अरविंद केजरीवालांचे आरोपसत्र

Submitted by एक प्रतिसादक on 17 October, 2012 - 13:39

सूचना :
===============================================================
१. आपण करत असलेले काम या बाफपेक्षा महत्वाचे आहे. ते आधी संपवावे.
२. आपली तब्येत या बाफपेक्षा महत्वाची आहे. रक्तदाब, साखर आणि कोलेस्ट्रॉल वाढेल असं काही करू नये. हे सर्व नियंत्रणात ठेवावे. डोक्टरांनी सांगितलेल्या सल्ल्याप्रमाणे विश्रांती घ्यावी.
३. सतत तीन तास कठोर परिश्रम करून भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाची सिद्धी प्राप्त केली आहे. या विषयावर आपला वेळ वाया घालवू नये.
================================================================

अरविंद केजरीवाल यांनी ऑक्टोबर महिन्यात धुळवड सुरू केली आहे. त्यांचे आरोप काँग्रेसवर होत असताना भाजपवाले खुषीत होते. आज भाजपवर आरोप होत असताना काँग्रेस खुषीत आहे. राष्ट्रवादी पक्ष भाजपला मदत करत असल्याचे दृश्य दिसत आहे. कल्पनेपलिकडचे सगळे घडत असताना भाजपने आता केजरीवाल यांच्यावर आरोप करायला सुरूवात केली आहे.

या आरोपांबद्दल काय वाटतं ? राजकिय व्यवस्था काय आहे हे सगळ्यांना माहीत आहे. केजरीवाल यांनी ते समोर आणले का ? भाजपवरचे आरोप लुटुपुटीचे आहेत का ? काँग्रेसवरच्या आरोपांबाबत ते कोर्टात जाणार का ? गडकरी संघाचे आणि केजरीवाल दमानियाही संघाचे, ही एक चाल असू शकेल का ? केजरीवालांचे हेतू काय असतील असं वाटतं ?

कि जे ते करताहेत त्याला वर दिलेले सगळे मुद्दे बाजूला ठेवून भारतातील बहुसंख्य जनतेचा मनातून पाठिंबा आहे ? तसं असेल तर नांदेडच्या निवडणुकीच्या निकालांचा अर्थ कसा लावायचा ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरुवातीच्या सूचनांचे पालन करतो. सध्या वेळ वाया न घालवता विश्रांति घेतो.
उद्या यावर विचार करता येईल.

सर्व भारताचा पाठींबा आहे. माबोसोडुन. माबोवरिल लोकांचा तसाहि भारताशी काहि संबंध नसतोच.

बाकि नंतर. पहिल्यांदा तथाकथित दिडशहाण्यांकडुन तारे तोडले जाउ देत.

भारतिय यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. पण आपण ही चर्चा उद्या चालूच ठेवणार आहोत. उद्या शेळीताई, मयेकर, उदयन, आंबा, ग्रेटथिंकर या सर्वांचीही मतं आपण जाणून घेणार आहोत. मी सर्वांना संधी देणार आहे. कुठेही जाऊ नका, वाचत रहा "अरविंद केजरीवाल यांचे आरोपसत्र "

>>गडकरींवरच्या आरोपांबद्दल आधी बोला. मी जातोय आधी भारतिय या (ख-या) आयडिकडे. भारतिय उत्तर द्या.
>>भारतिय यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. पण आपण ही चर्चा उद्या चालूच ठेवणार आहोत. उद्या >>शेळीताई, मयेकर, उदयन, आंबा, ग्रेटथिंकर या सर्वांचीही मतं आपण जाणून घेणार आहोत. मी सर्वांना संधी >>देणार आहे. कुठेही जाऊ नका, वाचत रहा "अरविंद केजरीवाल यांचे आरोपसत्र

बास बास शंकाच नको, तीच भाषा, तोच पवित्रा, तेच, इ. इ. Happy

असो, तुमच्या मुळ मुद्द्यावर बोलायचे झाले तर मुझे तो सब राजकारणी एक जैसे नजर आते हैं !
काही विटा दगडापेक्षा मऊ एवढेच !
आजवरच्या राजकारणात मला जे लोक चांगले वाटले ते खालील प्रमाणे, त्यांच्या बद्दल शंका घेताना हजारवेळा विचार केला पाहिजे. बाकी लोकांमधे काही फार राम नाही. लगेच मी दिलेल्या यादीवर चर्चा सुरू करू नये ही विनंती, त्यापेक्षा नि.वा. यांच्या मुद्द्यांवर चर्चा करावी.

