आनुभविक तोडगे

Submitted by हरिहर on 5 December, 2012 - 05:11

समाजामध्ये वावरताना कधीतरी अचानक एखाद्या समस्येला आपणास सामोरे जावयास लागते. तेव्हा तेथे उपस्थित असलेली जाणकार व्यक्ती पटकन त्यावर एखादा तोडगा सांगते व आपली समस्येचे चुटकीसरशी निराकरण होते. असे स्वतः अनुभव घेतलेले तोडगे शक्यतो आपण येथे लिहू, केवळ पुस्तकी तोडगे लिहूया नको.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या माहितीमधील दोन तोडगे देत आहे.
आमच्या गावाकडे उन्हाळा प्रचंड. मे महिन्याच्या सुट्टीत एखादा पाहुणा घरी आला की उन्हाळी लागलीच म्हणून समजा. अशा वेळी कितीही जरी पाणी पिले तरी लघवीला त्रास होतो. तेव्हा आम्ही त्याला सांगतो की कानामध्ये अत्तराचा बोळा जेथे ठेवतो त्या ठिकाणी वाळूचे दोन खडे ठेव म्हणजे त्रास कमी होईल.
एकदा मी एका कार्यक्रमासाठी बेळगावला गेलो होतो. जेवण झाल्यानंतर सुपारी खाल्ली. पण सुपारी लागल्यामुळे छातीमध्ये दुखावयास लागले. तेव्हा एका बाईने मला सांगितले की शेजारच्या माणसाच्या टाळूचा खोलवर वास घे. आणि खरोखरच एका झटक्यात त्रास बंद झाला.

शेजारच्या माणसाच्या टाळूचा खोलवर वास घे.>>>>>> Uhoh
वास शेजारच्या माणसाच्याच टाळूचा घ्यायचा का? आपलं माणुस शेजारी नसेल तर काय करु शकतो? कुठल्या ही अनोळखी माणसाला "मला तुमच्या टाळुचा वास घ्यायचा आहे" असं म्हटल्यास त्याची काय रीअ‍ॅक्शन असेल??

इथे तोडगे सांगायचे आहेत तर तु अजुन एक बिन तोडग्याचा प्रॉब्लेमच मांडुन गेलीस. >> रोडगे चालतील का.. नाही मला रोडगा वाहिल तुला गाणं आठवलं..

"मला तुमच्या टाळुचा वास घ्यायचा आहे" असं म्हटल्यास त्याची काय रीअ‍ॅक्शन असेल??
>>>>>>> Rofl

टाळूवर पडलायस का असं तो विचारेल Wink

बादवे, सारखी उचकी येत असेल थोडीशी साखर खाऊन पाणी प्यायचं.

उचकी लागल्यानंतर - वर्तमानपत्राचा, भेळ खाण्यासाठी करतात तसा मोठा शंकू करावा. हा शंकू तोंडासमोर ठेवून त्यामध्ये श्र्वासोच्छ्वास करत राहिल्यास उचकी थांबते.

सस्मित | आपलं माणुस शेजारी नसेल तर काय करु शकतो?
फार विचार करू नये. निवांतपणे सुपारी खाली सरकण्याची वाट पाहात बसावे.

दुपारी १२ - १ च्या दरम्यान पोटात खड्डा पडल्यास एका ताटात जेवण घेऊन ते जेवावे. हमखास बरे वाटते.

उचकी लागल्यानंतर - वर्तमानपत्राचा, भेळ खाण्यासाठी करतात तसा मोठा शंकू करावा. हा शंकू तोंडासमोर ठेवून त्यामध्ये श्र्वासोच्छ्वास करत राहिल्यास उचकी थांबते.>>>>>>>>>>> करुन बघावे लागेल. मला बर्‍याचदा उचकी लागते. आणि वरचा तो साखर आणि पाण्याचा उपायही काम करत नाही.

मामी | दुपारी १२ - १ च्या दरम्यान पोटात खड्डा पडल्यास ........
आणि संध्याकाळी पोटात खड्डा पडल्यास काय करावे?

<<शेजारच्या माणसाच्या टाळूचा खोलवर वास घे<< बाप्रे...!

