बॉस्टन मॅरेथॉन

Submitted by kaushiknagarkar on 21 April, 2013 - 17:07

बॉस्टन मॅरेथॉन

एक युवक
गोरागोमटा नाकेला, भावपूर्ण डोळ्यांचा
उंचनिंच देखणा हुशार
सर्वांचा आवडता

एक मुलगा
पिटुकला तुडतुडीत, विस्फारलेल्या डोळ्यांचा
जगाचं कुतुहल असलेला, ऊत्साही निरागस
सर्वांचा आवडता

एक आजोबा
अनुभवी धीरोदात्त, ममताळू डोळ्यांचे
उत्साही तंदुरूस्त
सर्वांचे आवडते

एक कॅमेरा
निर्विकार भावनाशून्य, लक्षलक्ष निर्जीव डोळ्यांचा
सर्वसाक्षी चित्रगुप्त, निरुत्साही अनुत्सूक
दुर्लक्षित

आजोबा पळतायत, धापा टाकत अंतीमरेषेकडे
मुलगा खिदळतोय, आनंदाने हातवारे करून शर्यत अनुभवतोय
युवकाने ठेवलीय, स्फोटक पिशवी मुलाच्या पायापाशी
कॅमेरा पाहातोय
मुलाला आजोबाना युवकाला पिशवीला

युवक निघून जातोय साळसूदपणे
पिशवीचा उद्रेक होतोय ठरल्याप्रमाणे
आजोबा पडतायत तळमळत अवचित धक्क्याने
आणि मुलगा? मुलगा कुठे गेला?

कॅमेऱ्याने पाहिलय सगळं, लक्ष डोळ्यांनी
नोंद करून ठेवलयं प्रत्येक क्षणचित्र
सांगेल तो सारं यथावकाश, वेळ टळून गेल्यावर

पण ... उत्साही युवकानं असं का केलं हे तो सांगू शकेल?

एप्रिल २०१३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सुध्दा आत्ताच ती बातमी वाचली आणि हा धागा वर आला. त्या लहान मुलाचे नाव मार्टीन रिचर्ड अवघा आठ वर्षाचा होता तो. कविता खरंच मनाला भिडली.

http://www.rediff.com/news/report/boston-bomber-tsarnaev-sentenced-to-de...