जगदंबेची प्रार्थना-6

Submitted by विनायक. दि.पत्की. on 26 March, 2013 - 07:07

जगदंबेची प्रार्थना-6
(अंबा जननी विश्वाची माया आदी पुरुषाची )
(चाल- निर्भय होई रे मना,निश्चिंत होई रे मना)
जरी जन्म दिला जननीने,
पुर्नजन्म दिला जगतजननी ने.
असेन जन्मलो संसारा साठी,
पुर्नजन्म राहो हा परमार्थासाठी.||१||
संसार भयाने न मी करावी भक्ती,
करी नष्ट पूर्ण विषयासक्ती.
साधो मज पूर्ण प्रेमळ भक्ती,
बाधो न माया देई सायुज्य मुक्ती ||२||
माया मोह हि तुझीच देणी,
यातून हि न सुटे कोणी.
वेळीच ज्याला गुरु हि भेटे,
न येई दैन्य तया आड वाटे ||३||
मोहाचे निखारे मजला भूलविती,
वनोवनी शोधितो मी ह्र्दयस्थ शांती.
पश्चातापे व्हावे परिपूर्ण दग्ध,
स्थिरतेने नामी असावे मंत्र मुग्ध ||४||
अज्ञान व्याधीने मी आहे त्रस्त,
अर्पियले मन हे तव चरणी समस्त.
व्हावे मन हे आता पाप वितिरिक्त,
संतोष असावा मनी अन्तस्थ ||५||
भोग भोगण्या जरी हा जन्म असो,
सदुपयोग देहाचा मज ठाऊक नसो.
तरी मंगलमय पवित्रता सर्वत्र दिसो,
माध्यम तुझे मी हा भाव मनी वसो.||६||
आता समर्पण माझे जरी अपूर्ण,
समर्पुनी मजला त्वा ते करावे पूर्ण.
असावे मज सदा शांतीचे भान,
त्या योगे पडावा गळोनी अभिमान.||७||
माझी ऐसी पात्रता मजला न व्हावी ज्ञात,
जी करेल हमेशा माझाच घात.
जरी मस्तकी माते आहे तुझाच हात,
ठेवी हमेशा तू मजला अज्ञात.||८||

Group content visibility: 
Public - accessible to all site users