“अन्नदाता सुखी भव”

Submitted by रमेश भिडे on 7 March, 2013 - 12:44

......

आज काही कामा निम्मित - नारायणगाव(जिल्हा पुणे ) ला गेलो होतो...नारायणगाव महाराष्ट्राची द्राक्षाची बाग म्हणून गौरवले जाते...येता येता ताजी द्राक्षे घ्यावीत म्हणून एका द्राक्ष बागेसमोर थांबलो...तिथे एक उच्चभ्रू दाम्पत्य आपल्या दोन गोंडस आणि बाळसेदार मुलांसोबत द्राक्षे पारखण्यात दंग होते... ताज्या रसरशीत द्राक्ष्याचा घड आणि घड तपासून पहात हे दम्पत्य त्या शेतकऱ्या बरोबर द्राक्ष्याच्या भावावर २० रुपये ३० रुपये किलोने मोलभाव करत वाद घालत उभे होते आणि त्यांची मुले हातातील छटाक भराच्या lays wafers च्या पिशव्या मिरवत आई बापाच्या bargaining power कडे कौताकाने पाहत wafers चा मिटक्या मारत आनंद लुटत होती...जवळ जवळ १०-१५ मिनिट हा सर्व प्रकार चालू होता...

इतक्या वेळ अत्यंत अदबीने त्यांच्याशी बोलणारा तो शेतकरी शेवट वैतागला आणि म्हणाला साहेब मी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाने अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत वर्षभर रक्त आणि घाम वाहून हि द्राक्ष्याची बाग फुलवली आहे वेळ पडल्यास आम्ही उपाशी राहिलो पण बागेला खते देण्यास कधीही मागे पुढे पहिले नाही ..स्वतः तहानलेले राहिलो पण बागेला कणभर हि पाणी कमी पडू दिले नाही...आणि आता जेव्हा ह्या कष्टाचे फळ खाण्याची वेळ आली कि आमच्या उत्पादनाची किमत तुम्ही ठरवता व्हय?

साहेब ह्या साली द्राक्ष्याला भाव नाय मिळाला तर कर्जापायी मारायची वेळे येणार हाय...इचार करा साहेब इचार करा ..अहो साहेब तुमच्या पोरांच्या हातात जी छटाक भर lays wafers ची पाकिटे आहेत त्याला २० रुपये मोजताना एवढा विचार केला होता का? आम्ही रक्ताघामाने फुलवलेल्या द्राक्षाची किमत करताय अन ५० ग्राम बटाट्याचे तुकडे खरेदी करतना डोळे मिटून घेताय ? तुम्ही लोक देशातील शेतकऱ्याच्या पोटात सुखाचे दोन घास जाऊ देणार बाही पण परदेशी परदेशी लोकांचे उखळ पांढरे करताय ? त्याचे खडे बोल ऐकून कोल्ह्याला द्राक्षे आंबट ह्या अविर्भावात खरेदी न करतच ते दाम्पत्य नाक मुरडत निघून गेले ...

“अन्नदाता सुखी भव” .....जेऊन पानावरनं उठताना म्हणायचंच हा लहानपणापासून पडलेला दंडक. एकदा बाबांना विचारलं “कोण हो आपला अन्नदाता ?” त्यांनी फार छान उत्तर दिलं “जो सगळ्यांसाठी अन्न पिकवतो तो अन्नदाता .......किंवा ते धान्य विकत घ्यायला केलेल्या कामाचा मोबदला म्हणून जो धन देतो तोही अन्नदाता .....पण या दोघात श्रेष्ठ मात्र पहिलाच कारण तो दुस्र्याचाही ही अन्नदाता” त्यावेळी समजलं नाही पण पुढे शेती करायला लागलो आणि खरा अर्थ समजला.....अभिमानही वाटायला लागला.

पण आज टीव्हीवर दुष्काळावर चाललेली चर्चा आणि एक documentary पाहिली ……आणि तो अभिमान किती खोटा आहे याची खात्रीच पटली .....काय एकेक समस्या ......चाळीस हजाराला गेल्या वर्षी मोठ्या हौसेने घेतलेली बैल जोडी आज चारा आणि पाण्या अभावी चार हजारात कसायाला विकताना त्या अन्नादात्याचा चेहरा बघवत नव्हता .......दुष्काळामुळे एक रुपयाही उत्पन्न येणार नाही हे माहित असूनही केवळ फळबाग जगावी म्हणून एक वेळ जेऊन वाचवलेल्या पैशात पाणी विकत आणणाऱ्या त्या अन्नादात्याची अवस्था पाहवत नव्हती .....आवंदा पिक बरं आलं तर भावाची येक आणि माझी येक पोरगी उजवणार होतो पन या दुष्काळानं घात केला......आता कधी होणार या अन्नदात्याच्या मुलींची लग्न

