करमरकर सुशाकाकू

Submitted by vilas naik on 14 September, 2012 - 21:14

सुशाकाकू
एक स्थूल व्यक्ती माझेकडे पहात होती. आमची पहिली भेट झाली. त्याला आता वीस पंचवीस वर्षे झाली असतील. ही आमची सुशाकाकू. अखंड बडबड, प्रेमाचा धबधबा.
सुशाकाकू सासवण्याची, एका मोठया इस्टेटीची मालक, एका सांस्कृतीक ठेव्याची वारसदार, बहादूर.
हातात ‘बाबा’ तंबाखूचा डबा. दर अध्र्या तासांनी त्यातला मावा दाढेखाली सरकवणार. कुणीही येओ सुरूवात अरेतुरेनीच होणार. वरती उत्तर तयार, ßमला मेल्या म्हातारीला सर्वच पोरासारखे मी कशाला त्याला मान देऊ?Þ
सुशाकाकू एका मोठया साम्राज्याची मालकीण. नवरा भारतीय सैन्यदलात उच्चपदस्थ अधिकारी. सासरा नावाजलेला शिल्पकार. भारतानी त्यांना डोक्यावर घेतलेलं. आमच्या पाचवीच्या पुस्तकात त्यांचा धडा. ते शिल्पकार कसे झाले त्याचा. अलिबागचे नाव वाचाल्यावर सर्वांना ते आमचे गावचे आहेत हे मी सांगायचो. पूढे तीस वर्षांनी त्याच घरात माझा शिरकाव झाला. मी सुशाकाकूचा आवडता होऊन गेलो. आजही कधीतरी जातो. त्या शिल्पांवरून हात फिरवतो. सुशाकाकू हक्कांनी कॉफी पाजते गप्पा रंगतात. वेळ कसा जातो ते समजतच नाही.
दारात एक कुत्रा अगदी तुम्हाला दचकवून सोडणारा पण तेही शिल्प म्हैस अगदी हुभेहूब. हात लावून पाहिले तरी कान हलवलेय अशा उगाचच भास होणारी. तीच्या बाजूला लंगोट लावलेला गुराखी मस्त खांद्यावर आडवी काठी टाकून शिळ घालणारा... तुम्ही लगेच दुसर्यातच दुनियेत जाता. हा चमत्कार त्या जादूर्इ बोटांचा. करमरकरांची ती करामत. पण सुन म्हणून तो वारसा जपणे सोपे नव्हते.
सुशाकाकूचं आयुष्य ‘हाय फाय’ सोसायटीत गेलेलं. त्यामुळे हाय प्रोफार्इल माणसांचा दिल्ली व कलकत्ता येथे राबता. अगदी इंदिरा गांधीचे पासून मदर तेरेसा पर्यंत सर्वांबरोबर गप्पा मारलेल्या. उत्तम इंग्रजी आणि गरीबातल्या गरीबासोबतसुद्धा नांदायची तयारी. त्यामुळे गावचा रस्ता पकडल्यावर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. मुलगा सुन अमेरीकेत. आजी इकडे निर्जिव आठवणींच्या दगड मातीच्या पुतळयात रमलेली.
आज अलिबागला येणारा पर्यटक किहीम समुद्राकडे वळल्यावर करमरकर शिल्पालयाला भेट देतोच. काकूही नटून थटून शाळा कॉलेजच्या मुलामुलींना माहिती द्यायला तयार असतातच. पर्यटकांच्या राबत्यामुळे एकांताचा प्रश्नच सुटला. गडयांनाही हालचाल करायला वाव मिळाला आणि गप्पांची हौसही भागवता आली.
मिस्टर असे पर्यंत खूप साथ होती. तेही कलाकार. घरामागच्या केळींचे बन असे काय रंगवले होते की, जेवणाच्या टेबलवर बसणार्याक पाहूण्याला बोटे तोंडात घालावी लागत.
जीन्यात एक तरूण कोळीण होती. हातात बोर्इट आणि कमरेवर मिच्छीची पाटी घेतलेली, ते सुरेख शिल्प खूप वर्षापूर्वीचे. त्याला अनेक मान सद्मान मिळाले. ती कोळीनही बरेच वर्षे होती. पहिला मजला तर प्रदर्शनासाठीच राखून ठेवलेला. भूतकाळात नेणार छानपैकी प्रतीकृती मांडून ठेवलेल्या करमरकर घराण्याचा इतिहास त्यातून नजरेत भरायचा. एकेका राष्ट्र पुरूषाचा इतिहासच त्या कलेतून बोलका झालेला.
सैनिकाची, सेनानीची बायको म्हणून काकू कुठेच कमी नव्हती. रात्री उशीरा काकांच्या छातीत दुरकू लागले. रात्री काकांना गाडीत घालून या बार्इने स्वत: गाडी चालवून हॉस्पीटलला दाखल केले. मला निरोप आला. मी सावरायचा प्रयत्न केला. डॉक्टरांनी शिकस्थ केली. पण मा÷या समोरच काकांची मान टाकली. मी प्रथमच कुणाचाही मृत्यू इतक्या जवळून पहात होतो. मला घाम फूटला. पण बार्इ धिराची. तिने स्वत:ला सावरले. त्या कठीण प्रसंगी सुशाकाकूंनी सर्व परिस्थिती हाताळली. लढावू वृत्ती तिच्या रक्तातच होती.
