प्रवासाची पूर्वतयारी

Submitted by निंबुडा on 14 January, 2013 - 06:10

एक दिवसीय पिकनिक किंवा मोठी टूर (देशांतर्गत किंवा देशाबाहेर) ठरली की सर्वात महत्त्वाचे असते, प्रवासासाठी न्याव्या लागणार्‍या सामानाची यादी बनवणे व त्यानुसार सामान पॅक करीत जाणे! सोबत लहान मुले/ वृद्ध व्यक्ती/ आजारी व्यक्ती असतील तर काही स्पेशल वस्तुंना सामानात जागा द्यावीच लागते.

इथे प्रवासाच्या पूर्वतयारीसाठी टिप्स देणे अपेक्षित आहे. उदा.
१) किती वर्षे वयाच्या मुलांसाठी काय काय वस्तु 'हे अजिबात विसरू नका' च्या यादीत असू शकतात?
२) विमान प्रवासासाठी च्या उपयुक्त टिप्स (उदा. हँड्बँग आणि बाकी मोठ्या बँग्स ह्या मध्ये काय काय ठेवायचे ह्याचे निर्णय कोणत्या अनुषंगाने घेता?
३) बाहेरचे खाणे न खाऊ शकणार्‍या लहान मुलांसाठी अध्ये मध्ये खाण्यासाठी तहान लाडू, भूक लाडू म्हणून काय काय घेता येऊ शकेल?
४) सामानाचे वर्गीकरण बॅग्स मध्ये कसे करता?
५) टूर कंपनी सोबत चा प्रवास व स्वतः ठरवलेला व स्वतःच आखलेला प्रवास ह्यांमध्ये काय काय गोष्टींचे नियोजन कसे कसे करता?
६) काही स्पेशल सहलींसाठी (जसे की क्रूज वरची सहल, ट्रेकिंग) स्पेशल वस्तु 'मस्ट' यादीत असतात. ती यादी इथे देता आली तर उत्तमच.
७) प्रवासाच्या ठिकाणाप्रमाणे सोबत 'मस्ट' असणार्‍या वस्तुंची यादी

ह्या व अश्याच अनुषंगाने एकुणच प्रवासाच्या पूर्वतयारी मध्ये जे काही मुद्दे येत असतील त्या सर्वांवरच इथे चर्चा करता येईल. (ही हेडर पोस्ट जरा विस्कळीत झाली आहे ह्याची कल्पना आहे. मनात असलेले सगळेच मुद्दे नीट मांडता आले नाहीयेत. माबोवर स्पेसिफिक कारणांनी स्पेसिफिक प्रवासांसाठी टिप्स मागणारे धागे आधी पाहिले होते. पण सर्वंकष मुद्दे चर्चेत असलेला धागा माझ्या पाहण्यात आला नव्हता. म्हणून हा धागा काढत आहे. अश्या स्वरुपाचा धागा आधी असल्यास सांगा, म्हणजे हा काढून टाकेन. )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी प्रवासाला न्यायच्या जनरल सामानाची एक लीस्ट बनवून ठेवली आहे. प्रवासासाठीचे सामान भरायला घेताना ते काम मी ह्या टप्प्यात संपवते.
१) ज्या बॅग्स न्यायच्यात त्या अ‍ॅक्च्युअल प्रवासाच्या साधारण आठवडाभर आधी काढून त्यात आठवेल तश्या वस्तु जमा करत जाणे
२) प्रवासाच्या आधीच्या दिवशी ते सर्व रँडमली जमा केलेले सामान बँगांमध्ये संगतवार लावून ठेवणे
माझी वर्गवारी अशी असते.
-- पर्स किंवा हँडबॅग मध्ये कधेही लागू शकेल व इन्स्टंटली मिळू शकेल असे सामान (उदा. रुमाल, मोबाईल, पैशाचे पाकीट, पेन, एखादी छोटी डायरी किंवा कोरा कागद, प्रवासाची तिकिटे (वा प्रिंट्स etc), फेसवॉश, कंगवा. ही बँग खूप वस्तुंनी भरलेली नको. थोडक्यात सुटसुटीत असायला हवी.
-- एका बॅग मध्ये सर्व खाऊचे सामान
--एका मोठ्या सुटकेस मध्ये प्रवासासाठीचे कपडे (शक्यतोवर एक जीन्स व वेगवेगळे कुर्ते. म्हणजे कपड्याचा प्रत्येक सेट वेगळा नको.)
३) आयत्या वेळी टाकण्याच्या काही वस्तु असतात. त्यांची यादी एकदा नजरेसमोर घालणे व त्यानुसार बॅगेत त्या वस्तु अ‍ॅड करणे. (उदा. मोबाईल चार्जर, कॅमेर्‍याचे चार्जेबल व आदल्या रात्री चार्ज करायला लावलेले सेल्स, टूथब्रश, इ.)

