भारतीय हवाईमार्गाचा इतिहास : माहिती हवी आहे

Submitted by गजानन on 16 January, 2013 - 11:41

नमस्कार मंडळी,

मला भारतीय हवाईमार्गाचा इतिहास, त्याचा विस्तार आणि आजवरची सर्वसाधारण वाटचाल याची माहिती हवी आहे. कृपया मदत करा. तुम्हाला यावरची पुस्तकं, आंतरजालावरचे दुवे ठाऊक असतील तर कृपया माहिती द्या.

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही काही शोधले आहे का? तसे काही प्रयत्न केले आहेत का? गुगल आणि विकीवर पाहिले आहे का?

असतील तर कुठे आणि काय हे पण लिहा जरा प्लिज.

विनय, धन्यवाद, वाचतो. (दुसरा आणि तिसरा दुवा एकच आलाय का चुकून?)

रोहन, हो. मला विकीवर विमानकंपन्यांची पानं मिळाली पण सुरुवात कोठून झाली, भारतातले पहिली विमानखेप (जसे भारतातील रेल्वे १८५३ बोरीबंदर ते ठाणे) वगैरे स्वरूपाची माहिती हवी होती.

गजानन..

देसाई, मामी आणि महेश यांनी दिलेल्या लिंक्स तुम्हालाही सहज शोधता आल्या असत्या. मी देखील शोधून देउ शकत होतो.

आपण आधी काय शोधले आहे ते धाग्यातच दिले तर इतरांचा वेळ आपण वाचवू शकतो.

माझा मुद्दा कळला असावा ही अपेक्षा आहे.

रोहन, हो तुमचा मुद्दा पहिल्या पोस्टीतच कळला.

महेश, मामी, धन्यवाद. महेश, तुमच्या दोन्ही लिंक्सवर चांगली माहिती आहे.

स्वर्गीय लालचंद हिराचंद यांचे एक चरीत्र

"जिंकिले भूमी, जल, आकाश"
लेखक बहुधा सविता भावे.

ह्या नावाने प्रकाशित झालेले आहे. भारतीय विमान सेवेचे जनक स्वत:च माहिती देत असल्याने ती माहिती आधिकारिक आहे. त्यांनी बंगळुरूला स्थापन केलेली हिंदुस्थान अ‍ॅरोनॉटिक्स कंपनीच पुढे राष्ट्रीयिकृत झाली.
भारतीय विमानसेवेची आद्य प्रवर्तक बनली.