God's got him !! its all over.. Tony Greg :( :(

Submitted by श्रीयू on 31 December, 2012 - 16:21

जेवणात मीठ नसेल तर कस होईल?? किंवा एखाद्या गाण्यात हवा हवासा तबल्याचा ठेकाच नसला तर? किंवा आवडत्या भेळेत नेमकी खजूर चिंचेची चटणीच नसेल तर कसं वाटेल?
TV वर match बघताना सचिन किंवा लारा किंवा सौरव यांनी मारलेल्या उत्तुंग षटकारावर
He hit that high in the air.. oh thats a bigie !! असं रोमांचित करणारा चीरकणारा आवाजच नाही आला तर? किंवा वासिम अक्रम च्या सुंदर in swinger वर कुणी out झाल्यावर oh beautifully bowled ,wonderfully bowled अस कुणी ओरडलच नाही तर?
Oh great shot, beautiful shot wonderful shot..
What a shot.. what a player !! अस कुणी खास शैलीत म्हणालच नाही तर कस वाटेल ती match बघताना?
पण आता हे सगळ खर होणार आहे. समोर सुरु असलेल्या सामन्यात समरसून आपल्या खास चिरक्या आणि रोमांचित करणाऱ्या आवाजाने लक्षावधी चाहत्यांना क्रिकेट सामना याची डोळा बघितल्याचं समाधान मिळवून देणारा, क्रिकेट आणि क्रिकेटपटूने मारलेल्या प्रत्येक सुंदर shot वर किंवा टाकलेल्या प्रत्येक सुंदर ball वर मनापासून प्रेम करणारा आणि मुख्य म्हणजे क्रिकेट बघणाऱ्या प्रत्येकाशी आपल्या उत्स्फूर्त ,चटकदार सामालोचनाने त्या खेळाडून इतकच जवळचं नातं असलेल्या टोनी ग्रेग यांचं निधन झालय Sad Sad
विश्वासच बसत नाहीये..
क्रिकेट खेळ आवडायचाच पण ती आवड शतपटीने वाढवली ती टोनी च्या सामालोचानाने..
सचिन,मार्क,लारा यांचा प्रत्येक shot आवडायचाच पण त्या shot ची लज्जत वाढवली टोनी ने दिलेल्या चटकदार दादेमुळे..
क्रिकेट matches थरारक होत्याच पण तो थरार,ते थ्रील हजारो किमी दूर असून देखील अनुभवता आलं ते टोनीच्या जिवंत करणाऱ्या शैलीदार चित्कारांनी.
क्रिकेट ची उत्कृष्ट जाण, दिलदार आणि मोकळा स्वभाव,सामान्यांना भावेल असं सोपं समालोचन आणि समोर पडणाऱ्या प्रत्येक चेंडूत अगदी समरसून जाऊन त्याचा पुरेपूर आनंद उपभोगणे आणि तो आनंद आपल्या खास आवाजात हजरो मैल दूर आपल्या प्रेक्षकांमध्ये वाटणे हे त्यांच खास वैशिठ्य.
जसे ते त्यांच्या शैलीदार सामालोचासाठी प्रसिद्ध होते तसेच खेळाडू म्हणूनही.
उत्स्फूर्तता हे त्यांच्या जीवनातील गमक असावं. म्हणूनच समालोचक म्हणून खेळाडूने मारलेल्या shot वर दाद देणं असू दे किंवा विश्वनाथ च शतक झाल्यावर त्याला उत्स्फुर्तपणे कडेवर
उचलून घेणं असू दे त्यांचं उत्स्फूर्त वागणं चाहत्यांना नेहेमीच आवडलं.
क्रिकेट बघताना कितीतरी सुवर्ण क्षण अनुभवले पण हे सुवर्ण क्षण टोनी च्या सुंदर समालोचानाने आमच्या मर्म बंधातल्या ठेवी झाल्या आहेत. ते shots,ते balls आणि टोनी चा आवाज हे वेगळे होऊच शकत नाहीत.
आमचं क्रिकेट वेड सचिन,मार्क लारा,स्टीव,सौरव राहुल यांच्या batting वर वाढलं असेल ,शेन च्या फिरकीवर आणि wasim donald,mcgrath यांच्या बोलिंग वर बहरलं असेल
स्टीव,taylor,cronje यांच्या थंड व्यावसयिक नेतृत्वावर फिदा असेल पण टोनी ग्रेग,बिल लॉरी यांच्या रोमांचित करणाऱ्या सामालोचनाने त्या वेडाला कायम तरुण ठेवलं.
कधी वाटलं होतं सचिन,सौरव,स्टीव,मार्क,शेन ,ब्रायन,डोनाल्ड वासिम यांच्या शिवाय अळणी क्रिकेट बघावं लागेल ? आणि केव्हा वाटलं होतं टोनी शिवायही commentry ऐकावी लागेल???
What a comentry, what a cricketer,what a man..
yes.. God's got him !! o dear.. oh dear.. God's got him..
its all over!! Sad Sad Sad