मी तर " Travel Light " हा मन्त्र मानते ...कमीत कमी सामान घेवुन प्रवास करावा .. पुरेसे पैसे ठेवावेत जवळ , अगदीच तातडीने गरज पडल्यास वस्तु विकत घ्याव्यात . उगाच जास्त सामान घेवुन स्वतःला त्रास करुन घेवु नये .
त्यामुळे प्रवासाला निघताना मी फक्त ३ गोष्टी चेक करते
१) कॅश
२) क्यॅमेरा
३)मोबाईल

बस्स ...

जिथे जायचंय तिथलंच तिकीट काढलं आहे ना, हे बघणे
>>>
Biggrin

नाहीतर जाते थे जापान पहुंच गये चीन समझ गये ना असं व्हायचं! Wink

डिपार्टिंग टाइम मध्यरात्रीचा असल्यास तारीख नक्की आजची की उद्याची ते बघणे Happy

एक ब्रश-(ट्रॅव्हल साइझ) पेस्ट-लोशन-क्रीम इ चे किट बनवुन ठेवावे. फर्स्ट एड किट पण असेच बनवुन ठेवले तर वेळ वाचतो. औषधांच्या एक्सपायरी डेट्स तेवढ्या बघाव्या लागतात. छोट्या-मोठ्या कुठल्याही प्रवासास निघताना कमीत कमी दोन कामं कमी होतात.

विमान प्रवास असेल तर एक ब्रश, पेस्ट-लोशन-क्रीम इ चे किट आणि एक वेळचे कपडे कॅरि ऑन बॅग मधे जरुर ठेवावे. थोडे स्नॅक्स,सेल फोन चार्जर सुद्धा जवळ ठेवावे. ७-८ वेळा स्नॅक्स कामी आले आहेत. स्नो पडत असताना डि-आयसिंग साठि विमानात बसवुन ठेवले आणि ३ तासाच्यावर वेळ झाल्यामुळे विमान रद्द केले असे बर्‍याच्दा झालेय. त्यावेळि कपडे आणि स्नॅक्स कामी आलेत. कारण रात्रि १० च्या पुढे डोमेस्टिक विमान्तळावर सगळे बंद झाल्यावर खायचे प्रॉब्लेम येतात.

पासपोर्ट/व्हिसा व्हॅलिड आहे याची खात्री करणे. विमानतळावर जाऊन परत आलेले लोक माझ्या माहितीत आहेत. Happy

विमान प्रवास असेल आणी एकाहुन जास्त व्यक्ती/बॅगा असतील तर जिवनावश्यक गोष्टी (उदा. कपडे) सर्व बॅगांमध्ये विभागुन ठेवाव्यात म्हणजे एखादी बॅग गहाळ झाली किंवा उशिरा आली तर खोळंबा होत नाही.

मौल्यवान गोष्टी कायम स्वत:जवळ बाळगाव्यात. (चेक ईन न करता कॅरी ऑन कराव्यात). उदा. औषधे, कॅमेरा इत्यादी.

