चरूया

Submitted by राजीव मासरूळकर on 12 March, 2013 - 23:30

सोमराजी (लगागा लगागा) या वृत्तातील गझल
"चरूया"

मनीचे करूया
चरूया चरूया

खरे बोलतो जो
तया सावरूया

खिसे फायद्याचे
उराशी धरूया

कुणी येत आहे
अता आवरूया

पडू देत शेती
धुरे नांगरूया

फुले वेचतांना
खिळे अंथरूया

निरोगी नसांना
विषाने भरूया

ज'रा जीव' जाता
मरूया मरूया !

-राजीव मासरूळकर
19.10.12,
7.00PM

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अत्यंत कमी शब्दांत अतिशय आशयघन असे विचार मांडण्याची अद्भूत हातोटी वाखाणण्यासारखी आहे. कमालीची ताजीतवानी, अर्थवाही गझल.

राजीव मासरूळकर | 13 March, 2013 - 03:59 नवीन
धन्यवाद अरविंदजी.

औपरोधिक झाली आहे ही गझल.

आमचे प्रतिसाद औपरोधिक असले तर तसे सांगण्यासाठी कोणती भावमुद्रा वापरावी लागते ते कळेल का?

कळावे

गंभीर समीक्षक

टुकार गझल.

मासरुळकर, तुमची प्रतिभा अशा टुकार गझलां वर दवडू नका. तुमच्यात खूप पोटेन्शियल आहे.

वरच्या गझलेत्,एकही शेर तगज्जुल वाला नाही आहे.त्रयस्थ नजरेने पाहिल्यावर समजेल. वृत्त्,व्याकरण पाळले म्हणजे गझल झाली असे नव्हे.

माझा प्रतिसाद कठोर वाटल्यास क्षमस्व.तुम्ही तुमच्या अशाच गझला चालू ठेवू शकता.

पुलेशु.

जयश्री अंबासकर,
अमेयजी ,
कावळा ,
आपले मनापासून आभार.

कावळेदादा, आपल्या मतांशी अंशतः सहमत.
Happy

गंभीर समीक्षक,
तुमचा पहिला प्रतिसाद औपरोधिक आणि अत्यंत खोटारडा आहे हेच तुम्हाला तुमच्या दुसऱ्‍या प्रतिसादातून सुचवायचं आहे ना ?
(विदिपांनाही तेच म्हणायचंय बहुतेक. कि दोघे एकच ?)
मग सरळ टिकाच करा ना कावळेदादासारखी प्रामाणिकपणानं. खोटी स्तुती कशाला ? भावमुद्रांची गरज कशाला भासावी ? भावमुद्रांतून सगळंच सांगता आलं असतं तर भाषेची गरजच पडली नसती ना माणसाला !
असो. आभार !