चल, एक नवी सुरूवात करूया....!

Submitted by बागेश्री on 10 December, 2012 - 07:07

तू, 'तू'
मी, 'मी'
असे जगणे जगूया,
चल, एक नवी सुरूवात करूया!

कोण बरोबर, कोण चूक
कुणाला सुखाची, किती भूक?
अशा हिशोबांत रमणे सोडूया
चल, एक नवी सुरूवात करूया..!

कुणाचे योग्य, अयोग्य कोण?
कसे सुधारावेत दृष्टीकोन,
अर्थहीन चर्चांतून बाहेर पडूया
चल, एक नवी सुरूवात करूया....!

अपे़क्षा एकमेकांच्या अन कसूर कर्तव्यात
नाती सांभाळणे अन 'मने जपूयात',
ह्या पोकळ व्याखांतून बाहेर पडूया
चल, एक नवी सुरूवात करूया....!

माझे ऐकावे तू आणि मी तुझे
लादून एकमेकांना, मने मारायचे
ज्याला जसे हवे, तसे जगूया
चल, एक नवी सुरूवात करूया....!

आखलेले जिणे का हे, जेव्हा आपण भिन्न
फूलवू मनांना तोडून पारतंत्र्य खिन्न
नव्या उमेदीने हेच नाते फूलवूया
चल, एक नवी सुरूवात करूया.....!

तू, 'तू'- मी, 'मी'
असे जगणे जगूया,
चल, एक नवी सुरूवात करूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तू, 'तू'
मी, 'मी'
असे जगणे जगूया,
चल, एक नवी सुरूवात करूया!<<<

आवडली कविता. शांत वाटले वाचून, काही व्याकरणचिन्हांनी किंचित रसभंग झाला, पण ते निव्वळ दुय्यमच!

हि अवांतर आणि काकाक आहे? बर तसं तर तसं म्हणेनास. तुलाच हि कल्पना आवांतर आणि काकाक वाटतेय का? की इतरांना हा फॉर्म /विचार/ कविता अवांतर काकाक वाटेल म्हणून इथे तशी टाकल्येस? तू नकोच लेबल लावूस ना पण. जिसको लगाना है लेबल वो लगाएगा मनमे.

बाग्ज, एकदम भारीच! आणि कवितेची लयही सुरेख आहे. सुंदर कविता !

( वाट बघुन प्रतिसाद टाकला. Wink )

खरंच बागेश्री, एवढ्या सुंदर कवितेला काकाक मध्ये का टाकलं आहेस ?

तू, 'तू'
मी, 'मी'
असे जगणे जगूया,
चल, एक नवी सुरूवात करूया!

इथेच जिंकलंस आणि कविताभर ते कायम राहिलं.

माझे ऐकावे तू आणि मी तुझे
लादून एकमेकांना, मने मारायचे
ज्याला जसे हवे, तसे जगूया
चल, एक नवी सुरूवात करूया....!
>>
लै भारी

Happy

सुरेख आशय.
खरंच; ही कविता जशीसमजली तशी प्रत्येकाला उमजली
तर आयुष्य बहारदार होईल नक्की. Happy

पुलेशु!

स्फूट सोडून मुक्तछंदाकडे वळलीस हे आवडले
कविता छानय

प्रांजळ प्रश्न :
अनेकजागी वरील कडव्यात जे आहे त्याच्याशी काहीसे फारकत घेणारे खालच्यात आहे असे वाटले
नक्की 'तू' अन् 'मी' याना एक होवून जायचे आहे / द्वैत विसरायचे आहे ; की वेगळे व्ह्यायचे आहे /अद्वैत विसरायचे आहे हे नाही समजले ..नक्की काय ते सांगशील का ?

खासकरून समारोपाच्या ३ ओळीच्या आधीचे कडवे =४ ओळी

वैभव,
इथे फक्त ज्याला जसे हवे आहे, तसे ते जगू द्यावे, नात्यात असूनही 'एक व्यक्ती' म्हणूनच दोघांनीही जगावे, इतकीच इच्छा व्यक्त केलीये. वेगळे होऊन जगण्याबद्दल काहीच नाही आणि एकरूप होण्याचाही विचार नाही. तू तूच म्हणून आणि मी मीच म्हणून असलेले जगणे, सामंजस्य इतक्या टोकाचं की एकमेकांना असं जगू दिल्यानं नातं फुलावं, उंच जावं! इतकंच म्हणेन....

सार्‍यांची आभारी आहे...

वाह!
खुप मस्त!

तू, 'तू'
मी, 'मी'
असे जगणे जगूया,
चल, एक नवी सुरूवात करूया!

>>
वाह वाह!
चार चारदा वाचाव्यात अशा ओळी Happy

आवडेश!!!

माझे ऐकावे तू आणि मी तुझे
लादून एकमेकांना, मने मारायचे
ज्याला जसे हवे, तसे जगूया
चल, एक नवी सुरूवात करूया....! >>> हे खुप जास्त आवडल Happy

Pages