डोन्ट "किल" टाईम व्हेन यु कान "स्पेंड" इट विथ हॉबीज....

Submitted by जाह्नवीके on 19 October, 2012 - 15:12

आई शाळेत असल्यापासून सांगायची की आपल्याला अभ्यासा व्यतिरिक्त काहीतरी छंद असलाच पाहिजे......तेव्हा आईचा मनातून खूप राग यायचा....वाटायचं की, हे बरं आहे हिचं....छंद म्हणून काहीतरी करत बसलं की म्हणणार, " चांगले उद्योग शोधलेत गणितं सोडवायची सोडून" आणि नाही काही केलं की म्हणणार छंद पाहिजेत..... एवढ्याशा जीवाने काय काय करायचं???
पण तिच्या म्हणण्याचा अर्थ आत्ता कळतोय....जेव्हा आपलं शिक्षण ज्यात झालं ते आणि त्याच्याशी निगडीत गोष्टी करता येत नाहीएत अशी परिस्थिती आहे. या डिपेन्डन्ट नावाच्या प्रकाराने न कधी कधी फार निराश व्हायला होतं.....असं वाटतं की आपणच का आपली नोकरी वगैरे सोडून आलो? हा नवरा का नाही थांबला तिकडेच?
पण परत डोक्यात विचार....आता आलोय ना.......मग पुढे बघा......मागे बघून पुढे चालणं शक्य नाहीये....खड्ड्यात पडायची लक्षणं.....हे ही आईचंच एक वाक्य!
या सगळ्याचा थोडक्यात अर्थ म्हणजे मला काही बाकीच्या मुलांसारखे छंद वर्ग वगैरे लावले नव्हते....लावले नव्हते म्हणजे मी बुडवले...... लावलेले... त्यामुळे आता जेव्हा घरात बसायची वेळ आली तेव्हा जरा दडपणच आलं की आता काय करायचं? फेसबुक वर असलं फालतू स्टेटस टाकायचं म्हणजे लाजच वाटत होती कारण "अशा" नवर्याबरोबर परदेशी जाऊन कसले तरी "घरी केलेली भेळ" किंवा "बटाटे वडे" असे फोटो टाकणाऱ्या मुलींची आम्ही तेव्हाच्या लग्न नं झालेल्या मुलींनी यथेच्छ टवाळकी केलेली होती......पण मग शेवटी करायला काहीच उरलं नाही तेव्हा कसबसं पोस्ट टाकली, " "

आणि मग काय......सुरुवात कमेंट्स ना.........या भारंभार कमेंट्स.........go on a shopping spree काय .....enjoy this time with husband काय, answer the question "what would I have done if" काय...

अस्सल पुणेरी भाषेत सांगायचं तर मनात म्हटलं, "आवरा यांना कुणीतरी....." वाट्टेल ते सांगतायत.....या सगळ्याने डोक्याला कशी चालना मिळणार? आणि अख्खा दिवस कसा घालवायचा?

मग शेवटी सगळी कडून "लॉग आउट" झाले आणि स्वतःच विचार करायला सुरुवात केली...म्हटलं, लहानपणी जरी आईकडून चित्र काढून वह्या पूर्ण केल्या असतील, शिवणाच्या परीक्षेचे लहान बाळाचे मोजे आणि स्वेटर जरी आईने विणला असेल आणि एक परीक्षा सोडून कधीच कुठला भरतकामाचा टाका आपण घातलेला नसेल तरी आई काय करायची ते बघितलं तर आहे नं? फिर वोही सही......
असं म्हणून कापड आणि सुई, रेशीम, रिंग वगैरे आणलं......जे जे दुकानात दिसेल ते उचललं अक्षरशः....... आणि त्यातून जे काही बाहेर पडलं त्याचे हे काही फोटोज.........
काही मैत्रिणींकडून सूचना आल्या की आम्ही ऑर्डर दिली तर बनवून देशील का ग? त्याबद्दल अजून विचार सुरु आहे कारण...........कारणं शोधावी तितकी आहेत.......
(१)
IMG_1173.JPG
(२)
IMG_1174.JPG
(३)
IMG_1175.JPG
(४)
IMG_1177.JPG
(५)
IMG_1178.JPG
(६)
IMG_1182.JPG
(७)
IMG_1188.JPG
(८)
IMG_1272.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच. तो हिरवा अन लाल ड्रेस पण तुम्हीच पुर्ण केला आहे का? येत नाही म्हणता चांगलाच जमलाय की. वेळ घालवायलाच नाही तर एकाग्रतेने मन रमवायला भरतकाम छान पर्याय आहे. डोक्यात फार विचार्/गुंता झाला की मी पण करते कधीतरी. असंच आपलं. इथे टाकण्याइतकं सुरेख वगैरे नाही. Happy

छान छान कला आहेत तुमच्या हातात...... कीप इट अप.....

या ज्या प्र चि टाकल्यात त्यांमधे जरा गॅप येऊ द्या व प्र चिंना क्रमांकही द्या....
कोणाला काही शंका असल्यास वा काही सुचवायचे असल्यास सोपे जाईल...

