च - च - च - च - च

पार्ले बाफवर शोनुने आज सांगितले- आपणच आपल्याला घातलेल्या सीमांबद्दल विचार करावा अन एकाचं तरी लंघन करावं. ह्यावर खूप म्हणजे खूप विचार केल्यावर मला असे जाणवले की कविता-बिविता माझा प्रांत नाही अशी जी मी माझ्या प्रतिभेला सीमा घातली आहे तिचे लंघन करायची हीच वेळ आहे. लगेच एक कविता पाडली सुद्धा. पहिलाच प्रयत्न आहे, समजून घ्या-

चकळेन चणालाहीको,
चळतातव चब्दश चसेऐ
चण्हतीक चदनाहीवे,
चषयाचीवि चही चरजग चहीना
चता चथा चथै चय्या !!!!

(च च्या भाषेची एक गम्मत नवर्‍याला सांगत असताना ही कल्पना सुचली. कृपया हलकेच घ्यावे)


चस्तम चगदीअ!!! हाहा



हल्ली काम बरच कमी दिसतय.. फिदीफिदी

पण भारी प्रयत्न बर्का.. हाहा



वा! एकदम झकास कविता स्मित



हल्ली काम बरच कमी दिसतय >>>> आज एका विचारमंथन कार्यक्रमात टाकली ही कविता डोळा मारा



सगळच पोस्ट च च्या भाषेत लिहायचस डोळा मारा
मजा आली वाचुन!! स्मित



कायच्या काय करायचं स्वतः अन नाव मात्र माझ्या पोस्टचं हां! हे काही बरोबर नव्हे स्मित



जबरीच हाहा
लंघन केलेस, आता तुझे औक्षवण करावे लागेल मग स्मित



चकदमए चंडूफ स्मित
नवर्‍याबरोबर विचारमंथन ? अ ओ, आता काय करायचं



नवर्‍याबरोबर विचारमंथन >>>> हा विनोद आहे ? त्याच्याशी बोलताना कल्पना सुचली, विचारमंथनात झोपा काढण्यापेक्षा काहीतरी productive करावे म्हणून कविता लिहिली डोळा मारा

सर्वांचे प्रतिसाद वाचुन मला हुरुप आला आहे (ऍडमिन आता माझे रंगीबेरंगी पान काढुन घेतील बहुतेक डोळा मारा )



चटलियेसु चकदमए डोळा मारा



मस्तच!
मी आजच माझी सिग्नेचर लाइन बदलली.स्मित
हा चगायोगयोच म्हणायचा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
चम्हांलातु चगतोसां चमी चकए चष्टगो...स्मित



लंघन नाही ते सीमा उल्लंघन असते.
उल्लंघन मात्र साध्य झाले आहे या नव कवितेद्वारा... स्मित



चस्तम चंड्रेलासी.... स्मित



हा हा हा < हसत गडाबडा लोळणारा स्माईली >

दे अशीच देणगी प्रतिभेची
व सुबुद्धीही दे की
निरनिराळया भकास विषयांवर किंवा
ना कुठल्याच विषयावर
दरवळु दे काव्यगंध, शक्यतो अनिर्बंध !!!!



हाहा चमेनआ!!!



शिंडे, याला आता काय म्हणावं?
न(व)कविता
नव(ल)कविता
च(व)कविता
न(व)च(व)कविता
च(ळवळ)कविता
च(वीला)कविता
च(वचाल)कविता
वा(चाळ)कविता
च-विताक
वचवच-कविता
चाव-कविता
काव-कविता
च्च्कविता
हुच्चकविता
हुश्शकविता
हुश्श...!!
फिदीफिदी
--
आठवांच्या पारूंबीला, बांधू एक झुला गं..
माझा झुला तुला घे, तुझा झुला मला!!



हाहा चहीचस !!