<< कानामध्ये अत्तराचा बोळा जेथे ठेवतो त्या ठिकाणी वाळूचे दोन खडे ठेव म्हणजे त्रास कमी होईल.<<
कानाला खडा लावणे हा वाक्प्रचार यावरुनच आला की काय! Happy

रच्याकने, आमच्या ऑफीसमधल्या एका जुन्या जाणत्या बाईकडुन ( ती एक भावगीत गायिका आहे.तीचा मुलगाही सारेगमा मधे गायलाय) असाच काहीसा तोडगा ऐकला.

डोळ्याला रांजणवाडी झाली तर "डोंगराला वेडावुन(वाकुल्या) दाखवायचं म्हणे". हे तिच्या आईने सांगितलय. आणि हमखास तोडगा आहे म्हणे. खखोदेजा.

मनिमाऊ | ..एक स्केअरी आणि एक यक्क !...अजुन?
आणखीन थोडावेळ थांबलात तर वॉक्‌ होईल. त्यामुळे मनिमाऊ तुम्ही आता कल्टी मारलेली बरी.

डोंगराला वेडावुन(वाकुल्या) दाखवायचं म्हणे>>>>

डोंगर कुठे शोधायचा? की त्या करीता डोंगर असणार्‍या भागात जायचे?

उचकी लागल्यानंतर - वर्तमानपत्राचा, भेळ खाण्यासाठी करतात तसा मोठा शंकू करावा. हा शंकू तोंडासमोर ठेवून त्यामध्ये श्र्वासोच्छ्वास करत राहिल्यास उचकी थांबते.>>>>>>>>>>> करुन बघावे लागेल. मला बर्‍याचदा उचकी लागते. आणि वरचा तो साखर आणि पाण्याचा उपायही काम करत नाही.
>>>
सस्मित सेम पिंच. मलाही नाक बंद करून पाणी पिणे, वरती बघत बघत पाणी पिणे, साखर व त्यावर पाणी पिणे इ. सगळे उपाय करूनही आराम पडत नाही. पण कागदी पिशवीत श्वासोच्छवास केल्याने खरंच उपयोग होतो. नक्की करून बघ. मी उचकी मास्टर आहे. Happy

मला वाटते माझे उचकीचे कारनामे नी इथल्याच कुठल्यातरी एका धाग्यावर लिहिलेत आधी.

उचकी लागल्यानंतर अजुन एक ट्राय करुन बघा, दिर्घ श्वास घ्या आणि दोन उचक्यांच्या अंतरापेक्शा थोडा वेळ जास्त धरुन ठेवा आणि मग श्वास सोडा, उचकि थांबेल, एका ट्राय मधे नाहि थांबली तर १-२ दा करा

प्रिया, हे ही करून झालेय माझे. माझ्या उचकीवर नो इफेक्ट. अगदी श्वास कोंडेल इथपर्यंत श्वास रोखून ही ठेवून पाहिलाय.

उचकीवर माझ्या भावाने सांगितलेला उपाय माझ्या लेकीला तरी उपयोगी पडतोय. तोंडात पाण्याचा घोट घेउन ओणवं उभ रहावे व खाली असतानाच पाणी गिळावे.

"उचकीवर औषध तीन घोट पाणी" असे म्हणायचे, पाण्याचा एक घोट घ्यायचा, पुन्हा म्हणायचे, पुन्हा एक घोट पाणी, असे ३-४ दा केले की बहुदा थांबते उचकी. मला वाटतं पोटात तयार झालेली पोकळी या बोलण्याने बाहेर जात असावी अन पाण्याच्या घोटाने जास्तीची हवा आत जायला प्रतिबंध होत असावा, असे काही होत असावे. पण थांबते उचकी. किंवा अवंढा गिळला ३-४ दा तरी थांबते असे म्हणतात. मला पहिला उपाय सूट होतो Happy

