सध्याचं राजकारण : केवळ पैसा आणि प्रसिद्धीसाठीच..

Submitted by Chetana Kulkarni on 28 February, 2013 - 13:48

सध्याचं राजकारण : केवळ पैसा आणि प्रसिद्धीसाठीच.....
आपण सध्या घोटाळयांनी वेढलेल्या आणि भ्रष्टाचाराच्या अत्युच्च शिखरावर असलेल्या देशात राहतोय याबद्दल कुणाचंच दुमत नसावं. मला या गोष्टीची खूप लाज वाटतेय आणि खूप निराशाही आलीय की आपण जे आपलं मत देतोय ते मत म्हणजे केवळ या लोकांच्या दहा पिढ्यांचं कल्याण करण्याचीच परवानगी देतोय की काय ! या नेत्यांना आम्हा सामान्य जनतेबाबत काडीचीही आस्था नाही. हे केवळ असच मानत आलेत की आपल्याला भ्रष्टाचार नी घोटाळे करायला अधिकृत परवानगी देणारे(मतदान) हे खुळे लोक.बस्स !!! या व्यतिरिक्त काहीही नाही.
खरतर हा दोष त्यांचा नसून आपलाच आहे. आपण यांना सुतासारख सरळ ठेऊ शकतो पण आपण केवळ मत देऊन गप्प बसतो. पण आत्ता मात्र हेच करण्याची वेळ आली आहे. आणि ही शेवटची संधी जर आता गमावली तर पुढे आपलं नि आपल्या या देशाच काय होईल याची स्वप्नात सुद्धा आपण कल्पना करू शकणार नाही. आपली पुढची पिढी किती वाईट नि हलाखीत दिवस काढेल याचीही कल्पना करू शकत नाही.
आपल्या देशात राजकारणातून पुढे आलेले असे अनेक नेते आहेत की ते नेते नसून देशाला लागलेली कीड वा कलंकच आहेत . सध्या सत्तारूढ पक्ष आणि त्यांना टेकू देणारे लेचेपेचे बांबूपक्ष आणि बाकी सारे विरोधी या साऱ्यात हे कलंक आहेत. यांना आपण बरोबर हेरणं गरजेच आहे. भले ते पैशाने कितीही मोठे असोत,यांना आपण आपलं अमूल्य मत देता कामा नये. या किडींना वेळीच जहाल विष घालून ठारच मारलं पाहिजे. कारण यांचं प्रमाण आता पन्नास टक्केहून जास्त झालंय. आणि अख्खा देश यांनीच पोखरून टाकलाय. आपली अवस्था सध्या कशी आहे ती पहा ! आपल्याला सगळ्यांना हे घोटाळेखोर कोण आहेत हे माहित आहे,पण आपण यांचं काहीही करू शकत नाही, यांच्या केसालाही धक्का लाऊ शकत नाही अगदी खूप काही करायची इच्छा असूनही. माझ्या तर मनात असही आहे की यांना पकडावं,यांची बॅंकखाती सील करून सगळे पैसे सरकारी तिजोरीत जमा करावेत हे सगळ्यात महत्वाच आणि यांना जेलमध्ये साध जेवण देऊन जगवावं . कारण काय तर दुसरयाना पण भीती वाटली पाहिजे याची. आणि वर त्यांच्याच तोंडून जगाला सांगायला लावावं की मी फार चूक केलीय, मी तुम्हा जनतेला लुटलंय, याची शिक्षा मी भोगतोय, अशा चुका बाकीचानी करू नका. पण हे सगळ फक्त माझ्या मनात आहे, प्रत्यक्षात मी काहीही करू शकत नाहीय. असच तुमचंही असेल ना.तेव्हा आत्ताच जागण्याची वेळ आलीय.
दुसर म्हणजे हे विविध पक्षांचे लोक २०१४च्या निवडणुकीत एनकेनप्रकारेण सत्ता हासील करण्यासाठी एवढा पैसा ओतणारेत की बस्स .. हा पैसा जर दुष्काळ असलेल्या गावांमध्ये ओतला गेला तर पुरा भारत कायमसाठी सगळ्या प्रकारच्या दुष्काळातून मुक्त होईल. पण नाही, हे अस करणारच नाहीत . केल तर ते नेते कसले? साधी गोष्ट पहा , रस्ते करणारे कंत्राटदार चांगला रस्ता करणारच नाहीत कारण तसा केला तर दरवर्षी त्याला काम कस मिळेल आणि लाखो-करोडो रुपयांवर त्याला पाणी सोडाव लागेल. बर यात तो एकटा थोडीच आहे - यात शिपायापासून ते कनिष्ठ,वरिष्ठ अधिकारी, नगरसेवक, मंत्री,आमदार,खासदार नि त्यांचे कार्यकर्तेही भागीदार असतातच. किंबहुना बाकीच्याही पक्षाचे लोक यात भागीदार असू शकतात.
कारण यात ते थोडं माझं भलं, थोडं तुझं भलं या भावनेने एकत्र आलेले असतात. हे असे सगळे लबाड लोक एकत्र येऊन देशाचा सत्यानाश करत आहेत. मी फक्त एक रस्त्याचेच उदाहरण दिले आहे. हे लोक हा रस्ता तुम्हा-आम्हासाठी करतच नाहीत,
यांच्या अलिशान गाड्यांसाठी हे रस्ता करतात आणि मुख्य म्हणजे पैसा खाण्यासाठीचा तो एक अधिकृत मार्ग असतो म्हणूनच निव्वळ तो रस्ता होत असतो. हे राजकारणी एवढे निर्ढावलेले आहेत की यांना सामान्य माणूस दिसतच नाही, मा.अण्णा हजारे म्हणतात तसे हे सत्ता नि पैसा यात मश्गुल झालेले आहेत. याबाबत खर तर अण्णांनीच आपल्या देशाला जाग केलंय. तो खरा,सच्चा देशवासी,देशभक्त आहे, त्यांना भारतरत्न किताब द्यायला हवाय. पण आपल्याला हे दिसत नाही , त्याजागी न जाणो, आपल्याला कुणा कुणाची नावं सुचू लागतात की ज्यांनी देशासाठी काहीही केल नाहीये,फक्त मजबूत पैसा कमावलाय आणि प्रसिदधी. अण्णान्मुळेच आपला नजरिया बदललाय हे एक चांगल लक्षणच म्हणायला हवं.
लोकतंत्र म्हणजे काय ,नुस्त मतदान केल की झाल अस नसून निवडून आलेले नेते नीट काम करतात की नाही,ते करत नसतील तर त्यांना आपण जाब विचारू शकतो हेही अण्णानीच आपल्याला न्यात करून दिलय.
खर तर आपल्याला हे सगळ माहित नव्हत अस नाही पण जाऊ दे,मरू दे, या राजकारणी लोकांच्या नादी लागण्यात अर्थ नाही असा समज आपण करून घेतला होता पण आता आपल्यावर जेव्हा उपाशी पडण्याची,आपलं राहत घर अथवा जमीनच जगण्यासाठी गहाण टाकण्याची वेळ आलीय, तेव्हा आत्तासे आपण भानावर येतोय हेही नसे थोडके. ही वाढती महागाई, रोगराई, लाचखोरी,गुंडाशाही,बलात्कार यामुळे सामान्य जीवन जगणंच जेव्हा आता कठीण झालंय तेव्हा आपण आता विचार करू लागलोय. खाण्याच्या वस्तू आणायला जा त्या महाग आणि भेसळयुक्तच मिळतील, औषधं आणायला जा, ब्र्यांडच्या नावाखाली कंपन्या दामदुप्पट पैसा घेऊन कशा लुटताहेत ते दिसतं, कामासाठी कुठल्याही ऑफिसमध्ये जा,तो माणूस असा अडवेल की लाच हवीय हे सांगायलाही त्याला लाज वाटत नाही आजकाल.
तुम्ही ज्यांना निवडून देता ते लोकच तुमच्यावर गुंडे,मवाली सोडतात, त्यांच्याकरवी मारहाण करतात आणि मग आपण भीतीने आपलं घर सोडतो,जमीन सोडतो, अशी ग्रामीण भागातली आजची स्थिती आहे. कोर्टात जा,तिथे तुम्हाला म्हणजे सत्याला न्याय मिळणारच नाही अशी सत्यस्थिती आहे. या सगळ्याच्या पाठीमागे नाही, तर सगळ्यांपुढे राजकारणी लोकच आहेत हे आता जगजाहीर झाले आहे. आपला देश हा कृषिप्रधान आहे अस आपण लहानपणी शालेय पाठ्यपुस्तकात वाचलेलं आहे.पण आज तो तसा कुठे आहे? तुम्हाला खूप हसू येत असेल जेव्हा आपले कृषी संबंधातील नेते अस बोलतात की यंदा खूप आणि छान पाऊस झाला असल्याने पिक भरपूर येईल आणि काहीच दिवसांनी असंही वक्तव्य करतात की पाण्याचा दुष्काळ असल्याने पिकं कमी येतील तेव्हा लोकांनी पाणी खूप जपून वापरावे. खरतर दुष्काळ ही दरवर्षी येणारी समस्या आहे त्यावर शेततळे (waterbank ) सारखे प्रकल्प भ्रष्टाचार होऊ न देता किवा जेवढे पैसे मंजूर झालेत ते 100% तेथे उपयोगात आणले तर पाण्याचा दुष्काळ कसा राहील? पण यांना खायलाच पैसा पुरत नाहीय ते तुमच्या दुष्काळावर पैसा खर्च करतीलच कसे?
