देशाची तिजोरी

Submitted by शाबुत on 11 October, 2012 - 02:33

देशाचीच तिजोरी, जनतेचाच ठेवा।
खा तुम्ही मेवा आता, खा तुम्ही मेवा॥ धु॥

दारी आमच्या एकदाच, पाच वर्षांनी येता
सभा घेऊनी तुम्ही मारता, मोठ्या-मोठ्या बाता
जाहीरनामा निवडनुकीचा, नंतर खोटा का ठरावा ॥१॥

गरीब जनता रात्र-दिवस, करीतात कष्ट
तरी त्यांना खाण्यामिळते, उरलेले-उष्ट
हरामाचे खाऊन तुम्ही, शिरजोर का ठरावा ॥२॥

जनतेला लुटण्याचाच, करार तुम्ही केला
नोकरदार वर्ग झाला, महागाईने अर्धमेला
धोरणं ठरवुन श्रीमंताचाच, फायदा का करावा ॥३॥

गरीबांच्या गरजांचा कधी, विचार नाही केला
पिण्यास नाही पाणी, त्यांना देणार कोका-कोला
झोपडीत आला तो, झोपडीतच का मरावा ॥४॥

खुर्चीत बसता असते, तुमचे एक लक्ष
सरकार टिकवण्यासाठी असता, नेहमीच दक्ष
सगळ्या योजनामधे नेहमी, भष्टाचार का करावा ॥५॥

(देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा..........वर आधारीत.)

- श्यामराव

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली