पापड चाट..

Submitted by सुलेखा on 25 November, 2012 - 12:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हॉटेल किंवा ढाब्यावर जेवायला गेले कि मसाला पापड मागवता येतो तसेच घरीही करता येतो.त्यासारखीच ही पापड चाट आहे..बोरिवली स्टेशन जवळ,"इंन्द्रप्रस्थ्"च्य समोर ही पापड चाट खाल्ली..खरंच या "भैय्या" लोकांचे डोके अजब- गजब आहे.
तर ही पापड चाट करण्यासाठी लागणारे पापड हे नेहमीचे नाहीत.मैद्याची उकड काढुन त्यात नांवाला मेथीची पाने घालुन केलेले जाडसर पापड आहेत..स्टँडवर करतात त्या पापड्याही चालतील किंवा तांदुळ पिठी ,ज्वारी पिठाची उकड काढुन लाटुन पापड करतात ते ही चालतील.
पापड.
पानकोबी,कांदा,टोमॅटो,कोथिंबीर बारीक चिरलेली.तसेच गाजर व काकडीची साले न काढता किसुन घ्यावी.
अमूल बटर,हि.मिरची-पुदिना-कोथिंबीर -लिंबूरस -मीठ घालुन वाटलेली पातळसर चटणी.
टोमॅटो सॉस /केचप, बारीक शेव[/इतर कोणतीही शेव चालेल ] ,जिरेपुड,आमचुर पुड,काळे मीठ,साधे मीठ ,अगदी किंचित मिरेपुड असे एकत्र करुन केलेला मसाला.किंवा चाट मसाला/पाणीपुरी मसाला/जलजीरा काहीही चालेल.
Paapad chat.. 004.JPG
वरील प्रचि मध्ये या उकडीच्या पापडाची कल्पना येण्यासाठी एक पापड कच्चा व एक भाजलेला ठेवला आहे.
Paapad chat.. 007_0.JPG

क्रमवार पाककृती: 

अमूल बटर पातळ करुन घ्यावे.
पापड भाजुन घ्यावा..
भाजलेल्या पापडाच्या एका बाजुला चमच्याने पातळ केलेले बटर लावुन घ्यावे.
एका ताटलीत हा पापड ठेवुन त्यावर मधोमध तळहाताने दाबुन त्याचे ४-५ तुकडे करुन घ्यावे..हे तुकडे ,पापडाच्या मूळ आकारातच ,गोलाकार जमवावेत्.आता चमच्याने त्यावर हि.चटणी लावावी.
त्यावर चिरलेल्या व किसलेल्या भाज्या ,टोमॅटो सॉस/केचप,मसाला व शेव पसरवावी.
Paapad chat.. 010.JPG
पापड चाट तयार आहे

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी एक.
अधिक टिपा: 

डाएट करणार्‍यांनी बटर व शेव वगळावी.
भाजका पापड आणि कच्च्या भाज्या आहेत त्यामुळे पथ्यकर आहे.
पापडा ऐवजी फुलका किंवा ज्वारी-मका भाकरी कडक भाजुन त्यावर बाकी वरील प्रमाणे करता येईल.
टॉपिंग मधे व्हेरीएशन्स आणता येतील.मटार ,भिजवलेले शेंगदाणे,उकडलेले हरभरे/मोडाचे मूग/काबुली किंवा देशी चणे/राजमा,कॉर्न,किसलेले चीज-चीज स्लाइस असे काही वापरता येईल..
अगदी थोडा कांदा-काकडी-टोमॅटो -पुदिना ,जिरेपुड व मीठ हे जिन्नस दह्यात कालवुन तयार केलेले स्प्रेड [म्हणजे आपली नेहमीचीच पण चवीला साखर न घातलेली कोशिंबीर]मक्याच्या शिळ्या भाकरीवर पसरुन वरुन सजवलेला देसी पिझ्झा ही छान लागतो .
शेव-बटाटा-दही पुरी [एस.पी.डी.पी] सारखीच ही पापड चाट आहे.
यात थोडेसे विषयांतर :-उकड काढुन केलेले पापड नेहमी तळुन खातात .कारण भाजले कि ते फार कुडुम-कुडुम लागतात.त्यामुळ कोणी पथ्याचा [हार्ट वाला]आला असेल तरच हा पापड भाजुन खातात असे निदान मलातरी लहानपणी हेच माहित होते..गुजरातेत असे वेगवेगळे पापड [उन्हाळ्यात ]दररोज तळुन ठेवायचे व पाणी पिण्याआधी एक पापड खायचा .अशी पद्धत तेव्हा होती.कॅलरी वगेरेची भानगड तेव्हा आजच्या इतकी अस्तित्वात नव्हती.एकतर गुजराती लोकांत तेलाचा वापर सढळ हस्ते होतो.भाजी पूर्ण तेलातच शिजवतात.

माहितीचा स्रोत: 
बोरिवली इन्द्रप्रस्थ समोरचा भैया.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.

मस्त

छान प्रकार, आता त्यासाठी बोरिवलीला नाहीतर तूमच्या घरी यावे लागेल !
केनयात पण गुजराथी बायका असे पापड करतात आणि जेवणाच्या टेबलावर ठेवलेले असतात, ( त्या पापडाची पण कृती, लिहा ना प्लीज. )

आवडले.

अजुन एक गुजराती चिवडो...म्हणजेच पापड चवाना...ह्या चिवड्यात भाजलेले पापड मोडुन टाकलेले असतात. मस्त चव असते.

अजुन एक म्हणजे भाकरी बरोबर भाजी ऐवजी पापडाचा किसमुर्/कुसमुर्/कुसमुड त्यात थोडी मिरची पुड, मीठ व तेल जबरा कोम्बो होतो. हा खानदेशी तडका आहे बरं !!!!