सेट टॉप बॉक्स

Submitted by मी अमि on 4 October, 2012 - 03:27

सेट टॉप बॉक्स सरकारने बंधनकारक केला आहे. आता आम्ही केबल वापरत आहोत. तर हा बॉक्स केबल ऑपरेटर कडूनच घ्यावा लागेल की तो बाहेरही विकत मिळतो. कोणत्या कंपनीचा सेट टॉप बॉक्स चांगला आहे?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही जो सर्व्हिस प्रोव्हायडर निवडाल, त्याच्याकडून सेट टॉप बॉक्स घ्यावा लागतो. बाजारात अंतिम ग्राहकाला नुसताच सेट टॉप बॉक्स घेऊन मग सर्व्हिस प्रोव्हायडर निवडायची सोय असल्याचे पाहिलेले नाही. (तसा विचारही डोक्यात आला नव्हता.)
हा सेट टॉप बॉक्स तुमच्या मालकीचा नसतो, हस्तांतरणीय = ट्रान्सफरेबलही नसतो. तुम्ही सर्व्हिस डिसकंटिन्यू करून घ्याल तेव्हा तो परत करायचा असतो. वर त्याच्यासाठी मोजलेले पैसेही रिफंडेबल नसतात.
ही माहिती टाटा स्कायशी बोलून आणि आमच्याकडच्या केबलवाल्याच्या करारपत्रातून मिळालेली आहे.

सेट टॉप बॉक्स प्रत्येकाला घ्यायला लागणार आहे का? की केबलवाल्याने त्याच्याकडे लावला की पुरेसे असणार आहे?

मध्यंतरी सर्विस प्रोव्हायडर बदलला तरीही सेट टॉप बॉक्स बदलावा लागणार नाही असा एक प्रयत्न झाल्याचे वाचले होते. त्याबद्दल कुणी सांगू शकेल का ?

शैलजा, सेट टॉप बॉक्स टीव्हीसेटला जोडायचाय. तेव्हा तो केबलवाल्याकडे नव्हे, तर प्रेक्षकाकडे असायला हवा. सध्या, म्हणजे ३१ ऑक्टोबरनंतर कंडिशनल अ‍ॅक्सेस चार महानगरांत अनिवार्य असेल. पुढच्या टप्प्यांत हे इतर शहरांतही लागू होईल. एका घरात एकापेक्षा जास्त टीव्ही सेट असतील तर त्यासाठी एक मल्टिटीव्ही सेट टॉप बॉक्स मिळतो.

इन-केबलवाल्यांच्या सेट टॉप बॉक्सचे पैसे रिफंडेबल आहेत असे दिसतेय.

खुली अर्थ व्यवस्था, ग्राहकाचे हित इ डांगोरा पिटला जात असताना ३१ अक्टोबर पुर्वी सेट टॉप बॉक्स लावण्याचा आग्रह म्हणजे काहितरी चुकतय अस वाटत नाही ?

चार प्रमुख शहरात आता डिजिटल प्रसारण होणार म्हणुन हा अनिवर्य बदल ग्राहकाच्या माथ्यावर मारला जातोय. आमच्या केबल ऑपरेटर्शी बोलल्यावर असे लक्षात आले की सर्वच केबल ऑपरेटर त्यांच्या ग्राहकांची संख्या लपवुन सरकारी टॅक्स चुकवत होते या साठी सरकारने हा उपाय काढला आहे म्हणे..

आता सेट टॉप बॉक्स अर्थात ग्राहकांची संख्या सरकारला समजणार आणि पर्यायाने जास्त टॅक्स जमा होणार. अर्थात लोकांचा पैसा प्रशासकीय कामात वापरुन कर जमा करण्याची नामी युक्ती सरकारने योजली आहे.

आपल्याला सेवा जरी केबलवाल्याकडुन जोडली गेली तरी महाग पडणार ( वाद या बाबत नाही ) सेट टॉप बॉक्स च्या अनिवार्य करण्याबाबत आहे.

