कुणाला चायनीज भेळ आणि मनचाव सुप ची रेसीपी माहीत आहे का?

कुणाला झटपट चायनीज भेळ आणि मनचाव सुप ची रेसीपी माहीत आहे का?


Submit to kanokani.com

आपला प्रश्न इथे विचारा - http://www.maayboli.com/node/24273

माझी मुलगी ( वय ११) चायनीज भेळ अशी करते

फ्राईड नुडल्स, उभा चिरलेला कोबी, उभा चिरलेला कांदा, टॉमॅटो केचप, शेझवान मसाला ( चिन्ग्ज चं छोटं पाकिट बहुतेक ५ का १० रुपयाला पडतं ते ) हे सगळ ती एकत्र करते. शेझवान मसाला मात्र तिखट असतो, त्या मुळे बेताने घालावा. केचप मधे ती थोडं पाणी मिसळते.

लागतं मात्र छान...

मी इतर कुठेच चा. भेळ खाल्लीली नाही. त्या मुळे नक्की रेसेपी माहित नाही. वरील क्रुतीत काहीही बदल करायचा ठरवला की तिच्या चापट्या खाव्या लागतात आणि खुप बोलणं पण ऐकायला लागतं....त्या मुळे बदल करण्याची हिम्मत नाही....

बाकी मानचाव सुप घरी केलेलं नाही...कायम बाहेरच खाल्ले नाहीतर पाकीट आणुन त्याचे बनवले...