कुणी काय केले...

Submitted by प्रेरीत on 23 January, 2013 - 07:20

मला आज हळवे होण्यासवे कुणी काय केले...?

किती गूढ कोडे किती गूढ भाषा...
कोण देई चिंता कुणा निर्मित आशा...
कळेना कसे अर्थ उदयास आले..?

असा मृत्तिकेचा गंध श्वासांत येई
जरा जागणे दंग ध्यासांत होई
तरी आज डोळ्यांस स्पर्श ओलेच झाले

कशा व्यर्थ वर्णू मी पेच अंतरीचे...
कां दु:ख घेऊन चढू दार पायरीचे?
मला दोष देणे मी कसे काय केले?

तुझ्या अंतरीचे रंग जन्मजात ते
असे सोड कागदी ,ओघांत ते
कसे ओघ आज सैरभैर वाहिले...?

चार सुचले शब्द तुझ्या विरहांनी
जवळ तू परी का दूर अंतरांनी!?
एक शब्द दोन अर्थ कसे निघाले...?

--रोहन्ता

Group content visibility: 
Public - accessible to all site users