तुमचे सर्व छंद उत्तम आहेत, अनेक शुभेच्छा...

त्या तिसर्‍या प्र चि तल्या वस्तू कशाच्या केल्यात कळू शकेल का ??

मस्त. वेळ एकदम सत्कारणी लागला. आपल्या मायबोलीवर कितीतरीजण खूप छान छान छंद, कला जोपासताहेत, त्यात तुमचीही भर पडली आहे आता.

http://www.maayboli.com/node/38376 हे वाचलंत का? एका मायबोलीकरणीनं हौस म्हणून सुरवात करून किती मोठा पल्ला गाठलाय.

अतिशय सुंदर विचार.

मला मोकळा वेळ असला की तो उगीचच नेटवर टिपी करण्यात घालवला जातो. मायबोलीवर काहीच नवे आले नाही तरी रिफ्रेश करुन पाहण्यात टिपी केला जातो. छंद मलाही आहेत पण अशा वेळी ते आठवत नाहीत. Happy

पुरंदरे शशांक.......

तिसर्या प्र. चि. मधल्या वस्तू सिरेमिक मातीच्या आहेत.
आणि पुढच्या वेळपासून नक्की प्रा.चि. ना क्रमांक देत जाईन..
धन्यवाद..

सर्वांच्या प्रतिसादांसाठी खूप धन्यवाद.
या सर्व कलांचा उपयोग उद्योजक बनण्यासाठी करायचा विचार होता.. आणि मायबोली वरचा मराठी उद्योजक हा लेख वाचून तो अधिकच दृढ झाला.....तुमचे सर्वांचे प्रतिसाद वाचून आणखी हुरूप आलाय....
आता जर मला यात यश आले...तर पहिले धन्यवाद तुम्हाला..... Happy

नंदिनी....धन्यवाद..

मी आधीही २ कविता दिल्या आहेत दिवाळी अंकासाठी.....लेखांच्या किंवा साहित्याच्या संख्येवर काही बंधन नसेल तर....तुम्हाला खरच वाटतं का मी हा लेखही द्यावा असं???

नताशा....
धन्यवाद.... हो तो लाल आणि हिरवा ड्रेसही मीच पूर्ण केलाय. खरतर तो ड्रेस नाहीये...
मोठं कापड होतं.....ड्रेस म्हणून वापरता आला असता... Happy पण मी नंतर माझ्याकडच सगळं सामान संपलं तेव्हा त्याचीच बॅग केली Uhoh .....शेवटी त्याचा फोटो आहे....

Hats off!
Tumache itar 2 lekhahee mast aahet! Ekandareet chandansathee milalelaa veL kharokhar satkaraNee lagatoy!
Keep it up!

>> मग शेवटी सगळी कडून "लॉग आउट" झाले आणि स्वतःच विचार करायला सुरुवात केली...
हे बेस. नाही तर सगळीकडे नुसत्याच चकाट्या पिटण्यात किती वेळ निघून जातो पत्ता लागत नाही, आणि नंतर त्या वाया घालवलेल्या वेळाबद्दल फार वाईट वाटतं.
तुमच्या हातात कला आहे. मस्त जमल्या आहेत सगळ्याच गोष्टी. पुढच्या छंदिष्टपणासाठी शुभेच्छा! Happy

मग शेवटी सगळी कडून "लॉग आउट" झाले आणि स्वतःच विचार करायला सुरुवात केली...
हे बेस. नाही तर सगळीकडे नुसत्याच चकाट्या पिटण्यात किती वेळ निघून जातो पत्ता लागत नाही, आणि नंतर त्या वाया घालवलेल्या वेळाबद्दल फार वाईट वाटतं. > +१
बाकी कलाकुसर अप्रतिमच

भरतकाम, लक्ष्मणकाम... ही आपली कामं नव्हेत ह्याचा साक्षात्कार फार झटकन झाला. मुलासाठी झबलं शिवलं आणि पक्की खात्रीच झाली...
कुणी असं छानसं काही केलेलं बघितलं की अगदी मनापासून "वाह" जाते... सुंदर, जान्हवी...

जान्हवी...........मस्त !सगळ्याच वस्तू उत्तम पण भरतकाम खूप आवडलं.
अभ्यासा व्यतिरिक्त काहीतरी छंद असलाच पाहिजे......तुझ्या आईला +१००!
माझंही अधून मधून शिवण चालू असतं. परवाच उरलेल्या कापडात ही पर्सवजा पिशवी केली.

Photo0502.jpg

छान!

>>मला मोकळा वेळ असला की तो उगीचच नेटवर टिपी करण्यात घालवला जातो. मायबोलीवर काहीच नवे आले नाही तरी रिफ्रेश करुन पाहण्यात टिपी केला जातो. छंद मलाही आहेत पण अशा वेळी ते आठवत नाही>><<< +१००००००००००००००००००
Proud

मानुषी...

वाह्ह्ह....मला आता शिवणमशीन घ्यावच लागेल......जर काही तर्हा करायच्या असतील तर हाताने शिवण्यावर बन्धन येतात.....

Pages