सत्ता टिकवण्यासाठी पाठींबा देणाऱ्या पक्षातल्या लोकांमागे CBI लावून सत्ता टिकवणे आणि भ्रष्टाचार केलेला असल्यामुळेच CBI ला घाबरून सत्ताधारयाना साथ देण्यावाचून साथी पक्षांना पर्याय नाही हाही प्रकार आता जगासमोर आला आहे.
तशाच विरोधी पक्षातील पण काही गोष्टी समोर आल्यात की सत्ताधारी आणि विरोधी पक्षात घोटाळे नि भ्रष्टाचार करण्यात पुढे कोण ? किवा भ्रष्टाचार उघड झाल्यावरही CBI लाच धमकी देऊन आम्हीही सत्तेत येऊन तुमचे पाहून घेऊ असे जाहीर बोलणे हेही एक भावी गुंडाशाहीचेच प्रतिक आहे. नाही का ? हे असे लोक सत्तेत आले तर जनतेच्या समस्यांकडे न पाहता कोणी किती त्रास दिलाय याचाच हिसाब-किताब करण्यात वेळ दवडतील यात शंका नाही.
त्यामुळे ज्यांचावर भ्रष्टाचाराचे,खुनाचे,बलात्काराचे,दडपशाहीचे,मारहाणीचे वा अन्य गुन्हे आहेत असेच लोक आपण आत्तापर्यंत निवडून देत आलोय , मग या देशाच काय होणार सांगा बर . आजकाल आपण मतदान करताना हे पाहतही नाही की त्यांची ध्येयधोरणं काय आहेत, निवडणूक लढविणारा काय लायकीचा आहे, गुंड,मवाली आहे की चांगला शिकलेला आणि लायक माणूस आहे,आपण फक्त असं पाहतो की हा माझा पक्ष आहे किवा या पक्षाचा मी आहे . आणि इथेच आपण आत्तापर्यंत माती खाल्लेली आहे. आपल्याला एकही उमेदवार पसंत नसेल तर नापसंतीचा अर्ज पण मतदानाच्या वेळी भरू शकतो हेही कित्येकांना अजून माहित नाहीय. मत देण्यात आपण धन्यता समजत आलोय हे खूपच हानिकारक आहे. आणि इथे अण्णानचे विचार मोलाचे ठरतात, त्यांच्यामुळेच आपल्याला Right to Reject and Right to Recall हे शब्द माहिती झालेत.अण्णा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक उपोषणे,आंदोलने केली. त्यांचा या मुर्दाड राजकारण्यांवर काडीचाही परिणाम झाला नाही. उलट यांनी अण्णा आणि सहकाऱ्यामागे CBI सोडली .म्हणून मलाही आता अस वाटू लागलय की या राजकारणात आता आपल्यासारख्या सामान्य लोकांनीच यायला हवं. या लोकांचं राजकारण आता पुरे झाल. देशाचा सगळा चुराडा करून टाकलाय यांनी. आपणच सत्तेत आल पाहिजे. पण राजकारणात येताना काही पथ्य कायमसाठी घालून घेतली पाहिजेत नाहीतर काही वर्षांनी आपणही या राजकारण्यांच्याच पंक्तीत येऊन बसलेलो असायचो. सत्ता हातात आली तरी सात पिढ्या पोसणार राजकारण आपण करता कामा नये.यासाठी स्वतःला काही नियंत्रणे घालून घेतली पाहिजेत. यासाठी जरा हटके विचार करता अरविंद केजरीवाल बरोबर वाटतात. आपल्यासारखीच तीही ही एक सामान्य व्यक्ती आहे. त्यांच्या पिढीत कुणीही राजकारणी झालेलं नाही. सार्वजनिक कार्यासाठी देण्यात येणारा मानाचा रेमन मेगासेसे हा जागतिक पुरस्कार मिळवणारा हा माणूस आहे. त्यांनी यातून मिळालेली सगळी रक्कम संस्थेला अर्पण केलीय. हा माणूस आयकर विभागात कमिशनर पदावर काम करायचा. पण माहितीचा अधिकार हा कायदा नीट बनावा यासाठी त्याने चांगली नोकरी सोडून त्या कामात स्वतःला झोकून दिले. हा माणूस चांगला शिकलेला आहे,त्याला चांगलं ज्ञान आहे,राजकारणी लोकांनी आणि कंपन्यांनी देशाला कस लुटलं आहे याची पुराव्यासकट त्याने भांडाफोड केली आहे. शिवाय स्वतः भ्रष्ट नाही. हा एक चांगला आदर्श असू शकेल. या सर्वाना रोखण्यासाठी सरकारने CBI चा वापर केला. पण हे लोक तावून सुलाखून बाहेर पडले कारण कुठे भ्रष्टाचार केलेलाच नाही. हे यांच्याबाबतच माझ स्वतःच मत आहे. तुमचही मत कदाचित असच असेल अस मी गृहीत धरलय. तेव्हा अशी फकीर वृत्तीची लोकच देश चांगला चालवतील अशी आशा करायला आपल्याला हरकत नाही. आपल्यासारख्या चांगल्या लोकांनी पुढे येऊन पैशाची,प्रसिद्धीची अपेक्षा न करता राजकारणात उतरलं पाहिजे आणि तेही सत्ता मिळवणे हाच हेतू ठेऊन. कारण या धनदांडग्या लांडग्यांच्या हातातून सत्ता हिसकावून घेतल्याशिवाय आता आपल्याला सामान्य जीवन जगण सोप राहिलं नाहीय हे लक्षात घ्यायला हवं. नाहीतर इथून पुढे सामान्य माणूस अन्नासाठी जर रस्त्यावर उतरला तर तो कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही आणि सगळीकडे अराजक माजेल. किवा भविष्यामध्ये आत्ता आहे त्यापेक्षा खूप भयंकर आणि विपरीत काहीतरी घडणार आहे हे मात्र नक्की. तेव्हा मात्र आजच्या या नेत्यांना पळता भुई थोडी होऊन जाईल. मला आत्ताच जे वास्तव दिसू लागलय,जे योग्य वा अयोग्य वाटलय त्याचाच मी उहापोह करायचा इथे प्रयत्न केलाय.
सत्ताधारयाचे जे घोटाळे समोर आलेत त्यात किती जणांना शिक्षा झाली बघा? झाली ती केवळ मामुली शिक्षा. खाल्लेल्या पैशाचं काय? ते सरकारी तिजोरीत जमा होतच नाहीत. ते आपोआप पचून जातायत. हे एवढे निर्लज्ज झालेत की जेलमध्ये आरामात बसतात कारण काय तर २/३ वर्ष जेलमध्ये बसले तरी बाहेरची सगळी कामे यांची व्यवस्थित चालू असतात आणि खाल्लेले सगळे पैसे पचतात कारण ते परत कोण मिळवणार ? सत्ताधारी नेते ? कस शक्य आहे ? यात त्यानाही हिस्सा मिळालेला असतो ना !
तेव्हा वाचकहो, माझ्या मनातली ही खळबळ आपल्यासमोर मी व्यक्त केलीय . मी आत्ता याक्षणी कुठल्याही पार्टीची प्रचारक किवा प्रसारक नाही किवा सभासदही नाही. मतदाराला जागं करणे एवढाच माझा हेतू आहे. आपल्या सामान्य माणसाचाच पक्ष राजकारणात सक्रीय व्हायला हवाय अस मला वाटतंय. राजकारणात मुरलेल्या या मोरावळयांना जराही सत्ता हातात लागू देता कामा नये. कारण हाती लागलेल्या छोट्याशा सुतानेही हे लोक पुरा कपडा हिसकावून घेतील.
