कृपया मदत करा - असंबध बडबड, मानसिक त्रास

Submitted by निषा on 24 January, 2013 - 01:49

माझ्या मैत्रिणीविषयी प्रश्न आहे. तिचे लग्न झाले असुन तिला ४ महिन्याची मुलगी आहे. तिला लहानपणापासुन पाहत आहे. तिचे वागणे बोलणे चांगले व नॉर्मल आहे. पण गेल्या काही दिवसांपासुन तिचे वागणे बोलणे अचानक बदलले आहे. ती सांगते की तिला सतत भिती वाटते. ती मध्येच सर्वांना नीट ओळखते तर मध्येच एखाद्या व्यक्तिकडे बघुन ती दुसरीच व्यक्ती आहे असे समजुन तिच्याशी बोलते. स्वतःच्या मुलीमध्ये तिला तिचा खुप वर्षापुर्वी वारलेला मामा दिसतो. स्वतःच्या बहिणीमध्ये तिची लहानपणीची वर्गमैत्रीण दिसते. मध्येच तिच्या सासुबद्द्ल बोलते की त्या बघ इथे बसल्या आहेत. खरेतर तिचे सासुसासरे तिच्या दिराकडे काही दिवस रहायला गेले आहेत. तिची मुलगी रडायला लागली तर तिला वाटते कि तिला दुसरे त्रास देत आहेत म्हणुन ती रडत आहे तर ती बोलते कि मी पोलिसांना फोन करते. तिला सतत वाटत असते कि तिला कोणीतरी घाबरवत आहे. ती सतत तिच्याबरोबर कोणालातरी बसुन राहायला सांगते. खुप असबंद बडबड करत असते. शाळेच्या,कॉलेजच्या,शेजारपाजारच्या सर्व जुन्या लोकांच्या आठवणी काढत बसते. मध्येच जोराने किंचाळते. मध्येच माझी आई मेली आता मी काय करु म्हणुन रडते. खरे तर तिचे आई वडिल दोघे जिवंत आहेत व तिच्यासमोर बसलेले असले तरी ती अशी बोलते. मध्येच बोलते मी टिचर आहे. माझे तेरावे करायचे राहिले ते करा नाहीतर मी मरुन जाईन. मग माझ्या मुलीला कोण सांभाळणार म्हणुन रडते. ती गृहिणी आहे. नवरयावर खुप प्रेम करते. सासुचे व तिचे काही दिवसांपासुन पटत नव्हते. कारण तिला असे वाटायचे कि नवरा तिच्या सासुला घरखर्चासाठी जे पैसे देतो ते ती तिच्या घरी खर्च न करता तिच्या दिराकडे खर्च करते. तिचा दिर काही दिवसांपासुन नोकरीवर जात नव्हता. त्यामुळे हिचा नवरा दिराच्या मुलांच्या शाळेचा खर्च बघायचा. त्यामुळे तिला सतत असे वाटायचे कि माझा नवरा एकटा कमवतो व सासु-सासरे,दिर-जाव त्यांची मुले या सर्वांचा खर्च चालवतो. या गोष्टीवरुन तिची हल्ली खुप चिडचिड असायची. तसेच तिच्या लहान मुलीला सासु आंघोळ घालायची तर ती मध्येच दिराकडे राहायला गेली तर तिला वाटायचे की सासुची इथे गरज आहे, सर्वांचा खर्च आम्ही चालवतो तरी सासु दिराकडे जाउन राहते व तिच्या एकटीवर सर्व घराची जबाबदारी येउन पडते. हल्ली तिच्या बोलण्यात सतत हाच विचार असायचा पण आम्ही तिला धीर धर, तुझी मुलगी लहान आहे तिला तुझी जास्त गरज आहे. इतर विचार सोडुन दे. पण ती सतत सासु,दिर, दिराची मुले यांचाच विचार करत बसायची व सर्वजण काम न करता फुकटचे आमचे पैसे वापरतात असे बोलत बसायची.

आम्हाला ही गोष्ट इतकी सिरीयस वाटली नव्हती. प्रत्येक घरात सासु-सुनेची धुसफुस असते असे वाटायचे. पण आता तिचे वागणे काही दिवसांपासुन वर सांगितल्याप्रमाणे पुर्ण बदलले आहे. तिला सतत असे वाटते कि तिची सासु तिच्या वाईटावर आहे तिला मारायला बघत आहे. तिला मुलगी झाली म्हणुन तिला व तिच्या मुलीला मारणार आहे. पण तिच्या असंबध बडबडीमुळे यातील काय खरे काय खोटे काही कळत नाही.