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखातील विचारांशी पूर्ण सहमती.

टोनी ग्रेग....भारतात सर्वप्रथम 'फलंदाज' म्हणून आल्यावर इथल्या क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईतच तो बनला...अशासाठी की, तो पहिला असा फलंदाज बघायला मिळाला जो आपली बॅट जमिनीवर न टेकविता गोलंदाजीचा सामना करीत असे. दुसरी गोष्ट म्हणजे मैदानावरील त्याचे सदैव हसरे मुख वावरणे. कितीही तणावाचे वातावरण असले तरीही हा पठ्ठ्या सदैव आपल्या वर्तनाने फुलझड्या पेटवायचा. संध्याकाळी पॅव्हेलियनमध्ये परतल्यावर मग पत्रकार असोत वा नित्याचे सर्वसामान्य प्रेक्षक असोत, त्यानाही तो हसमुखानेच सामोरे जात असे. आपण म्हणजे कुणी तरी आकाशातील अप्राप्य असा तारा आहोत असा कधीही त्याने आव आणला नाही.

पॅकरच्या WSC च्या दरम्यान त्याने नाही म्हटले तरी बर्‍याच सेक्शनचा रोष पत्करला होता....पण त्यातूनही तो सहीसलामत बाहेर पडला आणि क्रिकेटची लोकप्रियता आणखीन् वाढविण्यास त्याने सक्रिय योगदान दिले.

मे गॉड कीप हिज सोल रेस्ट इन पीस !

अशोक पाटील

@ अशोकजी : खरच..तुम्ही जुन्या जाणत्या क्रिकेट प्रेमींकडून टोनी चे बरेच किस्से ऐकले असतील . सुनील गावस्कर च्या Suny Days मध्ये असाच एक छान किस्सा आहे. बहुदा world XI वि. Australia सामान्याच्या वेळेस चा. सुनील गावस्कर नि खूप छान लिहिला आहे. या टोनी महाशयांनी साक्षात' सर ब्रॅडमन (ते ब्रॅडमन आहे हे त्याला माहितीच नव्हते) यांनाच विचारले होते तुम्ही कधी क्रिकेट खेळले आहात का? Happy Happy

टोनी ग्रेग यांना श्रद्धांजली.
तुम्ही खुप छान लेख लिहीलाय.

शारजात सचिनने एका ऑसि बोलरला षटकार ठोकल्यावर " oh what a shot , what a wonderful shot and he is half his size. " अशी उत्स्फुर्त कॉमेंट होती टोनीची. कधी कधी गावस्करांना पण टोनीचा मिश्किल गुगली कळायचा नाही.
भाततात आपल्याला ३-१ नी हरवायचा पराक्रम केला होता टोनीच्या टीमने.

यु ट्युब वर विक्रम साठे ने केलेली टोनीची नक्कल मस्त आहे.

खरच छान लिहिलय .
मधे SA Aus टेस्ट सिरीज मधे तो येऊ शकला नव्हता , त्यावेळी त्याच्या घरून तो म्हणाला होता की यावर मात करून तो पुन्हा Commentary Box मधे येईल . दुर्दैव Sad

शारजातल्या सचिनच्या सिक्सर्सना "ओह बॉय, ओह बॉय..." असे म्हणून पुढे बोलणारा टोनी ग्रेग Happy लहानपणी काय बोलायचा ते कळायचं नाही, तरी त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न असायचा... श्रद्धांजली Sad

श्रद्धांजली....

