सोशल स्किल्स(मराठी शब्द?) अंगी कसे बाणवावेत किंवा वाढवावेत?

Submitted by प्रिंसेस on 26 December, 2012 - 22:40

नव्या जागी मित्र मैत्रिणी कसे मिळवावेत?
आधीच ग्रुप्स असलेल्या ठिकाणी कसे मिसळावे?
नोकरी निमित्त देशोदेशीच्या लोकांशी संपर्क येतो अशावेळी बोलण्याचे विषय, संभाषणातल्या ओपनिंग लाईन्स (मराठी शब्द?) काय असावे?
आपले बोलणे प्रभावी पण नाटकी किंवा आढ्यताखोर न वाटण्यासाठी काय करता येईल?
संभाषणातील सहजता कशी आणावी?

बर्‍याचदा आपल्या देहबोली किंवा चेहर्‍याच्या हावभाववरुन आपण चुकीचे सिग्नल्स देत असतो. पूर्वी कुठल्याही अनोळखी पार्टीत मी दूर एकटी बसुन रहायचे. हल्लीच त्याबद्दल असे वाचले की त्यातुन तुम्ही लोकांना माझ्यापासून लांब रहा असा इशारा देत असतात. आता मी तसे करणे टाळते. बोलत नसले तरी ग्रुपच्या सान्निध्यात उभी रहाते.

अशा छोट्या छोट्या टिप्स तुम्ही इथे शेअर करु शकतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगवेगळ्या देशातल्या लोकांची संस्कृती, आचार - विचार, देहबोलीतून ध्वनित होणारे अर्थ, संकल्पना इ सर्वच बाबतीत वैविध्य असते.

माझ्या कंपनी मध्ये प्रोफेशनल इफेक्टिव्हनेस ह्या विषयांतर्गत अश्या अलाईड विषयांवर खूप ट्रेनिंग्स होत असतात. पण बहुतांशी मध्ये क्लायंटस शी करावयाचे कम्युनिकेशन आणि रीलेशनशिप फॉर्मेशन आणि ती रीलेशन्स मेंटेन करणे ह्यावर भर असतो.

प्रिंसेस,
तुला नक्की व्यक्तिगत बाबतीत सल्ला हवा आहे की ऑफिशियल मॅटरच्या संदर्भात?

ह्या विषयावर बरीच पुस्तके अवेलेबल आहेत.
how to win friends? हे एक नाव ऐकले आहे.

मी स्वतः जास्त वाचन केले नाहीये, ह्या विषयात.

तुला नक्की व्यक्तिगत बाबतीत सल्ला हवा आहे की ऑफिशियल मॅटरच्या संदर्भात?
<
+१
*
how to win friends? हे एक नाव ऐकले आहे.
<
how to books are dumb
*
वेगवेगळ्या देशातल्या लोकांची संस्कृती, आचार - विचार, देहबोलीतून ध्वनित होणारे अर्थ, संकल्पना इ सर्वच बाबतीत वैविध्य असते.
<
better to make this thread or rather (y)our reactions country specific.

नव्या जागी मित्र मैत्रिणी कसे मिळवावेत? >> I do things that I enjoy e.g. hiking, writing and in process if you make friends that is a bonus.
आधीच ग्रुप्स असलेल्या ठिकाणी कसे मिसळावे? >> I don't even try to mix in these situations. If people see a value to my presence, they include me. A smile, a nod, a tear goes long way than actually verbally saying anything.
नोकरी निमित्त देशोदेशीच्या लोकांशी संपर्क येतो अशावेळी बोलण्याचे विषय, संभाषणातल्या ओपनिंग लाईन्स (मराठी शब्द?) काय असावे? >> somethng that other person is wearing or carrying (phone or clutch etc) is sureshot ice breaker. How do you know the host or how did you come to know about the event/ this location. Do you know one cool thing in this town... so on...
आपले बोलणे प्रभावी पण नाटकी किंवा आढ्यताखोर न वाटण्यासाठी काय करता येईल? I try to focus on content rather than delivery. If content is good enough, people will put up with you irrespective of your delivery style.
संभाषणातील सहजता कशी आणावी? >> empathy or acceptance to variety of lifestyles and individuals and practice.

>>संभाषणातल्या ओपनिंग लाईन्>><<
'संभाषणाची सुरुवात' असे म्हटले तरी चालेल.
मूळात सर्वसाधारण आपणच मोकळे मन( prejudiced नसणे) असावे. व सुटसुटीत कल( flexible touch) असावा कुठल्याही देशात व लोकांत मिसळ्याआधी. बर्‍याचदा आपण(सर्वच जण) कधी ना कधी थोडेसे बुजतो वा वेग्ळे रहातो ते एकीव गोष्टीवर विश्वास ठेवून वा आपल्यातच कमी आहे हे समजून.