त्यासाठी २००९ सालचं पहिल्या दिवसाचंच (cash for vote) उदाहरण पुरेस आहे. पहा या लोकांनी पहिल्याच दिवशी झलक दाखवून दिली होती की आम्ही भविष्यात पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर काय काय करणार आहोत. आणि तस ते 4 वर्षात त्यांनी घोटाळयातून करूनही दाखवलं. कर्नाटकात पण सत्तेसाठी भ्रष्ट लोक कस राजकारण करताहेत तेही आपण पाहतोय. उत्तरप्रदेश,दिल्ली,बिहार,महाराष्ट्रातही सत्तेतील लोकांच्या पाठबळावर खुनी,बलात्कारी,गुंड लोक वाट्टेल तसा,वाट्टेल त्या क्षेत्रात,खुलेआम धिंगाणा घालून आपल्याला हवी ती गोष्ट सामान्य जनतेकडून हिसकावून घेत आहेत. याला आपल्याजवळ उत्तर एकच आहे. आपणच राजकारणात शिरुन देशाला मोठ करायचं. आत्ताचा हेलीकॉफ्टर घोटाळा, कोळसा घोटाळा, वीज घोटाळा,पाणी घोटाळा,सिंचन घोटाळा,चारा घोटाळा,रोजगार घोटाळा,जमीन घोटाळा,खनिज घोटाळा, अन्न घोटाळा, औषधं घोटाळा, लवासा घोटाळा, बांधकाम घोटाळा. संरक्षण क्षेत्रातही घोटाळे,भ्रष्टाचार करताना यांना जराही शरम वाटली नाही ? जे जवान तुम्हा आम्हा पुऱ्या देशाच आणि या निर्लज्ज पुढाऱ्यांचही दिवसरात्र रक्षण करतात त्यांना देण्यात येणाऱ्या गणवेश,बूट,ज्याकेटस मध्येही घोटाळा ? हलक्या दर्जाच्या वस्तू देऊन पैसा खाल्ला ? हे पाप यांना याच जन्मी फेडाव लागणारेय हे नक्की. यांनी एकही अस क्षेत्र सोडलं नाहीय की तिथे भ्रष्टाचार झालाच नाहीय. केजरीवालनी तर हे पुराव्यानिशी दाखवून दिलय की आत्ता आपण एखाद्या गोष्टीसाठी जो पैसा देतो ती खर तर आपल्याला १/२ किवा १/३ किमतीत मिळू शकते. उदाहरणच घ्यायचं झाल तर वीज बिल,पाणी बील,पेट्रोल,डीझेल,केरोसीन,घरगुती स्वयंपाकाचा ग्यास, भाजीपाला,खाण्याच्या वस्तू,दुध हे सगळ या लोकांनीच जाणुनबुजून महाग बनवलय. आपण कर भरतोय त्याचा उपयोग हे लोक स्वतःसाठीच करत आलेत. चांगले रस्ते,चांगल्या सोयीसुविधा, २४ तास पाणी, २४ तास वीज आहे कुठे ? पुरेस अन्न गरिबांना आहे कुठे? स्वस्तातील घरे गरिबांना आहेत कुठे ? सगळा पैसा हे मोरावळे, अनेक कंपन्यांचे मालक, आणि अधिकारीवर्ग हे एकमेकांच्या संगनमताने लुटत आहेत. या लोकांनी एखादी नवीन योजना आणली की मला हल्ली संतापच येतो कारण तुम्हाआम्हासाठी ही योजना नसून पैसे खाण्यासाठीच यांनी नवीन शोधलेला तो मार्ग असतो. त्यामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत ,गरीब एकदम भिकारी आणि आपण सामान्य लोक दारिदऱ्याच्या वाटेकडे चाललोय.या तेल कंपन्या,वीज कंपन्या,गेंस कंपन्या पहा कशा वारंवार दरवाढ करत आहेत त्या ! का तर कंपन्यांना घाटा होतो म्हणे. पण मग यांच्या balancesheet मध्ये प्रचंड फायदा येतो कुठून ? ह्या सगळ्या कंपन्या तुमचा आमचा खिसा कापून दिल्लीत बसलेल्या बड्या धेंडाचेच खिसे भरतायत हे सत्य उघड झालंय आता. या कंपन्या जो तोटा झालेला दाखवतात ना तो मुळात तोटाच नसतो .तो खरा फायदा असतो. असा बिनधास्त फसवणुकीचा धंदाच या लोकांनी चालवलेला आहे. आपल्यासारख्या सामान्य लोकांना यांची ही फसवेगिरी कधी कळणारच नाही.
तोंड उघडलं तर हे राजकारणी चिरडून टाकतील ही भीती आणि तोंड नाही उघडल तर महागाई कंबरड मोडेल ही भीती अशी आपली ‘इकडे आड तिकडे विहीर’ अवस्था झालीय. जिकडे तिकडे घोटाळेच घोटाळे दिसतायत. सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की घोटाळे उघडकीला आले तरी त्यांना कठोर शिक्षा होत नाही,घोटाळ्यातील पैसा सरकारी तिजोरीत परत जमा होत नाही. बलात्कारयाना कठोर शिक्षा होत नाही किंबहुना ते सापडतच नाहीत,सापडले तरी पुराव्या अभावी ते निर्दोष सुटतात ही सत्यस्थिती आहे. परदेशात काळा पैसा कुणाकुणाचा आहे हे आपल्याला माहित असूनही आपण त्यांना जाब विचारू शकत नाही किवा त्यांचावर case पण दाखल करू शकत नाही. CBI स्वतंत्र नसल्यामुळे व्यवस्थित तपास होऊ शकत नाही. परदेशातील काळा पैसा भारतात परत आणण हे जर इच्छाशक्ती असेल तर अजिबात कठीण नाही. भले त्या परदेशी बँका माहिती नाही देतील पण आपल्या देशातील जे काळा पैसावले लोक आहेत त्यांना योग्य तो झाशा दाखवला तर त्यांच्याकरवीच आपण हा सगळा पैसा मिळवू शकतो. आपल्या देशात पण लपलेलं धन सुध्दा काही कमी नाही . हे सगळ धन जर परत सरकारी तिजोरीत आलं तर आपल्याला आयकर (income tax)भरावा तर नाहीच लागणार, उलट महागाई पुर्णपणे नष्ट होऊन जाईल. आणि भारत एक महासत्ताच होईल. हे माझ स्वप्नातील वर्णन नसून खरोखरच अस होऊ शकेल.
आपल्या देशाला भगवा आतंकवाद म्हणणारा नेता नकोय,पोलीसबल १५ मिनिटांसाठी काढून घ्या मग पहा 100 कोटी हिंदुंचा कसा खात्मा करतो ते अस म्हणणारा नेता तर आसपासही नकोय, किवा आपल्या पक्षाचे आणि आपलेच पुतळे उभे करणारही नेतृत्व नकोय, बाहेरून येऊन आम्हा लोकांच्या पैशावर स्विस बँकेमध्ये काळा पैसा लपविणार आणि स्वत:च्या जावयाला सरकारी आणि देशाचाच जावई असल्यासारखा मान देणारी नेतेमंडळीही नकोत आणि त्यांचे पाय चाटण्यात धन्यता मानणारी आणि स्वत्व गमावून बसलेली कुत्री तर नकोच नकोत. तसेच जनतेला २०१३ हे वर्ष भारनियमन मुक्त असेल अशी खोटी आश्वासने देऊन दिशाभूल करणारी, चावीवर फिरणारी रोबोसारखी विचारहीन,दिशाहीन कर्तृत्वहीन,स्वतःचा मेंदू गहाण ठेवणारी बुजगावणी पण नकोत. गुंड,मवाली,सामान्यांची जमीन हडपणारी,स्वत:ची पंचतारांकित हॉटेल्स,साखर कारखाने, शाळाकॉलेज काढून पैसा हडपणारी,बेहिशेबी संपत्ती जमा केलेली फालतू लोकं पण नकोयत. किवा दुष्काळात लग्नासाठी करोडो रुपये खर्च करून गरिबांना नाक खाजवून दाखवणारी लोकं तसच जातीधर्माच्या नावावर राजकारण करून स्वतःच्या तुंबड्या भरणारेही आपल्याला नकोयत.
आम्हाला हवी आहेत अशी नेतेमंडळी की जी सर्व जातीच्या,सर्व धर्माच्या लोकांना एकत्र आणि बरोबर घेऊन जाणारी आणि यशाच्या वाटेवर सतत मार्गक्रमण करणारी , हुशार,सुशिक्षित आणि धाडसी नेतृत्वगुण असलेली नेतेमंडळी हवी आहेत. जागतिक स्तरावर भारताला मानाच स्थान मिळवून देणारे,भारताला प्रत्येक क्षेत्रात प्रगती पथावर नेणारे नेतेच आपल्याला हवे आहेत. हे असे अपेक्षित असणारे लोक आपल्यातच अनेक आहेत. मात्र त्यांनी स्वखुशीने राजकारणात यायचं धाडस करायला हवं. तरच या देशाचा विकास होण शक्य आहे. नाहीतर पाच-पंचवीस लोकांना हे धेंडे काही ऐकणारे नाहीत हे प्रत्येकानेच लक्षात घ्यायला हवय.
एकूणच काय तर आपल्याला सगळ्या गोष्टी माहित असूनही आपण आत्ता काहीही करू शकत नाही आणि म्हणूनच ही सत्ता आपल्या सामान्य माणसाच्याच हाती आली पाहिजे. हेच सत्य आहे. अण्णा जरी कितीही म्हणाले की सत्तेत जाण आपलं काम नाही तरी या काळाची ती गरज आहे हे ओळखून आपण राजकारणात प्रवेश करायलाच हवा. पण त्यांच्यासारख राजकारण मात्र करायचं नाही, नाहीतर त्यांच्यात नि आपल्यात फरक तो काय राहिल हेही तितकच खर आहे. पण राजकारणात प्रवेश करण सगळ्यांनाच शक्य होणार नाही म्हणून जे चांगले लोक प्रवेशकर्ते झालेत त्यांना आपण साथ द्यायला हवी. लेखाच्या शेवटी एवढच सांगेन की, लेख लिहिण्यामागे कोणत्याही पार्टीच समर्थन नसून,जोपर्यंत सामान्य माणूस राजकारणात सक्रीय होत नाही तोपर्यंत चाललय हे असच चालू राहणार. आपण मात्र ‘जो जन्माला येतो तो कधीतरी मरतोच’ ही उक्ती सार्थ ठरवण्याव्यतिरिक्त इतिहासात आपली विशेष अशी कुठलीही नोंद असणार नाही हे ध्यानात घ्यावे.
एक आशावादी भारतवासी..
सौ.चेतना कुलकर्णी
chetanakulkarni12@gmail.com