सौरव गांगुली विषयी - On the off side there is only Saurav Ganguli after God , अशी कॉमेंट देणारा टोनी ग्रेग होता की बॉयकॉट ?

कितीही मिश्किल आणि "हॅपी गो लकी काईंड" खेळाडू असला तरीही खेळाचे नियम त्याला पक्के माहीत होते....आणि त्याच्या अंमलबजावणीमुळे इंग्लंडचा वेस्ट इंडिज दौरा जवळपास रद्द होण्याच्या स्थितीत आला होता.

साल १९७४....मैदान 'ओव्हल' त्रिनिदाद. फलंदाज आल्विन कालिचरण, खेळतोय १४२ धावावर....दिवसातील शेवटची ओव्हर चालू आहे...बर्नार्ड ज्युलिअनला शेवटचा बॉल...कालिचरण नॉन-स्ट्रायकर एन्डला. ज्युलियनने तो बॉल तटविला...घरंगळत गेला नॉन-स्ट्रायकर झोनच्या आसपास फिल्डिंग करत असलेल्या टोनी ग्रेगकडे....दिवसाचा खेळ संपला म्हणून ज्युलिअन तंबूकडे परतला...अन् त्यापाठोपाठ कालिचरणही....पण तितक्यात ग्रेगने आपण अडविलेला तो चेंडू घेऊन विकेटसवर फेकला आणि 'हाऊज दॅट ?" असे कालीचरणसाठी 'धावचित' चे अपील केले. सारे खेळाडू तर स्तब्धच...मैदानही स्तब्ध....पंच डग्लस सॅन्ग यानी क्षणभर विचार केला आणि ग्रेगचे अपील उचलून धरले आणि कालिचरणला धावबाद जाहीर केले.....कारण खेळातील नियम असा सांगतो की जोपर्यंत अंपायर विकेटवरील बेल्स उचलून 'आजचा खेळ संपला' असे जाहीर करीत नाहीत तोपर्यंत खेळ 'जिवंत' अवस्थेत मानला जातो. त्याला अनुसरूनच ग्रेगने ती संधी साधली होती. त्याचे ते करणे कदाचित खेळाच्या नीतिमत्तेच्या व्याख्येत...Fair Play... बसत नसेलही पण नियमात जरूर होते.

कालिचरणनेही काही तक्रार केली नाही.... पण आपल्या लाडक्या शतकवीराच्या खेळीचा असा 'अपमानस्पद' शेवट त्रिनिदाद मैदानातील वेस्ट इंडिजच्या प्रेक्षकांना कसा पटेल ? मग त्यानी जी ग्रेगविरुद्ध मैदानात जी हुल्लडबाजी केली ती पाहता दुसर्‍या दिवशी खेळ होणार नाही याची व्यवस्थापनाला तसेच पोलिसांना पुरेपूर खात्री पटली.

रात्रभर मैदानात ठिय्याच मारला होता प्रेक्षकांनी....टोनी ग्रेग आणि एकूणच इंग्लंडच्या संघाविरुद्ध नारेबाजी चालू होती. शेवटी दोन्ही संघाचे कप्तान आणि व्यवस्थापन मंडळ हॉटेलमध्ये जमले, लंडनहून एमसीसीच्या अधिकारी पथकांशीही चर्चा झाली आणि खेळ तसेच उर्वरित दौरा निर्धोकपणे चालू राहावा म्हणून ग्रेगने 'ती धावबादची कृती केलेली नाही' असे मानण्यात येऊन कालीचरणला 'नाबाद' ठरविण्यात आले आणि मध्यरात्रीच तशी बॅनर्स मैदानात लावण्यात आली....त्यानंतर प्रेक्षक आपल्या घरी परतले हा इतिहास.

