पुण्यात हलव्याचे दागिने कोणी बनवून देणारे आहे का?

Submitted by पियू on 26 December, 2012 - 01:06

पुण्यात संक्रांतीनिमित्त हलव्याचे दागिने कोणी बनवून देणारे आहे का?
अश्या दागिन्यांची साधारण किंमत काय असते?
कोणी बनवत असल्यास फोटो पाहायला मिळतील का?
किती दिवस आधी सांगावे लागते?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खाउवाले पाटणंकरा कडचे एकदम झकास , मस्त , भरपुर निवड , न तुटणारे , असतात....... हा माझा स्वताहाचा अनुभव आहे .... Happy Happy

मी यावेळी हलव्याचे मुकूट बनवणार आहे. कुणी हे सांगू शकेल का की फेविस्टिक् लागेल की फेविकॉल? की अजून काही ट्रिक असते?

धारा एक आगाऊ सूचना दिली तर रागावणार नाहीस ना?

मागच्याच आठवड्यात मी एका डोहाळे जेवणाला गेले होते. तिथे नेहमीप्रमाणे त्या गरोदर मुलीने फुलांचा एक पारंपारिक मुकुट घातला होता. कार्डपेपर चा बनवतात तो.

अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर एकदम बंडल दिसत होता. त्यात तो मध्ये मध्ये सारखा डोळ्यांवर घसरत होता. तो मुकुट तिला जड होत होता. गरम होत होतं. ८ महिन्याच्या त्या गरोदर बाईचा जीव अगदी गुदमरून गेला होता.
(अर्थात यात तिची जरीची साडी, मोकळे सोडलेले केस, येणारी जाणारीला औक्षण करायचं म्हणून तिच्या डोक्यावरचा बंद करून टाकलेला पंखा, तो कंबरपट्टा हेही होतेच). पण त्या मुकुटाने तिची हालत खराब केली होती अगदीच.

तेव्हा माझ्या डोक्यात एक कल्पना आली कि या ठिकाणी मुकुटाच्या ऐवजी क्राऊन बनवला असता तर? आजकाल १०-२० रुपयात प्लास्टिकचे छान साधे क्राऊन मिळतात लहान मुलींसाठी बर्थ-डे पार्टी मध्ये घालायला. (कुठेच नाही मिळाले तर मोन्जीनीज मध्ये मिळतात बहुतेक). त्यालाच फुले चिकटवली तर किती छान दिसेल. तो घसरणार नाही. डोळ्यांवर येणार नाही. हेअर स्टाईलची वाट लावणार नाही.

मी म्हणतेय तो क्राऊन असा दिसतो:

१. http://goo.gl/8s9qY
२. http://goo.gl/QNd2w
३. http://goo.gl/PpCzg
४. http://goo.gl/E6AR1

तू पण अश्याच एखाद्या क्राऊनला हलवा चिकटवून तो छान झाकून टाकला तर किती छान होईल.

माझ्या कल्पनेचा नक्की विचार कर. आणि असा बनवलास तर इथे फोटू नक्की टाक.

आगाउपणा केल्याबद्दल सॉरी !!!

माझं असं मत आहे की जर छोट्या मुलासाठी बनवणार असाल (बोरनहाण) वगैरे तर पहिले वर्ष तरी कमीत कमी दागिने घालावे म्हणजे मनगटातले, दंडातले ... कारण ते बाळ त्रासतं त्या दागिन्यांमुळे...ओढून काढायला बघतात.. तोंडात घालू शकतात.
अर्थात प्रत्येकाची हौस.

पियुपरी, कल्पनेबद्दल धन्यवाद. ओजसच्या फोटोत आहेत तसलाच मुकूट बनवायचा विचार आहे. बनवून झाल्यावर फोटो मी डकवीन इथे.
अंजली, छोट्या ३-४ मुलांसाठी (वर लिहिल्याप्रमाणे) मुकूट (फक्त) बनवायचे आहेत.

हे घ्या आमचे फायनल मुकूट (मुले ३ महिने, ९ महिने, सव्वा वर्ष आणि ३ वर्षे या वयाची असल्याने त्याचे प्रत्येकी आकारही वेगवेगळे होते). मी हलवे फेव्हीक्वीकने चिकटवले. एक वर्षाच्या आतील दोन्ही मुलांनी लयीच कोऑपरेट केले, पण बाकीच्या दोघांनी तत्परतेने सगळे हलवे काढून दाखवले. जमले तर पुढच्या वेळी हलवे ओवायचे कसे, ते शिकून मग बनवीन.

mukuT.jpg

धारा मस्त केले आहेत.

मी केलेले हलव्याचे दागिने व रंगवलेला फ्रॉक (मी पहिल्यांदाच केलेत. बरेचदा हलवे निसटले त्यातले. म्हणून मग सोनेरी दोर्‍याने बांधले. सफाई कमी आहे.)
bindi.jpgvaki.jpgfrock.jpghar_1.jpg