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख आवडला.... विचार करायला लावणारा आहे.

अण्णा या.न्च्या सचोटी बद्दल आदर आहे पण त्यानी धर सोड वृत्ती केल्यामुळे त्या.न्ची विश्वासार्हता कमी झालेली आहे. प्रश्न आहे त्याबद्दल वाद नाही... पण उपाय सुचवाल का ? मी एकटा काय आणि किती करणार ? माझ्या एका मुळे किती फरक पडेल ?

लेख आवडला.... विचार करायला लावणारा आहे,

कधी कधी असे वाटते कि आपला देश देवाच्या भरोशावर चालू आहे प्रत्येक जण "मी माझा " विचार करून चालत आहे, जो अतिशय खेद जनक आहे. माजी राष्ट्रपती A P J अब्दुल कलाम म्हणाले होते कि सन २०२० मध्ये भारत एक महासत्ता बनेल, पण सद्य परिस्थिती मध्ये जे शक्य होईल असे वाटत नाही.

देवाक काळजी.

अगदी सर्वांच्या मनातलेच विचार आहेत हे, तुम्ही अगदी तळमळीने मांडलेत त्याबद्दल कौतुक.
पण हे सगळे जमावे कसे हा प्रश्नच आहे, कारण हे घडण्यासाठी संघटन पाहिजे.
ज्या संघटना आधीच अस्तित्वात आहेत त्यांच्याकडून अपेक्षा करण्यात अर्थ नाही,
आणि नविन काही उभे करावे म्हणले तर त्यासाठी किती लोक तयार होतील आपला वेळ आणि पैसा वेचायला ?
अण्णा आणि केजरीवाल यांच्याबद्दल तुम्ही चांगले लिहिले असले तरी विरूद्ध बोलणारे कमी नाहीत.
दुर्दैवाने परिस्थिती अशी आहे की फोडा आणि राज्य करा ही पद्धती अगदी वैयक्तिक पातळीपर्यंत केव्हाच पोहोचलेली आहे.
"कोण कोणावर आणि का विश्वास ठेवणार" Sad

दुसर्या बर्या देशात जा आणि तिथे स्थायिक व्हा. या देशाच फार काही चान्गल भवितव्य नाही. जो देश स्वतःच्या सैनिकान्च रक्षण करू शकत नाही, किन्वा त्यान्च्या विटम्बने च्या बदल्यात फक्त निषेध्पत्र पाठ्वतो, तो देश त्याच्या नागरिकान्च्या सुरक्षेतते साठी काय घन्टानाद करणार?
स्वतःपुरत बघा आणि इथून कलटीकट्टा . com करा

माझ्या लेखाला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.आपन एवध तर नक्किच करु शकतो की,
१) चान्गला नेता असेल तरच त्याला मत द्यायचे.
२)शक्य असेल तर आपण स्वतः राजकारणात उतरायचे.
३)हेहि शक्य नसेल तर जो चानगला नेता अहे त्याला मदत करावि.
४) आपण प्रत्येकानेच जर अस थरवल कि मिच स्वतःला बदलणार आहे तर झाल ना. प्रत्येकजण जागा झाला तर पुरा देश जागा होइल. आप्ल्याला फक्त एवधच करायच आहे.
५) राम्भरोसे चालत असलेला हा देश आपल्यालाला आपल्या मनगटाच्या भरवशावर परिवर्तित करायचा आहे. हातपाय गाळुन चालनारच नाहि.
६) आप्ला देश वाइट नाहिच आहे. नेते मन्डलिनि देश पोखरला आहे ,आणि त्यान्च्या पोटातिल सर्व काहि बाहेर काधायच आहे,त्यासथि आप्ल्या हाति सत्ताच हवि आहे. दुसर्या देशात जाणे ,आपल्यापुरत पाहाणे हाहि त्यावरचा उपाय नाहि.
धन्यवाद !