वैद्यकीय सल्ले:
१. उचकी ही (बहुधा) डायफ्रॅम = छाती व पोट यांदरम्यानच्या स्नायूंच्या पडद्याला दाह (इरिटेशन) झाल्याने येते. या पडद्याचा वेळेवारी अकुंचन होण्याची ही क्रिया आहे. अती तट्ट जेवणे, किंवा उपास असणे हेही एक कारण असू शकते. व्हेगस नावाचा एक नर्व्ह त्या डायफ्र्यामला कण्ट्रोल करतो. उचकी चे सगळे उपाय,- पाणी पिण्यापासून तर ब्रीदींग इन स्मॉल स्पेस, श्वास थांबवून वा तत्सम मार्गाने रक्तातील कार्बनडायॉक्साईडचे प्रमाण वाढवतात, व त्याद्वारे मेंदूतून व्हेगल इन्-हिबिशन्स खाली पाठवतात. इतर उपचारांत अ‍ॅनास्थेटिक औषधे पिण्यास दिली जातात. (अ‍ॅसिडिटी हेही एक कारण असू शकते)
अवांतरः मध्यंतरी टेड टॉक्स वर, ऑर्गॅझम कॅन स्टॉप इन्ट्रॅक्टेबल हिक्कप्स असे एका भाषणात ऐकून अंमळ गम्मत वाटली होती.
२. नाकातली माळीण. *नाकातील केसतोडा*
नाकपुडी, वरचा ओठ हा एक त्रिकोणी भाग कल्पिलात तर त्यास डेंजरस एरिआ म्हणतात. येथिल पिकणार्‍या पुळ्यांतील पू, सरळ मेंदूत जाऊ शकतो. यासाठी अत्यंत जोरदार उपचार करणे गरजेचे असते. तात्काळ (नाक कान घशाच्या) डॉक्टरांकडे जावे. याचसाठी नाकातील केस उपटु नयेत. बोथट कात्रीने कापूही नयेत.
३. रांजणवाडी/खिरपुळी इ.
डोळ्याच्या पापणीत होणार्‍या पुळ्या. या २ प्रकारच्या असतात.
एक पापणीच्या कडेजवळ, दुखते, पिकते, फुटते, बरी होते. यास स्टाय म्हणतात. डायबेटिस असेल, तर डॉक्टर कडे जा, अन्यथा गरम शेक द्या, 'लसूण ट्यूब' उर्फ क्लोरो अ‍ॅप्लिकॅप नावाचे मलम डोळ्यात टाका. बहुधा बरे व्हा.
दुसरी पापणीच्या कडेपासून दूर. दुखत नाही. पिकत नाही. जातही नाही.
परत शेका, हलक्या हाताने मालिश करा. १०-१५ दिवसांत गेली नाही तर छोटे ऑपरेश्न लागू शकते.

मी अमि | 5 December, 2012 - 22:01
पित्त झाल्यास कोकम सरबत प्यावे.

पित्तामुळे जठरान्न दूषित होऊन आंबट ढेकरा येत असतील तर राजगिऱ्याच्या लाह्या खाऊन पाहा. अगदी इनो सारखा त्वरित इफेक्ट मिळतो आणि तेही कोणत्याही साइड इफेक्टवाचून.
पण पित्तामुळे रक्त दूषित होऊन तीव्र डोकेदुखी होत असेल तर 'पुरेशी झोप होणे' हा एवढाच एक उपाय मला माहीत आहे. अन्य काही उपाय कोणास माहीत आहेत का?

मामी | 5 December, 2012 - 17:04 नवीन
दुपारी १२ - १ च्या दरम्यान पोटात खड्डा पडल्यास एका ताटात जेवण घेऊन ते जेवावे. हमखास बरे वाटते.

<<<

Rofl

हरिहर | 5 December, 2012 - 03:43 नवीन
मामी | दुपारी १२ - १ च्या दरम्यान पोटात खड्डा पडल्यास ........
आणि संध्याकाळी पोटात खड्डा पडल्यास काय करावे? >> १२ ते २ ताटे घेऊन त्यात जेवावे. खड्डा जाऊ द्या हो पण हमखास भांडीवाली वैतागते.

पण हमखास भांडीवाली वैतागते.
>>>
ह्या भांडीवाल्या/ कामवाल्या हल्ली जिकडे बघावे तिकडच्या धाग्यावर आप्ली हजेरी लावताहेत. Light 1

Pages