तिचा नवरा व आईवडिल तिला डॉक्टरकडे घेउन गेले (मानसोपचार तज्ञ) तेव्हा डॉक्टरने तिला कोणाशी भांडण झाले होते का, तु अशी का वागतेस असे विचारले तर ती बोलते कि मला भिती वाटते, कसली भिती वाटते तर काही सांगत नाही. तिची मुलगी लहान असल्यामुळे तिला अ‍ॅडमिट केले नाही तर तिला काही गोळ्या लिहुन दिल्या आहेत ज्यात झोपेच्या गोळ्या देखील आहेत.आठवड्याने पुन्हा बोलवले आहे. गोळ्या सुरु होउन ३ दिवस झाले तरी अजुन म्हणावा तसा परिणाम दिसत नाही आहे. डॉक्टरने तिला सहवासाची गरज आहे, तिला एकटे सोडु नका असे सांगितले आहे.

कृपया हा कसल्या प्रकारचा त्रास आहे हे कोणी सांगु शकाल का? तिला दिलेल्या गोळ्यांबद्द्ल गुगुलुन बघितले तर त्या स्किझोफ्रेनिआ आजाराबद्द्ल आहेत असे दिसते. माझ्या मैत्रिणीला हाच आजार झाला आहे का? तिला कश्यामुळे बरे वाटेल. ती पुन्हा नॉर्मल होईल का? तिच्या आईवडिल व नवरयाला तिच्या लहान मुलीची देखील काळजी वाटत आहे. तिच्या सासुला काही दिवस दिराकडेच रहायला सांगितले आहे कारण तिला बघुन ही कशी रिअ‍ॅक्ट करेल माहित नाही. तिचे आईवडिल तिला काही दिवस माहेरी घेउन जायला बघत आहेत. तिथे एखाद्या मानसोपचार तज्ञाला दाखवतो असे बोलत आहेत. नवी मुंबईत कोणी चांगला मानसोपचार तज्ञ कोणाला माहित आहे का? हि बरी होईल ना?

कृपया याविषयी माहिती द्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानसोपचार तज्ञांशीच बोला.
इथे बहुतेकतरी कोणी तज्ञ नाहीत आणि असतील तर ते इतक्या ढोबळ माहितीवर काहीच सुचवणार नाहीत.

"....मानसोपचार तज्ञांशीच बोला....."

... योग्य सल्ला. तसे पाहिल्यास इथे 'साती' आणि 'इब्लिस' असे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील नामवंत डॉक्टर्स आहेतच, पण ते देखील तुम्हाला मैत्रिणीला घेऊन मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याचाच सल्ला देतील. फरक इतकाच की त्यांच्या व्यवसायामुळे तशा दोनचार डॉक्टर्सना ते नक्कीच ओळखत असतील.

तुम्ही इथे धागा तयार करून सल्ला विचारला आहे हे ठीक, पण इथल्या [च] सल्ल्यावर अवलंबून राहून त्या मैत्रिणीवर योग्य ते उपचार होईल असेही मानू नका.

अशोक पाटील

मैत्रिणीच्या घरच्यांनी मानसोपचार तज्ञाकडे ट्रिटमेंट सुरु केलीच आहे. नवी मुंबईतील चांगला मानसोपचार तज्ञ कोणी सुचवु शकाल का? तिच्या आईवडिलांना तिला स्वतःच्या घरी ठेउन तिच्यावर उपचार करायचे आहेत व ते नवी मुंबईत राहत आहेत. त्या मुलीची आधीची हिस्टरी अशी नाही त्यामुळे तिचे आईवडिलदेखील अचानक सुरु झालेल्या त्रासामुळे खुप चिंतीत आहेत.

मानसोपचार तज्ञांशीच बोला. >> +१००००००

आणि ३ दिवसांत फरक कसा दिसेल ? मेंदूतील केमिकल्स संतुलित व्हायला थोडा वेळ लागेल.

......नवी मुंबईतील चांगला मानसोपचार तज्ञ कोणी सुचवु शकाल का?...

इथलेच डॉ. कैलास गायकवाड यांच्याशी संपर्क साधा. ते नवी मुंबईत असतात व त्यांच्या ओळखी बर्‍याच आहेत. ते तुम्हाला योग्य मानसोपचारतज्ञ सुचवू शकतील.

पोस्ट पार्टम सायकोसिस चा प्रकार असू शकतो. रेग्युलर ट्रीटमेंट घ्यावी लागेल.
पेशंस ठेवावा लागेल.

हा स्किझोफ्रेनिआ च आहे.
मानसउपचार तज्ञ च बरा करु शकेल. ऑषधे काही महिने तरी घ्यायला लागतील, तर च परिणाम दिसतील ( ३ दिवस काय १५ दिवसात दिसतील अशी पण अपेक्षा ठेवू नका ) .
ऑषधाचे थोडे परिणाम दिसल्यावर समुपदेशन पण चालू करावे.
स्किझोफ्रेनिआ चे बरेच मदत ग्रुप आहेत प्रत्येक शहरात, त्यांची माहिती काढुन त्यांच्या meetings ला जाणे सुरु करावे, पेशंट आणि घरच्यांनी सुद्धा.