>>>>> १) चान्गला नेता असेल तरच त्याला मत द्यायचे.

चान्ग्ल्या नेत्याची व्याख्या काय?

१. जो अनेक वर्ष राजकारणात असून ज्याच्या सम्पत्तीत भारम्भार वाढ झाली नाही आणि तरिही ज्यानी आपल कर्त्रुत्व सिद्ध केल आहे?.. तस असेल तर एक तर मोदीन्ना मत द्यायला लागेल किन्वा नितीश्कुमरला. पण परत प्रश्न आहेच की या व्यक्तीन्च्या नन्तर काय? जर तिथे परत यादव मण्ड्ळी आली तर तुमचा पोपट निश्चीत ठरलेला. आणि त्यासाठी मला उठून गुजरात किन्वा बिहारला जायला पाहीजे... आणि जरी गुजरात कितिही चान्गला असला तरी, राष्ट्रीयस्तरावर ज्या policies असतील त्याची झळ मला बसणारच आहे. मला गुजराथ सोडून जर काही कामानिमित्त दिल्लीला जायला लागल तर तिथल्या खाबूगिरीला तोन्ड द्यायलाच लागणार आहे. आणि "आपल्या जवानान्चे डोळे काढल्याबद्दल सरदार साहेबान्नी "कडक" निषेध नोन्दवला" ही बातमी मला वाचायलाच लागणार आहे. मग इथून उठून कुठे तरी जायचच असेल तर अमेरिका किन्वा कानडा काय वायीट? कमित कमी तिथे basic infrastructure त्याची तरी शाश्वती आहे. आणि कोणिही निवडून आला तरी मूलभूत सुविधा मला नक्कीच चान्गल्या दर्ज्याच्या मिळणार आहेत. इथून उठून गुजरातला जायच काय किन्वा विमानात बसून अमेरिकेत जायच काय? कष्ट साधारण तेवढेच.

२. जो तुमच काम करतो?
तस असेल तर कोणताही राजकारणी ज्याची तुमच्याशी घसटण आहे तो चालआहेच...मग तो रावडी असला तरी तुमच काम होणार आहेच आणि त्याच देखील राजकारण.

३. जो धकाधकीच राजकारण करत नाही?
असा माणूस राजकारणात राहूच शकत नाही.

>>>>२)शक्य असेल तर आपण स्वतः राजकारणात उतरायचे.

आणि पोटापाण्याच काय करायच? आता जर राजकारणातूनच स्वतःच पोट भरायच असेल तर आजचे राजकारणी काय वायीट आहेत?

>>>>> ३)हेहि शक्य नसेल तर जो चानगला नेता अहे त्याला मदत करावि

मुद्दा १ मध्ये याला पण उत्तर दिलच आहे.

>>>>>> ४) आपण प्रत्येकानेच जर अस थरवल कि मिच स्वतःला बदलणार आहे तर झाल ना. प्रत्येकजण जागा झाला तर पुरा देश जागा होइल. आप्ल्याला फक्त एवधच करायच आहे.

मी बदललेलोच आहे. भ्रष्टाचार मला ही आवडत नाही...मी माझ्या पगारा व्यतिरिक्त पैसे घेणार नाही... पण अजून तुम्हाला काय बदल अपेक्शीत आहे? मला अनेक ठिकाणी पैसे तरी द्यायला लागतील नाही तर माझा वेळ तरी खर्च करून मनस्ताप विकत घ्यायला लागेल.

दुसरी गोष्ट... सगळ्यानी बदलल पाहीजे हे उदात्त तत्व आहे... पण ते सगळे स्वतःच स्वतः बदलणार का तुम्ही त्यान्ना स्वतःचा वेळ घालवून बदलायला जाणार ते सान्गा. उगाच उन्टावरून शेळ्या हाकण्यात काय अर्थ आहे?

>>>>>> ५) राम्भरोसे चालत असलेला हा देश आपल्यालाला आपल्या मनगटाच्या भरवशावर परिवर्तित करायचा आहे. हातपाय गाळुन चालनारच नाहि.

अजिबातच नाही चालणार, मला तुमचे हे विचार वाचून खूप स्फूर्ती आली आहे... तुम्ही सुरुवात कराच... आम्ही अलोच थोडा व्यायाम करून, खाउन पिउन आणि मनगटातली ताकद वाढवून Happy

>>>>>> ६) आप्ला देश वाइट नाहिच आहे.

अफगाणिस्तान बान्ग्लादेश आणि सोमालिया पण वायीट नाही आहेत...

>>>>>>> नेते मन्डलिनि देश पोखरला आहे ,आणि त्यान्च्या पोटातिल सर्व काहि बाहेर काधायच आहे,त्यासथि आप्ल्या हाति सत्ताच हवि आहे.

सत्ता कशी मिळवणार? सत्तेच राजकारण करून? त्यासाठी पैसा लागतो, तो कोठून आणणार? का तुम्ही तुमच्या कुटुम्बीयान्च्या आणि मित्रान्च्या मता वर निवडून येऊ शकता? मला नाही वाटत ते शक्य आहे. आणि जी नेते मन्डळी तुम्हाला आवडत नाहीत ती देखील याच मातीतली आहेत. त्यान्च्यापैकी ७०% लोक, निम्न किन्वा साधारण परिस्थीतीतूनच राजकारणी झालेली आहेत. तुम्हाला राजकारणात स्थीर व्हायच असेल तर तुम्हाला तोच धोपट मार्ग चोखळायला लागण्याची शक्यता आहे.

किन्वा

तुम्हाला सत्ता खेचून घेण्यासाठी क्रान्ती करायला लागेल. त्यासाठी लोक जमवायला लागतील. त्यासाठी त्यान्चा एक तर अनुनय करायला लागेल (दुसर्या शब्दात त्यान्च्या मागण्या पुर्ण करायला लागतील) म्हणजे त्यान्च्या चहापाण्याच्या खर्चा पासून त्यान्ची वय्यक्तिक हेवेदावे सोडवण्या पर्यन्त सगळ्या गोष्टी करायला लागतील... म्हणजे परत खूप पैसे मिळवण आलच आणि त्या अनुशन्गानि भ्रष्टाचार देखील.. परत या सगळ्या गोष्टी तुम्ही करत राहीला तर क्रान्तीला वेळ कुठे मिळणार? तुम्हाला ज्यान्च्या विरोधी क्रान्ती करायची आहे त्यान्ना पण manage करायला लागेल... कमित कमी क्र्रान्ती होयी पर्यन्त तरी. या सगळ्या गोष्टीतून क्रान्ती करायला तुम्हाला किती वेळ मिळेल या बद्दल मला तरी शन्काच आहे

किन्वा
लोकान्वर प्रभाव पाडून त्यान्ना रस्त्यावर उतरवता तरी आल पाहीजे... हा प्रयत्न फर्न्नान्डीस च्या अगोदर पासून आण्णानपर्यन्त अनेक लोकान्नी अयशस्वी पणे केला आहे. तुम्ही देखील प्रयत्न करून पहा.