डिपार्टिंग टाइम मध्यरात्रीचा असल्यास तारीख नक्की आजची की उद्याची ते बघणे>>> +१. कोकणकन्या एक्स्प्रेस रात्री बारा पाचला पनवेलला यायची. एक दोनदा २४ तास उशीरा ट्रेनमधे चढलेय Happy

सुटसुटीत पॅकिंग्साठी : मिक्स अ‍ॅन्ड मॅच ड्रेसेस, मळखाऊ रंगाचे कपडे (अगदीच खाकी मरून नकोत. पण सर्वच कपडे "चांदनी स्टाईल" नको) प्रत्येकाचे किट (छोटी पेस्ट, साबण, ब्रश, कंगवा, हँड सॅनिटायझर, इतर मेकपचे साहित्य) वेगवेगळे पॅक करावेत. त्यामुळे सकाळच्या आवराआवरीचा वेळ वाचतो.. पावसाचे दिवस असतील तर प्रत्येकी एक एक छत्री अथवा रेनकोट पॅक करावा.

सामानामधे ईलेक्ट्रिक केटल आणि चहा बनवायचे कोरडे सामान घेतले तर उत्तम. ईलेक्ट्रिक केटल असेल तर गरम पाणी कधीही बनवून घेता येते.

साईटसीइंगसाठी जाताना:

नक्की काय काय बग्घायचे आहे ते आधीच ठरवून ठेवावे. देवदर्शनाची आवड नसेल तर "देवळे नकोत" किंवा खूप गर्दीची ठिकाणे नको हवी असतील् तर त्याप्रमाणी प्लान्स बनवावेत. म्हणजे फिरायला गेल्यावरचा वेळ वाचतो.

ऐतिहासिक ठिकाणी गेल्यावर पैसे देऊन गाईड आवर्जून ठरवावा. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित माहिती तर मिळतेच शिवाय बहुतेक ठिकाणे लवकर फिरून होतात. इतर लोकांनी गाईड माहिती देत असताना त्यांच्या आजूबाजूला फिरू नये. हंपीला मागच्या वर्षी गेलो होतो तेव्हा एक "मराठी कपल" आमच्या पाठी पाठी गाईड माहिती देत असताना फिरत होतं. ते इतकं चीप आणि विचित्र वाटत होतं...

फिरताना कॅप, स्कार्फ, गॉगल, कॅमेरा, (बॅटरीज), पाण्याच्या बाटल्या, थोडाफार खाऊ, सनस्क्रीन हाताशी येतील असे ठेवावेत.

पटकन काढता घालता येतील असे फूटवेअर (देवळाच्या पायर्‍यांशी बसून शूज काढणे, सॉ़क्स काढणे -दर्शन घेऊन आल्यावर परत सॉक्स घालणे, मग शूज घालणे. पूढच्या देवळांत गेल्यावर पुन्हा रीपीट मोड!! साईटसीईंगचा अर्धा वेळ यातच). कुठे काय फिरायला जातोय याचे भान ठेवून त्यानुसार कपडे घालणे. आमच्याकडे नात्यातल्या एक बाई आल्या होत्या. त्यांना गणपतीपुळे वगैरे फिरवायला घेऊन गेलो होतो. बाईंनी दहा हजाराची बनारसी आणि ढीगभर दागिने घातलेले. त्यातून पुळ्याचा टूरीस्ट सीझन असल्याने देवळात प्रचंड गर्दी. त्या दागिन्यांवर लक्ष ठेवायला हवंच. साडी भारीतली असल्याने "मी वाळूत चालणर नाही, समुद्रात येणार नाही" बाईंचे यजमान वैतागले अक्षरश:.

दक्षिणेत फिरताना बर्‍याच देवळांमधे पुरूषांना लुंगी/धोतर्/सोवळं नेसूनच आत जावं लागलं त्यामुळे तिकडे फिरायला जाताना बॅगमधे लुंगी वगैरे घेऊन ठेवावं. बायकांना सलवार कमीझ आणि साडी यापैकी काहीही चालतं. (जीन्स लांब कुर्ता असेल तरी चालतं. जीन्स टीशर्ट असतील तर चालत नाहीत.) "चालत नाहीत" म्हणजे आत गाभार्‍यामधे जाता येत नाही. देवाचे दर्शन घेऊ शकता.

