कोलंबस, इंडियाना मधील सार्वजनिक गणेशोत्सव

DSCF3224.jpg

कोलंबस, इंडियाना मधील सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे तिसरे वर्ष. सगळ्या गावाचा हा गणपती. ३०० हून अधिक भक्त मंडळी रोजच्या आरतीला ५ दिवस आवर्जून हजेरी लावतात. गणपतीच्या दिवसात अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तन, विष्णू सहस्त्रनाम ह्या धार्मिक कार्यक्रमांपासून चित्रकला स्पर्धा, पाककला स्पर्धा आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रम ही उत्साहाने साजरे होतात.

विसर्जनाच्या मिरवणुकीला तर सगळ्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. तासभर चालणार्‍या मिरवणुकीत गणपतीच्या पालखीसमोर भक्त मंडळी आवर्जून फुगड्या घालतात. ढोलाच्या तालावर मंडळी नाच ही करतात. "गणपती बाप्पा मोरया", "पुढच्या वर्षी लवकर या" च्या घोषणांनी सगळं वातावरण भारून जातं.

फक्त भारतीयच नव्हे तर अमेरिकन लोकंही आरतीला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना उत्साहानी येतात. कोलंबसच्या मेयर पासून येथील वर्तमानपत्रापर्यंत सर्वजण आपल्या ह्या सणाबद्दल माहीती घेतात, तो समजून घेऊन त्यात आनंदाने सहभागी होतात.


पाल़खी, फेटे, फुगड्या आणि सांस्कृतिक कार्यक्रम... मजा आहे!



अरे वा,
अगदी कसबा गणपती सारखी निघलीये मिरवणूक !!



क्या बात है! झकास रे

-परागकण