>>>>>>दुसर्या देशात जाणे ,आपल्यापुरत पाहाणे हाहि त्यावरचा उपाय नाहि.

का नाही? जगण्यासाठी आवश्यक कष्ट करायचे आणि आनन्दात अयुष्य घालवायच हे तत्व जिथे पूर्ण होइल तिथे जाऊन रहायला काय हरकत आहे?

व्वा, उत्तम लेख.
जे चालले आहे त्यात काही गैर आहे असे दिसले तर ते सुधारायला पाहिजे हा विचार योग्य आहे.

उगाच उन्टावरून शेळ्या हाकण्यात काय अर्थ आहे?

असे म्हणण्यात काही अर्थ नाही. ज्याने त्याने आपापल्या परीने मार्ग सुचवावेत, नीट विचार करावा. अडचणी आहेतच. परत परत त्याच उगाळण्यात काय अर्थ आहे?

कुणा एका व्यक्तीने सगळे करावे मग आम्ही तसे करू. तोपर्यंत आहे ते चालू द्या, असे म्हणून चालत नाही. विचार सुद्धा सर्वांनी करावा, नि मार्ग सुचवावेत. कुठलाहि मार्ग सुरुवातीलाच बरोब्बर नसतो, त्यात जाता जाता सुधारणा कराव्याच लागतात, त्यात सर्वांचाच हातभार पाहिजे.

सर,
आपण खुपच निराशावादि झालाय अस एकन्दरित दिस्तय .ठिक आहे.आमच्या या कार्यात सहभाग घेउन तर पहा.आपलि निराशा जाउन आपण देशासाठि काहितरि कर्तोय या विचाराने उर्मि येइल.
आप्ल्याला आम्ब्याच्या पेटित अस्लेले सगले आम्बे छान आहेत अस वाटत्,पण एखादातरि किडका निघतोच्,तस हे आहे.आप्ल्याला अशा किडक्या आम्ब्याला फेकुन देउन पुढे जायच आहे. एकदा का तो किडका आम्भा फेकुन दिला कि बाकिचे अम्बे चान राहतात. सो कालजिच कारण नाहि. समजा आम्ब्याचि पुरि पेटिच खराब निघालि तर ति फेकुनच द्यावि लागते.पैसे,श्रम् वाया गेले याच दु:ख होतच , पन ते कुरवाळत बसत नाहि आपण. दुसरि पेटि आणतोच. त्याक्शणि अस म्हणत नाहि कि हिहि पेटि खराब मिलालि तर ? एकुणच काय मला सर्वाना बरोबर घेउन पुढे जायच आहे.पण प्रत्येकाचि गति एकसारखि नसनारेय तसच जो कमकुवत,मनाने,देहाने अशक्त असेल तो मागेच राहणारेय.त्याला तिकडेच सोडाव लागेल. आपण जे जे सान्गितलय ते ते सर्वच बदलायचय, म्हणुनच सर्व किड्यामकोड्याना मारुन पुढे जाव लागणारेय. आप्स्वार्थि लोकानि दुसर्याच देशात जाव ,त्याना थाम्बवण योग्य नाहि. नहितरि ते स्वार्थानेच बर्बत्लेले आहेत. त्यामुले चान्ग्ल्या कामात अडथला कमि येइल.
शेल्याना योग्य ते ट्रेनिन्ग दिल तर उन्टावरुन पण शेळ्या हाकण अजिबात कठिन नाहि. इथुन पुढे तशाच हाकण सोप होणरेय. सत्तेच राज्कारण न करता लोकान्च मत परिवर्तन करुन सत्त मिलवाय्चि आहे.त्यासाथि उधळन्याएवध्या पैशाचि गरज नहि. चहापाणि घेउन काम करनार्याना इथे जागा नाहि. त्यासाथि घराघरात जाउन मत परिवर्तन करणे हा योग्य मार्ग आहे. आणि चान्गले लोक तर मदतिला तयार असतातच. असो.

लेख आणि त्या मागची तळमळ खुपच आवडली.
आपण तसे सत्तेत आहोतच ( रेल्वे आपकी संपत्ती है, असं लिहिलेलं असतं ना सगळीकडे )

आपण अजूनही चाचपडत आहोत हे सत्य आहे. राज्यपद्धतीचा जो प्रकार आपण निवडलाय तो आपल्या देशासाठी योग्य होता का आपल्या परंपरेप्रमाणे आपल्यासाठी राजेशाहीच योग्य होती, असे वाटू लागलेय.
या लोकशाहीचा अर्थच आपल्याला कळला नाही, आपले हक्क आणि कर्तव्य ( ना.शा. विषय शिकून / शिकवूनही ) आपल्याला कळली नाहीत. आपल्या शक्तीचा नेमका कसा वापर करता येतो, हेच आपल्याला समजलेले नाही.

त्यामूळे लोकशिक्षण हे महत्वाचे.

खूप कळकळीने लिहिले आहे.
मात्र आपल्याला आवडो अगर न आवडो, पण बरीचशी वस्तुस्थिती झोटिंग यांनी वर्णन केल्याप्रमाणेच आहे.
अण्णा आणि केजरीवालांनी प्रामाणिकपणे चळवळ उभी केली.
भ्रष्टाचार हा देशाचे जास्तीत जास्त वाटोळे करणारा सगळ्यात भयंकर शत्रू आहे. या एका मुद्यामागेच नेटाने काम करायचे सोडून नगण्य राजकीय शक्ती असलेले केजरीवाल राजकारणात अकाली गेले; आणि गेले ते गेले आणि अत्यंत चुकीच्या रणनीतीने शून्यवत झाले. याबद्दलचे माझे मत माझ्याच " केजरीवाल, जिंकण्यासाठी लढताय कि ....." या लेखावरील शेवटी लिहिलेल्या प्रतिसादात दिले आहे. खालील लिंक तुम्हाला नेमके तेथे नेईल.
http://www.maayboli.com/node/37939?page=3

मला तर भारताबद्दल फारच आशा वाटते.
काय आहे, भरपूर पैसा, परदेशवार्‍या, परदेशी सामान इथे मिळणे, तंत्रज्ञानातील प्रगति हे तसे थोड्याच वर्षांपूर्वी झाले.तत्पूर्वी जवळपास हजार वर्षे जणू गडद अंधारात होतो. त्या एकदम पडलेल्या प्रखर प्रकाशामुळे डोळे दिपणे, आपण अजूनही चाचपडणे हे सत्य आहे व स्वाभाविक आहे.
जशी तारुण्यातील मस्ती.

अजून वीस पंचवीस वर्षे जाऊ द्या. लोक शहाणे होतील, चांगले काय वाईट काय याचे तारतम्य येईल नि उपजत हुषारी, उच्च संस्कृतीची शिकवण, कष्टाळू वृत्ति परत उफाळून बाहेर येईल. भारत प्रचंड सुधारेल.
मी काही ते पहायला जगात नसेन, पण तुम्हाला शुभेच्छा.

अर्थात, या लेखासारखे विचार जनमानसात पसरायला पाहिजेत. सतत पसरले पाहिजेत, तळागाळात गेले पाहिजेत.