पण ही तर झाली एक नैसर्गिक बाजू.....त्यांच्या तक्रारीही अजब ......गावात पिण्याच्या पाण्यासाठी पाठवलेल्या Tankers ची सरकार दरबारी रोजची नोंद दहा Tankers ची प्रत्यक्ष पोच दहा दिवसात दोन Tankers ......जनावरांना दिल्याजाणाऱ्या चाऱ्याच्या सरकारी quantity पेक्षा प्रत्यक्ष पुरवठा कमीच ......आणि मग त्यांचे उपाय वर वर पाहता अघोरी पण कालानुरूप योग्य .....एका दुष्काळग्रस्त गावात सरकारी अधिकाऱ्याला वेळेत पाणी नाही पाठवलं म्हणून जमावानं गटाराचं पाणी पाजलं.....दुभती जनावरं पाण्या अभावी भाकड होण्यापेक्षा पडत्या भावात शेतकऱ्याला न विकता दोन पाचशे रुपये जास्त मिळतील म्हणून कसायाला विकायची ......तब्बल ४२ गावं कर्नाटकात जायच्या तयारीत ......

मग वाटलं बास झालं .....केवळ मतदारसंघ अबाधित राहावा म्हणून पाणी चोरणाऱ्या ......किंवा दुष्काळाच्या जास्तिजास्त सुविधा आपल्याच मतदारसंघात देऊ पाहणाऱ्या या नालायक राजकारण्यांना हा अन्नादाताच एक दिवशी अन्न अन्न दशेला आणेल .....एसी गाड्यातून बाटली बंद पाणी पीत दुष्काळी भागात दौरे करणारे हे सरकारी बाबू आणि राजकारणी एखाद्या गावात दगडाने ठेचून मारले जातील तेंव्हा तरी या लोकांची इछाशक्ती जागी होईल का ??

मित्रहो मार्च सुरु झाला .....तीन महिन्यानंतर पावसाळा सुरु होईल ......पण हे मधले तीन महिने फार भीषण जाणार आहेत ......दुष्काळ आजून भीषण होईल ......पाउस वेळेत पडेल अशी प्रार्थना करा ...... सहानुभूती नको ......उपाययोजनांवर बोलू या

फार उद्वेगाने आणि दुख:ने ही पोस्ट टाकतोय याला करणे दोन .....एक :- मनातलं दुख:, चीड, संताप मित्रां बरोबर नाही वाटायचं तर आणखी कोणा बरोबर ?? दोन :- माझे सगळे संवादी विचारी आहेत सहृदय आहेत लागलीच तर वाट्टेल ती मदत करायला मागे पुढे पाहणार नाहीत .....मागणे एकच तुम्हीही रोज जेऊन उठताना त्या अन्नादात्याला भरल्या पोटाने तोंड भरून एकच आशीर्वाद द्या त्याला आज त्या आशीर्वादाची फार गरज आहे “अन्नदाता सुखी भव” .....!

* (संदर्भ- माझे परम-मित्र Vidyacharan Purandare यांच्या पोस्ट वर आधारित )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सत्यकथन आहे. याच कारणाने मी आज पर्यंत एकदाही लेज खरेदी केले नाही. रोज फळे खरेदी करून खातो.