१. स.वल्लभभाई पटेल
२. ला.ब.शास्त्री
३. नरसिंहराव
४. अ.वाजपेयी

अरविंद केजरीवाल यांचा प्रमुख हेतू हा सत्ताधारी आणि प्रमुख विरोधी पक्ष यांना लक्ष करुन आपल्या नविन पक्षाच्या पुढिल राजकीय वाटचाली साठी वातावरण निर्मिती करणे हा आहे.

शूद्र द रायझिंग या जातीव्यवस्थेवर भाष्य करणा-या चित्रपटासाठी चित्रपटगृहे मिळत नसल्याची तक्रार दिग्दर्शक संजय जैस्वाल यांनी केली आहे. या चित्रपटातील गाणी दाखवण्यास दूर्चित्रवाहिन्यांनी नकार दिला आहे. या चित्रपटाविरोधात कुठलेही आंदोलन झालेले नसताना त्याबाबतच्या भीतीचे कारण देण्यात आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी चित्रपत जिथे प्रदर्शित होईल तिथे बंदोबस्त देण्याचे मान्य केले आहे.

अनेक भिकार चित्रपटांना सिनेमागृह उपलब्ध करून देणा-या या व्यवस्थेने हा चित्रपट का नाकारला ? या सिनेमात शूद्र या नाडल्या गेलेल्या , सामाजिक भ्रष्टाचाराची शिकार बनलेल्या घटकाचे चित्रण केलेले आहे. शूद्र म्हणजे ब्राह्मण आणि वैश्य नसलेला घटक. बारा बलुतेदार म्हणजेच आजचे ओबीसी हे शूद्र होत. सामाजिक उतरंडीमधे ज्याला कोणतेही धार्मिक अधिकार नाहीत आणि उच्चवर्णियांची सेवा करण्याची ज्यांच्यावर सक्ती होतॉ असा हा घटक. शेतात धान्य पिकवणारे , लोखंडी औजारे बनवणारे, ला़कूडतोडे, वस्त्र विणनारे, केस कापणारे या सर्वांना आपल्या व्यवसायातून मोफत सेवा करावी लागत असे. वर्णव्यवस्थेतल्या या चौथ्या वर्णाला आज ओबीसी म्हणून ओळखले जाते. गावाबाहेरच्या आणि नर्णव्यवस्थेचा घटक नसलेल्या समाजाला अतिशूद्र हे नाव देण्यात आलेले आहे. काही दिवसांपासून अतिशूद्र म्हणजेच शूद्र असा समज करून देण्यात येत आहे. म्हणूनच शूद्र या वर्णाबाबत काहींच्या मनात गोंधळ आहे. सवर्ण म्हणजे खरे तर शूद्र. पण अर्थातच या सिनेमामधे नेमके काय आहे हे जाणून घेण्यासाठी तो प्रदर्शित होणं अत्यंत महत्वाचे आहे.

असीम त्रिवेदीच्या अभिब्यक्ती स्वातंत्र्याबद्दल गळे काढणा-यांनी आता या सामाजिक भ्रष्टाचाराबद्दल ठाम भूमिका घ्यायला हवीय. आरक्षण सारख्या सिनेमाच्या वेळी व्यक्त झालेली मतं पाहिली तर अशी मतं बाळगणा-यांचं आताचं मत जाणून घेण्यास उत्सुक आहे. केजरीवाल यांचे आंदोलन २४ X ७ दाखवणा-या मेडीयाकडे हीन अभिरुचीपूर्ण अल्ब्ममधील गाणी दाखवायला वेळ आहे पण इतक्या महत्वाच्या विषयावरच्या सिनेमाला प्रसिद्धी देण्यास त्यांच्या जीवावर येते आहे.