जर काही वर्षे मागे गेलो तर रेडीओवरचे कर सरकारने मागे घेतले होते. ( माझ्या लहानपणी दरवर्षी पाच रुपये कर भरावा लागे )

जेव्हा एफ एम रेडीओ आला तेव्हा लोकांनी हळु हळु जसे आयुष्य संपेल तर रेडिओ बदलले. पण सरकारने आजही दोन्ही फ्रिक्वेन्सी चे प्रसारण सुरु ठेवले आहे. तसे आत्ता करणे शक्य आहे का ? असल्यास करायला हवे. जेव्हा सध्याच्या टीव्हीचे आयुष्य संपेल तेव्हा ( गरज असेल तर ) सेट टॉप बॉक्स इनबिल्ट असलेला टिव्ही लोक विकत घेतील.

वाहिन्यांनी जाहिरातीचा मारा करायचा. सरकारने कर लावायचा ही कसली दुरदर्शन सेवा ?
आणिबाणी च्या काळात तासातासाने ब्रेन वॉशिंग करण्यासाठी आणिबाणीला पुरक घोषणा, संवाद रेडीओवरुन लावायचे तसे आत्ता प्राईम ऑवर्स मध्ये दर तासाला एकाच वेळी सर्व वाहिन्यांवरुन सेट टॉप बॉक्स ची अनिवार्यता घोषीत करायची रित ही नागरीकांना ग्राहक न समजता वेठीला धरण्याची आहे.

मला आश्चर्य वाटते की अद्याप अजिबात विरोध न करता लोक पुढिल चर्चेला कसे लागले आहेत ?

अ‍ॅनेलॉग आणी डिजीटल प्रसारण चालु ठेवण्यात काही तांत्रिक अडचणी आहेत का ?

जर आहे तर लोकांनी याचा भुर्दंड का सहन करायचा ?

सेट टॉप बॉक्स डिजिटल ट्रान्समिशनसाठी आणि कंडिशनल अ‍ॅक्सेस(कॅस) साठी गरजेचा आहे. सध्या केबलवाला देतो ते सगळे चॅनेल्स आपल्याला घ्यावे लागतात. त्या सगळ्या चॅनेल्ससाठी पैसे मोजावे लागतात. कॅसअंतर्गत आपल्याला हवे तेच चॅनेल्स निवडून त्यापुरतेच पैसे बदलायचे स्वातंत्र्य मिळेल.

केबलवाल्यांनी टॅक्स बुडवण्याला पाठिंबा द्यावा असे म्हणणे आहे का?

. कॅसअंतर्गत आपल्याला हवे तेच चॅनेल्स निवडून त्यापुरतेच पैसे बदलायचे स्वातंत्र्य मिळेल>> हे जरा डिट्टेल सांगनार का? ही सुविधा असेल तर फारच उत्तम.
कारण चॅनेलवाइज पैसे नाहियेत सध्यातरी चॅनेलचे ग्रुप आहेत. त्यानुसार पैसे आहेत.

केबलवाल्यांनी टॅक्स बुडवण्याला पाठिंबा द्यावा असे म्हणणे आहे का?
भरतजी अजिबात नाही. माही भुमिका वर स्पष्ट आहे.

पण सेट टॉप बॉक्स लावल्यामुळे खरच ग्राहकाचा फायदा होणार आहे का ? दर महिन्याला किमान १० रुपये वाचणार आहेत का ? असे असेल तर ग्राहकाला भुर्दंड पडणार नाही. दरतासाला येणार्‍या जाहिरातीत सेट टॉप बॉक्स लावा अन्यथा टि.व्ही विसरा अशी धमकीच सरकार देत आहे. हे कोणत्या न्यायाला धरुन आहे ?

हम्म... केबलवाले कर भरत नसतील तर तो सरकारचा गलथानपणा आहे. ग्राहकांचा नाही.

असो, म्हणजे केबलवाल्याकडूनच सेट टॉप बॉक्स घेणे गरजेचे आहे असे दिसत आहे.