साजिर्‍या, हाहा हाहा
तुझ्यातल्या नवकवीला पण धुमारे फुटले म्हणायचे!!! डोळा मारा



>>धुमारे फुटले म्हणायचे!!!

धुमारे कसले, पारुंब्या म्हण!! हाहा



हाहा हाहा



आफताब, बरोबर आहे तुमचे.

GS, तुही मस्त पाडली आहे. "दरवळु दे काव्यगंध, शक्यतो अनिर्बंध" विषेश आवडले. माझ्यातर्फे १० गुण डोळा मारा

साजिर्‍या, मस्तच हहपुवा स्मित

बाकी सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद स्मित



हेहे ... स्मित
संदीप खरेचं 'चमालातु चंगतोसा' आठवलं.

परागकण



चंड्रेलासि चवीदे
चपणआ चशीअ चविताक चरूनक चवीनन चयंडापा चडलापा चहेआ.

नवीन मायबोलीवरची म्हणे 'बोलणे सोपे टायपणे कठीण'..
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home



"म्हाई हलान सअताना केअ षाभा लोबत सऊ. हबुकेत णुकालाच हाकीच ळकायचे हानी. गम ळाशेत राफच जम्मा यायची. मी णाई झामी केअ त्रैम्मिण म्हाई घोदी ही षाभा लोबायचो. इमी याक हिलिले णुकाला ळकले का? या षाभेतले केअ णागे ---
किंजू विंका रमू किंजू विंका रमू
णामुसकीच्या त्रशूगंसे धुय्य माउचे रुसू
किंजू विंका रमू किंजू विंका रमू ''
च च्या भाषेवरील मौलिक चर्चा वाचून मला लहानपणी आम्ही एक भाषा बोलत असू त्याची आठवण झाली.
वरील इन्व्हर्टेड कॉमामधील ओळींचे भाषांतर कोण करेल?



आम्ही लहान असताना एक भाषा बोलत असू. बहुतेक कुणालाच काहीच कळायचे नाही
मग शाळेत फारच मज्जा यायची. मी आणि माझी एक मैत्रिण आम्ही दोघी ही भाषा बोलायचो. मी काय लिहीले कुणाला कळले का? या भाषेतले एक गाणे...

जिंकू किंवा मरू
माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरू
जिंकू किंवा मरू

जीएस तुला धा पैकी धा.
~~~~~~~~~
~~~~~~~~~
स्मित



पहिले अक्षर आणि दुसरे अक्षर यांच्या क्रमाची आणि वेलांटी/ऊकाराची अदलाबदल करायची आहे स्मित



"म्हाई हलान सअताना केअ षाभा लोबत सऊ. हबुकेत णुकालाच हाकीच ळकायचे हानी. गम ळाशेत राफच जम्मा यायची. मी णाई झामी केअ त्रैम्मिण म्हाई घोदी ही षाभा लोबायचो. इमी याक हिलिले णुकाला ळकले का? या षाभेतले केअ णागे ---
किंजू विंका रमू किंजू विंका रमू
णामुसकीच्या त्रशूगंसे धुय्य माउचे रुसू
किंजू विंका रमू किंजू विंका रमू ''

आम्ही लहान असताना एक भाषा बोलत असू. बहुतेक कुणालाच काहीच कळायचे नाही. मग शाळेत फारच मज्जा यायची मी आणि माझी मैतीण आम्ही दोधी ही भाषा बोलायचो. मी काय लिहिले कुणाला कळले का? या भाषेतले एक गाणे-

जिंकू किंवा मरु जिंकू किंवा मरु
माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरु
जिंकू किंवा मरु जिंकू किंवा मरु

स्मित



आयटे, आम्ही अजुन सुद्धा घरी ही भाषा बोलतो.. उलटी... स्मित



आय टी गर्ल , मीनू
छान वाटलं बर्‍याच जणांना ही भाषा माहिती आहे.



