नको जातभाई ,हवे देशभाई.....

Submitted by सुशांत खुरसाले on 12 April, 2013 - 08:08

कुठे नांदशी तू, कुठे राहतो मी जणू धुंदण्याची मला ना मुभा
कुठे जाणशी तू पुरे शल्य माझे कशाला म्हणावे तुला दिलरुबा?

इथे हिंडलो का ?इथे काय माझे ? इथे मीच माझ्याच शोधी खुणा
गवसतो मला मी कुणी सांगते अन् 'नसे बाळराजा तुझा हा सुभा!'

'असे भक्त माझ्या नको साधनेला' व्यथा सांगतो आज त्याची विठू....
'तसा भक्त माझा नुरे आज कोणी जयाच्या स्तवे मी विटेवर उभा.'

मनाच्या मनाशी जरी झूठ बेड्या जरी सार्थ वेड्या खुळ्या भावना
कसा सांग विसरून जावा तरी मी दिला शब्द तुजला दिलेली जुबां..?

उरे प्रश्न 'जगणे' जसाच्या तसा पण खुज्या अस्मिता येथ सोकावती
नको जातभाई ,हवे देशभाई -चला तोडूया आज सार्या दुभा......

दुभा= दुभंगवणार्या रेषा ,आपल्यातील एकत्वाच्या आड येणार्या ,फूट पाडणार्या रेषा या अर्थाने.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उभे राहून टाळ्या........

काफिये एकापेक्षा एक सरस आलेत अन अगदी सहजही
मक्ता जरा कमी आवडला तो वगळ्ता सर्व शेर छानच मतला सर्वाधिक आवडला ....विठ्ठलही

कैलासजी, भारतीताई , वैभवजी सर्वांचे मनापासून आभार.............
वैवकुजी, विठ्ठलाच्या शेराबाबत आपल्या मताबद्दल उत्सुकता लागून राहिली होती. विठ्ठलाचा हा माझा पहिलाच शेर आहे..

धन्यवाद!

सर्वात आधी.... तुम्ही याबाबतीत माझ्या मताला जे महत्त्व देत आहात... त्यामुळे .....मला....मी म्हणजे काहीतरी फार भारी चीज आहे असे जे वाटते आहे .... त्याबद्दल धन्यवाद Wink

विठ्ठलाचा हा माझा पहिलाच शेर आहे>>>>>>>>. :हाहा:...... अहो त्याने काय फरक पडतो, महाराज ????
_________________________________
उत्तम खयाल आहेच ...
...... अर्थ लावण्यासाठी सहज , थेट , व्यवस्थित उलगडत जाणाराही झालाय हा शेर

आणि हा शेर त्याच्यात माण्डलेल्या भावनेची साक्षात प्रचिती घडवून आणेल असा झाला आहे

आणखी एक म्हणजे स्व्तःच्या नाही ; तर विठ्ठलाच्या भूमिकेस मांडणारा शेर केलात हेच याचे नेमके वेगळेपण / नाविन्य आहे असे मला वाट्ते

मला माझा एक अप्रकाशित शेर द्यावासा वटतो आहे

अरे जा ना विठ्या पिच्छा पुरवशिल केवढा माझा
किती करतात येथे चांगली बघ शायरी दुसरे

सुभा चांगलाय

कुठे नांदशी तू, कुठे राहतो मी जणू धुंदण्याची मला ना मुभा
कुठे जाणशी तू पुरे शल्य माझे कशाला म्हणावे तुला दिलरुबा?

बाप रे, एक कुणीतरी कुठेतरी नांदतय, आणि एक `मी' दुसरीकडे कुठेतरी राहतोय. यात त्या `मी'ला धुंदण्याची मुभा का नाहीये ? दोन ध्रुवांवर दोघे आपण अशा स्वरूपाच काहीतरी शल्य असावे असे पहिल्या ओळीवरून शंका येते... पूर्ण शल्य नक्की काय आहे? आणि `ति'ला त्यामुळे दिलरुबा का म्हणायचं नाही?........
(मोठं वृत्त असलं की प्रश्नपण फार पडतात)

मोठं वृत्त असलं की....>>>>>होय गझलुमिया बरोबराय तुमचं !! त्यामुळे गोची झालीये खरी .. पण मी मुद्दामच बोललो नाही
असो पण मला आवडली ही रचना

देवसर हवे होते आज !!! Sad (मायबोलीवर !!!!!!!!!!! ...उगाच गै. न. Wink )

