याच आशेवर सुरु असावा श्वास..

Submitted by -शाम on 9 November, 2012 - 12:24

इथे दगडांच्याही पुन्हा भेटी होतात
याच आशेवर सुरु असावा श्वास..
नाहीतर थांबलाच असता प्रवास

चुकून लागलेला फोन
झालेली ओळख
जुळलेले बंध
सगळंच चुकून.. तरीही बरोबर वाटणारं
किती भर्रकन उडून जातात न सुखाचे क्षण

आणि
उरलेल्या आठवणी उकरत राहतात तळ
मातीला होणाऱ्या वेदनांना न जुमानता
त्यांना काय... पाण्याशी मतलब

आठवतं एकमेकांना शिकवलेलं
खोटं बोलणं, वाट पाहणं
हसणं-रडणं, समजावणं
पण फसवणं मात्र तुलाच जमलं

आता उध्वस्त होऊन निपचित पडलोय
काळजाच्या गावातून त्सुनामी गेल्यासारखा
वाढदिवस, ग्रीटिंग्स, भेटी
हॉटेलची बिलं, सिनेमाची तिकिटं
आईस्क्रिमचे चमचे, कोल्ड्रिंक्सचे स्ट्रॉ
रंगीत धागे........
काय काय साचलं होतं ना?

तरीही त्सुनामीपेक्षा तूच आठवतेस
आणि वाटतं
आज नक्कीच येशील...बास्स

याच आशेवर सुरु असावा श्वास..
.........................................,,,,,,,,,,,,,,,,,,,,..शाम

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह्....सुरेख.... Happy

उरलेल्या आठवणी उकरत राहतात तळ
मातीला होणाऱ्या वेदनांना न जुमानता
त्यांना काय... पाण्याशी मतलब

हे आवडले.....:)

उरलेल्या आठवणी उकरत राहतात तळ
मातीला होणाऱ्या वेदनांना न जुमानता
त्यांना काय... पाण्याशी मतलब

आता उध्वस्त होऊन निपचित पडलोय
काळजाच्या गावातून त्सुनामी गेल्यासारखा

अशा काही ओळी आवडल्या..

>> आता उध्वस्त होऊन निपचित पडलोय
काळजाच्या गावातून त्सुनामी गेल्यासारखा
वाढदिवस, ग्रीटिंग्स, भेटी
हॉटेलची बिलं, सिनेमाची तिकिटं
आईस्क्रिमचे चमचे, कोल्ड्रिंक्सचे स्ट्रॉ
रंगीत धागे........
काय काय साचलं होतं ना?>>

आवडलं.