लय भारी..
"च" कवितांची कार्यशाळा कधी उघडताय..? स्मित
का.शा.: हलके घ्या हो. स्मित



आम्ही अजुन एक भाषा बोलायचो.

कापमाल तुपमु कुपमुठे गेपमेला होपमोतास ? म्हणजे काल तु कुठे गेला होतास ?

वाक्यातल्या प्रत्येक शब्दातल्या पहिल्या अक्षरा नंतर 'प' लावायचा पहिल्या अक्षराचा काना मात्रा वेलांटी जे काही असेल ते त्या नंतर 'म' ला लावायचे. पुढची अक्षरे मात्र न बदलता वापरायची.
उ.दा. रामायण = रापमारायण.
नंतर = नपमंतर.
कदाचित = कपमदाचित.

बपमघा तुपमुम्हाला बोपमोलायला जपममते कापमाय ? खुपमुप सोपमोपी आपमाहे हीपमी भापमाषा.



मपमला पपमण येपमेते हिपमी भापमाषा स्मित



हिपमी येते आपमाणी हिरफी परफण येरफेते भारफाषा

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home



वी मुंड हिडप्या वाषा मुंड भाडप्या वेते मुंड येडप्या वामुंड काडप्या वुम्हाला मुंड तुडप्या? स्मित

~~~~~~~~~
दक्षिणा...... स्मित
~~~~~~~~~



या भाषेत शिव्याच नसतील. आणि शिव्यांची लाखोली वाहणं कित्ती सोप्पं. ही ही ही स्मित
ह घेणे
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home



सॉरी सॉरी मायबोली समजुन मी चुकुन भलतीकडेच घुसले.....



खो खो



वी मुंड हिडप्या वाषा मुंड भाडप्या वेते मुंड येडप्या वामुंड काडप्या वुम्हाला मुंड तुडप्या?>> हाहा



देपमेवा आपमाता नपमविन कपमविता ऐपमकायला लापमागणार... तेपमवधच नपमविन कापमही, पपमण मपमज्जा येपमईल.. हाहा



अज्जुके, शिव्यांचि लाखोली काय???
शाळेत असले उद्योग लागतातच. स्मित

~~~~~~~~~
दक्षिणा...... स्मित
~~~~~~~~~



दक्षिणा,
संत्र सोलल्यासारखा विनोद सोलून सांगायला हवा का तुला?

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home



संत्र सोलल्यासारखा >>> खो खो मस्तय उपमा !



सत्यजित हाहा
अज्जुका फिदीफिदी



तुर्फम्हाला
रर्फची भार्फषा येर्फते?
एर्फकदम सोर्फपी आर्फहे..
पर्फण पर्फटकन बोर्फललं किर्फ कर्फळत नार्फही.
..प्रज्ञा



वी मुंड हिडप्या वाषा मुंड भाडप्या वेते मुंड येडप्या वामुंड काडप्या वुम्हाला मुंड तुडप्या?>>>

दक्षिणा स्मित
ही भाषा तुम्हाला येते का??
असं आहे ना ते??



राज्या, बरोबर. स्मित
अहो लोकहो! मराठी उप्-भाषांच्या उत्पतीचा बी बी नाहिए हा...
सिंड्रेलाच्या कवितेवर पण भाष्य करूयात का आता? स्मित

~~~~~~~~~
दक्षिणा...... स्मित
~~~~~~~~~



रर्फची भार्फाषा मर्फला येर्फेते.

गन्गरफची भान्गरफाषा येन्गरफेते कान्गरफा तुन्गरफुम्हाला?



माझे सीमोल्लंघनाचे प्रयोग बहुधा 'दारू पिणार नाही' या स्वतःच स्वतःवर घातलेल्या सीमेचे उल्लंघन करण्यापर्यंत थांबतात. मग मात्र, हे असले काही न करतासुद्धा पुष्कळदा मी काय बोलतो हे बहुतेक कुणालाच काहीच कळायचे नाही.



खुपच छान....!!!!