आनंदसागर

Submitted by श्रिया महेन on 27 January, 2013 - 00:41

आपला परमात्म्याशी नित्य आणि शाश्वत संबंध आहे. तो धूसर होऊन ह्या जगातील जीवनास प्रारंभ ती "सुरूवात".आणि परमात्म्याशी पुन्हा नित्य, आनंददायी संबंध प्रस्थापित होणे हा "शेवट" किंवा "मोक्ष".ह्या संकल्पनेवर आधारीत ही रचना आहे. कशी वाटली जरूर सांगा!

आनंदसागर

सुरूवात ही तुझ्याकडून,
शेवट ही तुझ्याकडेच.
पण मधला प्रवासच भरकटलेला,
अशाश्वतात गुरफटलेला.

ह्या भरकटलेल्या वाटेवरती
पुन्हा गवसतो तोच गांव
विस्मरून ते पावन तत्व
अन् मीही मांडते तोच डाव.

खुणा, तुझ्या नि माझ्या साम्यत्वाच्या
इथे मिटवीते माया
ममतेचे कच्चे बंध
इथे निर्मिते काया

नसे अशक्य जरी मिळविणे
त्रैलोक्याचे अवघे धन
तरीही आनंदाच्या एका थेंबासाठी
आसुसलेले अवघे जन

व्यर्थ शिणूनी मीही विसरते
कोठे गवसेल तो आनंदसागर
अंतरातूनी येते पावन साद
मी तुझ्या हृदयातील गिरिधर नागर!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

सध्या आपला प्रवास ........ सुरूवात ही माझ्या कडून,शेवट ही माझ्या कडेच.असा चाललेले आहे .त्यामुळे अशी सुंदर स्वप्नांची कविता आनंद देते.