सदस्य प्रवेश |
मराठी भाषा नि मायबोलीअहं ब्रह्माSस्मि या माझ्या लेखाला काही प्रतिसाद मिळाला नाही, पण मराठी भाषा नि मायबोली यांना मात्र फारच मोठा प्रतिसाद मिळाला. बिचार्या श्री. कुलदीप यांच्या शेवटल्या लिखाणाला दोन महिन्यात कुणि प्रतिसाद दिला नाही, म्हणून मीच देतो. त्याचे काय आहे लोकांची आजकाल प्रचंड प्रमाणात दिशाभूल झाली आहे. म्हणजे कुणि एकाने (बहुधा परदेशी, इंग्लड, अमेरिकेतला असावा. भारतातल्या तज्ञ लोकांचे कोण ऐकतो? त्यातून त्याने मराठीत लिहीले असले तर विषयच खुंटला!) म्हंटले की जे पाठ करायची गरज नाही ते उगाच पाठ करून मेंदू 'भरवून' कशाला टाकायचा? म्हणजे संगणक असताना आता पाढे पाठ करायची काय गरज आहे? मग सात गुणिले आठ करायला संगणक (calculator ला समर्पक, वापरायला सोपा असा मराठीत शब्द काय?) लागतो. मग आता वैश्विक युगात जर इंग्रजीच महत्वाची तर मराठी कशाला पाहिजे? मागे एकाने सांगितले की आईनस्टाईन म्हणाला की आपण मेंदूच्या फक्त एक दशांश भाग आयुष्यात वापरतो, नऊ दशांश रिकामाच असतो. त्यामुळे मेंदूत कितीहि भरलेत तरी हरकत नाही, पण खूप शिका, विचार करा असे त्याला म्हणायचे होते. अजूनहि एकाहून जास्त भाषा शिकल्याने मेंदूचा काही विकार झाल्याचे ऐकीवात नाही. तर मराठी सुद्धा शिकायला काय हरकत आहे? पण नाही. आपण काही 'आईनस्टाईन' नाही अशी पराभवात्मक (आळशी) भूमिका घेतली की त्रास नाही! त्यांच्या मदतीसाठी आणखी एक शोध लागला आहे. कुणितरी असे दाखवले की एक दशांश नाही, जेंव्हा मेंदू विचार करतो, किंवा काही आठवतो तेंव्हा मेंदूच्या सर्व शक्ति वापरल्या जातात! म्हणजे एका गाडीला पंधरा डबे आहेत. प्रत्येक डबा ५ मी. X ३ मी. क्षेत्रफळाचा आहे. प्रत्येक डब्यात एक माणूस आहे. म्हणजे गाडी भरली आता! अजून आणखी कुणि मावणार नाही त्या गाडीत!! मुंबईत अजूनहि कुणि मुंबई ते ठाणे गाडीतून प्रवास केला असेल त्यांना पटेल का हे? मग ज्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी, अशा भाषा नि त्यांचे व्याकरण शिकले आहे त्यांना मराठी व्याकरण, मराठी बोलणे लिहीणे हेच का कठिण किंवा लाजिरवाणे किंवा कमीपणाचे वाटावे? |
|
>>calculator<<
"गणकयंत्र"... हा शब्द समर्पक आहे, हां आता वापरायला सोपा आहे की नाही याच्यावर मतभिन्नता असू शकते
धन्यवाद झक्की! काय पण रूपकं वापरली आहेत इथं
(म्हणजे एका गाडीला पंधरा डबे आहेत. प्रत्येक डबा ५ मी. X ३ मी. क्षेत्रफळाचा(>>) मस्तच! अणि पटतयही! पण मागे ही तुम्ही >>> पटणार नाही (मला) असा (गैर) समज केला होतात! अन् तेंव्हा ही उत्तर मिळाल नव्हत
असो गैरसमज दूर होणे जास्त महत्वाचे
........
विद्या ददाति विनयं विनयाद् याति पात्रताम्
पात्रत्वाद धनमाप्नोति धनाद् धर्मः तत सुखम्...
कुलदीप, तुझ्या लेखाची लिंक दे ना. म्हणजे हा लेख कशावरून आला ते कळेल.
झक्की, फार छान.
गणकयंत्र"... हा शब्द समर्पक आहे, हां आता वापरायला सोपा आहे >>>तो कुठला आहे त्यावर ते अवलंबुन आहे नाही का?
........
विद्या ददाति विनयं विनयाद् याति पात्रताम्
पात्रत्वाद धनमाप्नोति धनाद् धर्मः तत सुखम्...
........
विद्या ददाति विनयं विनयाद् याति पात्रताम्
पात्रत्वाद धनमाप्नोति धनाद् धर्मः तत सुखम्...
http://www.maayboli.com/node/1114 मायबोलीवर मराठी का नाही! ही ती लिंक! मला काही प्रतिसादाच्या लिंकवरून देता नाही येत
कुणी सांगाल का?
........
विद्या ददाति विनयं विनयाद् याति पात्रताम्
पात्रत्वाद धनमाप्नोति धनाद् धर्मः तत सुखम्...
>>तो कुठला आहे त्यावर ते अवलंबुन आहे नाही का?
हो तेही आहेच म्हणा!
मला वाटत 'कॅसिओ'चे गणकयंत्र वापरायला सोपे आहेत
बाय द वे... अरे चुकल चुकल..
तर काय म्हट्ल पाहिजे... हां.... बये रस्ता दे, ते 'कॅसिओ' ला मराठीत काय बरे म्हणायचे?
बाय द वे... अरे चुकल चुकल.. ते 'कॅसिओ' ला मराठीत काय बरे म्हणायचे?>>> काय म्हणणार कप्पाळ! तू अस ही म्ह णू श क तो स की सायंटिफीक>> म.श. शोध आता
गणकयंत्र वापरायलाकठीण आहे
........
विद्या ददाति विनयं विनयाद् याति पात्रताम्
पात्रत्वाद धनमाप्नोति धनाद् धर्मः तत सुखम्...
'कॅसिओ' हे नाव आहे हो. नावाचे भाषांतर करत नाहीत. फक्त भारतीयच तसे करतात. आनन्द चे Andy, सुधीर चे Sid. पण आपण मात्र Szmigielski किंवा Wyszkowski असल्या नावाचा उच्चार चुकीचा केला गोरे आपल्याला हसणार! नि आपण पडलो सर्वांचा मान राखणारे नि शिवाय हुषार. आपण शिकतो. चांगले आहे. पण त्यांच्या सोयीसाठी आपली नावे का बदला?!
साहेब मराठीत लिवा ओ म्या अडानी मानूस!
God made Man and tailor made Gentleman!
>>'कॅसिओ'चे गणकयंत्र वापरायला सोपे आहेत
'कॅसिओ'ची गणकयंत्रे वापरायला सोपी आहेत/असतात
'कॅसिओ'चे गणकयंत्र वापरायला सोपे आहे/असते
मराठीवरच चर्चा चालू आहे तर व्याकरणपण संभाळणे बरे दिसेल असे वाटले
सव्या,
ते संभाळणे हा शब्द पण चुकीचाच आहे नै का?
सांभाळणे असे हवे ना?
मनु
तो नै शब्द 'नाही' बरा दिसला नसता का?
अरे वा!
एकमेकांच्या चुका काढण्यात कसले "निष्णात" आहेत सगळे!