गेली वीस एक वर्षे काकू परिस्थितीशी झुंजते. पैशानी सर्वच प्रश्न सुटत नसतात. संपत्ती, नोकरचाकर, गाडी, माडी सर्व काही आहे. पण तरीही नातवंडे जवळ नाहीत. काकू त्यांच्या आठवणींनी गहीवरतात. पाण्यात पोहणार्याक माशांचे अश्रू कसे दिसणार? काकू नोकर चाकरांच्या सेवेत दिवस घलवतात. त्यांच्या सुनेच्या बाळंतपणात रमतात. खूप वाचतात, खूप बोलतात. पण खूप हरवतांत, संध्याकाळ खायला उठते. वैभव आठवते. गर्दीत दिवस जातो. शाळेच्या सहली उरकता उरकता संध्याकाळ होते. पण रात्रीचा काळोख त्यांचा शत्रू ठरतो.
माणसाने सर्वावर विजय मिळवला. सर्व रोगांवर औषधे काढली. पण मन त्याचा ठाव ठिकाणा कुणी शोधू शकला नाही.
कधीतरी सुशाकाकू येते. आम्ही त्यांचा पाया पडतो तरी बोलण्यात अरेतुरेच असते. अलिबागला त्या दवाखान्यासाठी नाहीतर खास खरेदी असेल तरच येतात. सर्वच डॉक्टर त्यांच्या प्रेमात. स्वभावामुळे आणि पुण्यार्इमुळे काकूला कुठेही अटकाव नाही. काकूही सरळ मनात शिरणार्याम. खरं खरं सांगून टाकणार. मुलांचं कौतुक करणार. त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत बोलणार, खेळणार. मुक्यालाही बोलके करणार.
कोण बोलते समाजात दिपस्थंभ नाहीत? सुशाकाकूंसारखे नंदादिप आहेतच की, त्यांना कुठल्या पुरस्काराची गरजच काय? हात न पसरता आणि अगतीक न होता सुशाकाकू वावरतेय. पैसा आहे तरिही गरीबांसोबत मायेने वागते. शिक्षण आहे तरी घमेंडी नाही. आजारांचे भांडवल नाही आणि व्यसनांची भीड भाड सुद्धा नाही. जीवन कसे जगायचे ते शिकवणारी सुशाकाकू आज स्वत:च एक चालतं बोलता इतिहास झालेय.
संग्रहालय झालेय.......
माणसाला हसताना पहाण्यासारखं सुख नाही. पण त्यापेक्षा दुसर्यालचे हसू पाहून स्वत:चे मन सुखी ठेवणाराच हा जीवन रथ योग्य मार्गाने ओढू शकतो. सुशाकाकू अशीच दुसर्याूच्या आनंदात सुख शोधणारी कलंदर बार्इ.
सुशाकाकूला ओरडताना तुम्ही पहाल पण दुसर्या्च क्षणी गहीवरून माफी मागतानाही तुम्ही अनुभवाल. गडयाचा मुलगा दहावी झाला तर पहिला काकूकडे धावत येणार, तीची समाधी तोडणार. काकूला बिलगणार. सोवळे कसलं? ती पेशवार्इ काकीनी केव्हाच सोडलेय. काकूसुद्धा पोराला गोड धोड देणार बक्षीस हातावर टेकणार. चार हत्तींचं बळ देणार. कोरडे आशिर्वाद देणारे बरेच असतात. मायेने पाठीवरून हात फिरवणारेही कमी नसतात. पण वेळ येर्इल तेव्हा पर्समध्ये हात घालायला धर्माचे औदार्य लागते. आणि समोरच्यावर विश्वास टाकायला धैर्यही लागते. औदार्य आणि धैर्य काकूच्या हातात हात घालून बागडतात. लोकांना व्यवहारी वाटणारी. फार अलीप्त वाटणारी, काकू म्हणजे सोनटक्याची बहार! मंद सुगंध पसरवणारी संध्याकाळ.
तुम्ही जीतके जवळ जाल तेव्हडे त्या मंद उजेडात स्वत:च प्रकाशमान व्हाल.
आता सुशाकाकू उरलेलं आयुष्य आनंदात घालवते. दुसर्यां च्या आंगण्यात फूलबाग फुलवते. रात्र झाली की मंदावते. जुने अल्बम काढते. फोटोवरून मायेने हात फिरवते. इंटरनेट चालू करते. नातीशी बोलते. स्वत:चंच समाधान करून घेते.....
शेवटी सांतवात प्रत्येकाला खुणावत असतेच-
क्षितीज जवळ भासते-
पैलतीर दिसायला लागतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगलं लिहिलं आहे. हिंमतीच्या एका नेक, प्रेमळ, स्त्रीची सुरेख ओळख.
कृपया लेखाचं नाव बदला. तसच अनेक ठिकाणी शब्दांमधे "र" आलाय (उदा. बाई - बार्इ), शब्दच चुकीचे टाईप झालेत इ. तुम्ही वापरत असलेल्या s/w ची करामतही असेल. पण वाचताना हे खटकतय.

आम्ही करमरकर शिल्पालयाला भेट झाली तेव्हा या काकुंना भेटलो होतो. काय पर्सनॅलिटी आहे त्यांची. आमचं थोडंफार बोलणं झालं होतं. आम्हालाही फारच छान वाटल्या काकु तुमच्या.