जय देव जय देव जय जय गणराया..

27427184.jpg

जय देव जय देव जय जय गणराया
आरती ओवाळीतो वंदूनी तव पाया
जय देव जय देव ||धृ०||

कार्यारंभी तुजला पूजिती जन सारे
विघ्नांतक विघ्नेश्वर प्रार्थती तुजला रे
संकट निवारोनी शुभ शांती द्या या .. ||१||

लाडू मोदक पक्वान्ने तुजला प्यारी
तंदुल तनु मोहक उंदरावर स्वारी
गणपती बाप्पा रिद्धी सिद्धीच्या राया.. ||२||

परशू हाती शोभे ध्यान वक्रतुंड
सिंदुरवदना सुंदर रुळताहे शुंड
अशीच स्फूर्ती राहो किर्ती तव गाया.. ||३||