एकदम सुरुवातीला आले शिकायला तेव्हा, मला वाटायचे माझे ईंग्लिश उच्चार बरोबर नाहीत(देशातील लोकांचे बोचरं दुखणं) पण पाहिले की चायनीज काय स्पॅनीश काय फ्रेंच हे तर आपल्यासारखेच देशी(त्यांचे देशी) उच्चार करतात. मग कशाला घाबरा.. सरळ बोलायला लागले.

व्यतिगत आता संशाषणाची सुरुवात: कोणाच्या कल्चर मध्ये इंटरेस्ट दाखवला की लोकं बोलती होतात..( साधारण पणे).
पार्टीत गेलं की होस्टने केलेली सजावट, मग त्या त्या कलचरचे बोलणे, खाणे वगैरेवर आपोआप सूरू होते पाहिलय.
ह्यात आपण कमी बोलावे माहित नसेल तर.. पन एकावे जरूर व दाद द्यावी... छान वगैरे.

नाहितर मांजरं वा कुत्रं असेल हातात कोणाच्या तर त्याची तारीफ करावी... नावं काय ह्याचं/हिचं(कुत्रा/ मांजरीच). हमखास बोलणं सुरु होतं Proud
नाहितर मूवी आहेतच ना बोलायला... शेवटी काय... डरनेका नय... सिदा चालू करनेका बात.. ह्या फंड्यावर चालतं एकुणात. Proud

ऑफ्फिशियल ठिकाणी : इथे ढिगभर विषय असतातच... हि मॅनेजमेंट.. तो चेंज... ह्यांव त्यांव... त्यामुळे चिंता नसते...

पहिल्यांदा - सोशल होणे
त्यासाठी माणसांची, त्यांच्याशी मनापासून बोलण्याची, त्यांचे ऐकण्याची आवड हवी. विषयाचे बंधन नसावे. शक्यतो दुसर्याना वाईट वाटेल असे पहिल्या काही भेटींमधे कितीही वाटत असले तरी बोलू नये. एकदा सुसंवाद साधला की मात्र मनात असेल तेच बोलावे - मग खोटे बोलू नये. खरोखर समोरचे तुम्हाला समजून घेत असतील तर नक्की ऐकतील - थोडक्यात लग्नासारखे! Happy

सोशल व्हायचे असेल तर कुठलाही हौशी वर्ग लावा - जर्मन, जपानी, गिटार, नाटक, संगीत, Computer. तिथल्या मित्र्-मैत्रिणींमधे मिसळायला लागलात तर आपोआप जमेल सारे.

नोकरी - सर्वात आधी आपले काम व्यवस्थित करणे. मग बरेच लोकं आपण हून बोलायला येतील.
वर ( प्रमोशन) जायचे असेल तर आजूबाजूला बघा. प्रत्येक शाळेत, कॉलेजात, नोकरीत नेहेमी एक Star Performer असतो किंवा असते. त्यांचे अनुकरण करणे. एकदा तुम्ही स्टार झालात की आपल्या पिंडाला जमेल अशाच गोष्टी ठेवणे आणि बाकिच्याना डिच्चु देणे!

नीदा फाजलींची गजल आठवली -
"बातें कम किजिये,
जहानत को छिपाके रखियें|
ये नया शहर है, कुछ दोस्त बनाते चलियें |
दुष्मनी लाख सही, खत्म ना किजिये रिश्ता,
दिल मिले ना मिले, हाथ मिलाते चलियें | "

निंबुडा <<<तुला नक्की व्यक्तिगत बाबतीत सल्ला हवा आहे की ऑफिशियल मॅटरच्या संदर्भात? >>>

दोन्हीचेही उत्तर नाही Happy
व्यक्तिगत बाबतीत म्हणशील तर मी बरीच पुस्तके आणि इंटरनेटवरचे लेख वाचुन स्वतःत जाणीवपूर्वक बदल गेल्या काही वर्षात घडवुन आणलेत.

<<<ह्या विषयावर बरीच पुस्तके अवेलेबल आहेत.
how to win friends? हे एक नाव ऐकले आहे. >>> ऑफकोर्स बरीच पुस्तके शिवाय तू म्हणतेस ते how to win friends? पण वाचलय पण खरे सांगायचे तर ते पुस्तक मला खूपसे आवडले नव्हते.
हा धागा सुरु करतांना जुन्या माझ्यासारखे काही लोक असतील तर त्यांना काही माहिती मिळावी आणि माझ्या स्वत:मध्ये ही अजुन काही कमी असतील तर ते बदलता येतील हा उद्देश होता.

