वर्तमानात घेतलेला भविष्याचा शोध (Talaash - Movie Review)

Submitted by रसप on 1 December, 2012 - 00:42

अपनी मर्ज़ी से कहाँ अपने सफ़र के हम हैं
रुख हवाओं का जिधर का है उधर के हम हैं
- निदा फाजली
कमी-अधिक प्रमाणात असंच आपलं आयुष्य असतं. बहुतेक गोष्टी ओघानेच घडत असतात आणि आपण त्यासोबत घडत-बिघडत जातो. स्वबळावर आपली दिशा निवडणारे लोकही अनेकदा ह्या ओघासोबत वाटचाल करतातच. आपला असूनही आपला नसलेल्या किंवा नसूनही असेलल्या ह्या प्रवासात काही जाणीवा आपसूक होत जातात. कुणी त्याला ठाव लागणे म्हणतं तर कुणी शोध घेणे. फरक काही नसतो, काही तरी नवीन उमगलेलं असतं, फारसा प्रयत्न न करता किंवा प्रयत्न काही वेगळ्याच इप्सितासाठी असतो आणि हाताला काही वेगळंच लागतं. गुंतागुंतीचं आहे, पण बहुतेक वेळा सत्य गुंतागुंतीचंच असतं. नसेल पटत तर एकदा रीमा कागती दिग्दर्शित 'तलाश' पाहा, कदाचित पटेल आणि तरीही नाही पटलं तर हरकत नाही. ओघ चालू आहे, कधी ना कधी पटेलच; अशी मला - रणजितला - एक वेडी खात्री आहे.

सुर्जनसिंह शेखावत उर्फ सूरी (आमीर खान) मुंबई पोलीसदलातील एक निरीक्षक असतो. नव्यानेच ह्या शहरात दाखल झालेल्या 'सूरी'कडे केस येते एका विचित्र अपघाताची. हा अपघात साधासुधा नसतो, कारण तो फिल्म सुपरस्टार अरमान कपूरच्या गाडीला झालेला असतो आणि त्यात अरमान कपूर जागीच ठारही होतो. मध्यरात्रीच्या सुमारास, स्वत:च्या घरापासून बरंच दूर, एका वेश्यावस्तीजवळ असलेल्या समुद्र किनाऱ्यालगतच्या रस्त्यावर, कुठलीही नशा केलेली नसताना, कधीच स्वत: गाडी न चालवणारा अरमान त्याच रात्री भरधाव गाडी का चालवत असतो? अपघाताच्या आदल्या दिवशी संध्याकाळी त्याने त्याच्या अकौंटन्टकडून मोठी रक्कम का घेतलेली असते ? रस्त्यावर कुणीही नसताना अचानक रस्ता सोडून, त्याची गाडी समुद्रात का उडी घेते ? असे अनेक विचित्र प्रश्न ह्या केसला क्लिष्ट बनवत असतात. काहीच विशेष हाती लागत नसल्याने एक अन्सोल्वेबल केस म्हणून ही फाईल बंद करावी, असंही वाटत असतं.
दुसरीकडे, एक कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून नाव कमावलेला सूरी स्वत:ला एक कर्तव्यशून्य पिता मानत असतो. कारण त्याचा अल्पवयीन मुलगा, त्याच्या अपरोक्ष अपघाती मरण पावलेला असतो. ह्या अकस्मात धक्क्यामुळे सूरी आणि त्याची पत्नी रोशनी (राणी मुखर्जी) खूप अस्थिर असतात. दोघांतला संवाद खुंटलेला असतो. मनातल्या अपराधी भावनेमुळे सूरी अबोल, एकलकोंडा झालेला असतो. ह्या मानसिक अस्वास्थ्यामुळे रात्रीची झोप हरवलेला सूरी बहुतेकवेळा रात्र-रात्र घराबाहेरच राहत असल्याने त्याचे व त्याच्या पत्नीचे नाते अजून बिघडत चाललेले असते.
अश्या विचित्र मानसिक व कौटुंबिक कोंडीत असलेल्या सूरीला एक अनाहूत वेश्या रोझी (करीना कपूर) अपघाताची केस सोडविण्यासाठी काही मदत करते आणि त्याला मानसिक आधारही देते. तो केसच्या मुळापर्यंत जाण्याच्या दिशेने झटू लागतो. हळूहळू गुंते उलगडत जातात आणि उघडकीस आलेले सत्य त्याचा वैयक्तिक आयुष्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोनही बदलते.

