इथेच पावसास वाटतेय जाळले !

Submitted by राजीव मासरूळकर on 4 March, 2013 - 09:43

इथेच पावसास वाटतेय जाळले !
_._._._._._._._._._._._._._._

सखे, तुला हताशसे बघून वाटले
तुला मिठीत का न मी कधीच घेतले ?

हरेक वाट जातसे घरी कुण्यातरी
घरास मी कशास कुंपणात बांधले ?

तुझ्याच हातच्या चवी अता फिक्या मला
तुझ्याच पापण्यांतले समुद्र चाखले

कुठे न डोंगरावरी दिसे प्रसन्नता
इथेच पावसास वाटतेय जाळले !

उरात दुःख दाटता नभास पाहतो
सहस्त्र अश्रु मानवी तमात सांडले !

- राजीव मासरूळकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा मासरूळकर वा
अतीशय नाविन्यपूर्ण वाटले सर्वच शेर
खूप आवडले
काही मिसरे तर फारच ...................

अतिशय सुंदर गझल राजीव..
जियो...

कुठे न डोंगरावरी दिसे प्रसन्नता
इथेच पावसास वाटतेय जाळले !

वरील शेर तर कहरच...

अभिनंदन आणि शुभेच्छा..

अनामिक गझलवेडा,
एक दोन पर्याय बरे आहेत.
यापुढे माझ्या गझलेला पर्यायी गझल सुचवू नये.
जे आवडले नाही ते स्पष्टपणे सांगावे हवे तर. पर्याय शोधायला मी समर्थ आहेच.
आयत्या पिठावर रेघोट्यांपेक्षा आपली स्वतंत्र गझल समृद्ध करावी.
धन्यवाद !

अनामिक गझलवेडा | 5 March, 2013 - 13:58 नवीन
राजीवजी,
आपल्याला स्फुरलेले खयाल आम्ही असे वाचले.....

सखे तुला हताशसे बघून वाटले....
वसंतात ऐन, फूल म्लान जाहले!<<<

परममित्र कवी सतीश,

ठळक केलेला 'वसंतात' हा शब्द वृत्तात नाही. की आपण वृत्तालाही (एका ओळीपुरता) पर्याय सुचवू पाहात आहात?

-------------------------

>>>यापुढे माझ्या गझलेला पर्यायी गझल सुचवू नये.
जे आवडले नाही ते स्पष्टपणे सांगावे हवे तर. पर्याय शोधायला मी समर्थ आहेच.
आयत्या पिठावर रेघोट्यांपेक्षा आपली स्वतंत्र गझल समृद्ध करावी<<<

वादे भुलादे, कसम तोडदे वो
के हालतपे अपनी हमे छोडदे वो
उन्हे घर मुबारक हमे अपनी राहें
कोई उनसे कहदे हमे भूलजाये

कळावे

गं स

सखे, तुला हताशसे बघून वाटले
तुला मिठीत का न मी कधीच घेतले ?<<<

काय रे मासरूळकर? हताश मुलींना मिठीत घ्यायचा छंद आहे की तू मुलीला मिठीत घेतले नाहीस की ती हताश होते असे म्हणायचे आहे? काय वाट्टेल तसे मतले रचतोस का काय? घेतलं वृत्त, टाकला काफिया, ओतली गझल!

हरेक वाट जातसे घरी कुण्यातरी
घरास मी कशास कुंपणात बांधले ?<<< असंबद्ध ओळी.

तुझ्याच हातच्या चवी अता फिक्या मला
तुझ्याच पापण्यांतले समुद्र चाखले<<< दोन्ही ओळीतील तुझ्याच मधील 'च' चे प्रयोजन काय? दोन्ही ओळींचा संबंध काय?

कुठे न डोंगरावरी दिसे प्रसन्नता
इथेच पावसास वाटतेय जाळले !<<< दिवाळीत लावलेले भुईचक्र अचानक नाताळात पेटावे तसा शेर आहे.

उरात दुःख दाटता नभास पाहतो
सहस्त्र अश्रु मानवी तमात सांडले !<<< मानवी तम!

हद्द झाली. वर काय काय विशेषणं अन अभिप्राय तरी! नावीन्यपूर्ण, जियो, कहर शेर, खूप सुंदर! त्या गझलवेड्याने तर डुप्लिकेटच मारलीय गझल.

खेद वाटला.