सिमंतिनी Happy मस्त पोस्ट. ग्रुपमध्ये मिक्स होतांना चे टिप्स तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मला सामावुन घ्या !!! हाहाहा मी सुद्धा अशीच आहे/ होते पण वाटते की यात थोडा बदल व्हावा.

झंपी , टिप्स आवडल्यात Happy
सुलु, क्या बात क्या बात क्या बात !!!
<<< त्यासाठी माणसांची, त्यांच्याशी मनापासून बोलण्याची, त्यांचे ऐकण्याची आवड हवी. >>> बोलण्याची आवड मुळीच नाही , नव्हती. ऐकु शकते, I am a good listener पण असे वाटते की संभाषणात थोडी सहजता यायला हवी. ऑफिसात , पार्टीत मिसळतांना स्वतः बोलणे सुरु करता यावे.
ते अजुन जमत नाही.

आधी नुसतच त्यांच्यात जाऊन शेजारी उभं रहावं चेहर्यावर स्माईल ठेऊन. काय विषय चालु आहे, ते पाहून मग आपल्याला त्यात काही गती असल्यास आपल्या बाजूने तो विषय हळूच पुढे वाढवावा.
मी जिथे जाते तिथे माझे ग्रूप्स होतात, काही काळाने त्यातले काही दोस्त एकदम घट्ट मैत्रिचे होतात. काही कधितरी फोन करत राहण्या ईतपत मैत्रिचे होतात Happy
कॉमन विषय म्हणजे जिथे राहतोय तिथल्याबद्दल पॉझीटीव बोलण्याने सुरुवात करणे, मग तिथलं हवामान, शिक्षण पद्धती, लोक, जेवण खाण ह्या बद्दल डिस्कशन ह्यातूनच नवनवीन विषयांना वाट फुटते.

आणिक तशी तू भरपूर टॉकेटिव्ह आहेस की गं Happy

मुलांच्या मित्र मैत्रिणींचे पालक वर्ग हाही आपला एक मोठठा फ्रेंड सर्कल होऊ शकतो. बाकी राँग सिग्नल बद्दल नंतर लिहेन!

माझा आवाज मुळात मोठा आहे..त्यामुळे मी मुद्दा मांडत असले तर लोकांना असं वाटायचं की मी चिडले आहे, अंगावर येतेय की काय. आता मी जाणिवपुर्वक आवाजाची पट्टी खाली ठेवते.. Sad

आशु Happy खूप जवळच्या लोकांशी त्यांना न बोलु देण्याइतके बोलु शकते Happy
<<< आधी नुसतच त्यांच्यात जाऊन शेजारी उभं रहावं चेहर्यावर स्माईल ठेऊन.>>> ही एक ट्राईड अँड टेस्टेड टिप आहे. माझ्या आधीच्या पोस्ट मध्ये मी पण तेच लिहिलय की आता मी ग्रुपच्या जवळ जाउन उभी राहते. पूर्वी दूर रहायचे. त्यामुळे एक तर पूर्वीसारखे अनोळखी पार्ट्यात बोअर होणे कमी झाले.

अजुन एक म्हणजे आपण असे आलिप्त राहिलोत तर चेहर्‍यावर एक प्रकारचे कंटाळवाणे किंवा विचित्र हावभाव आपल्या नकळत येतात जे पाहणार्‍या लोकांना भयंकर वाटु शकते (स्वानुभव - दूर बसल्यावर नकळत चेहरा प्रचंड मख्ख अन मठ्ठ झालाय असे एकदा मला स्वतःला जाणवले होते Proud )

आवाजा बद्दल सहमत. एकुणच भारतीय लोक आवाजा बाबतीत भाग्यवान Happy भरभरुन देतो देव पण तेवढा सगळा वापरायची गरज नसते, हे ही अनुभवातुन आलेले शहाणपण Happy

आवाजा बद्दल अजुन एक मजेशीर निरिक्षण म्हणजे फोनवर अगदी मोठ्याने बोलण्यात चायनीज आपल्या लोकांना मागे टाकतात. Happy

मुलांचे मित्र मैत्रिणी आणि पालक अगदी घट्ट मैत्री होण्याइतके जवळचे आहेत. सहसा तिथे मुले आणि शाळा अभ्यास असे बरेच कॉमन विषय असतात Happy

खूपच छान धागा. मी ही या विषयावर धागा काढण्याच्या विचारात होतेच. धन्यवाद प्रिंसेस. Happy

आपल्याकडे शिक्षण महत्त्वाचं मानलं जातं आणि ते आहेच. पण रोजच्या आणि व्यावसायिक जीवनात वावरताना ही सॉफ्टस्किल्स आपल्या व्यक्तीमत्त्वाला अधिक संपन्न करतात. आपल्या अंगी सॉफ्टस्कील्स बाणवणे आणि दुसर्‍याची देहबोली ओळखणे या दोन गोष्टी जाणीवपूर्वक अमलात आणल्या तर चारचौघांत मिसळताना, समाजात वावरताना खूप उपयोग होतो.

