जगदंबेची प्रार्थना-4

Submitted by विनायक. दि.पत्की. on 19 March, 2013 - 05:58

जगदंबेची प्रार्थना-4 (षड विकार)
(अंबा जननी विश्वाची माया आदी पुरुषाची )
सृष्टीत त्वा जे निर्मिले ते सर्व अमुल्य असे,
सुंदर पुष्प हि ह्या दुर्बल दृष्टीस निर्माल्य भासे.
कार्य माझे असे घडावे,नाव तुझे वाढावे.
प्रसिद्धी पाई मी, तव सेवेत कमी न पडावे.||१||
मनी असावा लोभ,तव भक्ती रसातील ज्ञानाचा.
तव सेवेचे कण कण वेचुनी, मी पेला भरावा मोहाचा.
बेफाम वृत्ती करण्या सकाम, मनी मद हि वसावा.
न चाले सृष्टी तव इच्छे विना, हा गर्व हि असावा. ||२||
क्रोध हि असावा मज पाशी, न फिरकण्या पाप वासना.
मर्यादा श्रद्धेच्या नष्ट करण्या हवी, मज मत्सराची भावना.
नसो काम विकार,नसावा काम अलंकार.
तव भक्तीत रणमान मनाचा, मज असावा अहंकार.||३||
सुविचार आचरण्या माते, कधीच शक्ती नसावी कमी.
उरो संपत्ती संसारातुनी, आणिक लागो तुझिया नामी.
धन तव आशीर्वादाचे माते,सदोदित मजला कळावे.
उमगावा मोह मिथ्या मायेचा,उगाच फिरणे टाळावे.||४||
नसावे मी कधी पोरका,तुज वीण हे आई,
धुरीण वृत्ती साठीच दे ,अभय मज ठाई ठाई.
जन्मोजन्मी मी सेवक, तळाचा तव दरबारी.
माझे न सरे अज्ञान माते,आशा तुझ्या दयेची भारी.||५||
महती न कळते तुझी,हा अपराध माझा भारी.
पाप हरोनी अपराध क्षमोनी,माते आता मज तरी.
आर्त जाहलो माते हकेलाही,आता त्राण हि न उरे,
मज दर्शन देण्या तुजला,माझे आई बोलणे पुरे. ||६||
दर्शन देण्या माते जर माझी योग्यता नसेल,
माते मी हीन ,पापी,दुराचारी हि असेल.
जरी आलीस तू रागावोनी,करण्या मजला शिक्षा.
दर्शन तुझे हवेच मजला,मग चालेल हि सुदधा भिक्षा ||७||
तू अथांग ज्ञानसागर,रस भरीत प्रीती तुझी.
अमुल्य ठेवा,अगणीत मेवा,झोळी फाटकी माझी.
हे दुबळे हात वेचती,परी कधी न सरेल.
फाटक्या झोळीतला खजिनाही,मला जन्मांतरी पुरेल.||८||

Group content visibility: 
Public - accessible to all site users