अमेरिकेच्या निवडणूका

हे असले वादविवाद ऐकून काही खरी माहिती कळत नाही.
कुणाचेहि कसलेहि धोरण यशस्वी होण्यापलीकडे या देशाची परिस्थिती आहे.
आता फक्त खालील मार्गः

१. सर्व वकीलांना ठार मारून टाका.
२. सर्व welfare, unemployment, tax breaks वगैरे बंद करा.
३. उगाच securatized mortgages, hedgefund असले धंदे करण्यापेक्षा अंग मोडून काम करा, स्वतःला पाहिजे ते स्वतः बनवा! हे उगाच चीन, नि श्रीलंका असल्या देशाकडून स्वस्तात माल घेण्यापेक्षा स्वतः बनवा.
४. स्वतः कडे असलेल्या resources मधून जे जमेल ते करा. त्यासाठी त्यातूनच कसे भागवायचे यावर संशोधन करा!

एकदम मान्य!

अहो झक्की बुवा, तुम्हा अमेरिकन लोकांनी असा खर्चावर, खरेदीवर, ऐशो-आरामावर आळा घातला तर आमच्यासारख्या देशातल्या लोकांनी कसे जगायचे? तुम्ही १००$ मिळवून २००$ उडवले तरच आम्हाला काम मिळायचं ना!

झक्की वकीलांवर का गाडी घसरली?

आणि तसे केले तर टण्यान आणि मी कसे कमवायचे? पेक्षा असाही नोव्हेंबर आलाच आहे तर थॅक्सं गिव्हींगच्या निमीत्ताने जरा दिड-२००० घरटी उडवायला सांगा, मग बघा कसा डो वर जातोते अन आम्हालाही मग प्रोजेक्ट मिळतील टाईमपास करायला.

अगदी अगदी केदार.. जास्त खर्च जास्त क्रेडीट अजून खर्च अजून क्रेडीट.. चालूंद्या.. स्मित
झ्क्की मी ती मॅक्रो टू मायक्रो बी बी वर दिलेली लिंक पाहिलीत की नाही, वेंकटेश यांच्या भाषणाची?

केदार, तान्या, घाबरू नका. हे एक गंमत म्हणून लिहीले आहे.
शेक्सपियरच्या henry the Sixth या नाटकात हे वाक्य आहे. अधिक माहितीसाठी पहा:
http://www.enotes.com/shakespeare-quotes/lets-kill-all-lawyers

स्वतः कडे असलेल्या resources मधून जे जमेल ते करा.
--- स्वतः कडे resources नसतील तर ज्यांच्या कडे आहेत त्यांचे hearts and minds जिंका.