सामाजिक भ्रष्टाचाराचे हे एक उत्तम उदाहरण आहे. केवळ आर्थिक भ्रष्टाचारामुळे जनता त्रासली असेल तर मुलभूत हक्क अजूनही नाकारले जात असलेल्या आणखी एका समाजाला सामाजिक भ्रष्टाचारामुळे आपण या देशाचे नागरिक आहोत का असा प्रश्न पडणार नाही का ? या भ्रष्टाचाराबद्दल कुणीच काही बोलणार नाही. जेव्हा समाजाच्या सर्व थरात पैसा कमावता येऊ शकेल तेव्हाच त्यांना आर्थिक भ्रष्टाचाराचा चटका बसेल. शेअर बाजार म्हणजे काय , तो कोसळला म्हणजे काय झालं, कमोडीटी मार्केट म्हणजे काय, सेझ, जमीन संपादन याबाबत देशाच्या साधनसामग्रीची ३०% मालकी असलेली जनता आजही अनभिज्ञ आहे. त्यांना तसेच ठेवून लढा उभारण्याची भाषा करणं, सामाजिक व्यवस्था बदलण्याच्या भाषेला तोडून मोडून राजकिय व्यवस्था बदलण्याची भाषा करणं हे या आंदोलनामागील खरे हेतू आहेत. गेली साठ वर्षे या ना त्या कारणाने वंचित समाजाला न्याय्य हक्क नाकारत राहणा-या व्यवस्थेने नेहमीप्रमाणे काढलेला हा केजरीवालरुपी बायपास आहे.

देशाचा कायदा मंत्री हा आता एखाद्या गावगुंडाप्रमाणे विरोधकांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊ लागला आहे.

लोकसत्ता
कायदामंत्री खुर्शिद यांची केजरीवाल यांना धमकी
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली

फारुखाबाद लोकसभा मतदारसंघात जाऊन झाकीर हुसैन ट्रस्टमध्ये झालेल्या ७१ लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन करण्याची घोषणा करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना केंद्रीय विधी व न्यायमंत्री सलमान खुर्शिद यांनी मंगळवारी गर्भित धमकीच दिली. फारुखाबादमध्ये केजरीवाल येतील खरे, पण त्यांनी फारुखाबादमधून परतही जाऊन दाखवावे, असे धमकावताना आजवर आपण लेखणीने काम केले, पण आता रक्तानेही काम करू, असा इशारा खुर्शिद यांनी दिला.

केजरीवाल यांनी दिल्लीच्या संसद मार्गावरील आपले आंदोलन गुंडाळून येत्या १ नोव्हेंबरपासून फारुखाबाद येथे आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यावर बोलताना आपण विधी व न्यायमंत्री असल्याचे विसरून सलमान खुर्शिद यांनी सलमान खानच्या फिल्मी अंदाजात ‘दबंग’ प्रतिक्रिया व्यक्त केली. आवश्यकतेपेक्षा जास्त बोलण्याच्या सवयीमुळे खुर्शिद नव्याने अडचणीत आले आहेत. ही संधी साधून केजरीवाल यांनीही खुर्शिद यांच्यावर पलटवार केला. आपला जीव खुर्शिद यांच्या हाती नसून ईश्वराच्या हाती आहे. ईश्वरी इच्छेने आपल्या हातून होणारे कार्य पूर्ण झाल्याशिवाय आपण मरणार नाही. शिवाय एक अरविंद मेला तर शंभर अरविंद उभे होतील. कारण आता देश जागा झाला आहे, असे केजरीवाल म्हणाले. केजरीवाल यांना धमकी देणारे सलमान खुर्शिद हे देशाचे कायदामंत्री आहेत की माफिया डॉन, असा सवाल प्रशांत भूषण यांनी केला. आपल्या विधानामुळे वाद चिघळल्याचे लक्षात आल्यावर खुर्शिद यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आपल्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचा दावा खुर्शिद यांनी केला आहे. मात्र, अधूनमधून तोल सुटल्यासारखी विधाने करणाऱ्या खुर्शिद यांच्यामुळे सरकार आणि काँग्रेस पक्ष मात्र या नव्या वादामुळे अडचणीत आला आहे.

सामोपचार

तुम्ही गडकरींवरच्या आरोपांबद्दल एक अवाक्षरही बोलत नाही आहात. भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच असतो, मग तो ६० लाखांचा असो कि करोडो रुपयांचा असो. पण गडकरींवरच्या आरोपांचं "मोल" मोठं असताना ६० आणि ७० लाखाच्या आरोपावरून इतकं भावनिक होण्याचं कारण लक्षात येतंय. तुम्हाला गडकरींच्या भ्रष्टाचाराबद्दल सहानुभूती आहे का ? उत्तर द्या सामोपचार.

