हिंदी/मराठी चित्रपटगीत आणि लोकेशन

Submitted by जिप्सी on 25 February, 2013 - 00:41

हिंदी/मराठी चित्रपटगीत मग ती जुनी असो वा नविन न आवडणारा विरळाच आणि त्यात भटकंती म्हणजे सोने पे सुहागाच. बर्‍याचदा असे होते कि आपण एकदा ठिकाणी भटकंती जातो तेंव्हा कधी कधी असे वाटते कि हि जागा पूर्वी आपण नक्की कुठेतरी पाहिलीय. थोडा अधिक विचार केल्यावर आठवतं कि अरे हां, हे तर अमक्या अमक्या गाण्यातील लोकेशन आहे.

तेंव्हा मंडळी गाणी आणि भटकंती या दोन गोष्टींची आपण एकत्रित सांगड घालुया. तुमचं एखादं आवडतं गाण आणि त्याचे लोकेशन (भारतातील्/परदेशातील) इथे शेअर करायचे आहे (जरी गाणं आवडीच नसेल पण लोकेशन आवडत असेल तरीही चालेल Happy ). गाण्याची यु ट्युब लिंक असेल तर अधिक चांगले.

उदा.
१. तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा नही
चित्रपटः ऑंधी
लोकेशनः सुरूवातीला अवंतीपुरा मंदिर (अवंतीपुर - श्रीनगर) आणि नंतर मुघल गार्डन (श्रीनगर)
यु ट्युब लिंकः http://www.youtube.com/watch?v=EZjCBH3KUfk

२. गीतः क्या करते थे साजना तुम हमसे दूर रहके

चित्रपट: लाल दुपट्टा मलमल का
लोकेशनः भंडारदरा (विल्सन डॅम)
यु ट्युब लिंकः http://www.youtube.com/watch?v=1prbCxM95Ow

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गीतः रिमझिम गीरे सावन सुलग सुलग जाये मन (लता मंगेशकर)
चित्रपट: मंझिल
लोकेशनः ७० च्या दशकातील मुंबई (गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, वरळी सीफेस, आझाद मैदान इ.)
यु ट्युब लिंकः http://www.youtube.com/watch?v=dcLQ7AwRAjk

काँटोंसे खिचके ये आँचल
तोड के बंधन बाँधी पायल
रोको न कोई दिल की उडान को
दिल ये चला..
आज फिर जीने की तमन्ना है
आज फिर मरने का इरादा है..

गाईड मधलं देव आनंद आणि वहिदा वर चित्रीत झालेलं गाणं..

चित्तोडगढ किल्ल्याभोवतालचा परिसर आहे त्यात..

सारे शहर मे आपसा कोई नही .

उटी लेक आणी वृंदावन गार्डन . खर तर या दोन्ही ठिकाणी जुन्या काळच्या अनंत गाण्याच चित्रिकरण झालय

बेंगलोरला असताना प्रत्येक वेळी पाहुण्यांबरोबर फिरताना वेगवेगळ्या गाण्यांची आठवण व्हायची .

"मधुमती" चित्रपटातील "आजा रे परदेसी....मै तो कबसे खडी इस पार..." हे गाणंही भंडारदरा परीसरातच चित्रित केलंय ना?

हो हो, रफीचे सौ बार जनम लेंगे.. पण बहुतेक तिथेच. अंब्रेला फॉल जवळ. शम्मीचे, देखो कसमसे पण. ( त्यावेळी
स्विस ला जायला डायरेक्ट फ्लाईट नव्हती. मुंबई-कराची-मनामा-जिनेव्हा असे जावे लागे !)

हो हो, रफीचे सौ बार जनम लेंगे.. पण बहुतेक तिथेच. अंब्रेला फॉल जवळ>>>>अगदी अगदी. "आजा रे परदेसी" आणि "सौ बार जनम लेंगे" लोकेशन सेम आहेत. Happy

खिलाडी मधलं 'वादा रहा सनम' हे चक्क महाबळेश्वर आणि पाचगणीला चित्रीत झालंय.. फॉरेनची लोकेशन्स प्रचलित असण्याचा काळ तो आणि या गाण्यात चक्क पाचगणीचे टेबल लँड!

ऐ दिल ए नादाँ, आरजू क्या है ?
आणि अजुनही काही वाळवंटातली गीते कोणत्या वाळवंटात चित्रित झाली असावीत ?

गीतः ये दुनिया इक दुल्हन, दुल्हन के माथे कि बिंदिया...
चित्रपट: परदेस
लोकेशनः गाण्याच्या सुरूवातीला लोणावळा येथील टायगर पॉईंट Happy

http://www.youtube.com/watch?v=DobD3BddrM0

<दिल का भँवर करे पुकार प्यारका राग सुनो.
कुतुबमीनार- नवी दिल्ली.>

तिथे चित्रीकरण करायला परवानगी मिळाली नाही, म्हणून सेट उभारला होता, असं मी वाचलं आहे.