१) केबलवाले आपली ग्राहकसंख्या कमी दाखवतात. त्यामुळे सरकारकडे कर कमी जमा होतो, तसेच ब्रॉडकास्टर्सनाही पैसे कमी मिळतात. ग्राहकांचा फायदा होतोच असे नाही. खरी ग्राहकसंख्या कळली, सगळ्या ग्राहकांकडून येणारे पैसे ब्रॉडकास्टरपर्यंत पोचले, तर दर कमी करणे ब्रॉडकास्टर्सना शक्य व्हावे. शक्य झाले तरी ते करतीलच का?, हा भाग वेगळा.
२) कॅसमुळे चॅनेल्सच्या दरांत पारदर्शिता आली आहे. आधी आपल्या भागातला केबलवाला सांगायचा तोच दर द्यावा लागे. एकाच पॅकेजसाठी वेगवेगळ्या भागांत वेगवेगळे दर असल्याची उदाहरणे आहेत.
३) कॅस+ सेट टॉप बॉक्समुळे अधिक चांगल्या दर्जाचे प्रसारण मिळेल. वेगळ्या सेवाही (किंमत मोजून) मिळतील.
४) टाटा स्कायवर मेक माय प्लान असा पर्याय आहे, ज्यात सुटी सुटी चॅनेल्स निवडायची सोय आहे. पण यात दर महिन्याचे पैसे भरायला लागतात. शिवाय चॅनेल्सच्या गटाप्रमाणे पॅकेज घेणे सुटी चॅनेल्स निवडण्यापेक्षा प्रथमदर्शनी तरी स्वस्त भासते.
उदा: सगळ्यात जास्त दर स्पोर्ट्स चॅनेल्सचे असतात. आपण पहात असलेल्या स्पर्धा ज्या चॅनेलवर दाखवल्या जाणार आहेत, नेमकी ती चॅनेल्स त्या त्या वेळी/महिन्यात निवडली तर पैसे वाचू शकतात. आपल्या घरात नेहमी पाहिली जातात नेमकी तीच चॅनेल्स निवडून प्लान बनवला तर स्वस्त पडावे. पण हे कटकटीचे आहे.

सध्या तरी हवी तीच चॅनेल्स निवडण्याचे स्वातंत्र्य कागदावरच आहे असे म्हणावे लागते. पॅकेजेसच्या उतरंडीत प्रथम हिंदी आणि मग इंग्रजी चॅनेल्स आहेत. मला हिंदी न्युज चॅनेल्स न निवडता फक्त इंग्रजी न्युज चॅनेल्स निवडता येतील असा प्लान दिसलेला नाही.

सध्यातरी केबलवाल्यांचेच सगळ्यात जास्त नुकसान संभवीत असल्याने ते जुन्याच भावात सगळी चॅनेल्स दाखवण्याच्या तयारीत आहेत.

सेट टॉप बॉक्सचे पैसे रिफंडेबल नसावेत हे मात्र अन्यायकारक आहे. ते पैसे सेट टॉप बॉक्सची किंमत म्हणून नव्हे, तर इन्स्टॉलेशन चार्जेस म्हणून आकारले जातात. ग्राहकाने सर्व्हिस प्रोव्हायडर बदलायचे/सर्व्हिस बंद करायचे ठरवले, तर सेट टॉप बॉक्स कंपनी परत घेईल, तो दुसर्‍या ग्राहकाला वापरायला देईलच. मग संपूर्ण रक्कम नॉन रिफंडेबल का असावी? किंवा वर किरण यांनी म्हटल्याप्रमाणे ग्राहकाकडचा सेट टॉप बॉक्स कोणत्याही सर्व्हिस प्रोव्हायडरला चालायला हवा.

वर किरण यांनी म्हटल्याप्रमाणे ग्राहकाकडचा सेट टॉप बॉक्स कोणत्याही सर्व्हिस प्रोव्हायडरला चालायला हवा.>> +१.
ह्याच्यात देखील मोबाइलसारखे पोर्टिन्ग सुरु व्हावे. सेम सेट टॉप बॉक्स सर्वाम्साठी.
फक्त सर्व्हीस प्रोव्हायडर मी ठरवेन. बदलु शकेन. अस हवय खरतर.