बार्ली-मूग सुप..

Submitted by सुलेखा on 2 November, 2012 - 00:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

उसगावात असताना एका अमेरिकन मैत्रीणी कडे जेवायला गेले होते.शाकाहारी जेवण केले होते .त्यात हे सुप व "कडकणी"पिट्टा ब्रेड होती..ब्रेड न खाता मी सुप घेतल म्हणुन मैत्रीणीने गोड व मऊ अशी रेझिन ब्रेड दिली.सोबत चॉकोलेट केक व जेवणानंतर हेलोविन च्या निमित्ताने ट्रेडर जोस चे विशेष "पम्पकिन आइसक्रीम "होते.
आपण नेहमी टोमॅटो ,कॉर्न ,पालक ,गाजर सुप करतो ते पातळसर असते.पण हे सुप चावुन खायचे होते.म्हणजे आपण पातळ खिचडी किंवा दलिया करतो तसे.मिरे पुड -जिरेपुड व हर्ब्ज घालुन केले होते.त्यानंतर मी आपल्या पद्धतीने फेरफार केले.छान लागले.
३/४ वाटी सबंध मुग ३-४ तास भिजवुन ठेवले व त्यांना कापडात बांधुन मोड आणले..
१/२ वाटी बार्ली २-३ वेळा पाण्याने धुवुन थोड्या पाण्यात ३-४ भिजवुन ठेवली.
[मैत्रीणीने मुग व बार्ली हे दोन्ही जिन्नस धुवुन पॅन मधे शिजवले.३-४ तास भिजवले नाहीत]त्यानंतर कुकर मधे उकडुन घ्यायचे आहेत.त्याबद्दल कृति मधे लिहीले आहे.उकडलेले मुग व बार्ली असे दिसते.
Barley soup.. 001.JPG
२ टोमॅटो ,२ गाजर,१ लहान कांदा,थोडीशी पानकोबी,थोडी पानकोबी बारीक चिरुन घेतल्या.
२/३ लसणीच्या कळ्या ठेचुन घेतल्या.
१/२ इंच आले किसुन घेतले.
५-६ कढीपत्याची पाने,
१ चक्रीफुल..
१ १/२ चमचा मालवणी मसाला.[कोणतीही करी पावडर/सांबार पावडर/पावभाजी/धनसाक आपल्याकडे स्वयंपाक घरात उपलब्ध असणारा कोणताही मसाला चालेल. चवीप्रमाणे घालायचा.]
लिंबाचा रस चवीप्रमाणे.
हे आहे इतर साहित्य.
Barley soup.. 003.JPG
मीठ.
१ टेबल्स्पुन तेल.
१/२ चमचा जिरे.

क्रमवार पाककृती: 

मोड आलेले मुग व बार्ली पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवुन घ्या.
२ वेगवेगळ्या पातेल्यात ठेवुन त्यात थोडे पाणी घालुन प्रेशर पॅन मधे ३ शिट्या येईपर्यंत शिजवा.
[बार्ली व मुग एकत्र एकाच भांड्यात शिजवले तरी चालेल.मी शिजवलेले खुप छान "गटपट" शिजले होते व तसेच शिजायला हवे आहे..म्हणुन त्यातले २ चमचे फोटोसाठी वरुन घालायला [मुग अन बार्ली फोटोत स्पष्ट दिसावी म्हणुन ] वेगळे काढुन ठेवले..]
पॅन मधे तेल गरम करुन त्यात जिरे व चक्री फुल घालावे .त्यानंतर लसुण ,आले,गाजर ,टोमॅटो घालुन परतावे.
थोडे पाणी घालुन गाजर बोटचेपे होईपर्यंत पॅन वर झाकण ठेवुन शिजवावे.
आता त्यात कढीपत्याची पाने हाताने तोडुन,पानकोबी,शिमला मिरची टाकावी .
मालवणी मसाला व १ ग्लास पाणी घालावे.मिश्रण उकळले कि त्यात उकडलेली बार्ली व मुग घालावे..पावभाजी घोटायचा चपटा चमचा किंवा पळीने घोटुन घ्यावे.मिश्रण घोटले गेले पाहिजे.छान ढवळावे.मिश्रण पातळसर दिसले पाहिजे त्यात लागेल तसे पाणी घालावे.झाकण ठेवुन मध्यम आचेवर १५ मिनिटे शिजु द्यावे.अधुन मधुन २-३ वेळा मिश्रण ढवळावे.
आता चवीप्रंमाणे मीठ व लिंबु रस घालावा.चव पाहुन जरुर असेल तर मा.मसाला घालावा,मिश्रण घट्ट वाटत असेल तर थोडे पाणी घालावे एक उकळी आणुन गॅस बंद करावा.
Barley soup.. 005.JPG
पोटभरी चे वन्-डिश-मील,गरम सुप तयार आहे.त्यावर बटर कोथिंबीर,क्रीम किंवा तसेच काहीही न घालता खायला घेता येते.

वाढणी/प्रमाण: 
४ व्यक्तिंना पुरेसे होते.
अधिक टिपा: 

चवळी,राजमा,देशी किंवा काबुली चणा,बीन्स चे ओले दाणे इ.कडधान्ये घेता येतील.तसेच मुगडाळ,मसुर डाळ ,चणाडाळ वापरता येईल.तेला ऐवजी बटर वापरता येईल किंवा सुप तयार झाल्यावर त्यात बटर टाकावे.चव छान येते .[मी बटर वापरले नाही.]
भाज्या घरात असतील त्या --फरस बी,चवळी,गवार,मटार दाणे,फ्लावर वापरता येतील.
गाजर ,फरस बी,चवळी-गवारीच्या शेंगा असतील तर आधी त्या टाकुन शिजवा..शिमला मिरची.पानकोबी, फ्लॉवर अशा लौकर शिजणार्‍या भाज्या नंतर घाला..
थोड्या वाफवलेल्या शेवग्याच्या शेंगा घातल्या तर स्वाद व पौष्टीकता वाढेल.
टोमॅटो च्या आंबट पणा नुसार लिंबु रस घालायचा आहे तेव्हा सुप खायला घेताना सोबत लिंबाची फोड द्या.
मिश्रणात मसाला उकळवल्याने त्याचा तिखटपणा /तिव्रपणा वाढतो.म्हणुन आधी थोडा व सुप शिजल्यावर चव घेवुन त्याप्रमाणे आणखी टाकावा.
एक च चक्रीफुल टाकले आहे त्याचा स्वाद मस्त येतो.इतर खडे मसाले वापरायचे नाहीत .
सोबत ब्रेड चे उभे काप करुन ,मावे त [किंवा तव्यावर,ओव्हन मधे]कुरकुरीत करुन घेतले .

माहितीचा स्रोत: 
माझी मैत्रीण व स्व-प्रयोग.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users