अजिबात नाही. तुमचे अगदी बरोबर आहे. भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच असतो, मग तो ६० लाखांचा असो कि करोडो रुपयांचा असो. गडकरींवरच्या आरोपांचीही चौकशी झालीच पाहीजे. एका छोट्या रेल्वे अपघातानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून ला.ब.शास्त्रीजींनी रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तोच कित्ता गडकरींनीही गिरवला पाहीजे. निर्दोष सुटले तर पद परत मिळेलच. नाही तर तुरुंग हवा.

देशाचा कायदा मंत्री एखाद्या गावगुंडाप्रमाणे विरोधकांना जीवे मारण्याच्या धमक्या देत असेल तर तो माणूस फार धोकादायक उदाहरण घालून देत आहे. खरे सांगायचे तर देशाचा जबाबदार आणि मतदान करणारा नागरीक म्हणून आता मला भीती वाटू लागली आहे.

सामोपचार तुमच्या विचारांना सलाम करून मी आता जातोय काँग्रेसवरच्या आरोपांकडे. काँग्रेसचे प्रतिनिधी अजूनही या बाफवर पोहोचलेले नाहीत. घेऊयात एक छोटासा ब्रेक.

रॉबर्ट वद्रांना पाठिशी घातल्याबद्दल हरियाणा सरकार प्रायश्चित्त घेणार का ? हे आरोप घेऊन काँग्रेस येत्या निवडणुकीत जनतेला सामोरी जाणार का ? छोट्या छोट्या पक्षांची नसलेली प्रकरणे बनवून त्यांच्यामागे सीबीआय चौकशीचा ससेमिरा लावून देणारं केंद्रातील सरकार राजकन्येची चौकशी करणार का ?

वाचत रहा अरविंद केजरीवालांचे आरोपसत्र. आपली मतं आम्हाला अवश्य कळवा.

>>सतत तीन तास कठोर परिश्रम करून भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाची सिद्धी प्राप्त केली आहे. <<
आता आणखी कांही तास कठोर परिश्रम करून केजरीवालांनी नेमके काय आरोप केले आहेत ते लेखात मुद्देसूद स्पष्ट करा. त्यानंतर वेळ दवडायचा का याचा विचार करता येईल.

कोळसा घोटाळ्यामूळे मागे लागलेल्या मिडीया, विरोधक आणि जनता यांचा आपल्या मागचा(काँग्रेज) पिछा सोडविण्यासाठी व लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठीच ह्या केजरीवालला, हा रॉबर्ट वढेरांचा घोटाळा बाहेर काढण्यासाठी काँग्रेजने सुपारी दिली असावी.

आवंतर.
सध्या एक ‘मेसेज’ फिरत आहे सगळीकडे तो असा - ‘जुन्या जमान्यातील सिनेमातील चोर, लफंगे, मवाली, स्मगलरांचे नाव ‘रॉबर्ट’ का होते ते आता समजले!’

केजरीवाल यांची काळजी वाटतेय. एक चांगला माणूस, व्यवस्थेचा बळी होताना दिसतोय.

खैरनार ते हजारे, सगळे याच मार्गाने गेले. जर कायद्याचे राज्य मानले / आरोपात तथ्य असले / कायद्याच्या कसोटीवर टिकतील असे पुरावे असले.. तर न्यायालयात असा दावा करणे योग्य झाले असते.
एकदा दावा झाल्यावर, तो लढवण्यासाठी / पाठिंबा मिळवण्यासाठी लोकांकडे जाता आले असते.

यातला एखादा दावा जरी खोटा असल्याचे सिद्ध झाले (केले) तरी केजरीवाल यांची विश्वासार्हत कमी होईल आणि मग आंदोलनावर परिणाम होईल.

न्यायालयात दावा करता येणार नाही. कायद्याच्या चौकटीत सगळे आलबेल आहे. लोकांना हे समजायला पाहीजे कि कुणाचं कसं साटंलोटं आहे. केजरीवालांचा हा प्रयत्न आहे. डीएलएफ, आयआरबी इ.

पण आयएसी ला एका मोठ्या उद्योगसमुहाचा आशिर्वाद असल्याचा समज आहे. प्रमोद महाजन दूरसंचारमंत्री असतानाचे प्रकरण केजरीवाल बाहेर काढतील का ? ते खरे गंभीर आरोप आहेत. आणि वद्रा सारखे किरकोळ आरोप करायची गरज नाहॉ. टू जी आणि कोलगेट रेटून धरले तर मोठं काम होईल.