'तलाश' म्हणजे केवळ कुठली रहस्यकथा नाही किंवा फक्त एक भावनिक नाट्यही नाही. ही तलाश, हा शोध केवळ एका पोलिसाचा नसून एका पतीचा, पित्याचा आणि एका वेश्येचाही आहे. काही वेळी म्हणूनच आपल्याला असं वाटत राहातं की दिग्दर्शिकेला नक्की काय मांडायचं आहे ? थरारनाट्य की भावनाट्य ? उत्तर आहे - दोन्ही. फलित आहे - अप्रतिम !

talaash_350_110512050053.jpg

सिनेमा आमीर खानचा आहे, म्हटल्यावर सिनेमाभर आमीर असणारच, आहेच ! पण त्याने रंगवलेला सूरी व इन्स्पेक्टर शेखावत लाजवाब.
करीना व राणी, दोघींना मर्यादित वाव असला तरी दोघीही चोख काम करतात. राणी मुखर्जी खूप आकर्षक दिसते.
छोट्याश्या भूमिकेत नवाझुद्दिन सिद्दिकी परत एकदा आपली छाप पाडतो. त्याचा पाठलाग होत असतानाचा संपूर्ण भाग अतिशय थरारक झाला आहे.
पटकथा अजून जराशी आवळता आली असती, पण जशी आहे तशीही छानच !
दिग्दर्शिका रीमा कागती, दुसऱ्याच सिनेमात खूप प्रभावी पकड दाखवते.
बऱ्याच दिवसानंतर एका सिनेमात गाणी कानांवर बलात्कार करत नाहीत. त्यासाठी राम संपत ह्यांचे विशेष आभार !
हीरोच्या अंगावर 'खाकी' आहे म्हणून त्याने काहीही अचाट उड्या माराव्या, ठोसे लगवावे आणि 'माइंड इट' इष्टाईलने दुर्जनांचा नि:पात करावा असल्या दाक्षिणात्य मोहाला बळी न पडल्याबद्दल दिग्दर्शिका व एक्शन दिग्दर्शकाचेही आभार !!

काही ठिकाणी जराशी गती मंदावली असली, शेवट झाल्यानंतरही शेवट चालू ठेवला असला, तरी 'तलाश' नक्कीच ह्या वर्षातील उत्कृष्ट सिनेमांपैकी एक आहेच.

(अवांतर : "जब तक हैं जान" पाहिल्यापासून जर कुणाला बॉलीवूड-अपचनाचा त्रास सुरू झाला असेल, तर 'तलाश'ची एक गोळी हा रामबाण उपाय ! - इति वैद्य रणजित पराडकर !)

रेटिंग - * * *

http://www.ranjeetparadkar.com/2012/12/talaash-movie-review.html

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल माझ्या एका मित्राने गमेलवर स्टेटसमध्येच लिहून टाकलं होतं मर्डररचं नाव..
ते खरं आहे की खोटं हे बघायला तरी पिच्चर बघावा वाटतो. Proud

रणजित, तुमच्यामते या वर्षातला one of the best पिच्चर असूनही तुम्ही मात्र लिहिण्याच्या बाबतीत हात का आवरता घेतलाय?

