विपुतल्या रेसिप्या ३- कच्च्या फणसाची भाजी

Submitted by सायो on 31 March, 2013 - 11:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कच्चा, सोललेला, चिरलेला आणि आठळ्यांचेपण पातळ काप केलेला फणसः साधारण ५ कप.

२ टेबलस्पून धणे, १ टेबलस्पून जिरे, अर्धा टीस्पून मिरे, ४ लवंगा, पहिलं पेरभर (आणि लेंथवाइक अर्धा केलेला) दालचिनीचा तुकडा, अर्धा टेबलस्पून बडीशेप. हळद, तिखट, मीठ. मोठी पळीभर टोमॅटो पेस्ट, भरपूर कोथिंबीर, १ मोठा कांदा. चमचाभर आलं किसून आणि हिरव्या मिर्च्या ऑप्शनल

क्रमवार पाककृती: 

कोरडे मसाले कच्चेच मिक्सरमधून बारिक करून घ्यायचे. कांद्या आणि आलं बर्‍यापैकी तेलात परतून घ्यायचं. यावर डायरेक्ट फणसाचे तुकडे घालायचे. त्यावर टोमॅटो पेस्ट घालून परतून घ्यायचं. आता सगळे मसाले, मीठ, हळद, तिखट घालून मसाल्यांचा कच्चा वास जाईपर्यंत परतायचं. झाकण ठेवून वाफ आणायची. अगदी कोवळा असल्यास फणस शक्यतोवर तेलाच्या वाफेवर शिजवायचा. जरा जून वाटला तर पाण्याचे शिपके देऊन वाफ काढून शिजवायचं. शेवटी भक्कम कोथिंबीर घालायची.

वाढणी/प्रमाण: 
घरातल्या सगळ्या नगांना पुरत असावी बहुतेक
अधिक टिपा: 

कच्च्या फणसाची ही भाजी आईची रेसिपी आहे. चवीला सात्त्विक अजीबातच नाही. चालेल का बघ. अप्रतीम लागते एवढं मात्र खरं

ही पाककृती माझ्याच विपुत लिहून विपौड्या मारण्यापासून वाचवल्याबद्दल सर्वप्रथम मृ चे आभार Proud

माहितीचा स्रोत: 
मृण्मयीच्या विपुतल्या रेसिप्या (आजीचा बटवा चालीवर)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

वैदर्भीयांकडे (हा शब्द थोडासा भैय्यांसारखाच वाटतोय .. ;)) फणसाच्या भाजीच्या रेसिप्या असतील असं वाटलं नव्हतं हो .. Lol

एकदम नॉन-ट्रॅडिशनल पद्धत वाटते आहे .. कधीतरी ट्राय करायला हवा .. (आयता चिरलेला, बर्‍यापैकी बरी क्वालिटी असलेला आणि खरोखरच कोवळा असलेला फणस मिळालाच कधी तर .. Wink

पहिलं पेरभर >>> Lol आल्याचा तुकडा पहिल्या बोटाला लावून मापून बघणारी सुग्रण डोळ्यांसमोर आली.

छान आहे ही पण पाकृ. पण फणसाच्या भाजीला कांदा-टोमॅटो घातला तर मला अनेक तु.क. झेलावे लागतील. भाजीकडे तर कोणी ढुंकूनही बघणार नाही. त्यामुळे सायो डोंबिवलीत येईल तेव्हा करेल आणि मला खायला बोलावेल या आशेवर मी Wink

बरं, 'विपुतल्या रेसिप्या' अशी लेखनखूण द्यायची ना सगळीकडे? मी करते बदल.

छान आहे ही पण पाकृ. पण फणसाच्या भाजीला कांदा-टोमॅटो घातला तर मला अनेक तु.क. झेलावे लागतील. भाजीकडे तर कोणी ढुंकूनही बघणार नाही. त्यामुळे सायो डोंबिवलीत येईल तेव्हा करेल आणि मला खायला बोलावेल या आशेवर मी>>>> यात डोंबिवलीत ऐवजी पुण्यात करून बाकी पोस्टला +१! Wink

अजून तरी फणसाच्या भाजीची टेस्ट सासरी कोणाला माझ्याइतकी आवडली नाहिये. आईने करून पाठवली होती उकडगर्‍यांची आणि एकदा पार्‍याची भाजी, पण ती पहिल्यांदा वाढलेलीच घेतली सगळ्यांनी. मी उरलेली डबाभर भाजी चवीचवीने खात होते! Happy

कोवळे फणस बाजरात आलेत! त्यामुळे ही भाजी आता लगेचच करणार! छान रेसिपी बद्दल धन्यवाद!
विपूतल्या पाकक्रुतीचा खजिना आम जनतेसाठी खुला केल्याबद्दल धन्यवाद!