कायद्याच्या चौकटीत आलबेल असेल तर आरोप करण्यात हशींल काय ?
भारतात कॉप्ट्रोलर अँड ऑडीटर जनरल ऑफ इंडीया, हे कार्यालय, सरकारी आस्थापनांचे नियमित ऑडीट करुन,
संसदेला रिपोर्ट देते. त्यातले ताशेरे, वर्तमानपत्रातील कोपर्‍यातल्या बातमीत येतात, आणि अर्थातच संसद तो अहवाल गुंडाळून ठेवते..... काही वर्षांनी, केजरीवाल यांचे पुढे काय झाले, असा प्रश्न आपल्याला पडू नये, हिच
शुभेच्छा !

>>काही वर्षांनी, केजरीवाल यांचे पुढे काय झाले, असा प्रश्न आपल्याला पडू नये, हिच शुभेच्छा !
मारूती कांबळेचं कायं झालं ???

गैरव्यवहारच जर कायद्याच्या चौकटीत बसवलेले असतील तर ? गडकरींच्या आणि वद्रांच्या केसमधे त्यांच्या पदाचा गैरवापर तर झालाच आहे. पण सिद्ध करणं मुश्कील आहे. सध्या जनतेच्या लक्षात यावं इतकाच माफक उद्देश आहे असं दिसतंय. जनतेला आरोप सिद्ध होण्यात काहीच इंट्रेस्ट नाही. लक्षात आलं तरी बस. शेवटी निवडणुकीसाठी त्याच कोर्टात जायचंय.

चाचा, गेंड्यांच्या कातडीचे आहेत हो हे लोक, आणि सामान्य लोक, विसरभोळे आहेत.
तूझे १५ कोटी तर माझे १५० कोटी... असले खेळ आहेत यांचे.
नाहीतरी कोळसा आला कि बोफोर्स विसरायचे, असेच सांगताहेत ना, साहेब !

दिनेशदा
याला उपाय दिसतो का ? कुठलीही व्यवस्था आणा. लोक तेच असतील तर लाईफ अजून मिझरेबल होऊन जाईल. तळागाळापर्यंत शिक्षण आणि जागृती याशिवाय पर्याय नाही.

अंबा

नवीन धागा काढा हे कदाचित मला उद्देशून असावे. माझी पोस्ट या धाग्यावर कदाचित असंबद्ध वाटत असली तरीही तशी ती नाही हे लक्षात यायला थोडं अवघड आहे. एका दूरदर्शन वाहिनीला ती विशिष्ट वर्गाच्या लोकांची आहे म्हणून केबल ऑपरेटर्स, डिश टीव्ही कंपन्या नकार देत आहेत. या सर्वांना झी सलाम सारखी वाहिनी चालते, उर्दू वाहिन्या चालतात पण दलितांची वाहिनी चालत नाही. हा मानसिक भ्रष्टाचार आहे. सामाजिक भ्रष्टाचार आहे.

या मानसिकतेतून काय होतं ?

निवडणुकीत हा आमचा, तो तुमचा. त्यांचा माणूस निवडून आला नाही पाहीजे ही भावना वाढीस लागते. म्हणून मग आपल्या माणसाला त्याच्या भ्रष्टाचारासहीत पोटात घेतले जाते. मतदान होते. भ्रष्ट लोकं निवडून येतात आणि दोष पुन्हा राज्यघटनेच्या माथी मारायला माध्यमं पुढे सरसावतात. सगळं ठाऊक असून हे घडत असतं. फक्त रोजच्या रोज त्याचा विसर पडावा म्हणून रोज काही तरी चुरचुरीत दिलं जातं. करमणूकप्रधान चर्चा केल्या जातात. आरोपांची नाटकं खेळली जातात. यात आपल्या लोकशाहीचा दोष नसून सामाजिक भ्रष्टाचार हा मूळ आहे. पण लक्षात कोण घेतो ?

खातेराव,
तुम्ही म्हणताय त्यात तथ्य जरूर आहे. पण याचा संदर्भ भ्रष्टाचार निर्मूलन, अन राजकारणी याच्याशी लागतो. केजरीवाल यांचा अजेंडा खरेच देश सुधारायचा आहे काय, या बेसिकबद्दलच मला शंका आहे, अन त्यामुळेच, हा बाफ फक्त त्यांनी केलेल्या आरोपांबद्दल कुणाला काय वाटते याबद्दलच रहावा असे वाटते.
तुम्ही सुरू केलेल्या चर्चेसाठी खरेच वेगळा बाफ आवश्यक आहे असे वाटते.

