सुदिप मित्र सहकार करता.....

Ganesh 03.jpg

नमस्कार मायबोलीकर मंडळी,

आमच्या मंडळाची स्थापना १९६० साली असुन यंदाचे हे ४७ वे वर्ष होते. मंडळाची सुरुवात एका वाड्यातील लहानशा मंडळा पासून झाली, १९९४ साली कायमस्वरुपी ठेवण्यासाठी मोठी मुर्ती प्रसिद्ध शिल्पकार श्री. गोसावी ह्यांकडुन करवुन घेतली. तर आता त्या रस्त्यावरील केवळ सभासदांच्या वर्गणीवर चालणारे हे सगळ्यात मोठे मंडळ असावे. पुण्यामधे देख्याव्यातील यंत्रिक हालचाली, प्रकाशयोजना ह्यासाठी संगणकाचा वापर करणारे प्रथम मंडळ. त्यावर्षीचा देखावा होता २२ जुन १८९७ चाफेकर बंधुंनी रॅड चा केलेला वध. त्यावर्षी आम्हाला दोन पारितोषीके सुद्धा मिळाली होती. मागील दोन वर्षे सोसायटीच्या इमारतीच्या बाधकामामुळे देखावा करणे शक्य होत नव्हते तरीपण रोजच्या पुजा अर्चेमध्ये कोणताही खंड पडु दिला नव्हता.

मंडळा बद्दल आजुन लिहायचे होते पण तेवढा वेळ आज देऊ शकत नाही.

|| गणपती बाप्पा मोरया ||
|| पुढच्या वर्षी लवकर या ||