हा आजार पूर्ण बरा होणारा नाही, त्यामुळे कायम स्किझोफ्रेनिआ मदत ग्रुप शी संबंधीत रहावे.

पुण्यात डॉ ऊल्हास लुकतुके आहेत, खुप अनुभवी, जुने जाणते आहेत.

वर जर २५ च्या पेक्षा कमी असेल तरच स्किझोफ्रेनिया होतो ना? Uhoh

मला तर मल्टिपल पर्सनॅलिटी डिसॉर्डर असेल असं वाटलं वाचल्यावर.
असो, तज्ञ योग्य ते निदान करतीलच.

मानसिक आजारात रोग्याबरोबरच घरच्यांनाही खूप चिकाटी ठेवावी लागते, औषधं, समुपदेशन वेळच्यावेळी करावे.

हे तसं सिरीयस आहे तर आपण सगळे जे तज्ञ नाहीयेत त्यांनी काहीच नको बोलायला इथे.
दिशाभूल व्हायला नको उगाच.
साती, इब्लिस, रुणू, डॉ कैलास गायकवाड इत्यादी डॉक्टर मंडळींनाच फक्त बोलूदेत.
म्हणजे अशी विनंती....

डॉ.राकेश गिल्डियाल, कन्सल्टण्ट--सायकियाट्री, एमजीएम हॉस्पिटल्,वाशी.--

Dr Rakesh Premdutt Ghildiyal
022 - 67913958, 27660531
Clinic No 43, 4th Floor, Shanti Centre, Next To Green City, Sector 17, Vashi, Navi Mumbai, - 400703

डॉ.सुरेश बोराडे ,एम.डी. सायकीअ‍ॅट्री ( हा माझा क्लासमेट आहे )
Shop no 2,Grow More Tower,Behind Indian Bank, Near Siemens Bldg. Kharghar Station road, Sector 2, Kharghar, New Mumbai, Maharashtra 410210, India
India

Tel. 09967361710

दोघेही अत्यंत निष्णात सायकीअ‍ॅट्रीस्ट आहेत. लगेचच अपॉइंटमेंट घ्या.

कैलासराव, या माहितीसाठी सगळेच आभारी असतील आपले.

लेखात वर्णन केलेली लक्षणे वाचून वाईट वाटले. स्किझोफ्रेनिआ असाच असतो असे ऐकून माहीत आहे.

बाकी, येथे डॉक्टरांनीच बोलावे या नीधप यांच्या सुचवणीशी सहमत आहे. निव्वळ लेख वाचून काय वाटले हे लिहायला आलो होतो. रुग्ण स्त्रीला बरे होण्यास शुभेच्छा!

ज्ञानेशही डॉक्टर आहेत.

(मायबोलीवरील डॉक्टरांची - म्हणजे मेडिकल डॉक्टरांची - एक यादी प्रकाशित करता येईल का कोणाला? त्यात संपर्काची माहिती, ठिकाण व स्पेशलायझेशन मिळेल, अशी?)

धन्यवाद!

डॉ.भारत मोटवानी
श्रद्धा नर्सिंग होम
एक्सर रोड,
एस के क्लब च्या समोर
ऑफ न्यू लिंक रोड
बोरिवली वेस्ट.

२८९५५०२०
मोबा. ९३२३९५२६५६

चांगले डॉ आहेत. योग्य मार्गदर्शन तर करतीलच, पण कुटुंबियांनी प्रेमाने आणि धिराने घेणे गरजेचे आहे..
लवकर उपचार झाले तर हा आजार संपूर्ण बरा होतो, हा स्किझोफ्रेनियाच आहे, असावा..

माफ करा. मी डॉक्टर नाही. पण नुकतीच एक केस पाहिलीये त्याबद्दल लिहीते. कदाचित उपयोगी पडेल.
ओळखीत एकांना अचानक असे भास व्हायला लागले - काही दिवस होत राहिले. त्या ऑपरेशनसाठी हॉस्पीटल मधेच होत्या त्यावेळी. ( त्रास ऑपरेशनपूर्वीच सुरु झाला.) डॉक ने सांगितले की स्ट्रेस, अचानक शुगर खुप कमी होणे, आणि इलेक्ट्रोलाईट इम्बॅलन्स यापैकी कशाने तरी होऊ शकते. बाकीची औषधे अ‍ॅडजस्ट केल्यावर त्रास कमी/ बंद झाला. पण त्यावेळी झालेले भास त्यांना अजुनही खरे होते असेच वाटतात. यापैकी काही असेल का? इलेक्ट्रोलाईट इम्बॅलन्स आणि शुगर हे त्रास होत असलेल्या वेळीच रक्ताची तपासणी केली तर कळेल का?