@झक्की
>>>>>> असे म्हणण्यात काही अर्थ नाही. ज्याने त्याने आपापल्या परीने मार्ग सुचवावेत, नीट विचार करावा. अडचणी आहेतच. परत परत त्याच उगाळण्यात काय अर्थ आहे?

परत परत उगाळण्यात काय अर्थ आहे.... त्याच उत्तर अस आहे की तुम्ही कितिही आपटा... अडचणी त्याच राहील्या आहेत. त्यात काही फारसा फरक पडला नाही आहे. म्हणून तुम्हाला त्याच उगाळायला लागणार आहेत. वेगळ्या आडचणी आल्या असत्या तर वेगळ्या आडचणी उगाळल्या असत्या.

>>>>कुणा एका व्यक्तीने सगळे करावे मग आम्ही तसे करू. तोपर्यंत आहे ते चालू द्या, असे म्हणून चालत नाही.

नाही आम्ही तस म्हणतच नाही आहोत. आमच म्हणण अस आहे की परिस्थिती आहे ही अशी आहे त्याच्याशी जुळवून घ्या आणि मार्गक्रमण करा. लाच देउन जर तुमचा वेळ वाचत असेल आणि काम होत असेल तर लाच देताना थोडी घासाघीस करा आणि २ पैसे वाचवा... जर लाच न दिल्यामुळे तुमची फार अडचण होत असेल तर उगाच तत्वाचा बाऊ करू नका...

>>>>> विचार सुद्धा सर्वांनी करावा, नि मार्ग सुचवावेत.

पार IBN पासून BBC पर्यन्त्च्या सगळ्या वाहीन्यान्नी सगळे उपाय सुचवून झाले आहेत. लोकशाहीमध्ये तर मेन्दू गमावलेल्या लोकान्ना सुद्धा विचार करण्याचा अधिकार आहे. प्रश्न असा आहे की या सुचवलेल्या उपायान्वर कार्यवाही कोण करणार.

एक उदहरण... पावसाच पाणी साठवून ठेवाव ही गोष्ट गेले ३०+ वर्ष चाउन चाउन चोथा झाली आहे, सत्तेत असणारे, विरोधी असणारे, NGO, स्वतःला शहाणे समजणारे, TV वर बडबड करणारे सगळ्यान्नी या वर उपाय सुचवून झाले आहेत.... पुढे? काही भरीव काम झाल? कुठेतरी राळेगण किन्वा अशच ठिपका भर गावात त्या द्रुश्टीनी वाटचाल झाली... याला तुम्ही आता ३० वर्षातली फार महान उपलब्धी म्हणणार असाल तर तुमच्या द्रुष्टीनी २००९ पासून काम चालत असलेला २०० मि लाम्बीचा सिन्हगड रस्त्यावरचा उड्डाण पूल जरी २०१५ साली झाला नाही तरी ही पण तुमच्या द्रुष्टीनी उपलब्धीच असेल... नाही का?

@ चेतना...
>>>> आपण खुपच निराशावादि झालाय अस एकन्दरित दिस्तय .

नाही... पण यथार्थवादी नक्कीच आहे.

>>>>> ठिक आहे.आमच्या या कार्यात सहभाग घेउन तर पहा.

तुमच्या कार्यात सहभाग तर आहेच म्हणूनच माबो वर बोलघेवडेपणा करत आहे.

>>>>>> आपलि निराशा जाउन आपण देशासाठि काहितरि कर्तोय या विचाराने उर्मि येइल.

ती काल रात्री दारू पिताना पण आलीच होत्ती.. माझ्या खीशातून महाराष्ट्र सरकारला दारूवर अबकारी कर दिल्यानन्तर हे सरकार माझ्या साठी आणि इतर वन्चीत लोकान्साठी दारूतुन मिळालेल्या अबकारी करातून योजना राबवील असा विचार येउन माझे डोळे भरून आले होते. विशेषतः गुजराथच्या (अन्गावर कपडे नसलेल्या) नेत्याची छबी असलेली ५०० रुपयाची note दिल्या नन्तर त्याच नेत्याच "खेड्याकडे चला" हे बोधवाक्य आठवल आणि मी नाही तरी ही नोट खेड्यात नक्की जायील अशी आशा बाळगून मी त्या दारूच्या अड्ड्यातून बाहेर पडलो.

>>>>>>> आप्ल्याला आम्ब्याच्या पेटित अस्लेले सगले आम्बे छान आहेत अस वाटत्,पण एखादातरि किडका निघतोच्,तस हे आहे.आप्ल्याला अशा किडक्या आम्ब्याला फेकुन देउन पुढे जायच आहे. एकदा का तो किडका आम्भा फेकुन दिला कि बाकिचे अम्बे चान राहतात.

हे उदाहरण पटल नाही... कस आहे ना... की किडका आम्बा म्हणजे असामाजिक तत्व. चान्गले आम्बे म्हणजे उर्वरित समाज जो किडका होउ शकतो किन्वा चान्गला होउ शकतो... किडका आम्बा निवडून नन्तर फेकून देणारी व्यक्ती म्हणजे राज्यकर्ते किन्वा व्यवस्था (system)... बरोबर?

तर आता गम्मत अशी आहे की... किडक्या आम्ब्यान्च्या जोरावर व्यवस्था किन्वा राज्यकर्ते निवडून येतात. सध्या तसाच trend आहे हे तुम्ही देखील मान्य कराल. म्हणून चान्गले आम्बे हे बाजूला केले जातात हे तर तुम्हाला दिसतच आहे.

आण्णान्ची बदनामी, अभय बन्ग सारख्या व्यक्तीला नक्षलवादी ठरवण, स्वामिनाथन सारख्या पत्रकाराला... ज्यानी maharashtra and andhra are grave yard of farmers हा लेख लिहिला होता त्यान्ना discredit करण, मेघालयतल्या (का आसाममध्ल्या...) जी मुलगी अनेक महिने आन्दोलन करत आहे तिला दुर्लक्श करून उपेक्शा करण, मेधा पाटकरची परवड अशी अनेक उदहरण देता येतील... दुसर्या बाजुला स्वतः टगे आहोत म्हणून राजकारणात टिकून आहोत हे प्रामाणिक पणे मान्य करणारे देखील राज्यकर्ते आहेत.

तर माझा प्रश्न असा आहे... की या किडक्या आम्ब्यान्ना बाजुला कोण करणार.... व्यवस्था करू शकत नाही कारण व्यवस्थेच अस्तित्व हे किडक्या आम्ब्यान्वर अवलम्बून आहे. चान्गले आम्बे करु शकत नाहीत कारण ते देखील व्यवस्थेचाच एक भाग आहेत. आणि किडके आम्बे आत्म्हत्या करणार नाहीत कारण त्यान्ना त्याच काही कारणच नाही आहे.

"किडके आम्बे बजुल करायल हवेत", "आपण सगळ्यान्नी बदलल पाहिजे"... ही वाक्य चाउन चाउन चोथा झाली आहेत. घासून घासून गुळगुळीत झाली आहेत. बदलायला पहिजे म्हणजे काय? कपडे बदलू का दाढीमिशी वाढवू? काही specific सान्गाल का बदल म्हणजे काय ते? का फक्त अशाच हवेत पुड्या सोडत बसणार?

आणि कस आहे ना... किडके आम्बे हे उदाहरण कदाचित ८० किन्वा ९० च्या दशकामध्ये लागू पडल असत. सध्या किडके आम्बे नाही आहेत तर कर्करोग झालेल्या व्यक्तीसारख झाल आहे. तुम्हाला जाणवलय का? गेल्या १० ते १५ वर्शात विशेषतः महाराष्ट्रात तरी खुन्नस खूप वाढली आहे. या विषयावर लिहिता खुप येयील.... पन ज्या वेळी वेळ मिळेल तेन्व्हा कदाचित मी लिहीनही.