यातील विरोधाभास असा की जो कालिचरण १४२ धावावर "नाबाद" होता तो दुसर्‍या दिवशी १५८ वर खर्‍या अर्थाने बाद झाला. उरलेल्या दौर्‍यात टोनी ग्रेग म्हणजे वेस्ट इंडिजसाठी 'खलनायक' मानला गेला...पण ग्रेगने केलेले कृत्य नियमबाह्य नसल्याने इंग्लंडने त्याच्यावर कसलीही कारवाई केली नाही.

अशोक पाटील

>>क्रिकेट matches थरारक होत्याच पण तो थरार,ते थ्रील हजारो किमी दूर असून देखील अनुभवता आलं ते टोनीच्या जिवंत करणाऱ्या शैलीदार चित्कारांनी.

अगदी....!
श्रध्दांजली..

अशोकजी: छान किस्सा सांगितलात.. धन्यवाद !!.
@विप्रा: सौरव बद्दल हे विधान Geoff Boycott चे. Boycott तसे English धर्जीणेच पण सौरव बद्दल मात्र त्यांना विशेष आपुलकी. Geoff Boycott म्हणजे एक वेगळेच रसायन आहे.

अरेरे.. खरच वाइट वाटले ही बातमी वाचुन्..त्याने विश्वनाथला कडेवर उचलुन घेतल्याचे मलाही आठवते.
तसेच सिलिपॉइंटला उभे राहुन बेडरपणाने क्षेत्ररक्षण करतानाही तो आठवतो. बाकी त्याच्या टीव्ही समालोचनाबद्दल वर लिहीले आहेच.. एक स्वतःची वेगळीच शैली होती त्याची. ६७ म्हणजे अकालीच गेला तो..:(

आणी आत्ताच बातमी कळली की बीबीसी टेस्ट मॅच स्पेशलचा एक दिर्घकालीन रेडिओ समालोचक ख्रिस्तोफर मार्टिन जेन्किन्सही आज निधन पावला... :(. मी लहान असताना शॉर्ट वेव्ह रेडिओवर बीबीसी चे समालोचन कान देउन ऐकायचो, १९७१ ला इंग्लंडला ओव्हलवर जेव्हा अबिद अलीने चौकार मारला व भारताने इंग्लंडला इंग्लंडमधे प्रथमच हरवले तेव्हापासुन ते आजपर्यंत मी बीबीसी टेस्ट मॅच स्पेशलचे धावते समालोचन जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा ऐकतो. १९७१ ला जॉन आर्लॉट, ब्रायन जॉन्स्टन व हेन्री ब्लोफिल्ड समालोचन करायचे व त्याच सुमारास त्या दिग्गजांबरोबर तरुण ख्रिस्तोफर मर्टिन जेन्किन्सने आपली कारकिर्द्र सुरु केली.. १९८० ला जॉन आर्लॉटची पोएटिक समालोचनाची कारकिर्द्र संपल्यावर ख्रिस्तोफर मर्टिन जेन्किन्स हा टेस्ट मॅच स्पेशलचा एक अविभाज्य भाग बनला.. १९९० मधे ब्रायन जॉन्स्टनच्या निधनानंतर याने, हेन्री ब्लोफिल्ड व जॉनाथन अ‍ॅग्न्युने जॉन आर्लॉट व ब्रायन जॉस्टनने सुरु केलेल्या टेस्ट मॅच स्पेशलचा दर्जा तसाच कायम राखला.

आता बीबीसी टेस्ट मॅच स्पेशल वर क्रिकेट समालोचन ऐकताना कसेसेच वाटेल...:(

एकापाठोपाठ एक असे २ खंदे क्रिकेट समालोचक २ दिवसांच्या अंतराने निधन पावल्याने जगभरच्या क्रिकेट समालोचक चाहत्यांना खरच खुप वाइट वाटत आहे .... ईश्वर या दोघांच्या आत्म्यांना शांती देवो...:(

टोनीचा स्वभाव आणि त्याचे सदाबहार समालोच सामना पहाणार्‍यास गुंतवून ठेवायचे. शारजात मायकेल कॅस्प्रोविचला साईडस्क्रिनवर फेकून दिल्यावर टोनीने दिलेली उस्फुर्त प्रतिक्रिया सगळ्याच क्रिकेट शौकिनांनाच्या मर्मबंधात जतन झाली आहे.

श्रद्धांजली...