आला आला दुश्काळ माझ्या हिरव्या शेतात......

Submitted by आमीनचौहान on 23 September, 2012 - 04:39

आला आला दुश्काळ
माझ्या कोरड्या शेतात
माना टाकती रे पीक
अश्रु म्हातारया डोळ्यात

नाही पाणी गुरा ढोरा
नाही खाण्यास रे चारा
विनवणी करु करु
थकला जीव म्हातारा
ना काठीचा धाक चाले
ना चाले पुजा पाठ
तान्हेल्याले पाणी देणं
पुण्य आहे भलं मोठं

मला दिसतो रे फासा
खंगलेला जीवे देण्या
तू बरस पावसा
घाईकर जीव घेण्या
घाईकर जीव घेण्या

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जरा खयालावर अजून काव्यसन्स्कार व भाषासन्स्कार अत्यावश्यक !!

बाकी भावना म्हणाल तर तुमच्या मनात जशा उमटल्यात तश्शाच हुबेहूब पोचताय्त

धन्स
अन् पुलेशु !!
_______________________________

खाली एक लिन्क देतोय ............वाचून पहाच!..........;काही नाही सवयीप्रमाणे माझीच एक कविता देतो आहे !!
..........तुम्हाला नक्की आवडेल बघा ; शेवटी आपण दोघेही समदु:खीच आहोत ना !!

http://www.maayboli.com/node/36685

धन्यवाद

आपला समदु:खी
-वैवकु