तद्दन मुर्खपट........ Happy

कलाकारांचा अभिनय सोडला तर बाकी चित्रपटात काहीच नाही आहे...मुद्दामुन रहस्य म्हणुन दाखवण्यासाठी टाकलेले मुर्ख संवाद आणि प्रसंग... कशाला ही आगा पिछा नाही...
सुरुवातीलाच एक हवालदार शेखावत ला सांगतो.. "साब इस जगह पर ऐसे पेहले भी अ‍ॅक्सिडेंट हो चुके है .. पर कुछ हात नाही लगा" पण नंतर च्या चित्रपटात ते आधीचे झालेले अपघातांचा कुठेच उल्लेख नाही? शेखावत ने त्या अपघाताची साधी चौकशी देखील करण्याचे दाखवले नाही?
.
.अजुन भरपुर बकवास आहे......नंतर ...आधी काम करतो Wink

मला पण काल फेबु वर एंड कळाला.. जाम राग आला टाकणार्याचा . .पण तरीपण उद्या जातेय थरार अनुभवायला.. आताच म.टा वर पण रीव्ह्यु वाचला ..कहाणी टाईप थ्रील ... परवा आल्यावर कमेंट टाकेनच परत.. Happy

रसप,
मी शेवट फोडू ? Proud
मी पण पाहिला काल आणि सिनेमा सुटल्यावर डोक्यात पहिला विचार तुझाच आला.
आणि तुझं परिक्षण आलं.

>>मला पण काल फेबु वर एंड कळाला.. <<

दीपाली... जो शेवट थोपु वर फोडलेला आहे, तो चुकीचा आहे... खरा शेवट जाणून घ्यायचा असल्यास मेल आयडी द्या... सांगतो !

-----------------------------------

किरण...

तुम्हालाही थोपुवरून कळलेले असल्यास विसरा !!

-----------------------------------

दक्षिणा...

धीर धरा !!

------------------------------------

उदयन..

दिवा घ्या!

------------------------------------

आनंदयात्रीजी...

वेळ कमी होता, म्हणून !! Happy

कैच्याकै.......थोपु वरचाच खरा आहे.... Lol
आणि ते काही रहस्यच नाही आहे... ठिगळ लावल्यासारखे आहे

रसप...घ्या दिवा तुम्हीच Wink

हो हो,कालपासून जो शेवट फेबु, गमेल, समस वर येत आहे तो चुकीचा आहे.

दिग्दर्शिकेला नक्की काय मांडायचं आहे >> अगदी अगदी
काल हा सिनेमा पाहील्यावर माझ्यापण डोक्यात हाच विचार आला..

रणजित, तुमच्यामते या वर्षातला one of the best पिच्चर असूनही तुम्ही मात्र लिहिण्याच्या बाबतीत हात का आवरता घेतलाय?
>>>>>>>>>>>>>>

रणजित बर्‍याचदा त्रोटक आणि थोडक्यात महत्वाचे सदरातच लिहितो..... जब तक सारख्या सिनेमांमुळे त्याला लेंथ वाढवणं भाग पडलं आणि जाता जाता यश चोप्रा त्याचं भलं करून गेलेत Wink

है का नाय रे जीतू....... Proud

बाकी, कालच जब तक वर लिहिलं होतं की उद्या तुझा तलाशचा रिव्ह्यू येणार...... शब्द राखल्याबद्दल तुझे धन्यवाद. Happy

आजच बघायचा आहे.....

उदयन, अगदीच काही मुर्खपट नाहीये हो....!! JTHJ पेक्षा बरा आहे. पण one of the best नाही वाटला.
शेवट गुंडाळला आहे. आणि इंटर्वलच्या आधीचा खूप स्लो झालाय.
राणी मुखर्जी ला तर काही कामच नाहीये. BTW, राणी मुखर्जी ने आडनावाच स्पेलिंग बदललेलं दिसतंय. नावं दाखवताना '' मुकर्जी '' लिहिलेलं दिसलं.
तो ''तैमुर '' झालेला ''कहानी '' मधला इन्स्पेक्टर आहे ना?
आणि अरमान कपूर ची बायको दाखवलेली heroine '' एक दुसरेसे करते हैं प्यार हम'' ह्या हिंदी सिरीअल मधली ''भाभी मां'' आहे.

बाकी, ( हीरोच्या अंगावर 'खाकी' आहे म्हणून त्याने काहीही अचाट उड्या माराव्या, ठोसे लगवावे आणि 'माइंड इट' इष्टाईलने दुर्जनांचा नि:पात करावा असल्या दाक्षिणात्य मोहाला बळी न पडल्याबद्दल दिग्दर्शिका व एक्शन दिग्दर्शकाचेही आभार !!

