हरबरा डाळीचे वडे

Submitted by वेब on 30 September, 2012 - 22:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य
१ किलो हरबरा डाळ
१० हिरव्या मिरच्या
दिड इंच आले
१/२ चमचा दालचीनी पूड
१ जुडी कोथिम्बिर

क्रमवार पाककृती: 

साहित्य
१ किलो हरबरा डाळ
१० मिरच्या
दिड इंच आले
१/२ चमचा दालचीनी पूड
१ जुडी कोथिम्बिर

हरबरा डाळ रात्री भीजत घाला. सकाळी ती अरतबोबडी (जरा जाडसर ) वाटा.
वाटताना त्यात आले ,हिरवी मिरची ,दलिचिनी किंचित , मीठ आणि भरपूर कोथिम्बिर घाला. लसुण चालेल . गणपतीचा प्रसाद असल्याने मी लसुण कांदा घातला नाही. प्रथम थोडा वेळ मंद आचेवर तलुन नंतर लालसर रंग येइपर्यंत वडे तळणे.
vade.gif

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्याच पद्धतीने छोते गोले करुन त्याचा गोल्याचा रस्सा बनवतो.कोल्हापुर मध्ये असा रस्सा बनवतात.असे वडे नुसतेच खायला खुप सुन्दर लागतात.

MSc ला NIV त असताना canteen मधे आमचा दाक्षिणात्य आचारी हा पदार्थ करायचा. त्याला बहुतेक ते जमायचे नाही. कारण त्याने केलेले वडे एकदम कडकडीत व्हायचे. तुटता तुटायचे नाहीत. नाश्त्याला हा पदार्थ असला आणि कुणी विचारल कि आज canteen मधे काय आहे तर आम्हि फिदीफिदी हसुन म्हणायचो "दगडी वडे!" Happy

Anyway, इथे सान्गितल्यप्रमाणे हा पदार्थ करुन बघायला हवा!