तिलकधारी,
तुम्हाला उत्तर द्यायला मी काही देवपूरकर किंवा अनामिक गझलवेडा नाही.
मी गझल लिहायला आत्ता कुठे सुरूवात केली आहे.
तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले आहेत, ते तुमच्या दृष्टिकोनातले आहेत.
तसाच विचार सर्वांनी करावा असा काही नियम नाही. धन्यवाद.
मतल्यात माझ्या मनातले भाव व्यक्त करायला चपखल शब्द सापडले नाहीत, त्यामुळे त्यांत संदिग्धता आहे हे मी मान्य करतो.

गझलुमियां ,
गंभीर समीक्षक ,
आपले मनापासून आभार .

मासरूळकर योग्य स्टांस (पावित्रा ) !!!!
कीप इट अप !!!

_________________________________________________

तिलकधारीजी मस्त प्रतिसाद <<<त्या गझलवेड्याने तर डुप्लिकेटच मारलीय गझल.>>> हे वाक्य वेगळा पॅराग्राफ व ठळक्क अक्षरात हवेच होते बघा मग त्याला खरे वजन प्राप्त झाले असते बघा

धन्यवाद , वैवकु.
तिलकधारी यांनी मतल्यातला "सखे" हा शब्द दुर्लक्षिलेला दिसतो. किंवा त्यांना रस्त्यावर बघितलेल्या प्रत्येक मुलीला सखे म्हणायची सवय असावी. ज्याचा त्याचा दृष्टीकोन असतो. असो. Happy
मैत्रीचे नाते (पावित्र्य) जपण्याच्या नादात दोघांच्याही मनातलं एकमेकांविषयी असलेलं निस्सिम प्रेम व्यक्त करण्यास त्यांच्यातलं कुणीही धजावलं नाही, असं काहीसं मला म्हणायचं आहे त्यातून.

करकरीत कोरे शेर मासरूळ्कर. आवडले आपल्याला. इथल्या डोमकावळ्यांकडे लक्ष देऊ नये. चांगल काही सोडून वाईट कुजक नाजक खायची सवय आहे त्याना. ती जाणार नाही. दुर्लक्ष करा.

तुम्ही तीन तीनदा वेगवेगळ्या आयडींनी एकाच गझलेवर प्रतिसाद देण्याचं कारण काय बरं ?>>>>>>>>>

तीनदा कुठे हा वरचा धरून चारदा की ..................!!!! Proud

वैवकु,
कसला शेर न् कसलं काय ?
"पणती जपून ठेवा"वरून खरडलं मीच ते , मायबोलीवर सक्रीय बुरखे पाहून.
Happy

<<कुठे न डोंगरावरी दिसे प्रसन्नता
इथेच पावसास वाटतेय जाळले !>>
वेगळ्या आणि चांगल्या ओळी, राजीव. आवडली.

राजीवजी मी गजल अलीकडेच नीट वाचू लागलोय .(कधीतरी लिहीनसुद्धा .) वरील गडबड मला कळत नाही .काव्य सुंदर असणे महत्वाचे,आणि ते इथे आहे.

मझ्या दादाच्या नवाने कोन पर्तिसाद देत आहे ? माझ्य दादासार्क्या स्मायल्या कोन वापरुन राहिलय बे ? काऊन पंगा घेउन राहिलय बे ? माज्य दादाचि भाशा मले वळखु येनार नाय ?

तिलकधारि का फलकधारि लैच बार फुसका निघाला. गझलुमियांबी हिथंच अन गुतवळ समिक्षक बि हिथंच ? अन कावला नाय ? काऊन बे ? Proud

एस -तीस -गॉड- फ्लड -डू !!!!
स-तीश-देव- पूर -कर

हा इन्ग्लिश अवतार कोणाचा तोतया आहे हे लगेच ओळखू येतेय !!!

अमेयजी,
विक्रांत प्रभाकरजी,
आपले खूप खूप आभार! आपले प्रतिसाद नक्कीच माझ्या लेखनास प्रोत्साहक ठरताहेत. असाच लोभ असू द्यावा.

कुठे न डोंगरावरी दिसे प्रसन्नता
इथेच पावसास वाटतेय जाळले !

तुझ्याच हातच्या चवी अता फिक्या मला
तुझ्याच पापण्यांतले समुद्र चाखले

अप्रतिम शेर , खूपच सुंदर