काही ठिकाणी जराशी गती मंदावली आहे.))+१

'वन ऑफ द बेस्ट' नसेलही कदाचित.. पण मी 'ज.त.हैं.जा.'च्या धक्क्यातून सावरत असतानाच्या काळात हा सिनेमा पाहिला आहे, ही गोष्ट ग्राह्य धरून मला तेव्हढा 'बेनिफिट' द्यावा, अशी सर्वांना विनंती ! Happy

-------------------------------------------------

भुंगा...

Happy

---------------------------------------------------

घाई गडबडीत एक स्टार जास्त टायपला गेला आहे.... मी 'कहानी'ला साडे तीन दिले असताना ह्याला चार देऊच शकत नाही.. असो! Sad

का?? कधी?? कुठे?? कसं?? कोणी???

याची उत्तरे कृपया देऊ नका....... "कहानी" नंतर ठरवून बघणार आहे (प्रोमोज पाहून) असा हा सिणूमा आहे...... उगाच रहस्यातली हवा काढू नका लोक्स... Wink

स्टारच कमी करायचा आहे ना? त्यातकायएवढं? पोस्ट एडीटा की.. इथे लोक अख्ख्या पोस्टी बदलतात! आपण तर जेन्युइन रिजन देऊन र्‍हाईलात की!

भुंगा़जी, रहस्य कळायला नको असेल तर तुम्ही येऊन वाचू नका की.. उगाच कैच्याकै लिवायचं!

जगदंब!!

मला वाटतं, की कहानी आणि तलाशची तुलना करता येणार नाही. 'कहानी' एका शोधाची कथा म्हणून सुरू होतो आणि शेवटी त्याचं रूपांतर सुडनाट्यात होतं. संपूर्ण व्यावसायिक पद्धतीने बनवलेल्या या चित्रपटाला अत्यंत वेगवान अशी ट्रीटमेंट देण्यात आली होती- जी त्याचा युएसपी ठरला. विद्या, नवाजुद्दीनसारख्यांच्या अचाट कामाची त्याला जोड मिळाली. तलाश मध्ये सुडनाट्याचा एक पदर असला तरीही भावना आणि स्वतःच्या शोधात, तत्वं-श्रद्धांच्या शोधाभोवती संपूर्ण सिनेमा फिरतो. थरार आणि सस्पेन्सला जास्त वेटेज मिळू नये, म्हणून मुद्दाम स्लो ट्रीटमेंट दिलीय हे लगेच लक्षात येतं. कॅमेर्‍याचे सोळा सोळा अँगल्स वापरलेले नाहीत. धडकी भरवणार्‍या संगीताचा, अंधाराचा, धक्कातंत्रांचाचा आणि एकूणच तंत्राचा सोस टाळला आहे. आमिरच्या बुद्धीप्रामाण्याची कल्पना आणि त्यावर अतिविश्वास असलेल्यांना शेवट कदाचित पटणार नाही. पण तसा विश्वास ठेवू नका, कारण 'मी शेवटी 'कलाकार' आहे, मला सारे प्रयोग आणि सगळ्या प्रकारचं काम करून बघायचं आहे'- हेही त्याला सुचवायचं असेल, असं वाटलं.
जगताना आपल्याला नक्की काय हवं असतं, आणि कशाच्या सतत शोधात असतो - याचा विचार करताना स्वतःच्या श्रद्धा, कल्पना आणि बुद्धीवर आपण किती विश्वास ठेवतो! या गोष्टी बाजूला ठेवल्या, तर किती कोटी शक्यतांनी भरलेलं जग सामोरं येऊ शकतं, याची कल्पना यानिमित्ताने करावीशी वाटली.

या वर्षातला एक महत्वाचा सिनेमा- याबद्दल अनुमोदन.