संयुक्त राष्ट्र संघाने 2013 हे आंतरराष्ट्रीय जल वर्ष जाहीर केल आहे .आपल्या कडे दुष्काळ पडला, तरी अन्नधान्याची टंचाई लगेच जाणवणार नाही. जाणवलीच, तरी आयात करण्याएवढी आपली ताकद आहे. पण पिण्याच्या पाण्याचं काय करणार? पीक, पशुधन, नैसर्गिक साधनसंपत्ती यांचं नुकसान होतं. दुष्काळ येणं, न येणं आपल्या हातात नाही, पण त्याला तोंड कसं द्यायचं हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे. सरकारनं तर प्रयत्न करायलाच हवेत, पण केवळ त्यावरच अवलंबून राहून चालणार नाही.
उपलब्ध पाणीसाठ्याचा कार्यक्षम आणि नियोजनबद्ध वापर ही बाब सर्वांत महत्त्वाची आहे. अगदी शहरातल्या माणसापासून गावातल्या शेतकऱ्यापर्यंत सर्वांनीच ती अंगी बाणवायला हवी.'वॉटर फूटप्रिंट’ आणि 'व्हर्च्युअल वॉटर’ या संकल्पना समजून घ्यायला हव्यात.थोडक्यात काय, तर 'आजचं भागलं, उद्याचं उद्या बघू’ अशी मानसिकता पाण्याच्या बाबतीत घातक ठरेल. दुष्काळासाठी तयार राहिलं आणि तो आला नाही, तर चांगलंच होईल. पण उलटी परिस्थिती झाली, तर मात्र आतासारखी कठीण परिस्थिती होईल. प्रत्येक गोष्टीत पाणी जपून वापरण्यासाठीची मानसिकता तयार होण्याची आवश्यकता आहे; नाही तर देव पाण्यात ठेवण्यापुरतंही पाणी उरणार नाही, अशी परिस्थिती यायला वेळ लागणार नाही....

शहरात ल्या उच्च्भ्रु लोकाना शेतकर्याच्या कश्टा चि जणिव नाहि>> शहरातल्या लोकानाच नाही तर उच्चभ्रू शेतकर्‍याना देखील गरीब बांधवांची जाणीव नाही.

जपान मधे पेट्रोल आणी पण्याचा भाव सारखाच आहे.घरात वापरल्या जानार्‍या सांड पाण्याचे ही बिल येते.
तिथे खुप जपुन पाणी वापरतात.तिकडे आपल्याकडिल पाण्याच्या सुबत्तेची खुप आठवन येते.

लेख आवड्ला. “अन्नदाता सुखी भव” !

आता नव्या सरकारने भूसंपादन कायद्यात सुधारणा(?) केल्यात.

आता अन्नदात्याला सुखाचे दिवस येणार? कि आता जी हालत आहे त्याहून खालावणार हे येत्या काळात कळेलच.

नव्या भूसंपादन कायद्या बद्द्ल http://www.dnaindia.com/india/report-decoded-what-changes-has-the-narend... हा एक माहीतीपूर्ण लेख वाचला. प्रमुख मुद्दे असे.
शेतकर्‍याला जमीनीची मिळणारी किंमत तीच ठेवली गेली आहे ( बाजारभावा च्या चौपट ) : या बद्द्ल लोकसत्ताच्या अग्रलेखात असा मुद्दा होता की जेव्हा एखाद्या जागी योजना येणार अस जाहीर होत तेव्हा तिथले जागेचे भाव साहजिकच प्रचंड वाढतात. शेतकर्‍याला मात्र बिगर शेती जमीनीचा भाव गुणीले चार इतक मिळत नाही. आता हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ असु शकत. सामान्यपणे शेत जमीन व बिगरशेती जमीन यामधे बाजार भावात किती फरक आहे ? यावर ते अवलंबून आहे.

national security, defence, rural infrastructure including electrification, industrial corridors and housing for the poor या पाच क्षेत्रांकरता जमीन अधिग्रहण करतांना सामाजिक अभ्यास अहवाल व ८०% लोकांची सहमती हे बंधन आता असणार नाही. आधीच्या कायद्या नुसार जमीनीवर अवलंबून असणार्‍या सर्वच लोकांचा विचार होता आता फक्त जमीन मालकाचा आहे. याहून अधिक वाईट हे की उत्तम शेतजमीन ही आता उद्योगांकरता अधिग्रहीत केली जाउ शकते.( रामजादे वगैरे बाष्कळ वक्तव्या विरोधात संसदेच काम रोखण्या ऐवजी काँग्रेसने या मुद्द्या विरोधात संसद बंद पाडली असती तर मला अधिक आवडल असत. )

शेतकर्‍यांच्या बाजूने एक गोष्ट आहे. यपूर्वी तेरा वेगवेगळ्या कायद्यांनुसार जमीन घेतली जाउ शके. त्यांचे नियम व मोबदला सगळच वेगवेगळ होत यात शेतक र्‍याच्या नुकसानीची शक्यता वाढत होती. आता या तेरा कायद्यांएवजी एक सर्वसमावेशक धोरण आखल गेलय.

बहुतांशी हे धोरण उद्योगांना अनूकूल आहे हे वेगळ सांगण्याची गरज नाही.The erstwhile bill may have had its heart in the right place, but was too rigorous, making it difficult both for industrialists and farmers. In a way, the new ordinance tries to address this problem. हे या लेखातल एक महत्वाच वाक्य.