प्रवेशिका - ३९ ( mi_anandyatri - मी कुणा पटलोच नाही... )

मी कुणा पटलोच नाही
की खरा कळलोच नाही?

मी कसा हे दाखवाया
अंतरी शिरलोच नाही

ते तिचे नसणार डोळे
मी जिथे दिसलोच नाही

जिंकण्याचा अर्थ कळला
मग कधी हरलोच नाही

संपली माझी गरज अन्‌
मी कुणा स्मरलोच नाही

मरणही ध्यानी रहावे
मी असा जगलोच नाही


वाह... छोट्या बहरातील सुंदर गजल! अगदी सहज उतरलीये!
मतला... PERFECT!! हरलोच.. खास!
शेवटचा शेरही जमून गेलाय.
(छोट्या बहरामुळे गजल 'पुलस्ति'चीच असावी अशी शंका डोकावून गेली मनात स्मित)



मरणही ध्यानी रहावे
मी असा जगलोच नाही

हे आवडलं.
छान गझल.



मी जिथे दिसलोच नाही; मग कधी हरलोच नाही ; मी कुणा स्मरलोच नाही

हे तिन छान आहेत

६ गुण



माझे ७. बहर मस्तच.



मस्तच जमलिये.. माझे ७ गुण..



छान! मतला आणि हरलोच हे शेर फार आवडले.
माझे - ६.



छान आहेत छोटे छोटे शेर.. स्मित
"मी कुणा पटलोच नाही" वाचून वाटलं काहितरी "यो' गझल आह का काय.. फिदीफिदी

jokes apart.. माझ्याकडून ६ गुण..



"मी कसा हे दाखवाया
अंतरी शिरलोच नाही"

क्या बात है!!
८ गुण..



६ गुण



माझे ८ गुण



जिंकण्याचा अर्थ कळला
मग कधी हरलोच नाही

मस्त! खूप आवडला हा शेर!



गुण ६
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....



सुंदर. ७ गुण.



छान माझे ६