प्रेम ज्याचे त्याचे ...
झाला हृदयी ऐसा घाव त्याला प्रेम एकच नाव मन घेतय ज्याचा ठाव ओठांवर रुळ्तंय नाव
प्रेम म्हणजे नाही सबकुछ पैसा हि खरी दौलत ऐसा हो या वैसा फ़क्त कमवायचाय पैसा
प्रेम असो वा पैसा घ्यावे थोडे थोडे नशीब ज्याला हात जोडे त्याचे सुटे आयुष्य कोडे
ज्याची त्याची प्रेम व्याख्या ज्याला त्याला कळे कुणी गाठे टोक त्याचे कुणी अर्ध्यावरुनी वळे
- देवनिनाद