धडपड..

Submitted by मी मुक्ता.. on 22 January, 2013 - 00:37

माझ्या उदासीला 'तुझ्या नसण्याचं' लेबल लावण्याचे
सोयिस्कर दिवस केव्हाच मागे पडलेत..
अनादी अनंत पसरलेल्या अंधारात उगवावा प्रकाशाचा किरण,
आणि मग तो च काय ते सत्य बनून जावा..
तसा 'एकटेपणा' झळाळलाय,
कारणांच्या पसार्‍यातून..

कुठं काही खुट्ट् झालं की अंधारात लपायची सवय झालेली मनाला..
एखादं सोयिस्कर कारण गुरफटून घेऊन..
आता ह्या झळाळलेपणाला कुठं लपवावं?
'आणखी एक कारण' या कॅटेगिरीत ते बसत नाही..
आणि त्याला जिथे नेऊ तिथल्या कारणांचा फोलपणा याच्या प्रकाशात लपत नाही..

अंधारात लपता येत नाही म्हणून प्रकाशाची चाललेली ही धडपड,
आता असह्य झालीये...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वतःलाच भेटता आलं या धडपडीचं फलित म्हणून तर...? इतकं एकटेपण व्यापून उरत असेल सारंच.. तर हेच होणं शक्यंय.. मग बरंय ना हे एकटेपणच.
खूप आवडली कविता.

अमेलिया,
स्वतःची भेट होते म्हणून तर हे एकटेपण जरा सुसह्य आहे.. Happy पण तरी हेच बरं नाही म्हणता येणार..
प्रतिसादासाठी धन्यवाद..

आभार समीर.. Happy