देवळामधे पंडे, भट वगैरेच्या हातात पैसे देऊन सेवा करवू नये. त्यापेक्षा देवळाच्या ऑफिसमधे जाऊन रीतसर पावती करून घ्यावी. प्रसाद लगेच देत असतील तर घ्यावा, अन्यथा पोस्टाने बर्‍याचदा पाठवून दिला जातो.

(अजून सुचले तर लिहेन)

प्रवासाला जाताना मी खालील प्रमाणे काळजी घेते.

१. सामान एकाच बॅगेत ठेवत नाही. म्हणजे जर तीन लोकांच्या तीन बॅगा असतिल, तर तिघांचे ही सामान तीन बॅगात विखरुन ठेवतो. म्हणजे माझ्या बॅगेत नवरा+ मुलीचे प्रत्येकी दोन सेट, मुलीच्या बॅगेत आमचे दोन सेट, नवर्‍या बरोबर आम्हा दोघींचे सेट. तेच खाण्याच्या पदार्थांचं. ते ही विखुरलेले. काही कोरडे पदार्थ माझ्या पर्स कम हँड बॅग मधे.

२. कॅमेरा, मोबाईल, त्यांचे चार्जर्स हे सगळे हँड बॅगेज मधे. त्यांच्या एक्स्ट्रा बॅटरीज आणि मेमरी कार्ड्स लगेज मधे.

३. पैसे नवर्‍या कडे आर्धे आणि माझ्या कडे आर्धे. परदेशी जात असु, तर आम्ही जानव्या सारख्या घालायच्या पातळ मांजरपाटाच्या पिशव्या शिवलेल्या आहेत, त्या आंगाच्या आत पॉकेट सारख्या ठेवता येतात. त्यात जास्तिचे पैसे/चलन व वेळेला पास्पोर्ट ही राहु शकतात. खुप उपयोग झाला त्यांचा मला अत्ता पर्यंत...

४. बहुतेकदा कपडे कमीत कमी घ्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे ८ दिवसांसाठी ३ जीन्स्/पँट आणि ८ टॉप. आणि एखादा पंजाबी सुट. गरम कपडे असतिल तर थर्मल ला जास्त पसंती. ते घातले की मग इतर कपडे जास्त खराब होत नाहीत. मग एकच टॉप दोनदा घातला तर चालतो. टॉप्स साधारण इस्त्री न लागणारे घ्यावेत, म्ह्ण्जे मग सोंगं दिसत नाहीत शेवटच्या दिवशी.गरंम कपडे म्हणुन अनेकदा लोकांना सुट वापरताना पाहिले हसावे का रडावे कळतच नाही. शक्यतो जास्त सांभाळायला लागतिल असे कपडे घेउच नये बरोबर

५. खाणे बरोबर घेताना. छोट्या छोट्या पुड्यां मधे बांधणे पसंत करते. मग ते ही प्रत्येक बॅगेत विखरुन ठेवता येते. परत तेवढीच पुडी फोडली की झटक्न संपते आणि मग आर्धवट पुड्या सांभाळण्याची कट्कट वाचते.

६. एकतरी स्लीपर्स चा जोड बरोबर ठेवतेच (प्रत्येकी). त्याही अशा स्लीपर्स की वेळप्रसंगी त्या बाहेरही घालता येतात.

७. खुप खिसे असलेल्या कार्गो पँट्स आणि जॅकेटस ना पसंती.

८. दागिन्यांना फाटा.

९. कमरेचा कसा चांगला पट्टे वाला कमरेला बांधता येइल असा.

हे सामान वेगवेगळे विखरुन ठेवण्या मागे हाच उद्देश की एखादी बॅग राहीली/ मागे राहिली / हरवली तरी कोणाचे काहीही अडु शकत नाही. नीदान लगेचच व्यत्यय येत नाही. एकाच बॅगेत खाणे ठेवले आणि तीच मागे राहिली तर? किंवा एकाच बॅगेत सॅनेटरी/ मुलांचे डायपर्स ठेवली आणि ती आयत्या वेळा एयर लाइनच्या कृपेने राहिली तर मग? म्हणुन ही काळजी . ( मीना प्रभुंच्या "दक्षिण रंग" मधे असे अनुभव दिलेले आहेत)

लोकहो.. प्रवासाच्या सूचना लिहायच्या आधी प्रवासाचा प्रकार पण लिहा प्लीज. थंड हवामानातला विमान प्रवास, कोकणातला रेल्वे प्रवास इत्यादी.. Happy

आपण मोठ्या ट्रिप्सना जातो तेव्हा सलग सगळे दिवस एकाच ठिकाणी रहात नाही त्यामुळे कपडे धुणे, वाळवणे हे होत नाही. देशात परदेशासारखी लॉण्डरमॉट्स नसतात त्यामुळेटाकली नाणी निघाले कपडे धुवून आणि वाळून हे ही शक्य नसते.
इकडे तिकडे पताका लटकवत बसण्यापेक्षा जे धुवावेच लागतात असे जरूरीचे कपडे जास्त संख्येने बरोबर घ्यावेत. दिवसागणिक मोजून घेतले तर फारच उत्तम. त्यापायी एखादी कमी गरजेची वस्तू टाळावी लागली तरी हरकत नाही.

एक टिप.. बाहेरचे कपडे धुणे शक्य नसेल (उदाहरणार्थ जाद फेरन किंवा तत्सम गरम कपडे) आणि कपड्याला वास येत असेल तर एखादी चीप व्होडका आणि पाणी समप्रमाणात मिसळून त्याचा स्प्रे वास येणार्‍या जागेवर रात्री मारावा आणि रात्रभर हवेशीर जागी टांगून ठेवावे. अल्कोहोल उडून जाते त्याबरोबर वास पण बर्‍यापैकी उडून जातो.

माझ्या सूचना कोणत्याही प्रवासाला सुट होतिल.... कारण बॅग हरवणे/रहाणे हे कुठेही होवु शकते. हँड बॅग हा इतर वेळी पर्स्/सॅक असा अर्थ घ्यावा. कारण आपण जरी गाडीने जात असलो किंवा रेल्वेने जात असलो तरी मोठ्या बॅगा उघडायला नकोन छोट्या वस्तुंसाठी.

परत येताना, जस जसे आपण कपडे वापरत जाउ तसे तसे बॅगा री पॅक कराव्यात. वापरलेल्या वस्तू / कपडे जे परत कधीच लागणार नाहीत, खरेदी, अश्या गोष्टी एकाच बॅगेत पॅक कराव्यात. साधारण ट्रिप्च्या मध्या वर अशी बॅग री पॅक करावी. म्हणजे मग परत परत ती बॅग उघडायचा व्याप नको.

अजुन एक... जर खुप खरेदीच्या ठीकाणी जात असु उदा. जयपूर, राजस्थान, दिल्ली, तर एखादी पातळ फोल्डींगची बॅग, बरोबर नक्की ठेवावी. ही खरेदी भरायला...

विमान प्रवासा साठी लाइट पण व्हील वाल्या बॅगा मस्ट...

जर दिवसांप्रमाणे कपडे मोजून नेलेले असले आणि कधी काय घालायचं याचा प्लॅन तयार असला तर शेवटच्या दिवशी लागणारा सगळ्यात खाली आणि पहिल्या दिवशी लागणारा सगळ्यात वर अशी रचना करावी बॅगेत. जेणेकरून लगेच रिपॅकला वेळ मिळाला नाही समजा तरी सगळी बॅग उस्कडावी लागत नाही आणि कपड्यांच्या इस्त्र्या जशाच्या तश्या रहातात.

घालून झालेले कपडे रिपॅक करताना कॅरिबॅगमधे करावेत. फिरताना कपड्याला लागलेली माती, घामाचे वास हे सगळं स्वच्छ कपड्यांना लागत नाही.

री पॅक... >>> +१
सेम पिंच फॉर्म मी अ‍ॅज वेल.

वापरलेल्या वस्तू / कपडे जे परत कधीच लागणार नाहीत, खरेदी, अश्या गोष्टी एकाच बॅगेत पॅक कराव्यात. >> +१

थंडीच्या ठिकाणी जास्त दिवसांच्या टूरवर जाणार असू तर फोल्डिंग ची लहानशी इस्त्री मिळते, ती कॅरी करावी. कारण लहान मुले सोबत असतील तर काही कपडे (शी-शू चे, ओकारी चे etc) धुवावे लागतातच आणि मग ते ओले कपडे थंड हवामानात वाळता वाळत नाहीत. त्या दृष्टीने कपड्यांचा साबण व ब्रशही आठवणीने सामानात ठेवावा.

वन टाइम यूजची डिस्पोजेबल अंडरगार्मेंट्सही मिळतात.

विमानप्रवासात द्रवरूप काहीही जवळ चालत नाही ही भीती असल्याने पर्स मधली सॅनिटायझरची बाटली फेकायला लावली होती ते आठवले.
साडी कव्हर टाइपच्या आयताकृती सुटसुटीत कापडी कंटेनर्समध्ये कपडे वर्गीकरण करून घातल्यास खूपच व्यवस्थित प्रवास होतो. अर्थात वाळल्यावरही या कपड्यानी आपापल्या कव्हरमध्येच परतावे.

एरवी काहीजण या यादीत 'चपलांना मारायचे खिळे, सुईदोरा ' अशा वस्तूंचाही अंतर्भाव करतात.. Happy अटिट्यूड बाबा, अटिट्यूड.

माझा एक अनुभवः अमेरिकेतून प्रथमच भारतात गेलेले. महिना मस्त हुंदडून काढला. निघायचा दिवस जवळ आला. कधी निघणार या प्रश्नाला मी मस्तपैकी १५ चं परतीचं तिकीट आहे असं उत्तर देत होते. वास्तविक १५ चं तिकिट म्हणजे १५ ला पहाटे १ चं विमान होतं. त्यामुळे १४ रात्री विमानतळावर जाणं अपेक्षित. मी आपली १४ तारखेला बसल्ये सर्वांना सांगत - उद्या निघणार म्हणून. १४ तारखेला संध्याकाळी ६ वा. च्या सुमारास सहज म्ह्णून मी तिकीट बघायला कॉम्पुटर लावला नी लक्षात आलं एकदम १५ पहाटे १ चं विमान म्हणजे आपण आज रात्री १० वाजेपर्यन्त विमानतळावर जायला हवं...हे लक्षात आलं नी मग काय? नुस्ती धावाधाव. वडीलांना सांगितला गोंधळ. मग काय सर्वांची धांदल. आई तर घाबरूनच गेली आता कसं काय होणार म्हणून! गडबडीने २ तासात बॅगा भरून, काहीतरी तोंडात कोंबून ८ वाजता घरून निघालो. हुश्श! पोहोचले बुवा विमानतळावर १० वाजता.
अमेरिकेला पोहोचल्यावर आईला फोन केला तर, ती म्हणे - अगं तू गेलीस नी इथे काल सर्वांचे फोन तुला बाय बाय करायला. नी मी प्रत्येकाला सांगत्ये ती कालच गेली. यावर सर्वांची प्रतिक्रिया - अरेच्या, आम्हाला वाटलं, आज रात्री निघणार्...मग आई आपली प्रत्येकाला स्पष्टीकरण देत्ये नी सगळे हसतायत!
त्यानंतर प्रत्येक वेळी भारतात गेले की सर्वजण पहिले सांगतात - बाई, तुझं परतीचं विमान कधीचं आहे ते नीट बघ बुवा! नी भरपूर हसून घेतात....

तस्मात, प्रवासाच्या बरेच दिवस आधी आपली तिकीटे तपासून तारीख/वेळ नक्की बघून घ्यावी.

रायगड, ही आमची स्टोरी तर नाही ना? Wink
नशिबाने पहिल्यांदाच आमच्या बॅगा भरुन तयार होत्या त्यामुळे आज रात्रीचं फ्लाईट म्हटल्यावर फक्त बरोबर न्यायचं सामान आणायची गडबड उडाली.