>>>>>>> सो कालजिच कारण नाहि. समजा आम्ब्याचि पुरि पेटिच खराब निघालि तर ति फेकुनच द्यावि लागते. पैसे,श्रम् वाया गेले याच दु:ख होतच , पन ते कुरवाळत बसत नाहि आपण. दुसरि पेटि आणतोच.

१००% अनुमोदन... मी तर म्हणतो की ज्या व्यापार्याकडून ती पेटी आणली आहे तो व्यापारीच बदला.. म्हणजे दुसर्या देशात जा...

>>>>>> त्याक्शणि अस म्हणत नाहि कि हिहि पेटि खराब मिलालि तर ?

तर... adapt or perish.

>>>>>> एकुणच काय मला सर्वाना बरोबर घेउन पुढे जायच आहे.पण प्रत्येकाचि गति एकसारखि नसनारेय तसच जो कमकुवत,मनाने,देहाने अशक्त असेल तो मागेच राहणारेय.त्याला तिकडेच सोडाव लागेल.

हो अर्थात... अशक्तान्ना मागे सोडा आणि इथून पलायन करा... यः पलायते स जीवति.

>>>>>>> आपण जे जे सान्गितलय ते ते सर्वच बदलायचय, म्हणुनच सर्व किड्यामकोड्याना मारुन पुढे जाव लागणारेय.

नक्की जा... व्यवस्थीत मारा... वेगवेगळ्या प्रकारान्नी मारा.

>>>>>>> आप्स्वार्थि लोकानि दुसर्याच देशात जाव ,त्याना थाम्बवण योग्य नाहि. नहितरि ते स्वार्थानेच बर्बत्लेले आहेत. त्यामुले चान्ग्ल्या कामात अडथला कमि येइल.

नाही... अजिबात आडवू नका.. शक्य झाल तर त्यान्ना बाहेर जाण्यासाठी मदत पण करा.

>>>>>>>> शेल्याना योग्य ते ट्रेनिन्ग दिल तर उन्टावरुन पण शेळ्या हाकण अजिबात कठिन नाहि.

ते ठिक आहे हो.. पण हे training देणार कोण? का शेळ्यान्ना तुम्ही हे सान्गत बसणार "आपल्यात बदल करा" म्हणून? कमित कमी त्यान्ना train करण्यासाठी तरी तुम्हाला उन्टावरून उतरायला पाहीजे का नाही?

>>>>>>>>>> इथुन पुढे तशाच हाकण सोप होणरेय.

त्या शेळ्या सध्या राजकारणी तशाच हाकत आहेत. ते अगोदर पण सोप होतच. पण त्यासाठी जी सन्घटना लागते ती पण तुम्ही उन्टावरूनच निरमाण करणार का?

>>>>>>>>> सत्तेच राज्कारण न करता लोकान्च मत परिवर्तन करुन सत्त मिलवाय्चि आहे.

कस ते तर सान्गा? आणि लोकान्ची मत ही अत्ता अयोग्य आहेत आणि तुम्ही परिवर्तन केल्या नन्तर ती चान्गली होतील असा तुमचा दावा आहे का?

>>>>>>>> त्यासाथि उधळन्याएवध्या पैशाचि गरज नहि. चहापाणि घेउन काम करनार्याना इथे जागा नाहि.

तुम्ही जर हे model prove करू शकला तर कदाचित तुम्हाला मेगाससे पण मिळेल..

>>>>>>>>> त्यासाथि घराघरात जाउन मत परिवर्तन करणे हा योग्य मार्ग आहे. आणि चान्गले लोक तर मदतिला तयार असतातच. असो.

... असो Happy

आजच्या लोकसत्ता मधल्या अग्रलेखाचा काही भाग

... "महाराष्ट्राच्या राजकारणाचे प्रचंड प्रमाणावर बिहारीकरण झाले आहे आणि उत्तर प्रदेश वा बिहारप्रमाणेच या मंडळींनी आपापल्या मांडलिकत्वाखालील प्रदेश वाटून घेतले आहेत. त्यामुळे त्या त्या प्रदेशात या मंडळींची सत्ता असते आणि मग ते कोणत्याही पक्षात असले तरी त्यांच्या वर्चस्वाला शह देण्याचा विचारसुद्धा केला जात नाही. महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक अशा अनेक जिल्हय़ांतील परिस्थितीचा आढावा घेतल्यास याचा प्रत्यय यावा. हे सर्व प्रदेश राज्यातील काही राजकारण्यांना आंदण देण्यात आले असून तेथे कायद्याचे नव्हे तर या मंडळींचे राज्य चालते ही वस्तुस्थिती नाकारणे म्हणजे आत्मवंचना ठरेल. या आणि अशा परिसरात जमिनीचा कोणताही व्यवहार या मंडळींना खंडणी दिल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यांची ताकद इतकी असते की त्या त्या परिसरात सरकारी अधिकारीही त्यांना हवे तेच नेमले जातात आणि हा होयबा वर्ग या राजकारण्यांच्या दारी हात बांधून उभे राहण्यात धन्यता मानू लागतो. त्या त्या परिसरातील आर्थिक उलाढालीवर यांचेच नियंत्रण असते आणि त्यामुळे स्थानिक राजकारणावरही त्यांचीच पकड असते. सरकारी आणि खासगी कंत्राटे यांच्या मर्जीशिवाय निघत नाहीत आणि दिलीही जात नाहीत. अशा मार्गानी अनेकांना उपकृत करण्याची ताकद या मंडळींना मिळत असल्याने जनतेतील लाभार्थी वर्गही त्यांच्या मागे उभा राहतो."

झोटिन्ग तुमचे बरोबर आहेत लोकच मुर्ख असल्या मुळे
हे भ्रश्ट लोक आप्ल्यावर राज्य करत आहेत.
यात राजकारण्यान्चा काहि दोश नाहि.
लोकाना त्यान्च्या लायकि प्रमाणे राज्यकर्ते मिळाले आहेत.

या राजकारण्यांनी सध्या इटली च्या राजदूतांना भारत सोडू नका, परिणाम वाईट होतील, अशी धमकी दिली आहे. असे कसे झाले?
मला वाटले होते भारताचे इटलीशी काही विशेष संबंध आहेत. शिवाय एक महत्वाच्या व्यक्तीचे याबाबत काय मत आहे ते कळले नाही. त्या व्यक्तीचा म्हणे भारतीय राजकारणावर बराच मोठा प्रभाव आहे.

@झक्की | 15 March, 2013 - 18:21 नवीन
>>मला वाटले होते भारताचे इटलीशी काही विशेष संबंध आहेत. शिवाय एक महत्वाच्या व्यक्तीचे याबाबत काय मत आहे ते कळले नाही. त्या व्यक्तीचा म्हणे भारतीय राजकारणावर बराच मोठा प्रभाव आहे.<<

त्या व्यक्तीच्या प्रभावामुळेच तर त्या दोन इटालियनांना मतदानासारख्या कारणावरून येथून इतलीला जाऊ दिले गेले आहे. आता कडक ठराव, पोकळ गुर्गुर इत्यादी सर्व नाटके यथासांग पार पाडली जातील. पण आता ते दोघे कांही इकडे पाठविले जाणार नाहीत. ते भारतीयांच्या हातून सुटले. हेच तर त्या व्यक्तीला साधायचे होते.

>>या राजकारण्यांनी सध्या इटली च्या राजदूतांना भारत सोडू नका, परिणाम वाईट होतील, अशी धमकी दिली आहे. असे कसे झाले?<<

सर्व कांही नाटक आहे. क्वात्रोचीला नाही का सहिसलामत सोडला? तसेच होणार.