नाच रे सुब्रा अँबेच्या व्हॅलीत

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

नाच रे सुब्रा, अँबेच्या व्हॅलीत
नाच रे सुब्रा नाच !

सेबीशि वेडा झुंजला रे
काळा काळा पैसा भिजला रे
आता तुझी पाळी, वीज पडे भाळी
वाचव सहारा नाच !

भरभर धाड पडली रे
रायांचि भरली शंभरी रे
पेपरात लिहू, जहिराती देऊ
करुन ठणाणा नाच !

नवनव्या योजना(स्कीम) काढूया रे
गुंतवणूकदारांस नाडूया रे
करोडोंच्या नोटांत, केस लढु कोर्टात
नवाबी लखनव्या नाच !

मिडीयाची गडबड थांबली रे
तुझि माझि जोडी जमली रे
जनपथी छान छान, श्वेत रंगी (हाय)कमांड
कमांडीखाली त्या नाच !

चु भू द्या घ्या

____________________
मूळ अजरामर गाणे:

नाच रे मोरा, अंब्याच्या बनात
नाच रे मोरा नाच !

ढगांशि वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच !

झरझर धार झरली रे
झाडांचि भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहितरि गाऊ
करुन पुकारा नाच !

थेंबथेंब तळ्यात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत, खेळ खेळु दोघांत
निळ्या सौंगड्या नाच !

पावसाचि रिमझिम थांबली रे
तुझि माझि जोडी जमली रे
आभाळात छान छान, सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच !

गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - पु. ल. देशपांडे
स्वर - आशा भोसले
चित्रपट - देवबाप्पा

प्रकार: