मेथी बाटी-

Submitted by पिन्कि ८० on 11 January, 2013 - 08:00

साहित्य-
मेथीची जुडी- 2
लाल तिखट- आवडीनुसार
गरम मसाला – आवडीनुसार (मी ½ चमचा घेतला)
हळद- ½ चमचा
बाटी साठीचे साहित्य-
गव्हाचे पीठ- 2 वाट्या
रवा- ¾ वाट्या
थोडे तीळ
ओवा
मीठ- चवीनुसार
कृती-
प्रथम बाटी साठी पीठ भिजवून घ्यावे. गव्हाचे पीठ + रवा + तीळ + ओवा + मीठ असे सर्व (असल्यास चमचाभर दही) चांगले घट्ट भिजवून घ्यावे(डाल-बाटीच्या बाटीप्रमाणे). हाताने गोल गोल बाटी तयार करून घ्याव्यात.
आता पसरत पॅनमध्ये थोड्या जास्त तेल तापवून घ्यावे. फोडणी करून (हिंग ही घालावा) लगेच हळद, लाल तिखट, मसाला घालावा. मेथी घालावी. 2 मिनिटानंतर त्यात बाटी रचून ठेवावी. असल्यास कोथ्म्बीर ही घालावी. पाणी असलेले ताट वरती ठेवावे व 10 मिनिट शिजू दयावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

1795716_595179500558408_445284921_n_0.jpg

533364_469770076370318_1436838883_n.jpg