मुकद्दर का सिकंदर मधलं रोते रोते आते है सब : https://www.youtube.com/watch?v=zuf9jyBVKYM
चित्रीकरण मुंबईत वरळी ते कफ परेड या पट्ट्यात झालेलंसं वाटतं. गिरगाव चौपाटी व मरीन ड्राईव्ह स्पष्ट दिसतात. गाणंभर समुद्राचं सान्निध्य आहे. अमिताभ बच्चन फटफटी उलटसुलट दिशांना चालवतोय हे त्यामुळेच कळतं. Proud

-गा.पै.

चित्रपट : आराधना
गाणं : मेरे सपनोंकी राणी कब आयेगी तू
तूनळी : https://www.youtube.com/watch?v=EofAlMh2Huo
चित्रीकरण स्थळ : दार्जिलिंग हिमालयीन लोहमार्ग

-गा.पै.

गाणे - 'मराठी पाउल पडते पुढे'
लोकेशन - पन्हाळ्याचा तीन दरवाजा.

गाणे- 'जाउया ड्बलसीट रं लांब लांब लांब'
लोकेशन- पन्हाळ्याच्या पुसाटी बुरुजाकडे जाणारा रस्ता

राजा हिंदुस्थानी, धर्मात्मा (तुमने किसी से कभी प्यार किया है)
पाचगणी, टेबल टॉप

आप की कसम, जवानी दिवानी
आय आय टी, पवई, मुंबई

उठे सबके कदम, एक अकेला इस शहर मे, दो दीवाने शहर मे, चोरनी ( नितू सिंग / जितेंद्र ) या चित्रपटातले एक गाणे, देख कबीरा रोया मधले शुभा खोटे चे एक गाणे, ब्लफ मास्टर मधले गोविंदाचे गाणे, गणपती विसर्जन दाखवलेली बहुतेक गाणी, न जाने क्यू, होता है ये जिंदगी के साथ ( छोटीसी बात ) अशी अनेक गाणी आपल्या
मुंबईत चित्रीत झाली आहेत Happy

अक्षय कुमार आणि लारा दत्ता यांचे एक गाणे ( मला आठवत नाही, पण इथे कुणीतरी सांगितले होते )
ओमानमधल्या मस्कतजवळच्या कंताब बीच वर चित्रीत झाले होते. अतिशय सुंदर आणि स्वच्छ असा बीच आहे तो. आमचे नेहमीचे सहलीचे ठिकाण होते ते.

गीतः आज फिर जीने कि तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है....
चित्रपटः गाईड
लोकेशनः चित्तोडगड किल्ला (राजस्थान) Happy
युट्युब लिंकः http://www.youtube.com/watch?v=1odcNKyfZJU

गीत : राम भजन कर लेना रे इक दिन जाना रे भाई
चित्रपट : अवघाची संसार
स्थळ : १९६० सालचे पुणे, सायकलवर फिरणारे राजा गोसावी आणि शरद तळवलकर
लिन्क : http://www.youtube.com/watch?v=LZGn8601vw4

मागच्या दिवाळीत दार्जिलिंगला भेट दिली त्यावेळी अनेक सिनेमांतील गाण्यांमधून दिसणारा बतासिया लूप बघितला.

batasia
(आंतरजालावरून साभार)

अ‍ॅक्च्युअली सिनेमात त्याच्या शॉट घेताना बराच वरून - वरच्या डोंगरावरून - घेतात. आम्ही त्या लूपवर उभे होतो. तिथे आता एक युद्ध स्मारक आहे आणि बाग आहे. आम्ही उभे असतानाच ती दार्जिलिंगची ती सुप्रसिध्द टॉय ट्रेन लूपमध्ये आली. भारीच रोमांचित झाले मी!

घरी आल्यावर ढुंढाळले असता त्या दार्जिलिंग ट्रेन (आणि दार्जिलिंगमध्ये शुटींग झालेले सिनेमे) यांवर हे दोन सुरेख लेख मिळाले :

http://www.railnews.co.in/on-a-train-with-loud-horns/
http://www.meabhi.com/blog/darjeeling-bollywood/

हीना चित्रपटाच्या वेळी काश्मीर मधली परिस्थिती फारच बिघडलेली होती. इतकी की शूटिंगलाही जाता येऊ नये. शेवटी काश्मीर म्हणून जे संदर्भ आहेत त्याच्या शूटिंग्साठी रणधीर कपूरला ओस्ट्रियाला जावे लागले.....

Pages