गझलुमियां, मियां बात कुछ ऐसी है......
त्या `मी'ला धुंदण्याची मुभा का नाहीये ?>>>>तिला सोडून धुंदण्याचा विचार सुद्धा मनाला शिवू शकत नाही ,
त्याबाबतीत याआधीच्या माझ्यागझलेतला एक शेर देऊ इच्छितो....
भलत्या कुणामध्येमी गुंतू नये म्हणूनी
तुजला स्मरावयाचा करतो प्रयास हल्ली!
खरे शल्य हेच आहे की, ती माझ्यापासून एवढी दूर गेलीय की -कोणत्या धुंदीत आता मी झुरावे? अशी मनोवस्था आहे (थोडक्यात तिचे असणेच मला धुंदी चढवून जाते असा आशय)
आणि `ति'ला त्यामुळे
दिलरुबा का म्हणायचं नाही?........>>>दिलरूबा न म्हणण्यामागे एक चीड आहे.माझ्या (एवढ्याशा) वेदना ती जाणून घेऊ शकत नाही म्हणून...(तरीही मी दिलरूबा म्हणने सोडणार नाही .डोळा मारा)
गै.न.
@ वैवकुजी,
विठ्ठलाचा हा माझा पहिलाच शेर
आहे>>>>>>>>. ...... अहो त्याने काय
फरक पडतो, महाराज ????>>>> आम्हा पामरांना पडतो हो....प्रेयसीवर ऊठसूठ उभे आडवे शेर करणार्या आमच्यासारख्यांना विठ्ठलाचा शेर म्हणजे बरेच स्वविचार तपासावे लागतात. आपल्या विठ्ठलशेरांमुळे आपली याद आली इतकेच. गै.न.
आशय पोचवण्यात कमी पडलो असेल तर क्षमस्व!

छान

पल्लेदार
वृत्तातील गैरमुरद्दफ स्वरकाफियांची गझल!
वृत्तहाताळणी छान!
सुंदर खयाल!
विठ्ठलाचा शेर झकास!
अवांतर: विपुवर नजर टाकावी!

धन्यवाद अरविंदजी ,कर्दनकाळजी!
अवांतर-कर्दनकाळजी, आपली आठवण काढलीच होती वैवकुंनी....

गंभीरजी , आपल्याला पडलेले प्रश्न कॄपया कळवावेत.
मी माझ्या परीने स्पष्टीकरणाचा प्रयत्न करीन .कॄ.गैं.न.

वृत्त आवडले. सगळेच शेर आवडले.
वाचता वाचताच कधी "मै जिंदा हूं, पर जिंदगीसे खफा हूं " च्या चालीत वाचले कळलेही नाही.

मनाच्या मनाशी हा कल्पनाविलास आवडला.

गझल एकुण ठीकठाक आहे. . ही गझल गोटीबंद आहे या कैलासरावांच्या विधानाशी असहमत आहे.

शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

सुमंदारमाला स्त्रग्विणीच्या चालीत वाचू शकणारी अद्वितीय व्यक्तिमत्वे Lol

उपरोधाने का होईना आयडी डिलीट करण्याशिवाय आणि काविळीशिवाय वेगळं काही आपल्या मुखातून बाहेर पडले. पण म्हणून बघ बेफी त्या चालीत. वाचायला सोपं जातंय.

उपरोधाने का होईना आयडी डिलीट करण्याशिवाय आणि काविळीशिवाय वेगळं काही आपल्या मुखातून बाहेर पडले. पण म्हणून बघ बेफी त्या चालीत. वाचायला सोपं जातंय.<<<

माझी मूळ पोस्ट 'सुमंदारमाला स्त्रग्विणीच्या चालीत' ही चुकीची पोस्ट होती. मला ते गीत (मै जिंदा हूं पर...) हे एक बशीर बद्रच्या वाचलेल्या गझलेचा त्याक्षणी आठवलेला भाग वाटला जे स्त्रग्विणीमध्ये आहे. किरण यांचे म्हणणे बरोबर आहे की सुशांत यांची ही रचना भुजंगप्रयातसारखीच लय असलेल्या सुमंदारमाला वृत्तामुळे 'मै जिंदा हूं पर...' या किशोरकुमारने गायलेल्या गीताच्या चालीत वाचता येते. मनस्तापाबद्दल दिलगीरी व अवांतर चर्चेसाठी क्षमस्व!

-'बेफिकीर'!

मनस्तापाबद्दल दिलगीरी व अवांतर चर्चेसाठी क्षमस्व!

या एका वाक्यासाठी मी आपल्यापुढे पुन्हा मैत्रीप्रस्ताव ठेवत आहे.

माफ करा..
पण असा करून पाहिला.

इथे गुंतल्यावर मना सांगतो मी नसे बाळराजा तुझा हा सुभा!>>>
विशेष आवडला..

विठूचा पण मस्तच...

इथे हिंडलो का ?इथे काय माझे ? इथे मीच माझ्याच शोधी खुणा
गवसतो मला मी कुणी सांगते अन् 'नसे बाळराजा तुझा हा सुभा!'

'असे भक्त माझ्या नको साधनेला' व्यथा सांगतो आज त्याची विठू....
'तसा भक्त माझा नुरे आज कोणी जयाच्या स्तवे मी विटेवर उभा.' >>> हे शेर सर्वात आवडले.

गझल उत्तमच . विठोबाला वेठीला घरण्याचा प्रकारही नवीनच समजला. ववैकुंनी री ओढुन त्याला अनुमोदन दिल्याने हा भलताच पॉप्युलर प्रकार असावा असे वाटते.

विठोबाला वेठीला घरण्याचा प्रकारही नवीनच
समजला. ववैकुंनी री ओढुन त्याला अनुमोदन
दिल्याने हा भलताच पॉप्युलर प्रकार
असावा असे वाटते.>>> नाही हो विठ्ठलाला वेठीला धरणारे आम्ही कोण?
क्रु. गै.न.
प्रतिसादाबद्दल आभार नितीनचंद्रजी!