मानसोपचार तज्ज्ञला जरूर भेटाव... पण माझा आणखी एक सल्ला आहे.

इथल्या माबो वरच्या कथित विज्ञानवादी मंडळींना तो कदाचित पटणार नाही, पण ही अंधश्रद्धा नाही.

तुंहि नाशिक इथे जावून नारायण नागबली विधी करून या , जर टी म्हणते की माझे तेरव करायचे राहिले आहे ,तर एखादा आतृप्त आत्मा तिला त्रास देत असावा ,ज्याचे मरणोत्तर विधी झाले नसावेत .

किंवा देवाला कौल लावणे म्हणून एक विधी असतो,त्यामध्ये प्रश्न विचारता येतील .माझ्या अनेक नातेवाईक मंडळींना चांगला अनुभव आहे

अतृप्त आत्मा Uhoh
असा एक आयडी कालपरवाच पाहण्यात आला. त्यांच्या लक्षात ही पोस्ट आली तर त्यांचा खुलासा मिळू शकेल
@ बाफचा विषय
त्रोटक माहितीवरून ही केस कशाची आहे हे अंदाज बांधत बसण्यात अर्थ नाही हे वर आलंच आहे. धागा वर ठेवायचा असल्यास टिंब दिले तरी चालू शकेल.

१००% स्क्रिझोफेनिया आहे. अशात रुग्णाला पटवुन काहिच उपयोग नाही. औषधे घ्यावी लागतील.
स्क्रिझोफेनियाच्या बर्याचशा औषधांचे साइड एफेक्ट चांगले नसतात यामुळे नीट डॉक्टरांना त्याबद्दल विचारा.
आहाराची काळजी घ्या.
अशात रुग्णाबरोबर रहाणार्यांना सासु सासरे मुलगी पण त्रास होतो त्यामुळे घरात सतत प्रयत्नपुर्वक पॉझिटिव्ह वातावरण ठेवणे गरजेचे आहे.

घरातील आणि जवळच्या परिवारातील सपोर्ट सिस्टिम भक्कम असली पाहिजे. रुग्णाला मानसिक आजाराचे सेल्फ रिअलाझेशन होणे खूप महत्वाचे असते अशा वेळी. तुमच्या मैत्रिणीला यातून बाहेर पडण्यासाठी अनेक सदिच्छा.

आश्याच पध्द्तीचा आजार आम्ह्च्या एका काकाना आहे.
पण त्यांच्या घरचे स्वभावाची एक तर्हा म्हणून दुर्लक्ष करतात
त्याचा त्रास त्या काकाना खुप व घरच्या लोकांनाही होतो.
घरच्यांना वाटते स्वभावाला औषध नाही,
ते सांगली जिल्हात राहतात.सांगली,कोल्हपुर ,मिरज कडील चांगले मानसोपचार तज्ञ कोणाला माहित आहेत का?

नी ने सांगित्॑ल्य॒ प्रमाणे मानसपोचार करा
बाकी तुमची मैत्रिण लवकर बरीव्हावी यासाठी शुभेछा कारण तिच्या पिल्ला ला तिची गरज आहे

घरातील आणि जवळच्या परिवारातील सपोर्ट सिस्टिम भक्कम असली पाहिजे.>> अनुमोदन

रुग्णाला मानसिक आजाराचे सेल्फ रिअलाझेशन होणे खूप महत्वाचे असते अशा वेळी.>> हे रुग्णाला शक्य नसते म्हणुन तर आधी ऑषधांची गरज असते. काही काळाच्या ऑषध उपचारानंतर रुग्ण सेल्फ रिअलाझेशन च्या स्टेज पर्यंत पोचु शकतो

माझी मुलगी सायकॉलोजिस्ट व निष्णात काऊन्सेलर आहे. तिच्याशी बोललो.
त्वरीत सायकियॅट्रिस्ट व सायकॉलॉजिस्ट्च्या उपचारांची गरज आहे.
पण ती अमेरिकेत असल्याने तिचा रेफरन्स देता येत नाही

इथले अनावश्यक प्रतिसाद उडवले आहेत.

मायबोली हे सार्वजनीक व्यासपीठ असल्याने अधून मधून असे डिवचणारे/ विषय भरकटवणारे प्रतिसाद येणारच. ते शक्य होतील तसे उडवण्याचा प्रयत्न चालूच असतो. पण यांत तुम्हीही सहकार्य करू शकता. अश्या पोस्टकडे दुर्लक्ष करून विषयाशी संबंधीत चर्चा चालू ठेवायची. त्या जाणीवपूर्वक केलेल्या प्रतिसादाबद्दल प्रत्येकाने नाराजी व्यक्त करण्याची गरज नाही.