बिनआयडीचे खाते - कोणती दूरदर्शन वाहिनी? अधीक माहीति द्याल का?
चाचा - नांदेडची कोणती निवडणुक?
महेश - मारूती कांबळे कोण?

माझ्या नसलेल्या "GK" बद्दल क्षमस्व.

इब्लीस
तुमच्या पोस्टचा अर्थ मला कळाला नाही. क्षमस्व ! मला गुळमुळीत म्हणणं मांडता येत नाही. थेट असेल तर समोरच्याला समजते यावर माझा विश्वास आहे. भ्रष्टाचाराचं मूळ एकमेकांना सांभाळून घेण्यात आहे. त्यामागे काय मेकॅनिझम आहे यामागची माझी विचारसरणी मी मांडली आहे, कुणी सहमत असेल अथवा नाही हा वेगळा प्रश्न आहे. आपलीही तीच विचारसरणी असावी असं वाटतंय. असल्यास आनंद आहे. नसल्यासही आनंदच आहे.

भ्रष्टाचाराची जी सर्वात अचूक व्याख्या आहे त्याप्रमाणे भ्रष्टाचार हा मनात जन्म घेतो. ज्या व्यवस्थेचा पायाच मुळी सामाजिक भ्रष्ट आचारावर आधारलेला आहे तिथे भ्रष्टाचार निर्मूलनाचे स्वप्न हे दिवास्वप्न ठरण्याची शक्यता आहे. ही व्यवस्था आहे तशीच रहावी यासाठी प्रयत्न करणा-यांकडून भ्रष्टाचारविरोधी लढे उभारले जाणे यामागे काय हेतू आहेत यासाठी गुळमुळीतपणा सोडून थेट मुद्द्यावर बोलणे श्रेयस्कर आहे. बोटचेपेपणामुळे आपण कशालाच न्याय देऊ शकत नाही. किमान आपले म्हणणे चुकीचे असेल तर ते कुणीतरी दाखवून देईल !

सामाजिक उतरंडीच्या या व्यवस्थेत कुठलीही राजकिय व्यवस्था मग ती लोकशाहीची असो, हुकूमशाहीची असो, कम्युनिस्ट असो कि धार्मिक असो आपल्याच धार्मिक, जात समूहाकडे रहावे असे प्रत्येकाला वाटत असते. ही जातव्यवस्था आपल्या माणसाच्या गुन्ह्यांना संरक्षण देत असते. प्रसंगी कायदे वाकवत असते. ज्याची संख्या जास्त त्याच्याकडे सत्ता आणि म्हणूनच तो शिरजोर हे या सामाजिक व्यवस्थेचं अपत्य आहे. यातूनच असमान विकास होत असतो. हा ही भ्रष्टाचारच. प्रादेशिक असमानता हा ही भ्रष्टाचारच. यातून उभे राहणारे प्रश्न प्रचंड आहेत. ही असमानता दूर न करता प्रादेशिक विरुद्ध भूमिपुत्र असे वातावरण निर्माण करणे हे मूळ प्रश्नापासून भरकटणे होय. अमूक एका पक्षाचे सरकार सत्तेवर होते हे वरवरचे उत्तर असले तरी सर्वपक्षियांची या धोरणाला सहमती असते ती का ? याचे उत्तर पुन्हा या सामाजिक भ्रष्टाचारामधे दडलेले असल्याचे दिसते.

ही व्यवस्था मनात आणली तर एका क्षणात उलथवून लावता येते. ती कुठे शासनाच्या तिजोरीत नाही, संसदेत नाही, न्यायपालिकेत नाही तर आपल्या मनात , बुद्धीत आहे. म्हणून स्वतःमधे आमूलाग्र बदल घडवून आणणे हे व्यवस्था परिवर्तनाचे पहिले पाऊल आहे. ही काही कुठल्या एका विशिष्ट समूहाची विचारसरणी किंवा मक्तेदारी असू शकत नाही. तसं असून चालणारच नाही. आपल्या बुद्धीत अस्तिवात असलेल्या या सामाजिक भ्रष्टाचाराला फेकून दिलं तरच एकजिनसी समाज बनू शकेल. तसं झालं तरच लढे देण्यास अर्थ राहील. अन्यथा आनंदीआनंद आजही चालू आहेच.

Pages