आणि- सस्पेन्स उघड करणं म्हणजे त्याला सर्वात जास्त महत्व देणं. नक्की कशाला महत्व द्यायचं, हे जो तो ज्याचं त्याचं ठरवतोच. पण तो तसा आधीच उघड झाला तर 'मनोरंजन' भागाची वाट लागेल हेही आहेच आहे.

Biggrin
काही संवाद आणि प्रसंग टाकुन रहस्य बनवणे वेगळे आणि गोंधळ करणे वेगळे ... त - लाश मधे गोंधळ होतो जो शेवट पर्यंत चालुच असतो... अतिशहाणा त्याचा बैल रिकामा...हा वाक्य प्रचार पर्फेक्ट बसतो.. Biggrin

कहानी आणि तलाश याची तुलना बिलकुल होणार नाही..कारण कहानी मधे सस्पेंस कायम होता जो शेवट पर्यंत टिकुन राहतो.. आणि स्टोरी १ सेकंद सुध्द्दा भरकटली नाही..एक ही प्रसंग अथवा संवाद हा चुकिचा नव्हता.

यात तर संवाद तर संवाद प्रसंग ही पाणी टाकुन बनवलेले.. नशिब बार मधले करिनाचे गाणे नाही दाखवले Wink नाहीतर अजुन गोंधळ वाढला असता..
नेमके कशावर लक्ष केंद्रित करायचे हेच दिग्दर्शकाला कळाले नाही.. तरी नशिब चांगले त्यांनी स्टारकास्ट पर्फेक्ट घेतली त्यामुळे डुबते को तिनके का सहारा. मिळाला...
आमिर खान , राणी मुखर्जी, आणि इतर कलाकार.यांचा अभिनय इतका अप्रतिम झाला आहे की.. बाकीच्या कथेला अर्थ नाही उरला तरी पैसे वसुल होतात..निव्वळ अभिनयासाठी १०० रुपये खर्च झाल्याचे समाधान मिळते.. बाकी आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे..!!!
.

रहस्यकथा म्हटल्यावर जेवढे प्रश्न संपुर्ण चित्रपटात प्रेक्षकाला पडतात ते सगळ्यांची उत्तरे शेवटी दिली गेली पाहीजे या मताचा मी आहे..इथे उलट जेवढे प्रश्न पडतात त्याची उत्तरे सोडा...उलट अजुन जास्त प्रश्न डोक्याचा भुगा करतात... याचाच अर्थ त्याप्रश्नांची उत्तरे खुद्द कथाकार आणि पटकथाकार यांना सुध्दा मिळाली नाहीत अथवा त्यांनी ती शोधण्याचा प्रयत्न देखील केला नाही...
.
१) त्या अपघाताआधी बरेच तसेच अपघात त्याच जागी झाले..ते कुणाचे, कशासाठी, का झाले ?
बर झाले तर झाले.... त्या अपघातांची साधी चौकशी करावीशी वाटली का नाही ?
३) करीना ३ वर्ष काय करत होती ? शेखावत ची वाट बघत होती का ?
४) करीना ने आपले खरे नाव सांगितले असते तरी काय फरक पडला असता ?
५) तिने केवळ त्या विशिष्ट मुलीलाच का सोडवले ? त्रासात तर बर्याच होत्या..?
६) निव्वळ फोन वरुन धमकावल्यावर लगेच कोणी २० - २० लाख ३ वर्ष देत का ?
७) या सर्व प्रसंगात तैमुर चा काय संबंध..? त्याने काय केलेले चुकिचे ?
८) कमिशनर स्वतः पोलिस स्टेशन मधे येउन भेट घेतात एका इस्पेक्टरची ? इतका महत्वाचा आहे तो ?
९) शशीला जर माहीम मधे जत्रेत सर्वांदेखत गोळी झाडुन ठार मारले तर त्याचा मृत्युदेह पाण्यात कसा सापडला ????????????
पार डोक्याचा भुगा झाला राव..:खोखो:
.
ज्याला आवडला त्याने उत्तर द्यावीत ...

या पेक्षा ही गोष्ट वाचा... कुठेही पकड सुटलेली नाही..ही खरी "तलाश" ची स्टोरी ..

Pages