जनसमूह यांना खासगी अथवा सार्वजनिक रीत्या मदतीप्रीत्यर्थ पुरविलेली सेवा.
पण आजच्या या धावत्या जगात कोणालाहि याची इच्छा राहेलेली नाही . आज उभ्या भारत भर अनेक सामजिक विषयांवर कार्य करीत असणारे बरेच संस्था आहेत. प्रत्येकाचे या समाजात एक वेगळ स्थान आहे ….
त्याच पैकी एक वेगळी संस्था म्हणजे '' सेवा सहयोय foundation " यांच्या नावातच 'सेवा'करणे आणि सहयोग करणे .समाजकार्याचे मुख्य ध्येय, सामाजिक कार्यक्षमता वाढविणे हेच यांचे ध्येय होय.
स्वामी विवेकानंद यांच्या आदर्शांवर कार्य करणारी एक संस्था . गरजू विधार्थ्याना शालेय शिक्षणात लागणारे साहित्य पुरवणे हे यांचे प्रमुख कार्य …. ज्या मुलांना आपल्या या देशात शिक्षण घेण्याची इच्छा असूनही त्या सामुग्रीच्या कमतरतेमुळे त्यांना शिक्षण सोडावे लागते त्या उद्याच्या भविष्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी हि संस्था वही , पुस्तक , पेन्सिल , दफ्तर , चित्रकला वही ,रंगीत खडू अश्या अनेक वस्तू गेले अनेक वर्ष आपल्या मध्यमातून पुरवत आहे …….

या संस्थेत एक वेगळे पण आहे या school kit वस्तूचे वाटप सामाजिक कार्य करणार्या संस्थेच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्या पोहचवत असत.

आज 35 NGO चळवळी ' सेवा सहयोय foundation " करत असलेल्या कार्याच्या माध्यमातून एकत्र येत आहे ….
आज झालेल्या कार्यक्रमात ३००० school kit assembly पूर्ण झाली.
जर आपल्यालाही या समाजकार्यात आपला कोणत्याही प्रकारात योगदान द्यावयाचा असेन तर नक्की संपर्क करा. कारण आपल्या या छोटाश्या मदतीने त्या गरजू विद्यार्थाना पुढील शिक्षणासाठी नवी चेतन मिळेल
धन्यवाद
अधिक माहिती साठी :
दिपाली ताई देवळे : 09892031529(http://www.sevasahayog.org/)

अजित राणे 8097519700
नितीन पाटोळे 865582374
eee_0.jpgs.jpg3.jpgt="450" alt="gg.jpg" />tttt.jpggggggg.jpg1_0.jpg2.jpg3.jpg4.jpg5.jpg<6.jpg7_0.jpg8_0.jpg10.jpg11.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय चांगला उपक्रम. ''सेवा सहयोग'' ने असाच उपक्रम अगोदरही राबविला होता तेव्हा मदत केली होती. या वेळी दिपालीताई मार्फत मदत पाठवितो. त्या ठाण्याच्या पर्यावरण केद्रांचेही चांगले काम करत आहेत.