डिपार्टिंग टाइम मध्यरात्रीचा असल्यास तारीख नक्की आजची की उद्याची ते बघणे>>> +१. कोकणकन्या एक्स्प्रेस रात्री बारा पाचला पनवेलला यायची. एक दोनदा २४ तास उशीरा ट्रेनमधे चढलेय >>>>++११११११११

आम्हि तर मग खाजगी बसने गेलो जास्त पैसे देउन... उशिर झाला तो वेगळा....

परदेशात जाताना, तिथले कस्टम्सचे नियम नीट बघून घ्यावेत.
दुबई / सिंगापूरला जाताना सामानात खसखस असू नये. ऑस्ट्रेलिया / न्यू झीलंड / फिजी ला जाताना सामानात कुठलाही खाद्यपदार्थ / बिया असू नयेत. बियांच्या बाबतीत अनेक देश संवेदनशील आहेत. काही देशांत पेहरावावर पण निर्बंध असतात.
काही देशांत बूटांना माती लागलेली असलेली चालत नाही. तिथे जाताना नवे बूट घालूनच जावे.

नेहमी लागणारी औषधे जवळ असावीतच पण काही खास प्रसंगी लागणारी औषधे, डॉक्टरकडून लिहून घ्यावीत.

मुंबईला एअरलाईनचा चेक-इन स्टाफ प्रत्येक प्रवाश्याला, हँड बॅगेत द्रवपदार्थ / टोकेरी पदार्थ नाहीत ना, याची
आठवण करुन देतो, तरीही सिक्यूरीटी चेक जवळ मी अशा वस्तूंचा ढीग नेहमीच बघतो. ( त्याचे पुढे काय होते ?) याशिवाय मोठमोठ्या तेलाच्या / शांपूच्या बाटल्या. मोहरीच्या तेलाचे पॅक्स ( हो ) असतातच. चेक्ड इन बॅगेजमधे या वस्तू ठेवण्यावर बंधने नाहीत, त्यामूळे त्या केबिन लगेजमधे का ठेवतात लोक ?
प्यायचे पाणी केवळ सिक्यूरिटी चेक पर्यंत लागेल तेवढेच असावे ( खरे तर सगळीकडे आता पिण्याच्या पाण्याची सोय आहे. ) विमान प्रवासात हवे तेवढे पाणी मुद्दाम मागून घ्यावे. विमान प्रवासात जास्तीत जास्त पाणी प्यायला हवे. काही देशांत मात्र इमिग्रेशनसाठी मोठी लाईन असते. विमानातून उतरल्यावर घसा
कोरडा पडायची शक्यता असते. त्यासाठी मात्र विमानात किंवा विमानतळावरच ( सिक्यूरिटी चेक नंतर ) एक
पाण्याची छोटी बाटली घ्यावीच.

काही देशांत कमरेचे पट्टे ( उदा. दुबई ), फार धातूकाम असलेले बूट, सिक्यूरिटी चेकसाठी काढावे लागतात. त्यापेक्षा ते न घातले तर बरे. विमानात झोपताना घट्ट पट्टा काचतो. आताशा लांबच्या प्रवासात, बहुतेक जण कॅज्यूअल कपडेच घालतात. भारी साड्या / ड्रेसेस घालून लांबचा प्रवास अजिबात सुखकर होत नाही.

जेट लॅग होणार असेल किंवा देशातही दिवसाचा प्रवास असेल तर डोळ्यावर लावायचा पट्टा असावा. त्याने उजेडातही झोप घेता येते. मानेभोवती गुंडाळायची ट्रॅव्हल पिलो पण मिळते.

भारतीय पद्धतीचे प्लग्ज अनेक देशांत चालत नाहीत, त्यासाठी ट्रॅव्हल अडाप्टर असलेला बरा. या सर्व वस्तू
विमानतळावर महाग मिळतात.

कोकणकन्या एक्स्प्रेस रात्री बारा पाचला पनवेलला यायची. एक दोनदा २४ तास उशीरा ट्रेनमधे चढलेय >> सृष्टी, मीपण. टीसीने बर्‍याचदा जागा अ‍ॅडजस्ट करून दिल्या. नंतर नंतर सीएसटीवरूनच तिकीट बूक करायचे. Happy

Pages