आत्ता जरा घाईत आहे. नंतर सविस्तर लिहिते.

खूप उपयोगी धागा....
पण रोजच्या आणि व्यावसायिक जीवनात वावरताना ही सॉफ्टस्किल्स आपल्या व्यक्तीमत्त्वाला अधिक संपन्न करतात.>>>> ह्या वर अजून वाचायला आवडेल.

छान आहे ही चर्चा. मला वाटते तुमच्या देहबोलीचा भरपूर फरक पडतो बरेचदा.
तसेच मला जाणवणारी गोष्ट म्हणजे नेहेमी 'सॉफ्ट स्पोकन' असायला हवे.
म्हणजे उगाचच मनात एक पण जिभेवर दुसरे असे नाही पण बोलताना योग्य वेळी योग्य शब्द वापरणे गरजेचे आहे.
मी काही लोकांचे निरिक्षण केले आहे जे कधी कधी लगेच मिक्स तर होतात पण फार आगाऊ वाटतात. तर समोरच्याचा तसा गैरसमज होऊ देता कामा नये.
तसचं 'आइस ब्रेक' करण्यासाठी फारही इन्फोर्मल आणि पर्सनल होता कामा नये.

सोशल स्कील्स... हम्म्मम्म्म्म्म्म्म

खरतर लोकांना तुम्ही त्यांच्याशी बोलण्यापेक्षा, त्यांचं ऐकून घेतलेले आवडते. त्यांच्या बोलण्यात जराआआआआ ईण्ट्रेस्ट दाखवलात की काम फत्ते Happy

असो, वरच्या काही पोस्टस् वाचल्या. बर्‍याच गोष्ती पटल्या, काही नाही पटल्या.

सर्वात आधी म्हनजे तुम्हाला खरच सोशल होण्यात समाधान आहे की निव्वळ काळाची गरज म्हणून ? सोशल व्हायचं असेल तर "मी" बाजूला ठेवायला लागेल. त्याजागी 'आपण' आणायचा. ज्याठिकाणी जाणार आहोत त्याठिकाणाची, लोकांची, घडलेल्या घटनांची माहिती मिळवायची. त्यांच्या चालिरीती समजून घ्यायच्या. मॅनर्स / एटिकेटस् अंगी बाणवायचे. पीपल शुड नो यू बाय द वे यू कॅरी युअरसेल्फ.

सध्या ईतकच. पुढे बोलूच

मला वाटतं की आपण नवी नवी माणसे जोडण्या करीता एक चांगला श्रोता होणे गरजेचे आहे. आजकाल दुसर्‍याचे ऐकण्या पेक्षा स्वतःचेच टुमणे सतत लावणारी माणसे असतात. चांगला श्रोता हा फक्त योग्य ऐकतो. उगाचच जिथे गॉसिप आहे, राजकारण आहे, तिकडे फिरकतच नाही.

भेटल्यावर केलेले एक "गुड मॉर्निंग" एखाद्याचा मुड बदलु शकते. छोट्या छोट्या गोष्टीं चे खुप फायदे होतात.

आमच्या ऑफिस मधे एकाला सवय आहे (होती) ज्याला त्याला विचारायची " कुठे चाललास किंवा कुठे चाललीस" लोकांनी पहिले पहिले सीरीयस्ली उत्तर दिली ( कारण तो चांगल्या मोठ्या पोस्ट वर आहे). एकदा मला विचारले " कुठे चाललीस" मला जी सणक आली मी फाटकन उत्तर दिले " वॉशरुमला. येतोस?" ते ऐकल्यावर आजुबाजुला सगळे वाटाण्या सारखे फुटले.... त्या नंतर त्याचा हा प्रकार बंद झाला.

असे भोचकपण असु नये.... आणि अशा भोचक लोकांकडे आपण बोलु ही नये.. नाहीतर इतरांचा गैरसमज होतो.

जेंव्हा आपण वेगळ्या वातावरणात जातो, म्हणजे वेगळ्या प्रांतात किंवा देशात, तेंव्हा नक्कीच सुरुवातीला बाचकल्या सारखं होतं... पण इतरांच्यात त्यांना खुपणार नाही ह्या पध्धतिने मिसळायला सुरुवात केली की गोष्टी सुकर होतात.